Thursday, 27 June 2024

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दूध दराबाबत महत्वाची बैठक

 पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली

 शनिवारी दूध दराबाबत महत्वाची बैठक

 

            मुंबई, दि. २७ : राज्याचे पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढीसंदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार २९ जून २०२४ रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे.

            या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधीदूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले.    

            या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. या बैठकीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांनी सांगितले.

0000


वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

 वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

 

            मुंबईदि. 27 : विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबईत प्रारंभ झाला.  विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ व जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.             विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपाध्यक्ष नरहरी झिरवाळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितगृहनिर्माण मंत्री अतुल सावेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेक्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील  मंत्री  तसेच विधानसभेचे सदस्य  उपस्थित होते.

निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश व्हावा

 निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचा

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश व्हावा  

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतली

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील यांची भेट

 

            मुंबईदि. २६ : जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई (PMKSY-AIBP) योजनेत होण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्लीत भेट घेतली.

            निम्न तापी प्रकल्प पाडळसे या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई  योजनेत होण्याबाबतच्या प्रस्तावास यापूर्वी केंद्रीय जल आयोगाने (CWC) इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स (Investment Clearance) दिलेले होते. असून या प्रकल्पाच्या टप्पा-१ चा समावेश या योजनेत होणेबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस केलेली आहे. आज झालेल्या बैठकीत याविषयी सकारात्मक चर्चा झाली. निम्न तापी (पाडळसे) प्रकल्पाबाबतची कार्यवाही पूर्ण करून (PMKSY-AIBP) या योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत लवकरच अंतिम मंजुरी देण्यासंदर्भात निर्देश मंत्री सी. आर. पाटील यांनी विभागाच्या सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिले.

            या बैठकीस जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव देबाश्री मुखर्जीजलसंधारण विभागाच्या सचिव  विनी महाजन तसेच जलशक्ती विभाग आयुक्त  ए. एस. गोयल उपस्थित होते.

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार

 धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य

            मुंबईदि. 26 :  मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून  ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडामहानगरपालिकाएमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बुधवारी दुपारी घाटकोपर भागातील असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली आणि त्याठिकाणी डोंगराला बसविण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप लांडेमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादारउपायुक्त देविदास क्षीरसागर, इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच हनुमान टेकडी येथे पाहणीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेयापूर्वी महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्व्हे करण्यास सांगितले होते. त्यानुसारमुंबईमध्ये एकूण ३१ दरड प्रवण क्षेत्र आहेत. त्यातील आज असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी येथे सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे त्यासाठी स्वीस तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे. खडकाच्या आतमध्ये आठ मीटर खोल इतके सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते. त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढणार आहे. मुंबईत सर्व ३१ ठिकाणी हे काम सुरू आहे. कोणत्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे.  दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे. त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

            मुख्यमंत्री म्हणाले की२००१ मध्ये याच हनुमान टेकडी येथे दरड कोसळल्याची घटना घडून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता अशा घटना मुंबई मध्ये कुठेच घडू नयेतयासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे मुंबई - पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्यातशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. त्यामुळेच याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. हजारो कुटुंबे याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फुलांनी स्वागत

            स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे पोहोचले. त्यावेळी दरड कोसळण्याच्या घटनांपासून संरक्षणासाठी ज्या सेफ्टी नेट बसवल्या आहेत. त्यामुळे जीवाचा धोका कमी झाल्याची भावना व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करीत सहृद स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचा चालत पायथा ते टेकडी थेट प्रवास

            असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे. हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत.पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंदनिमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्रमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली. 

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत

 विधान परिषदेच्या शिक्षकपदवीधर मतदारसंघ

निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत

 

             मुंबईदि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज सुरळितपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

            या मतदानाची ६ वाजेपर्यंतची आकेडवारी पुढीलप्रमाणे -

            कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची सायंकाळी ६ वाजेपर्यंतची टक्केवारी  ६३.०० टक्के इतकी आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ५६.०० टक्के इतकी आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वाजेपर्यंतची मतदानाची  टक्केवारी  ७५.०० इतकी आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ९३.४८ टक्के इतकी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी कळवले आहे.

००००

जनहितासाठी धाडसी निर्णय घेणारे सरकार

 जनहितासाठी धाडसी निर्णय घेणारे सरकार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई, दि. 26 : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला यांच्यासह समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न हे राज्य शासन करीत असून अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. मागील दोन वर्षात राज्यातील विविध पायाभूत सुविधांसह अन्य विकासकामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून जनतेच्या हितासाठी धाडसी निर्णय घेणारे हे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

            विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून (दि. 27 जून) सुरुवात होत आहे.  अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांत सुमारे 45 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिलाच निर्णय शेतकरी हिताचा घेतला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजना 2.0 सुरु करण्यात आलेली आहे. समृद्धी महामार्ग, मेट्रो, मुंबईतील रस्ते, कोस्टल रोड, अटल सेतू यासारखे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. वाढवण बंदर प्रकल्प गेम चेंजर ठरणार असून आजूबाजूच्या भागाचा विकास होईल. महिला व युवकांसाठी विविध योजना, शासन आपल्या दारी योजनेतून लाखो लोकांना फायदा देण्यात आला आहे.

            विदर्भासह राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यात उद्योगधंद्यांना पोषक वातावरण आहे. राज्य औद्योगिक क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे. सरकारी नोकऱ्या, पोलीस भरती मोठ्या प्रमाणात सुरु आहे, तर काहींना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहेत. राज्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेवून पुढे जात आहोत. मुंबईसारख्या शहरात जागतिक दर्जाचा 300 एकराचा सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम होणार नाही. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसह कॅशलेस सेवा सुद्धा देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  

विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वाकडे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून 87 प्रकल्प पूर्ण होत आले आहेत. वैधानिक विकास मंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचा हर घर जल या योजनेमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. गुंतवणुकीमध्ये राज्य आघाडीवर आहे. पुण्यातील पोर्शे घटना दुर्दैवी असून याबाबतीत राज्य शासनाने कडक भूमिका ठेवली आहे. ड्रग्ज व अमली पदार्थ विरोधी मोहीम धडकपणे राबविली जात आहे. पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राला बळ देणारे ठरेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दुर्बळ घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

            यंदाचे वर्ष छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आहे. राज्य शासन शाहू-फुले-आंबेडकर यांच्‍या विचाराने काम करीत आहे. दुर्बळ घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला राज्य शासन उत्तर देण्यास तयार आहे.

            पत्रकार परिषदेपूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. पवारमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलवनमंत्री सुधीर मुनगंटीवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितशालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरगृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेपाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईमंत्री हसन मुश्रीफमंत्री मंगलप्रभात लोढाग्राम विकास मंत्री गिरीश महाजनकृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळातील सदस्यवरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी ३१० मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता

 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी

३१० मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता

            मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा-२ मधून ३ हजार ९०९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून ३१० मिलियन डॉलर्सचे कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

             या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार कि.मी. रस्त्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.  त्यापैकी नियमित ७ हजार कि.मी. रस्ते कोणत्या जिल्ह्यात करायचे ते वाटप निश्चित केले आहे. 

-----०-----

Featured post

Lakshvedhi