Wednesday, 3 July 2024

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश

 


सुधारित :

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश

– मंत्री दीपक केसरकर

            मुंबईदि. 2 : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्‌यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून  येत्या 30 जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोहोचतील. गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल याची काळजी घेण्यात आल्याची माहितीशालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.

            सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीचालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गणवेश उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारितील वस्त्रोद्योग कमिटीकडून गणवेशाच्या कापडाचे तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले.  त्यानुसार कापडाची खरेदी प्रक्रिया ई निविदा द्वारे राबविण्यात आली. त्यानंतर कापड पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली. पुरवठादारामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या कापडापासून विद्यार्थ्यांचे गणवेष शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थानिक महिला बचत गटांना देण्यात आले आहे. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

            राज्यात 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले. विदर्भात 30 जून पासून शाळा सुरु झाल्या. विद्यार्थ्यांना दोन्ही गणवेश विहित कालावधीत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 30 जुलैपर्यंत सर्व शाळांपर्यंत हे गणवेश पोहोचतील आणि प्रथमच येत्या स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतीलअशी माहितीही त्यांनी दिली. 

000

महाराष्ट्र सरकारची महाज्योती योजना

 जर आपल्या ग्रुप मधील कोणाच्या मुलाने किंवा मुलीने अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलेली असेल तर त्यांनी वरील जाहिरातीमधील फॉर्म भरावा त्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपयांचा एक मोफत टॅब मिळतो व त्या टॅब मध्ये दररोज अनलिमिटेड मोबाईल डाटा मिळतो त्या टॅबवर त्याला अकरावी सायन्स च्या सर्व विषयाचे ऑनलाइन क्लासेसचे मोफत मार्गदर्शन पण मिळते ही योजना महाराष्ट्र सरकारची महाज्योती योजना आहे


पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा

 पीक विमा योजनेसाठी

शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा

 

            मुंबई, दि. २ : पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी (CSC) केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा जास्त शुल्काची  मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर  संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

 

            मुंबईदि. 2 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

             ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून अधिकाधिक महिलांना सुलभपणे योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेतअसे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, यासंदर्भात विधानसभेत निवेदन ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती. ती 2 महिने करण्यात आली असून दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै, 2024 पासून दरमहा रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

            परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. रुपये अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील दुर्बल घटकातील अधिकाधिक महिलांना आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी

अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 

झालेल्या बैठकीत निर्णय

 

            मुंबईदि. २ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

            विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेमुख्य सचिव सुजाता सौनिकवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरामहिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते.

            योजनेसाठी नाव नोंदणीअर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.

            अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचालाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचापरराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईलअसा निर्णय यावेळी घेण्यात आला.

            अडीच लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

००००

विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

 विधानसभेत विश्वविजेत्या 

भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

 

            मुंबईदि. २ : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आज मर्यादित २० षटकांच्या विश्व करंडक स्पर्धेतील विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला होता.

             नुकत्याच पार पडलेल्या नवव्या मर्यादित २० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात बर्बाडोस  येथील किंग्सटन ओव्हल मैदानावर दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा भारताने पराभव केला. यावेळी कर्णधार रोहित शर्मासह क्रिकेट संघातील सर्वच खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

००००

चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार

 चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह 

सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार

- मंत्री उदय सामंत

             मुंबईदि. 2 : रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील चवदार तळ्यातील  पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 7 कोटी रुपयांचा असा एकूण 72 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. नवीन प्रस्तावानुसार चवदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतीलअसे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

             याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य बाळासाहेब थोरातविजय वडेट्टीवारनितीन राऊतअनिल देशमुखकिशोर जोरगेवार यांनीही यावेळी उपप्रश्न उपस्थित केले.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी सद्या ऑरगॅनिक बायोटेक या कंपनीकडून दरमहा मायक्रोबाएबल कल्चरचे मिश्रण तलावात सोडून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित असून अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोनवर आधारित प्रक्रिया करुन चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाला 15 दिवसात उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.

              महाड शहरातील चवदार तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल व दुरुस्ती नगरपरिषदेच्या स्व-निधीतून व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी प्रथमच शासकीय जयंती साजरी करण्यात आली असून तेथे स्मारक उभारणार असल्याची माहिती मंत्री श्री.सामंत यांनी सभागृहात दिली.

Featured post

Lakshvedhi