Monday, 24 June 2024

भंडारा जिल्ह्यातील ५४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन जल पर्यटनच्या वाढीव विकास आराखड्यास मंजुरी देणार

 भंडारा जिल्ह्यातील ५४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

जल पर्यटनच्या वाढीव विकास आराखड्यास मंजुरी देणार

 - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            भंडारा, दि. 24 :- राज्य शासन सर्व सामान्यांचे व शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंर्तगत  केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा असे बारा हजार रुपयेसानुग्रह अनुदान व धानाला सातशे रुपये बोनस देणारे हे पहिले सरकार आहे. आता  ५४७ कोटी रुपये खर्च करून भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. 102 कोटी रुपये खर्च करुन जल पर्यटन सुरु होत आहे.  यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

        भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील जल पर्यटनासोबतच ५४७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वैनगंगा जलाशयातील जल पर्यटनाच्या वाढीव आराखड्यास मान्यता देण्याचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त (तीन एप्रिल )  सार्वजनिक सुट्टी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

         यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकरपोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजेजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व पोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते.

         जलपर्यटन केंद्राचा प्रथम टप्पाभूमिगत गटार योजनाअमृत योजने अंतर्गत भंडारा आणि पवनी येथील तलाव सौंदर्यीकरणनगरोत्थान अभियानाअंतर्गत रस्ते बांधकामभंडारा व पवनी नगर परिषद अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनांची कामेजिल्हा नियोजन समिती अंतर्गत भंडारा व पवनी नगर परिषदमध्ये विविध विकासकामेजिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे विविध सुविधासार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध कामे या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला.

         विकास कामांमुळे भंडारा जिल्ह्याला पर्यटकांची पहिली पसंती मिळणार आहे. जल पर्यटनाचा सध्याच्या 102 कोटी रुपयांचा आरखडा 200 कोटी रुपयांचा करावा, अशी मागणी आमदार श्री. भोंडेकर यांनी आपल्या भाषणात केली होती. यावर वाढीव विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

         ५४७ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या विकास कामामुळे भंडारा जिल्ह्यात पर्यटन विकासासोबतच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, असे आमदार श्री. भोंडेकर यांनी सांगितले.           भूमिपूजनातील विशेष उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे जलपर्यटन प्रकल्प होय. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार निर्मिती होईलच पण भंडारा जिल्हा भारताच्या नकाशावर अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी व्यक्त केला.

जलपर्यटन प्रकल्पाची वैशिष्ट्ये

            भंडारा येथील मौंदी येथे असलेला हा जल प्रकल्प जागतिक दर्जाचा आहे. भंडारा जिल्ह्यातील जलपर्यटन प्रकल्पात नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्रपर्यटकांसाठी आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उच्च दर्जाचे उपहारगृहपर्यटकांना पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नाविन्यपूर्ण कृत्रिम तलावपर्यटकांसाठी  विविध सुविधाजलतरण तलावमाहिती केंद्रकॉन्फरन्स हॉलव्यवस्थापक आणि कर्मचारी निवास तरंगती जेट्टी वाहनतळ यांचा समावेश असेल.

0000000

*बारिश 🌨️का पाणी 💧 जमा करणे का आफ्रिका देश का अनोखा तरिका...*

 *बारिश 🌨️का पाणी 💧 जमा करणे का आफ्रिका देश का अनोखा तरिका...*

बॅरिस्टर माजी मुख्यमंत्री यांच्यप कार्याला सलाम

राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत

 राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी

विद्यार्थ्यांनी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत

            मुंबईदि. 24 : विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात आपले करिअर करता यावे तसेच रोजगारक्षम संस्थांना कौशल्याधिष्ठीत मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (MSSU) माध्यमातून विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जून 2024 पर्यंत अर्ज  करावेतअसे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून केले आहे.

            महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. अभियांत्रिकीव्यवस्थापनतंत्रज्ञान आणि इतर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याचे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या विद्यापीठात बीबीएपदव्युत्तर पदवीसायबर सिक्युरिटीमध्ये व बांधकामातील मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीआर्टिफिशियल इंटेलिजन्सइंटरनेट ऑफ थिंग्ज इत्यादी अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांसाठी 30 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत देण्यात आली असून 1 जुलै 2024 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेतअसेही कुलगुरू डॉ. पालकर 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून सांगितले आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवारदि. 25बुधवार दि. 26 आणि गुरूवार दि. 27 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे, तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 26 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मतदार यादी व मतदान केंद्रासंदर्भात माहितीसाठी हेल्पलाइन उपलब्ध मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४

 मतदार यादी व मतदान केंद्रासंदर्भात 

माहितीसाठी हेल्पलाइन उपलब्ध

मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४

            मुंबई, दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार, २६ जून२०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी

हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

            मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक तसेच 022 69403398 आणि 022 69403396 हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या हेल्पलाइनद्वारे मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे निवडणूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.

            सोमवार १ जुलै२०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया आगरी कोळी संस्कृती भवनसेक्टर-२४. नेरुळ (पश्चिम)नवी मुंबई येथे पार पडणार आहे.

-----000------

बोटीला कोणतेही नुकसान नाही गोसीखुर्द जलाशय भूमीपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तूस्थिती

 बोटीला कोणतेही नुकसान नाही

गोसीखुर्द जलाशय भूमीपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तूस्थिती

            भंडारा, दि. 24 : भंडारा जिल्हा येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसीखुर्द या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री श्री.शिंदे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आठ जण होते. तर दुसऱ्या बोटीमध्ये पत्रकार होते. या बोटीचे वाहक गोविंद खवणेकर होते.

            बोट सफर करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रतिकात्मक म्हणून  स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री बोट चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली. मात्र, पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व पत्रकारांचे वजन पुढील एका बाजूस झाल्यामुळे बोटीचा पुढचा भाग थोडासा पाण्यात गेला. बोट एका बाजूला गेल्यामुळे बोटीतील बसण्याचा भाग जो बोटीला स्क्रूने फिट केलेला असतो तो ओढला गेला व सोफासेट पाण्यात पडला. घटनेमध्ये प्रसंगावधान राखून बोटीचे चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोट मध्ये बसवले आणि बोट पूर्ववत झाली.

            त्यादरम्यान या कार्यक्रमासाठी महामंडळाद्वारे सुरक्षेसाठी जेटस्की आणि जिल्हा प्रशासनातर्फे रेस्क्यू टीम तैनात केली होती. ते सर्व काही क्षणात आले आणि पत्रकारांना कार्यक्रम स्थळी नेले. या घटनेच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः घटनाग्रस्त बोटीकडे गेले आणि त्यांनी निश्चित केले की बोट आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. कोणतीही व्यक्ती पाण्यात पडली नाही. बोटीला कोणतेही नुकसान झालेले नाही. सबब घटनेनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त ‘बोटीचे तुकडे झालेबोट बुडाली’ हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे डॉ.सारंग कुलकर्णी, महाव्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक, एमटीडीसी यांनी कळवले आहे.

००००

स्वस्त दरात औषधेमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी

2 जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार

- जितेंद्र भोळे

             मुंबईदि. 24 : महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून 11 सदस्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड करण्यासाठी द्विवार्षिक निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळेउपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश शरद शिंदेअवर सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सीमा सचिव तांबे यांच्याकडे 2 जुलै 2024 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कक्ष क्रमांक 122, पहिला मजलाविधान भवनबॅकबे रेक्लमेशनमुंबई – 400032 येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल.

            नामनिर्देशन पत्रांची छाननी 3 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता विधानभवनबॅकबे रेक्लमेशनमुंबई येथे करण्यात येईल. तसेच उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवारांकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्यांच्या निवडणूक एजंटला या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या कार्यालयात 5 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल.

            त्याचप्रमाणेनिवडणूक लढविली गेल्यास 12 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईलअसे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी

            त्याचप्रमाणेनिवडणूक लढविली गेल्यास 12 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईलअसे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi