Thursday, 27 June 2024

एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

 एसआयएसी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास

२० जुलैपर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदि. २७ : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास प्रवेशासाठी २५ ऑगस्ट रोजी केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी १ जुलै ते २० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, २१ जुलैपर्यंत शुल्क चलन भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

            ऑनलाईन अर्ज करण्यासाठी siac.org.in मधील SIAC MUMBAI नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण सामाईक प्रवेश परीक्षा CET २०२४-२५ नोंदणीसाठीची लिंक मधील REGISTRATION NOW ला जाऊन प्रवेश अर्ज नोंदणी करावी. तसेच नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण २०२५ च्या अधिक माहिती siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे.

             केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावेयासाठी  दिलेल्या   मुदतवाढीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावाअसे आवाहन सामाईक प्रवेश परीक्षा समनव्यक संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांनी केले आहे.

            राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थामुंबई व सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिककोल्हापूरऔरंगाबादअमरावती व नागपूर तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रपुणेपिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणेअंबरनाथ नगरपालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्रअंबरनाथठाणे महानगर पालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थाठाणे ई. केंद्रामधील प्रवेश परिक्षेसाठी सन २०२४ च्या अंतिम वर्षात पदवीला बसलेले व यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि  जाहीरातीतील नमुद इतर अटी शतीर्ची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून  नागरी सेवा पूर्व परीक्षा निःशुल्क प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

             ही सुधारीत परीक्षा दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील सात (मुंबईपुणेकोल्हापूरनाशिकऔरंगाबादअमरावती व नागपूर) केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.

            याकरिता  उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची  मुदतवाढ १ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ या कालावधीत आणि दिनांक २१ जुलै २०२४ पर्यत परीक्षा शुल्क चलन भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

पोषण आहार प्रती लाभार्थी दरात वाढ करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री अन्नपूर्णादेवी यांची भेट

 पोषण आहार प्रती लाभार्थी दरात वाढ करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी

घेतली केंद्रीय मंत्री अन्नपूर्णादेवी यांची भेट

 

            मुंबई, दि. २७ : बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सहा वर्षाखालील लहान मुलांनागरोदर महिलांना स्तनदा मातांना  पोषण आहार दिला जातो. त्यासाठी प्रती लाभार्थी आठ रुपये मानधन देण्यात येतेत्यामध्ये वाढ करून १२ रुपये मानधन देण्यात यावे  अशी विनंती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा यांची भेट घेऊन विनंती केली.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, पोषण आहार प्रती लाभार्थी १२ रुपये  दरवाढ दिली तर  बालकांना चांगला आहार आणि बचतगटांना आर्थिक मदत होईल. तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात राज्य हिस्सा प्रमाणे  केंद्राचा हिस्सा मिळाला तर अंगणवाडी सेविकाच्या मानधनात वाढ करता येईल.

              विविध लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार ८४ अंगणवाडीची मागणी असून यासाठी  मान्यता देण्याबाबतचा  प्रस्तावही  केंद्रीय मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्याकडे  मंत्री तटकरे यांनी दिला. तसेच अंगणवाडीमध्ये सध्या जी वृद्धी सहनियंत्रण साधने ( Growth monitaring Devices)   वापरण्यात येत आहेत. ती जुन्या पद्धतीची असून आयआयटीने विकसित केलेले अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वृद्धी सहनियंत्रण साधने तातडीने  उपलब्ध करून देण्यात यावीत. या साधनांचा वापर केला तर कामामध्ये सुलभताअचूकता येईल आणि वेळेची बचतही होईल. महिलांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना निर्भया अंतर्गत केंद्र शासनाकडून जो निधी दिला जातो  तो तातडीने देण्यात यावा. अशी विनंतीही मंत्री कु. तटकरे यांनी केंद्रीय मंत्री यांना केली.

            नोकरीसाठी अनेक महिलांना त्यांचे घर सोडून नोकरीच्या ठिकाणी त्यांना राहावे लागते. अशावेळी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी  केंद्र शासनाच्या मिशन शक्ती उपक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागाकडून सखी निवास ही योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी विनंतीही मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्याकडे केली.

