Wednesday, 22 May 2024

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा सुरू

 इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा सुरू

 

            मुंबईदि. २२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.  

            या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. : ७३८७४००९७०९०१११८४२४२८४२११५०५२८८२६३८७६८९६८३६९०२१९४४८८२८४२६७२२९८८१४१८२३६९३५९९७८३१५७३८७६४७९०२ आणि ९०११३०२९९७

            भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतीलयाची विद्यार्थीपालक यांनी नोंद घ्यावीअसे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi