Friday, 26 April 2024

आपल्याला कोणती आरोग्यविषयक समस्या असल्यास खालील नंबरवर संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी.

 नमस्कार, डॉ. परमात्मा ठाकरे, आयुर्वेद तज्ञ असून अनेक वर्षे रुग्णचिकित्सा करत आहेत.


डॉक्टर मुंबई, पुणे, ठाणे,नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला, हिंगोली  येथे प्रत्येक महिन्यात विशेष भेट देतात व वाशीम येथे मुख्य शाखा आहे.


आपल्याला कोणती आरोग्यविषयक समस्या असल्यास  खालील नंबरवर संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी.


☎️ +91 9604518008 / 9822574152 ☎️ 


धन्यवाद 🙏


डॉक्टरांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या फेसबुक page ला visit करा

https://www.facebook.com/ShriVishwamayClinic/


डॉक्टरांच्या टीव्ही वरील मुलाखती पाहण्यासाठी, आरोग्याविषयक उपयुक्त माहिती आणि वेगवेगळे आजार व त्यांवरील उपचार यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या YouTube channel ला नक्की subscribe करा,

https://youtube.com/channel/UCNyzj1Guhgggpuy5zJwSvaw


आणि हो, आवडलेले व्हिडीओ इतरांना share करायला विसरु नका.


Patients Feedback Playlist

https://youtube.com/playlist?list=PL6oQ5kYAf544-PMrAh56eiO52960LrvFE


Dr Paramathma Thakare TV Interviews Playlist

https://youtube.com/playlist?list=PL6oQ5kYAf544BVq6XCyJV2kJtqQtmuMbL


Thursday, 25 April 2024

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची' ‘दिलखुलास’

 सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची' ‘दिलखुलास

कार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमातून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दिनांक २७ एप्रिल 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी,मतदार जनजागृती,कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी माहिती दिली आहे. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलंवत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

संध्या गरवारे/ वि.स.अ

 


मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे

 मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे

विशेष जनरल निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

            मुंबईदि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थनी आणावेअसे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले.

            लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. लोकसभेच्या या चारही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे स्वीपच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात मुंबई महानगरपालिकेच्या टी’ विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकाआरोग्य सेविकास्वच्छता कर्मचारीमतदान केंद्रस्तरीय (बीएलओ) आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी क्षमता विकास आणि जीवन बदलण्याची कला’ या विषयावरील २३ व्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी विशेष निरीक्षक श्री. गंगवार बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागरअपर जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजननिवडणूक निर्णय अधिकारी दादाराव दातकर, ‘स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवीतहसीलदार प्रिया जांबळे-पाटीलस्वीपचे सल्लागार भारत मराठे उपस्थित होते.

            विशेष निरीक्षक श्री. गंगवार म्हणाले कीलोकशाहीच्या सक्षमीकरण आणि संवर्धनासाठी मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी संयुक्तरित्या मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व मतदाराला मतदान प्रक्रिया आनंददायी वाटेल यासाठी प्रयत्न करावे.

            मतदान प्रक्रिया शांततामय वातावरणकमी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने होईल यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

रीच वन टीच वन धोरणाचा अवलंब करावा

            राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. येथे उपस्थित सर्व मतदार दूतांनी मतदारांमध्ये जागृती करावी व त्यांनीही इतरांचे मतदान करण्यासंदर्भात्‍ प्रबोधन करावे या पद्धतीने मतदानाचा टक्का वाढविण्यास मदत होईल. चुनाव का पर्व - देश का गर्व’ हे घोषवाक्य सार्थकी ठरविण्यात आपला सहभाग खूप महत्वाचा आहे. राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत सर्वांची भागीदारी महत्वाची असून आपण आपली जबाबदारी नक्कीच पार पाडालअसा विश्वास विशेष पोलीस निरीक्षक एन. के. मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केला.

मतदान जनजागृतीत समूहाचे योगदान मोलाचे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर मतदानाच्या अधिकाराबाबत सविस्तर माहिती मतदारांना देणे आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर घेऊन जाणे इत्यादी महत्वपूर्ण कामांची जबाबदारी मतदान केंद्र जनजागृती समूह (बूथ अवरनेस ग्रुप) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या राष्ट्रीय टक्केवारीच्या सरासरीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान केंद्र जनजागृती समूहाचे योगदान मोलाचे असणार आहे. या कामात आपण सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी यावेळी केले.

