*रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात...*
अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते.
तज्ञांच्या मतानुसार रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसान कारक ठरू शकते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या.
*वजन वाढणे:*
रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.
*झोप पूर्ण न होणे :*
रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.
*रक्तदाब अनियंत्रित होणे :*
रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशीरा जेवणे टाळावे.
*पचनाशी निगडित समस्या :*
रात्री उशीरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात.
*शरीरातील ऊर्जा कमी होणे :*
रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते.
*Nutritionist & Dietitian*
*Naturopathist*
*Dr. Bhorkar*
*🪴🌺शुभ प्रभात🌺🪴*
No comments:
Post a Comment