0000

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.६ टक्के वाढ अपेक्षित ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४’ सादर मुंबई, दि. 27 : ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला. या पाहणीच्या दुस-या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.६ टक्के वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ही 7.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक म्हणजे 13.9 टक्के इतका आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्याच्या ‘कृषि व संलग्न कार्ये’ क्षेत्रात 1.9 टक्के वाढ अपेक्षित असून, ‘उद्योग’ क्षेत्रात 7.6 टक्के वाढ आणि ‘सेवा’ क्षेत्रात 8.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन 2023-24 मध्ये सांकेतिक (नॉमिनल) (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 40,44,251 कोटी अपेक्षित आहे आणि वास्तविक (रिअल) (सन 2011-12 च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 24,10,898 कोटी अपेक्षित आहे. सन 2022-23 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 2,52,389 होते तर सन 2021-22 मध्ये ते 2,19,573 होते. सुधारित अंदाजानुसार सन २०२३ -२४ करिता राज्याची महसूली जमा ४,८६,११६ कोटी, तर सन २०२२-२३ करिता ४,०५,६७८ कोटी आहे. सुधारीत अंदाजानुसार सन २०२३-२४ करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे ३,९६,०५२ कोटी आणि ९०,०६४ कोटी आहे. सन २०२३-२४ मध्ये फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष महसूली जमा ३,७३,९२४ कोटी (सुधारित अंदाजाच्या ७६.९ टक्के आहे) सुधारित अंदाजानुसार सन २०२३-२४ करिता राज्याचा महसूली खर्च ५,०५,६४७ कोटी अपेक्षित असून सन २०२२-२३ करिता ४,०७,६१४ कोटी आहे.सन २०२३-२४ मध्ये फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष महसूली खर्च ३,३५,७६१ कोटी (सुधारित अंदाजाच्या ६६.४ टक्के ) आहे. सुधारित अंदाजानुसार सन २०२३-२४ करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा २५.९ टक्के असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा २३.० टक्के आहे. सन २०२३-२४ च्या सुधारित अंदाजानुसार राजकोषीय तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण २.८ टक्के,महसूली तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण ०.५ टक्के आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण १७.६ टक्के आहे. सन २०२३-२४ च्या सुधारित अंदाजानुसार राज्याचा वार्षिक योजनांवरील खर्च २,३१,६५१ कोटी असून त्यापैकी २०,१८८ कोटी जिल्हा वार्षिक योजनांवरील आहे. ३१ मार्च २०२३ रोजी राज्यातील अनुसूचित वाणिज्यीक बॅंकांच्या एकूण ठेवी आणि स्थूल कर्जे अनुक्रमे ३९.२३ लाख कोटी आणि ३८.६७ लाख कोटी होती. दि.३१ मार्च २०२३ रोजी राज्याचे कर्ज ठेवी प्रमाण ९८.६ टक्के होते. ३१ डिसेंबर २०२३ रोजी अखिल भारत स्तरावर अनुसूचित वाणिज्यिक बँकांच्या एकूण ठेवी (२२.० टक्के) व स्थूल कर्जे (२८.० टक्के) यामध्ये राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे. सेंद्रीय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर राज्य २७ टक्के हिश्श्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचायी योजना - प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत सन २०२२-२३ पर्यंत सुमारे १०.७६ लाख हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आले. सन २०२२-२३ मध्ये या योजनेअंतर्गत १,७३,०४३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५११.९८ कोटी अनुदान जमा करण्यात आले. राज्यात सन २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन सूक्ष्म सिंचन योजना सुरू झाल्यापासून मार्च, २०२४ पर्यंत ३,९५,४३३ शेतकऱ्यांना ५९३.१५ कोटी पुरक अनुदान वितरित करण्यात आले. सन २०२३-२४ मध्ये सप्टेंबर अनुसूचित वाणिज्यीक बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्याद्वारे ६०,१९५ कोटी पीककर्ज ९३,९२६ कोटी कृषिमुदत कर्ज वितरित करण्यात आले. सन २०२३-२४ पासून पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष ६,००० वार्षिक अतिरिक्त आर्थिक अनुदान देत आहे. सन २०२३-२४ मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील ९२.४३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात ५,२८५.२१ कोटी रक्कम जमा करण्यात आली. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये २७.३५ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ४३०.२४ कोटी व्याज सवलत अनुदान वितरीत करण्यात आले आणि सन २०२३-२४ मध्ये ११.२५ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ३६८ कोटी व्याज सवलत अनुदान वितरीत करण्यात आले. सन २०२२-२३ मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा १६ टक्के आहे. मार्च, २०२४ पर्यंत केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा सर्वाधिक (१९ टक्के) आहे. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये राज्य देशांत सर्वोच्च स्थानी राहिले आहे. नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयावतीने प्रकाशित करण्यात आलेला हा अहवाल मराठी व इंग्रजी मध्ये (1) https://mls.org.in (२) https://www.finance.maharashtra.gov.in (३) https://www.maharashtra.gov.in (4) https://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असून आर्थिक पाहणीच्या ठळक वैशिष्ट्यांची यादी सोबत जोडली आहे :- ०००

 राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.६ टक्के वाढ अपेक्षित

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४’ सादर

 

            मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४ चा अहवाल आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला. या पाहणीच्या दुस-या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.६ टक्के वाढ अपेक्षित आहेतर देशाच्या अर्थव्यवस्थेत ही  7.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा  सर्वाधिक  म्हणजे 13.9 टक्के इतका आहे.

            सन २०२३-२४ मध्ये राज्याच्या कृषि व संलग्न कार्ये’ क्षेत्रात 1.9 टक्के वाढ अपेक्षित असून, ‘उद्योग’ क्षेत्रात 7.6 टक्के वाढ आणि सेवा’ क्षेत्रात 8.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन 2023-24  मध्ये सांकेतिक (नॉमिनल) (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 40,44,251  कोटी अपेक्षित आहे आणि वास्तविक (रिअल) (सन 2011-12 च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न  24,10,898 कोटी अपेक्षित आहे. सन 2022-23 मध्ये  दरडोई राज्य उत्पन्न 2,52,389 होते तर सन 2021-22 मध्ये ते 2,19,573 होते.

                 सुधारित  अंदाजानुसार सन २०२३ -२४  करिता राज्याची महसूली जमा  ४,८६,११६  कोटीतर सन २०२२-२३ करिता ४,०५,६७८ कोटी आहे. सुधारीत अंदाजानुसार सन २०२३-२४ करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे  ३,९६,०५२  कोटी आणि  ९०,०६४  कोटी आहे. सन २०२३-२४ मध्ये फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष महसूली जमा ३,७३,९२४ कोटी (सुधारित अंदाजाच्या ७६.९ टक्के आहे)

            सुधारित  अंदाजानुसार सन २०२३-२४ करिता राज्याचा महसूली खर्च ५,०५,६४७ कोटी अपेक्षित असून सन २०२२-२३ करिता ४,०७,६१४ कोटी आहे.सन २०२३-२४ मध्ये फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष महसूली खर्च ३,३५,७६१ कोटी (सुधारित अंदाजाच्या ६६.४ टक्के ) आहे.

             सुधारित अंदाजानुसार सन २०२३-२४  करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा २५.९  टक्के असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा २३.०  टक्के आहे. सन २०२३-२४ च्या सुधारित अंदाजानुसार  राजकोषीय तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण २.८  टक्के,महसूली तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण ०.५ टक्के आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण १७.६ टक्के आहे.

            सन २०२३-२४ च्या सुधारित अंदाजानुसार राज्याचा  वार्षिक योजनांवरील खर्च २,३१,६५१ कोटी असून त्यापैकी २०,१८८ कोटी जिल्हा वार्षिक योजनांवरील आहे.

         ३१ मार्च २०२३ रोजी राज्यातील अनुसूचित वाणिज्यीक बॅंकांच्या एकूण ठेवी आणि स्थूल कर्जे अनुक्रमे ३९.२३ लाख कोटी आणि ३८.६७ लाख कोटी होती. दि.३१ मार्च २०२३ रोजी राज्याचे कर्ज ठेवी प्रमाण ९८.६ टक्के होते. ३१ डिसेंबर २०२३ रोजी  अखिल भारत स्तरावर अनुसूचित वाणिज्यिक बँकांच्या एकूण ठेवी (२२.० टक्के) व स्थूल कर्जे (२८.० टक्के) यामध्ये राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे.

