Wednesday, 26 June 2024

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार

 धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य

            मुंबईदि. 26 :  मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून  ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडामहानगरपालिकाएमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बुधवारी दुपारी घाटकोपर भागातील असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली आणि त्याठिकाणी डोंगराला बसविण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप लांडेमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादारउपायुक्त देविदास क्षीरसागर, इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच हनुमान टेकडी येथे पाहणीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेयापूर्वी महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्व्हे करण्यास सांगितले होते. त्यानुसारमुंबईमध्ये एकूण ३१ दरड प्रवण क्षेत्र आहेत. त्यातील आज असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी येथे सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे त्यासाठी स्वीस तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे. खडकाच्या आतमध्ये आठ मीटर खोल इतके सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते. त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढणार आहे. मुंबईत सर्व ३१ ठिकाणी हे काम सुरू आहे. कोणत्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे.  दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे. त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

            मुख्यमंत्री म्हणाले की२००१ मध्ये याच हनुमान टेकडी येथे दरड कोसळल्याची घटना घडून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता अशा घटना मुंबई मध्ये कुठेच घडू नयेतयासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे मुंबई - पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्यातशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. त्यामुळेच याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. हजारो कुटुंबे याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फुलांनी स्वागत

            स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे पोहोचले. त्यावेळी दरड कोसळण्याच्या घटनांपासून संरक्षणासाठी ज्या सेफ्टी नेट बसवल्या आहेत. त्यामुळे जीवाचा धोका कमी झाल्याची भावना व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करीत सहृद स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचा चालत पायथा ते टेकडी थेट प्रवास

            असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे. हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत.पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंदनिमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्रमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली. 

0000

विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांचा 27 जून रोजी निरोप समारंभ

 विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांचा

27 जून रोजी निरोप समारंभ

           

            मुंबईदि. 26 : महाराष्ट्र विधानपरिषदेतील 21 जून 2024 रोजी पाच सदस्य निवृत्त झाले आहेत. निवृत्त झालेल्या सदस्यांचा निरोप समारंभ गुरुवार 27 जून रोजी दुपारी 3.00 वाजता विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

            विधानपरिषद सदस्य सुरेश धसप्रवीण पोटे - पाटीलरामदास आंबटकरनरेंद्र दराडेविप्लव बाजोरिया हे 21 जून रोजी निवृत्त झाले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तसेच दोन्ही सभागृहांचे सदस्यही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 39 टक्के मतदान

 विधानपरिषद शिक्षकपदवीधर मतदारसंघाच्या

द्वैवार्षिक निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत 

सरासरी 39 टक्के मतदान

 

             मुंबईदि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  द्वैवार्षिक निवडणुकीसाठीचे  मतदान आज होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३९ टक्के मतदान झाले आहे.

            कोकण पदवीधर मतदारसंघातील एकूण मतदार संख्या २,२३,४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या ७९,६४१ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी  ३५.६५ इतकी आहे.

            मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १,२०,७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या ४६,३७५ इतकी आहे. दुपारी  १  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ३८.३९ इतकी आहे

            मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५,८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या ६,४११  इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची  टक्केवारी  ४०.४८ इतकी आहे

            नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९,३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या ३०,१५६ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ४३.४७ इतकी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

राज्यपालांच्या उपस्थितीत युरोप दिन साजरा युरोपमधील देशांनी विद्यापीठांमध्ये भारतविषयक अभ्यासक्रम राबवावे

 राज्यपालांच्या उपस्थितीत युरोप दिन साजरा

युरोपमधील देशांनी विद्यापीठांमध्ये भारतविषयक अभ्यासक्रम राबवावे

- राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबई, दि.२६ : भारत व युरोपीय देशांचे संबंध अनेक शतकांपासून चालत आले आहेत. भारतीय राज्यघटनेत अनेक युरोपीय देशांच्या राज्यघटनांची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.  भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असून युरोपीय  राष्ट्रांनी उद्योगव्यापाराशिवाय आता भारतातील आणि विशेषतः राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे, आपल्या विद्यापीठांमध्ये भारतविषयक अभ्यासक्रम राबवावेत असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

            राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २५) मुंबई येथे 'युरोप दिवससाजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. 

            'द काउंसिल ऑफ युरोपियन युनियन (ईयू) चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया'तर्फे या भारत - युरोप व्यापार वृद्धीसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे युरोप दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            राज्यपाल श्री. बैस म्हणाले, भारत आज जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणूनही उदयास आले आहे. वाढती वृद्ध लोकसंख्या असलेले जगातील प्रगत देश त्यांच्या कुशल मनुष्यबळाच्या गरजेसाठी भारताकडे पाहत आहेत. भारतात कार्यरत असलेल्या युरोपीय कंपन्यांनी युवकांच्या कौशल्यवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावल्यास त्याचा फायदा भारताइतकाच युरोपियन देशांनाही होणार आहे. 

