Thursday, 23 May 2024

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात?

 दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात?


आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून लगेच निघू नये  मंदिरात काही वेळ बसायला पाहिजे.


परंतु तुम्हाला माहिती आहे का

 या परंपरेमागचं मूळ कारण काय आहे?

आजकाल काही लोकं दर्शनाला जातात आणि वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पायऱ्यांवर बसतात आणि तिथं बसून व्यावसायिक किंवा राजकीय चर्चा सुद्धा करतात.

परंतु ही प्राचीन_परंपरा एका विशिष्ट उद्देशासाठी बनवली गेली होती. वास्तविक पाहता आपण सर्वांनी दर्शन घेऊन निघताना किं श्लोक म्हणायला हवा, जो आजकाल बहुतांश लोकांना माहित नाही.


आपल्या माहितीसाठी तो श्लोक सांगत आहे तुम्ही नक्की वाचा व इतरांनाही सांगा


श्लोक पुढीलप्रमाणे:-


*अनायासेन मरणम्, विना देन्येन जीवनम् ।*

*देहांते तव सानिध्यम्, देहि मे परमेश्वरम् ।।*


या श्लोकाचा अर्थ असा आहे की,


*अनायासेन_मरणम्*

अर्थात, माझा मृत्यू कोणत्याही पिडे विना म्हणजे त्रासदायक अवस्थेत होऊ नये आणि मी कधीही आजारी होऊन, एका जागेवर पडून त्रासदायक अवस्थेत कष्ट उचलून होऊ नये. माझा मृत्यू अगदी चालत-फिरत असतानाच्या अवस्थेत व्हावा.


*विना_देन्येन_जीवनम्*

अर्थात, माझं जीवन हे सक्तीचं जीवन नसावं, म्हणजे मला कधी कोणाच्या आश्रयाची आवश्यकता पडू नये. जसं की अर्धांगवायू झाल्यानंतर माणूस इतरांवर अवलंबून राहतो, तसं माझं जीवन लाचार बनू नये आणि ईश्वराच्या कृपेने माझं आयुष्य विना भिक्षेचं निघून जावं.


*देहांते_तव_सानिध्यम्*

अर्थात, मला जेव्हा पण मृत्यू येवो तेव्हा तो मी परमेश्वराच्या समोर असतानाच येवो. जसं पितामह भीष्म यांच्या मृत्यूवेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले होते आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतरच भीष्मांचा मृत्यू झाला होता.


*देहि_मे_परमेश्वरम्* अर्थात हे परमेश्वरा मला असं वरदान दे. (वरीलप्रमाणे जे मागितलं आहे ते)


प्रार्थना करताना वरीलप्रमाणे करा आणि लक्षात ठेवा की देवाकडे धन-दौलत, गाडी-बंगला वगैरे मागू नये. कारण त्या व्यक्तीच्या कर्तृत्वानुसार हे त्याला मिळत असते. आपल्याला आपल्या पात्रतेनुसारच देत असतो. यामुळे देव दर्शनानंतर अशीच प्रार्थना करा. आणि ही प्रार्थना आहे, याचना नाही हे लक्षात ठेवा. याचना ही सांसारिक गोष्टींसाठी असते, जसं की धन, घर, व्यापार, नोकरी, संतती सांसारिक सुख किंवा अन्य गोष्टी ही आहे याचना.

प्रार्थना म्हणजे निवेदन....

*🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!🚩*

Wednesday, 22 May 2024

मोफत उपचार २जुन

 


नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान द्यावे

 नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी

राज्याच्या विकासात योगदान द्यावे

राज्यपाल रमेश बैस

 

            सातारा दि. 22 : प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नवनवीन संकल्पना राबवून राज्याच्या विकासात योगदान द्यावेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            महाबळेश्वर येथे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज्यपाल यांच्या सहसचिव श्वेता सिंघलजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेखअप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे ,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलालउपवनसंरक्षक आदिती भरद्वाजजलसंपदा विभागाचे अरुण नाईकजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपेनिवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

            सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पउपक्रम यांचा सखोल आढावा घेत असताना राज्यपाल श्री. बैस यांनी शिक्षणआरोग्यपर्यटन विकासबांबू लागवड अदीविषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास यासाठी राबविण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूल या उपक्रमाबाबत माहिती घेत असताना श्री. बैस यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची वर्गवारी ही उपलब्ध पायाभूत सुविधांच्या आधारे करत असतानाच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारेही करावी. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करावे. त्यासाठी शाळांच्या स्पर्धा  आयोजित कराव्यात. ज्या शाळा चांगली कामगिरी करतील त्यांना शासनामार्फत पुरस्कार देण्यात यावेतअसे सांगितले.

