Monday, 8 July 2024

ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह' रोखण्यासाठी कडक कारवाई करावी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज, बार, रेस्टॉरंटवरही कारवाई करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई महानगरपालिका, पोलीस आयुक्तांना सूचना

 ड्रंक अॅण्ड ड्राइव्हरोखण्यासाठी कडक कारवाई करावी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्जबाररेस्टॉरंटवरही कारवाई करावी

       - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई महानगरपालिकापोलीस आयुक्तांना सूचना

          मुंबईदि. 8 : मुंबईतील ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्तेचौकवर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करून ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावीअशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाई करण्यात यावीअशी सूचनाही मुंबई महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.

            विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहन चालकांचे परवाना रद्द करण्यात यावेत. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्जबार आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी. पब्जबाररेस्टॉरन्ट चालू ठेवण्याची वेळध्वनिप्रदुषणाचे नियमआवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा सुरू राहणारे बारपब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावेअशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

            मद्य सेवन करुन वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावीअशी सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.

जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका

 _*🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴

नमस्कार मंडळी...

मी हरिदास जाधव मी गरवारे पॉलिस्टर लिमिटेड वाळूज औरंगाबाद मध्ये कामगार आहे मो नं  9922238922   आमच्या सासरेबुवाच्या पायाला ठेच लागलं कारण जखम झाली होती तर जालना येथील हॉस्पिटल मध्ये ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना शुगर असल्या कारण ती जखम बरी होत नव्हती डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिला होता तरीपण ती जखम बरी होण्याची गॅरंटी दिली नव्हती .हो..म्हणजे अपंगच झालं असतं


. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता एक पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व  रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि  आपले शारिरीक अवयव गमवु नये*.

*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका  आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.

 इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.


_पत्ता:-_

*वैद्य दत्तात्रय कदम*

*कदम उपचार केंद्र*

*Bank  of India शेजारी*

*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*

Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*

www.woundskadamupchar.com

_उपचार केंद्रची वेळ:-_

*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*

 

टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल

 मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल

-मंत्री दीपक केसरकर

मुंबईदि. 8 - मुंबईत रात्री मोठा पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या शीव आणि कुर्ला परिसरात दोन ठिकाणी पाणी साचलेले असून प्रशासनामार्फत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन तासात परिस्थिती सामान्य होईलअशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.

काल रात्री मोठा पाऊस झाल्याने मुंबईतील परिस्थितीबाबत निवेदन करण्याची सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली होती. त्यावेळी श्री. केसरकर यांनी सद्यस्थितीबाबत सभागृहात माहिती दिली.

पावसामुळे विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक बंद असून दोन तासात परिस्थिती सामान्य होईलअशी माहितीही त्यांनी दिली.

                            ००००

जे काही आहेः ते..........


 

देव आहे की नाही हे समजण्यासाठी हा व्हिडीओ पहा !

 🌹 देव आहे की नाही हे समजण्यासाठी हा व्हिडीओ पहा ! मध्यप्रदेशातील "देवास" जिल्ह्यातील "हाटपिलीया"नांवाच्या गांवात पुरातन काळातील भगवान विष्णूचे चौथा अवतार  "नरसिंह "देवाची दगडी मुर्ती असलेले मंदिर आहे . "जलझिलणी " एकादशीला दरवर्षी या मुर्तीला स्नान करण्यासाठी तेथील "भमोरी" नांवाच्या नदीत नेले जाते. पंडितांनी पुजाअर्चा केल्यानंतर ही साडेसात किलोची पाषाणमुर्ती पाण्यात सोडण्यात येते. आश्चर्य असे की, ही मुर्ती पाण्यात न बुडता वाहत्या पाण्याच्या विरुद्ध दिशेने परत सरळ त्या पंडिताजवळ येते. हा विलोभनीय नजारा पाहण्यासाठी देशभरातील हजारो भाविकभक्त येथे येतात .आपणसुद्धा हे क्षण पहा !!!🌹ओम विष्णवे नमः!🌹🙏🙏


Sunday, 7 July 2024

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

 वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ

 

मुंबईदि. 7 :  ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याचे, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आज सह्याद्री अतिथी गृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्लामहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगनमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारीतसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेतिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा रू.500/- चा भत्ता आता रु.1000/- इतका करण्यात आला आहेअसे त्यांनी सांगितले.

000


Saturday, 6 July 2024

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार पर्यावरण रक्षण,अन्न सुरक्षेसह विविध शाश्वत उपाययोजनांची दखल

 महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 

१५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार

पर्यावरण रक्षण,अन्न सुरक्षेसह विविध शाश्वत  उपाययोजनांची दखल

 

मुंबईदि.६ :-  १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील पर्यावरण रक्षणअन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात बांबू लागवडतृण धान्य- श्रीअन्न अभियान आणि औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर अशी क्रांतिकारी पावले उचलली आहेत. या पावलांमुळेच हा प्रतिष्ठेच्या मानांकित पुरस्कारावर महाराष्ट्राचे नाव कोरले गेल्याचे श्री पटेल यांनी नमूद केले आहे.