            निवडणुकीचे काम करण्यात आणि मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यात काहीही समस्या आल्यास त्या सोडविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सहकार्य करेल. मतदाराचे नाव आणि केंद्राची माहिती मिळविण्यासाठी व्होटर हेल्पिंग ॲपचा वापर करावा. भारत निवडणूक आयोगाच्या www.eci.gov.in या संकेत स्थळावर उमेदवाराची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. तसेच 1950 या हेल्पलाईनवर संपर्क समस्यांचे निराकरण करण्यात येणार आल्याचेही श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

७५ टक्के मतदानासाठी घेतली शपथ...

            ‘मी स्वतः मतदान करणार. मित्र मंडळी आणि परिवाराच्या सदस्यांना मतदान करण्यासाठी आग्रह धरणार. तसेच आपल्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगून अंगणवाडी सेविकाआरोग्य सेविकापर्यवेक्षकक्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यात ७५ टक्के मतदान करण्यासाठी सकारात्मक आणि उत्साहपूर्वक काम करणार असल्याची प्रतिज्ञा यावेळी घेतली.

एक मत लोकशाहीत परिवर्तन घडवेल...

            लोकशाहीच्या संवर्धनासाठी प्रत्येक मत हे महत्वपूर्ण आहे. सकारात्मक आणि एकत्रितरित्या काम केल्यास सोमवार 20 मे 2024 रोजी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नक्की मदत होईल. मुंबई उपनगरात एकत्रित ५२२१ अंगणवाड्या आहेतत्याअंतर्गत सेविका आणि मदतनीस एकूण १०,४४२ जण आहेत. 4500 आरोग्य सेविका व आशा वर्कर आहेत. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या ८२३ स्थानिक सामाजिक संस्थांचे सफाई मित्र १०,२३६ आहेत. ८३०० बचतगटाचे 80 हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. विविध विभागातील सुमारे  हजार क्षेत्रीय कर्मचारी (बीएलओ) आहेत. असे एकूण अंदाजे एक लाख कर्मचारी मतदार दूत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरची मतदार संख्या जवळपास ९८ लाखाच्या आसपास आहेत. आपण कामांची विभागणी करून काम केल्यास प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यास आपण यशस्वी ठरणार असल्याचे स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. दळवी यांनी सांगितले.

            मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय समोर ठेवून एक लाख कर्मचाऱ्यांना डॉ. दळवी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी मतदारांशी सकारात्मक पद्धतीने कसे वागावे तसेच त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आत्मविश्वास उपस्थितांमध्ये निर्माण केला. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे केंद्रीय निरीक्षक श्री. गंगवार यांनी डॉ. दळवी यांच्या कार्याचा गौरव केला. जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची अनुभुती घेत कार्यक्रम यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार काढले.

0000

श्रद्धा मेश्राम/ससं/

स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने पोलिसांच्या मदतीने काटेकोरपणे वाहन तपासणी करावी

 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने पोलिसांच्या मदतीने काटेकोरपणे वाहन तपासणी करावी

मुंबई शहर जिल्ह्याचे आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 24 : स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (SST) वाहन तपासणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावावाहनतपासणी दरम्यान रोख रक्कममद्यसाठाभेटवस्तू व शस्त्रसाठा पोलिसांच्या मदतीने तपासावा. संपूर्ण तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामकाजावर निरीक्षक (खर्च) देखरेख ठेवणार आहे. तसेच वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमने सतर्क राहून त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल विहित वेळेत संबंधितांना पाठवावाअसे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांनी दिले.

            मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज आयोजित या प्रशिक्षण शिबिरात श्री. महाजन यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरास उपजिल्हाधिकारी तथा तक्रारी व्यवस्थापन निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे समन्वय अधिकारी राजू थोटेअतिरिक्त जिल्हा माहिती-तंत्रज्ञान अधिकारी विद्याधर शेळके आदी उपस्थित होते. या शिबिराला `३०-मुंबई दक्षिण मध्यव `३१-मुंबई दक्षिणलोकसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीममधील (SST) नियुक्त अधिकारी उपस्थित होते.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावेयासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशासनाने स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त केल्या आहेत. २६ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे दाखल होणार असून या पार्श्वभूमीवर सदर टीमचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

            या प्रशिक्षण शिबिरात भारत निवडणूक आयोगाने Election Seizure Management System (ESMS) हे विकसित केलेले ॲप कसे हाताळावेयाबाबत श्री. महाजन यांनी सविस्तर माहिती दिली.

            लोकसभा निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात व्हाव्यातयासाठी या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमची (SST) नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम करण्याची जबाबदारी पार पाडावीअसे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

****

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे - निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

 आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून

राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे

निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

             मुंबईदि. २४ : लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी केले आहे.

            लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील कापडणीससहायक पोलीस आयुक्त अनिल देशमुख यांच्यासह नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

             श्री. कटकधोंड म्हणालेनिवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा,पदयात्रा,रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलीसांची परवानगी घ्यावी.उमेदवारांनी दैनंदिन खर्च अहवाल सादर करणे अत्यावश्यक असून निवडणूक अर्ज भरण्याअगोदर स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार असल्याचे श्री.कटकधोंड यांनी यावेळी सांगितले. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन यावेळी श्री.कटकधोंड यांनी केले.

            ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार असून त्यासाठीची अधिसूचना दिनांक २६ एप्रिल रोजी निर्गमित होणार आहे. या मतदारसंघात एकूण १५ लाख २४ हजार ९३९ इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख २७ हजार १७८महिला मतदार ६ लाख ९७ हजार ७१८ आणि इतर ४३ मतदार आहेत. तर मतदान केंद्र १५२७ आहेत.

****

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

 विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला

मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

            मुंबईदि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करून त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेतअशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या.

            मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागरविभागीय उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड आणि अमोल यादवअपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडउपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ यांच्यासह चारही लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारीसहायक निवडणूक निर्णय अधिकारीविविध कक्षांचे  जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर म्हणाले कीनिवडणूक आयोगाने ज्या सूचना आणि निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्या मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय स्वीकारला आहेत्यांच्या पर्यंत पोहोचून ही प्रक्रिया सुलभपणे पार पाडावी. याशिवायनिवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन होईलयादृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावेअशा सूचना त्यांनी दिल्या. मुंबई उपनगर जिल्ह्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी केलेल्या तयारीबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

            निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सी विजील ॲप वर आलेल्या तक्रारीची वेळेत दखल घेऊन त्या तक्रारींचा वेळेत निपटारा करावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना कमीत कमी वेळेत मतदान करून बाहेर पडता येईलअशी व्यवस्था असावीअशा सूचनाही त्यांनी केल्या.

            निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यासाठीं नियुक्त पथकाने तसेच व्हिडिओ पथकभरारी पथक यांनी सतर्क राहावयाचे आहे. बँकांकडून संशयित बँक व्यवहारांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना दैनंदिन अहवालाच्या स्वरूपात पाठवली जावी. याबाबत बँकांना सूचना द्याव्यात. अवैध मद्य वाहतुकीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

            जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती दक्षता घेतली जावी. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेलयादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनीजिल्ह्यातील चारही मतदारसंघात निवडणूक विषयक तयारीची माहिती यावेळी दिली. जिल्हा निवडणूक यंत्रणा ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास सज्ज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

000

रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात...*

 *रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात...* 


अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. 


तज्ञांच्या मतानुसार रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसान कारक ठरू शकते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या.


 *वजन वाढणे:* 


रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.


 *झोप पूर्ण न होणे :* 


रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.


 *रक्तदाब अनियंत्रित होणे :* 


रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशीरा जेवणे टाळावे.


 *पचनाशी निगडित समस्या :* 


रात्री उशीरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात.


 *शरीरातील ऊर्जा कमी होणे :* 


रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते.


 *Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Bhorkar* 


*🪴🌺शुभ प्रभात🌺🪴*

Featured post

Lakshvedhi