            विद्यापीठांशी सहकार्य वाढवताना युरोपमधील देशांनी आपापल्या विद्यापीठांमध्ये 'इंडॉलॉजीसारखे अभ्यासक्रम राबवावे तसेच संस्कृत भाषेसह हिंदी व इतर भारतीय भाषांच्या अध्ययन - अध्यापनाला चालना द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करुन राज्यपाल श्री.बैस म्हणाले,   भारतीय स्वातंत्र्य चळवळ फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्यसमानता आणि बंधुता’ या ब्रीद वाक्याने प्रेरित होती. देशाच्या राज्यघटनेने ब्रिटिशआयरिशफ्रेंचजर्मन आणि इतर राज्यघटनांमधूनही काही वैशिष्ट्ये घेतली आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांनी तसेच सामायिक मूल्यांनी भारत युरोपियन राष्ट्रांशी जोडले आहे. भिन्न राष्ट्रे, परस्पर सीमा व मतभेदांवर मात करून समान ध्येयांसाठी कसे एकत्र काम करू शकतात याचे युरोपियन संघ उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            आज युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याचप्रमाणे भारत देखील युरोपियन युनियनसाठी नववा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवले असून देशाची अर्थव्यवस्था चांगल्या गतीने वाढत आहे. त्यामुळे आपले आर्थिक संबंध अधिक दृढ आणि सुधारण्यासाठी सध्याची योग्य वेळ आहेअसे राज्यपालांनी नमूद केले.

            भारत आणि युरोपियन संघ यांच्यात 'मुक्त व्यापार करारकरण्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. या करारामुळे व्यापारातील अडचणी कमी करण्यात मदत होईल आणि वस्तूसेवा आणि गुंतवणुकीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल. युरोपमधील देशांना भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता युरोपीय देशांमधून देखील अधिकाधिक पर्यटक भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत भारतीय चित्रपट उद्योगाच्या शक्तीचा पर्यटन वाढविण्यासाठी उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले. 

            दरवर्षी भारतात भव्य 'युरोपियन युनियनसांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे. तसेच 'नमस्ते इंडियाआणि 'महाराष्ट्र महोत्सवहे कार्यक्रम युरोपियन युनियन देशांमध्येही आयोजित करावे, असे राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले.

            युरोपियन युनियन देशांच्या ४५०० कंपन्या भारतात कार्यरत असून त्या एकूण ६० लाख लोकांना रोजगार देत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात भारत - युरोपियन युनियन संबंध अधिक दृढ होतीलअसा विश्वास अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर यांनी व्यक्त केला. युरोपियन युनियन चेम्बर्सचे अध्यक्ष पियुष कौशिक यांनी चेम्बर्सच्या कार्याची माहिती दिली, तर संचालिका डॉ. रेणू शोम यांनी आभार प्रदर्शन केले.  

            कार्यक्रमाला चित्रपट निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरायुरोपियन युनियन चेम्बर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जी यांसह व्यापार व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor presides over Europe Day Celebrations

            Mumbai 26 : Maharashtra Governor Ramesh Bais presided over the Europe Day celebrations organised by the Council of European Union (EU) Chambers of Commerce in India at Hotel Taj Mahal Palace Mumbai on Tue (25 Jun). The Chamber founded in 1992 promotes trade and economic relations between India and EU countries.

            Stating that India's relations with European Union countries date back to several centuries, Governor Ramesh Bais called for enhancing inter university collaboration between universities in EU countries and those in Maharashtra. He expressed the need to promote Indology and Sanskrit studies in EU universities. 

            Addl Chief Secretary Manisha Mhaiskar, Film Director and Producer Rakeysh Omprakash Mehra, President of EU Chambers Piyush Kaushik, Vice President Robin Banerjee, Director Dr Renu Shome and Consuls and trade representatives of various countries were present.

०००

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अकरा वाजेपर्यतची मतदान आकडेवारी

 विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या

द्वैवार्षिक निवडणुकीची अकरा वाजेपर्यतची मतदान आकडेवारी


             मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंतची आकेडवारी पुढीलप्रमाणे -


            कोकण पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या २,२३,४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या ४५,०१० इतकी आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २०.१५ इतकी आहे.


            मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १,२०,७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या ३२६२२ इतकी आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २७.०१ इतकी आहे


            मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५,८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या २,९०० इतकी आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी १८.३० इतकी आहे


            नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९,३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या १६,०६९ इतकी आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २३.१६ इतकी आहे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी कळवले आहे.


0000

नमो माये

 


विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु

 विधानपरिषद शिक्षकपदवीधर मतदारसंघाच्या

द्वैवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु

 

            मुंबईदि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. 

            सकाळी सात ते नऊ वाजेपर्यत झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे - कोकण पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या २२३४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या १६३२० इतकी आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ७.३० इतकी आहे.

            मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १२०७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या १२६३५ इतकी आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी १०.४६ इतकी आहे

            मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या ११८८ इतकी आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ७.५० इतकी आहे

            नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या ६१८२ इतकी आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ८.९१  इतकी आहे.

००००

Featured post

Lakshvedhi