हा पुरस्कार १० जुलै रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १५ व्या कृषी नेतृत्व संमेलनात प्रदान केला जाईल. या संमेलनात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान तसेच ब्राझीलअल्जेरियानेदरलँडचे राजदूतमहाराष्ट्रयूपीहरियाणाहिमाचल प्रदेशनागालँड या राज्याचे  मंत्रीगण व इतर मान्यवर सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळणे प्रतिष्ठेचे अत्यंत समाधानाचे असल्याचे नमूद करून श्री. पटेल म्हणालेयुनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी तापमान वाढीचे युग संपले आहे. आता होरपळीचे युग सुरु झाले आहे. आता तातडीच्या प्रयत्नांची गरज आहेअशी जगातील कारभाऱ्यांना हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देणारे आणि त्यावर गांभीर्याने पावले उचलणारे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले नेतृत्व आहे. गुट्रेस यांनी दगडी कोळसा जाळणे थांबवा आणि वृक्षारोपणाची गती वाढवा असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने आता २१ लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर दगडी कोळसा जाळणे कमी व्हावे यासाठी कोळश्या ऐवजी पाच टक्के बायोमास वापरण्याचा निर्देश देणारे श्री. शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. गुट्रेस यांचा मानव जात वाचवण्याच्या हाकेला संवेदनशीलतेने प्रतिसाद देणाऱ्या त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे यांची या पुरस्कारासाठी दखल घेतली गेली आहे. जगात नव्हेकिमान देशात तरी अशी क्रांतिकारी पावले उचलणारे खरोखरच आपल्या मुख्यमंत्री पदासोबतच पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे निर्णय घेणारे श्री. शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक परिवर्तनकारी निर्णय घेतले आहेत. यात २१ लाख हेक्टर क्षेत्रावर देशातील सर्वात मोठे बांबू मिशन राबविण्याचा निर्णय आहे. यात नंदुरबार येथील धडगांव तालुक्यातील ७० गावच्या सरपंचांनी केंद्रीय फलोत्पादन सचिव प्रभातकूमार यांच्या समोरच आमचा प्रश्न बांबू लागवडीशिवाय सूटणार नाहीअशी मागणी केली. केंद्रानेही त्याला होकार दिला. या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पवार यांनी नंदूरबार जिल्ह्यातील एक लाख २० हजार एकर जमिनीमध्ये केंद्र आणि राज्य मिळून हरित पट्टा निर्माण करण्याचे जाहीर केले आहे.  या अभियानासाठी अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे.  याशिवाय सरकारने १२३ प्रकल्पांना मार्गी लावून सुमारे १७ लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करण्याचा चंग बांधला आहे.

नुकतात झालेल्या खरीप आढावा बैठकीत मायक्रो मिलेटचे उत्पादन वाढीसाठी पेरा आणि प्रत्यक्ष उत्पादन वाढीसाठी सर्व संबंधित यंत्रणांना आदेश दिले गेले आहेत. भारतातील पहिले मायक्रो मिलेट क्लस्टर लातूर जिल्ह्यात सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. 

पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा निर्णय घेणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे. याशिवाय लाखो शेतकऱ्यांना नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण करण्याची सुरवातही केली आहे. तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावाराळा-भुरका यांसह विविध तृणधान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करणारे महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरले आहे. या तृणधान्यांना एमएसपी देण्याचा निर्णयही महाराष्ट्राने घेतला आहे. नुकताच देशातील विविध सहा ( महाराष्ट्रासहराजस्थानम.प्रदेशगुजरातगोवा आणि दमण)  राज्यांच्या  रब्बी पिकांच्या हमी भावाच्या शिफारशीकरिता मुंबईत केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांच्या समोर झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे अशा बैठकीत उपस्थित राहिले. या दोघांनीही या बैठकीत ठोस अशी भूमिका मांडली. एमएसपी ठरवणाऱ्या बैठकीत आपल्या राज्याची भूमिका मांडणारे सत्तर वर्षातील एकमेव मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे यांचा उल्लेख केला जाईल. या शिवाय केंद्रीय कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षांनी आयोगांची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविला जाईलअसे सुतोवाच केले. हे केवळ मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमुळेच शक्य झाले आहेअसेही श्री. पटेल यांनी नमूद केले आहे. अन्न सुरक्षा आणि पर्यावरणाची काळजी या दोन्ही आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार काम करत आहे. त्यामागे मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा पुढाकार कारणीभूत आहे. अलिकडेच औष्णिक वीज केंद्रांनी बायोमास मध्ये बाबुंचाही वापर करावे असे निर्देश दिले गेले आहेत. यासाठी राज्यातील बांबु लागवडीचे मिशनही उपयुक्त ठरणार आहे. बांबू लागवडीसाठी हेक्टरी सात लाख रुपायंचे अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शिर्डी आणि मुंबईसह शक्य त्या सर्वच विमानतळांच्या ठिकाणी कार्बन फुटप्रिंट कमी करण्याकरिता पोलाद आणि अन्य धातुंच्या ऐवजी बांबुचा वापर करण्यावर भर देण्याचेही राज्य सरकारने धोरण आखले आहे.  या सगळ्याचा परिपाक म्हणूनच महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला आहे.

यापुर्वी हा पुरस्कार २०२३ मध्ये तामिळनाडुला२०२२ मध्ये  उत्तर प्रदेशला मिळाला होता. समितीचे विद्यमान अध्यक्ष न्या. सदाशिवम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश आहे.

आतापर्यंत हा पुरस्कार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहशिवराजसिंह चौहानज्येष्ठ नेते शरद पवारखासदार अखिलेश यादव तसेच  स्व. प्रकाशसिंह बादलस्व. वर्गीस कुरियनस्व. एमएस. स्वामिनाथन यांना दिला गेला आहे. अँग्रीकल्चर टुडेच्यावतीने या पुरस्कारांची सुरवात केली आहे. स्व. स्वामीनाथन यांनी दहा वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद भुषवलेले आहे. सध्या डॉ. एम. जे. खान या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मानव जातीवरील संकट ओळखूनतिला वाचवण्यासाठी जे निर्णय घेतले आहेतउपाययोजा केल्या आहेत. त्याबद्दल या तिघांचेही आणि महाराष्ट्राच्या या प्रयत्नांची दखल घेऊनत्याला पुरस्कार दिल्याबद्दल डॉ. खान यांचे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी आभार मानले आहेत.

00000

 


Featured post

Lakshvedhi