            या उपक्रमाबाबत बारकाईने जाणून घेत असताना त्यांनी मॉडेल स्कूलच्या निर्मितीसाठी येणारा खर्चजिल्ह्यातील एक शिक्षकी शाळांची संख्याशाळांमध्ये प्रयोगशाळासंगणक लॅबची उपलब्धता आदींबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचा दर्जा तपासणी नियमितपणे व्हावी व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे मध्यान्ह भोजन मिळेल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  सध्याच्या काळात मुलांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. मैदानी खेळांमधील सहभाग कमी झाला आहे. त्यामुळे शाळांमध्ये मुलांच्या क्रीडा विकासावर जाणीवपूर्वक भर देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

            जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एकात्मिक धार्मिकऐतिहासिकपर्यावरण पूरक पर्यटन विकास आराखडा राबविण्यात येत असून यामधून किल्ल्यांचा विकास करत असताना अर्काइव्हलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची मदत घेण्यात यावीअशी सूचना राज्यपाल श्री. बैस यांनी केली. जिल्ह्यातील प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत असलेल्या बांबू लागवडीचा आढावा घेत असताना श्री. बैस म्हणालेबाजारपेठेच्या दृष्टीने किफायतशीर ठरणाऱ्या बांबूच्या प्रजातींची लागवड करावी. बांबूपासून असंख्य प्रकारच्या वस्तू तयार करण्यात येतात. याचे व्यावसायिक प्रशिक्षण स्थानिकांना देऊन त्यांचा उत्पन्न स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना फळ रोपेशेवगा यासारखी रोपे मोफत उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांनी या रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे व त्यापासून मिळणारे उत्पन्न हे शेतकऱ्यांनाच देण्यात यावे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी उजाड माळराने आहेत. त्या ठिकाणी अशाप्रकारे वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.

            जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर दगड उपलब्ध आहेत अशा वेळी एखादी अंगणवाडी संपूर्णतः दगडी बांधकामाची अशी तयार करण्यात यावी. जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर टसर सिल्क प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना सिल्क धागा तयार करण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यात यावे. बांबूपासूनही धागा तयार करण्याच्या दृष्टीने प्रकल्प राबवावेतअशा सूचना राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी दिल्या.

            या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्याचा संपूर्ण आढावा सादर केला. यामध्ये जिल्ह्यात राबविण्यात येत असणारा मॉडेल स्कूल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच स्मार्ट पीएचसी ,जिल्ह्याचा एकात्मिक धार्मिकऐतिहासिकपर्यावरण पूरक पर्यटन विकास आराखडाबांबू लागवड उपक्रमअभिनव अंगणवाडीटसर सिल्क उत्पादन प्रकल्पआदींबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.

0000

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा सुरू

 इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा सुरू

 

            मुंबईदि. २२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.  

            या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. : ७३८७४००९७०९०१११८४२४२८४२११५०५२८८२६३८७६८९६८३६९०२१९४४८८२८४२६७२२९८८१४१८२३६९३५९९७८३१५७३८७६४७९०२ आणि ९०११३०२९९७

            भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतीलयाची विद्यार्थीपालक यांनी नोंद घ्यावीअसे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

         मुंबई, दि. 22 : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

          भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसाशांती व करुणेची शिकवण व्यक्तींनासमाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक आहे. आज ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे.

          बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो व सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतोअसे राज्यपाल श्री. बैस यानी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

 

Maharashtra Governor greets people on Buddha Pournima

 

              Mumbai, 22nd May : The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people on the occasion of Buddha Pournima. In his message, the Governor has said:

               “Bhagwan Buddha's teachings of non-violence, peace and compassion have always guided mankind, societies and nations on the path of righteousness. These teaching are more relevant today than ever. I offer my pranams to Bhagwan Buddha and extend my heartiest greetings to the people on the auspicious occasion of Buddha Pournima.”

0000

 

आरोग्य मित्र

 


*आरती केल्यावर स्वतःभोवती गोल फिरण्याचे काय आहे महत्व ?*

 *आरती केल्यावर स्वतःभोवती गोल फिरण्याचे काय आहे महत्व ?*  


*आपण सगळेच वेगवेगळ्या प्रसंगी देवाचे रूप पाहत, हातात टाळ घेत किंवा टाळ्या वाजवत देवाची मनोभावे आरती केली असेलच. पण आरतीचे नेमके महत्त्व काय ?* 


*आणि आरतीमध्ये स्वतः भोवती का फिरतात?*


*हिंदू धर्मात देवाची पूजा केल्या नंतर आरती केली जाते. स्कंद पुराणात आरतीचे महत्त्व सांगितले गेले आहे.  प्रत्येक व्यक्तीला सगळेच धार्मिक विधी, मंत्र, येतातच असे नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी, मंत्र, श्लोक इ. माहीत नसेल त्यांनी केवळ देवाची आरती केली तरीही देवाची त्याच्यावर कृपादृष्टी राहते.* 


*इतर विधीनंतर ज्या प्रकारे देव प्रसन्न होतो तसाच केवळ आरती केल्यानेही देव पावतात* 


*आरतीला पुराणात आरात्रिक आणि नीराजन अशा दोन नावांनी संबोधले गेले आहे.* 


*आरती ही साधारण एखाद्या धार्मिक कार्यानंतर केली जाते. त्यामुळे पूजा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात काही त्रुटी झाली असेल, काही विधी राहिल्या असतील तर आरती मुळे त्या त्रुटी भरून निघतात.*


*देवाची आरती करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पंच- प्राणांना संपूर्ण एकाग्रतेने आरतीच्या तालात सुरात स्वतःला समरस करावे लागते.*


*आरती करताना आरतीच्या ताटात असणारा दिवा हा त्या व्यक्तीच्या आत्म्याचे प्रतीक असल्याचेही पुराणात नमूद केले आहे* 


*त्यामुळे आरती करताना तो दिवा अखंड तेवत राहणे आणि तो पंचमुखी असणेही महत्त्वाचे ठरते.* 


*आरती करताना आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ही देवाची स्तुती असते त्यामुळे ते शब्द अत्यंत भावगर्भतेने आपल्या मुखातून यायला हवे तरच आरतीचा लाभ आपल्याला मिळतो.*


*आरती दरम्यान आपण सगळेच स्वतः भोवती गोल प्रदक्षिणा का घालतो?*


*याचे स्कंद पुराणात महत्त्व सांगितले गेले आहे. ते म्हणजे आपल्याला जीवन प्रदान करण्यासाठी रोज नवा दिवस दिसण्या साठी पुथ्वीचे खूप मोठे कार्य आहे. तिच्या अस्तित्वामुळे आपल्याला जीवन मिळाले आहे.*


*त्यामुळे तिच्या प्रति कृतज्ञतापूर्वक भाव व्यक्त करण्या साठी स्वतः भोवती गोल फिरणे म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्या सारखेच आहे.*


*आरती करताना आपल्याला हातातले आरतीचे  ताट केवळ गोल फिरवायचे नाही तर ते फिरवताना ॐ अशी आकृती निर्माण होईल अशा पद्धतीने ताट फिरवायचे आहे. म्हणजेच देवाच्या चरणापाशी चार वेळा, देवाच्या छातीपाशी दोन वेळा आणि मुखाजवळ एक वेळा.* 


*अशा पद्धतीने ॐ ही आकृती निर्माण होते हे पुराणात नमूद केले आहे. आपण आरती करताना साधारण दिवा किंवा धूप इ. ने आरती करतो मात्र आरती ही चार प्रकारे केली जाते.* 


*पहिली जल आरती*

*दुसरी दीप आरती* 

*तिसरी पुष्प आरती*

*चौथी कर्पूर अगरबत्ती  धुपाआरती*


*अशा वेगवेगळ्या प्रकारात आपण आरती करु शकतो.*


*पुराणात आरती करण्यासाठी शुभ अशा ५ वेळा सांगीतल्या आहेत.*


*१   पहिली आरती जी सूर्योदया पूर्वी आपण केली पाहिजे तिला मंगल आरती असे म्हणले जाते.*


*२   दुसरी आहे शृंगार आरती जी शक्यतो सूर्य डोक्यावर आल्यानंतर केली जाते.*


*३   तिसरी आरती ही दुपारी देवाला नैवेद्य दाखवताना केली जाते.*


*४   चौथी आहे संध्या आरती जी संध्याकाळी केली जाते.*


*५   पाचवी आहे शयन आरती जी रात्री देवाच्या निद्रेसाठी केली जाते.*


*रोज देवाची आरती केल्याचे अनेक फायदे ही आहेत.*


*देवाची आरती केल्याने आपल्या भोवतालचे वातावरण शुद्ध होते.* 


*आरतीमुळे देव जागृत होऊन त्यांचा आपल्या भोवती वावर असतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आरतीच्या गायनाने वाद्यांच्या तालाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.* 


*आरती केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होऊन तो पवित्र होतो. त्याच्या मनातील राग, द्वेष कमी होऊन त्याच्या भावना शुद्ध होतात. आरती करताना वापरलेल्या कापूरमुळे भोवतालचे सूक्ष्म कीटक नष्ट होऊन वातावरण शुद्ध होते.*


*श्वासाद्वारे ही हवा आपल्या शरीरात गेल्याने आपल्या रक्ताची शुद्धी होते आणि आपल्याला शांतता प्रदान होते.*


*हे आहे आरतीचे महत्त्व आणि तिचे आपल्याला होणारे फायदे.*


संकलन 

श्री. दिलीप अनंतराव तांबोळकर

ज्येष्ठ शंखवादक 

चिंचवड, पुणे

CP

Featured post

Lakshvedhi