            सेंद्रीय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर राज्य २७ टक्के हिश्श्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचायी योजना - प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत सन २०२२-२३ पर्यंत सुमारे १०.७६ लाख हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आले. सन २०२२-२३ मध्ये या योजनेअंतर्गत १,७३,०४३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५११.९८ कोटी अनुदान जमा करण्यात आले. राज्यात सन २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन सूक्ष्म सिंचन योजना सुरू झाल्यापासून मार्च२०२४ पर्यंत ३,९५,४३३ शेतकऱ्यांना  ५९३.१५ कोटी पुरक अनुदान वितरित करण्यात आले. सन २०२३-२४ मध्ये सप्टेंबर अनुसूचित वाणिज्यीक बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्याद्वारे ६०,१९५ कोटी पीककर्ज ९३,९२६ कोटी कृषिमुदत कर्ज वितरित करण्यात आले. सन २०२३-२४ पासून पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष ६,००० वार्षिक अतिरिक्त आर्थिक अनुदान देत आहे. सन २०२३-२४ मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील ९२.४३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात ५,२८५.२१ कोटी रक्कम जमा करण्यात आली. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये २७.३५ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना  ४३०.२४ कोटी व्याज सवलत अनुदान वितरीत करण्यात आले आणि सन २०२३-२४ मध्ये ११.२५ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ३६८ कोटी व्याज सवलत अनुदान वितरीत करण्यात आले.

            सन २०२२-२३ मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा १६ टक्के आहे. मार्च२०२४ पर्यंत केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा सर्वाधिक (१९ टक्के) आहे. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये राज्य देशांत सर्वोच्च स्थानी राहिले आहे.

             नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयावतीने प्रकाशित करण्यात आलेला हा अहवाल मराठी व इंग्रजी मध्ये  (1) https://mls.org.in (२) https://www.finance.maharashtra.gov.in           

(३) https://www.maharashtra.gov.in (4) https://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असून आर्थिक पाहणीच्या ठळक वैशिष्ट्यांची यादी सोबत जोडली आहे :-

०००

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

 ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मोहीम सुरू

             ठाणे दि. २७ : संपूर्ण महाराष्ट्र अमलीपदार्थ मुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पबबार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळामहाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्यातर हॉटेलपब्जबार असे मिळून 8 ठिकाणी तर 9  व शेडवर कारवाई करण्यात आली.

        पुणे शहरामध्ये तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशाप्रकारचे गैरप्रकार राज्यातील कुठल्याही शहरात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कठोर निर्णय घेवून राज्यात सर्व शहरातील अनधिकृत पब्जबार व अनधिकृत अमली पदार्थ विक्री केंद्रे नष्ट करावीत अशा सूचना दिल्या आहेतयाची सर्वत्र अंमलबजावणी सुरु आहे. ठाण्यात देखील प्रभागसमितीनिहाय असलेल्या पब्जबार आदींवर धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले असून त्यानुसार आजपासून प्रभागसमितीस्तरावर अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरू करण्यात आली.

            वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पंचशील बारइंडियन स्वाद बारअनधिकृत पानटपरीगुटखा विक्रेते यांचेवर कारवाई करण्यात आली.

            वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात असलेल्या द सिक्रेट बार व हुक्का पार्लर तसेच कोठारी कंपाऊंड येथे असलेल्या पबबारवर कारवाई करण्यात आली. याच परिसरातील सोशल हाऊस पब येथील अनधिकृत बांधकाम व अवैध पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

            लोकमान्य सावरकरनगर प्रभागसमिती अंतर्गत  ज्ञानेश्वरनगर राजश्री शाहू महाराज विद्यालय येथील 100 मीटर परिसरात असलेल्या तीन टपऱ्या सील करण्यात आल्यातसेच सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यालय येथील एक पानटपरी जप्त करण्यात आली.

            उथळसर प्रभाग समितीतील अनाधिकृत हॉटेलहुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली तर राबोडी येथील के.व्हिला शाळेपासून 100 मीटरच्या आतील पानटपऱ्या हटविण्याची कारवाई करण्यात आली.

            त्याचप्रमाणे माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोड येथील खुशी लेडीज बार व ओवळा येथील मयुरी लेडीज बारवर कारवाई करण्यात आली असून पोकलेन मशीनच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच चितळसर मानपाडासिनेवंडर परिसरातील अनधिकृत बारकापूरबावडी येथील स्वागत बारवर देखील कारवाई करण्यात आली. तसेच ए.पी.शहा कॉलेजजवळील अनधिकृत दिव्यांग स्टॉलची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले ते स्टॉल जप्त करण्यात आले.

            नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या अनधिकृत हॉटेलबारचे बांधकाम देखील जमीनदोस्त करण्यात आले.  कोपरी परिसरात दिव्यांग व्यक्तींना देण्यात आलेले स्टॉल तसेच अनधिकृत स्टॉल यांची तपासणी  करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणचे स्टॉल सीलबंद करण्यात कारवाई करण्यात आली. या ठिकाणची पाच दुकाने सील करण्यात आली आहेत.

            कळवा प्रभाग समितीमधील शाळा परिसरालगत 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपऱ्यांवर तसेच अनधिकृत बार यांच्यावर कारवाई करण्यात आली.

            दिवा प्रभागसमिती अंतर्गत संपूर्ण विभागाचा सर्व्हे करुन शाळांपासून 100 मीटर परिसरात असलेल्या पानटपऱ्या तसेच अनधिकृत हॉटेलबार यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली.

         प्रभागसमितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडेअतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 चे उपायुक्त  मनिष जोशीपरिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळेपरिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे, तसेच पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधवसहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या बंदोबस्तातमहापालिकेच्या सर्व प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

           महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत हॉटेलपब्जबार तसेच पानटपऱ्या पूर्णपणे निष्कसित होईपर्यत ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी दिली.

.....


*लीवर सही है या नही, यह जानने का एक सामान्य घरेलू टेस्ट ।।बहुत ही आसान सा एक मिनट का टेस्ट है, कीजिए और स्वस्थ रहिए।**

 *लीवर सही है या नही,  यह जानने का एक सामान्य घरेलू टेस्ट ।।बहुत ही आसान सा एक मिनट का टेस्ट है, कीजिए और स्वस्थ रहिए।**


Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक...?*

 *परत, परत, परत, परत वाचण्यासारखा अतिशय छान मेसेज.....*


*Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक...?*


घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. 


त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. 


त्यातील एकाने साधूला विचारलं, 

"साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. 


पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?"


साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले. 


साधू : "तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?"


पत्रकार : "येस !! का हो ?"


साधू :  "घरी कोण कोण असत?"


आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं.


कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.

 

तरी मूळ प्रश्नाचे "उत्तर" मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला. 


तो म्हणाला : "माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण !


सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत."


साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?"


(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला.)


साधू : "तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?"


पत्रकाराने राग आवरत सांगितलं

 : "बहुतेक एक महिना झाला असावा.


साधू : "तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ?


एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?"


(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)


तरी त्याने उत्तर दिले : "गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो"


साधू : "त्यावेळी किती दिवस एकत्र होता?"


पत्रकार (हळवा होत) : "तीन दिवस होतो"


साधू : "तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?"


(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला.)


साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ?"


वडिलांना विचारलं का ? की कसे आहात?

आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?"


(असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं).


साधू : "बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको.


तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते. 


तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही

Connection नाहीय. 


You are not connected to him. आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी "लगावं" असणं वेगळं. कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते. 


एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे, आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं... हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही...


तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही.


आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं. 


एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला. 


*आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतयं...*

आपण आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारी, सहकारी, समाज... सर्व फक्त contact मधे ठेवतो आणी गरज पडली की लगेच connection जोडतो...


सर्व एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही...


कसला संवाद नाही, कसल्या चर्चा नाहीत, सगळे स्वमग्न झालेत...!


आपण वरचेवर बदलत चाललोय...

हेच खरं आहे..!


इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळं विसरलं जातंय....


कुणाला जवळ करायचं, कधी जवळ करायचं, हे चांगलच समजायला लागलयं...


प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे...


गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगलीच जोपासली आहे...


वाटलं तर प्रतिसाद द्यायचा नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं व ठेवणीतलं ऊत्तर तयार ठेवायचं...!


*दाहक असलं...तरी सत्य हेच आहे...*


*संपर्क, संवाद वाढवणं, एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं म्हणजेच connection..*


वरील घटनेतील "साधू" म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले

 *स्वामी विवेकानंद होते.* 🙏🏻

पेराल तेच उगवेल

 लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये.

त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये.

त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.

त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.


तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते..

आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!

  "आपण एक दाणा पेरला असता, 

  आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? 


धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .


पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. 


आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.


अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? 


दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..,


आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!


          


             *"पेरणी चालू आहे.."*

          *काय पेरायच हे आपलं*

             *आपणच ठरवायच*    

  🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi