Friday, 22 March 2024

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद · भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

 आचारसंहितेचे उल्लंघन होतेय मगसीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

·       पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

·       भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

            मुंबई, दि. २१ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

            आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवारप्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पणकाहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

            हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठीवापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणेउल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिलस्थानवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

            सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा

            एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांकपत्तामतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

            या ॲप्लिकेशनचा वापर करूननिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृतीदेखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

            या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटोव्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथकस्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

            या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा

            या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

०००

Thursday, 21 March 2024

नेत्र तपासणी मोफत


 

शनीची मूर्ती काळी कां असते ?*

 🕉️ *शनीची मूर्ती काळी कां असते ?*


*स्मशानात चितेवर महर्षी दधीचिंच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या* *पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती. दुःखावेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली. अशा प्रकारे महर्षी दधिची* *यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं. इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला.* *खायला कांहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली. त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला.* *झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं. हळू हळू ते बालक मोठं होऊ लागलं. झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं.*

*एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना* *पिंपळवृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला.* *नारदाला आश्चर्य वाटले. त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचेकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली -*

*नारद- हे बालका, तू कोण आहेस?*

*बालक- मलाही ते माहित नाही. मला तेच जाणून घ्यायचं आहे.*

*नारद- तुझे आईवडील कोण आहेत?*

*बालक- मला तेही माहित नाही*. *मलाही तेच जाणून घ्यायचं आहे*

*तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना महदाश्चर्य वाटलं. ते म्हणाले, "हे बालका, तू महादानी अशा महर्षी दधिचीचा पुत्र आहेस. तुझ्या पित्याच्या अस्थींच्या साहाय्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या* *साह्येकरूनच देवांना असुरांवर विजय मिळविणं शक्य झालं. तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघं एकतीस वर्षांचं होतं.*

*बालक- माझ्या पित्याच्या अकाल मृत्युचं कारण काय होतं ?*

*नारद- तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरु होती.*

*बालक- माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं?*

*नारद- शनिदेवाची महादशा.*

*एव्हढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली.*

*नारद निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादनं नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं.ब्रह्मदेवानं पिप्पलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिप्पलादनं 'मी ज्याच्याकडे पाहीन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं' असा वर मागितला. ब्रह्मादेवानं "तथास्तु" म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला. हा वर मिळाल्याबरोबर पिप्पलादनं सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं. त्याबरोबर शनिदेव प्रगट झाले. शनिदेव समोर येताच पिप्पलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली. त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं. हे पाहून समस्त ब्रह्माण्ड हादरलं. सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं. प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले. शेवटी स्वयं ब्रह्म्यानं पिप्पलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली. पण पिप्पलादनं ती विनंती धुडकावून लावली. शेवटी ब्रह्मदेवानं पिप्पलादाला एका ऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं. मग मात्र पिप्पलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली. पिप्पलादनं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले -*

*1- जन्मानंतर पहिली पाच वर्षे कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही.*

*2- माझ्यासारख्य अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे. म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही.*

*"तथास्तु" म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले. तेव्हा पिप्पलादनं आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापामुक केलं. ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पाहिल्यासारखं चालता येईना. म्हणून* *तेव्हापासूनच शनि "शनै:चरति य: शनैश्चर:" अर्थात जो हळू हळू चालतो त्याला शनैश्वर म्हटल्या जाते. आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली. .*

*शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे. पुढे पिप्पलादनं प्रश्नोपनिषदाची रचना केली. आजही हे उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवल जातं.*

डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षा जागरुकतेला प्राधान्य देण्याची गरज 'मालवेअर'च्या प्रसाराचे पायरसी वेबसाइट्स मोठे माध्यम

 डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षा

जागरुकतेला प्राधान्य देण्याची गरज

'मालवेअर'च्या प्रसाराचे पायरसी वेबसाइट्स मोठे माध्यम



                                                                           ब्रिजेश सिंह

 

आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सेसचा सायबर सुरक्षेबाबतचा अहवालाचे प्रकाशन

 

            मुंबईदि. २१ : पायरसी वेबसाइट्स मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे मध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड मुव्ही किंवा टीव्ही शो पाहत नसून ते त्यांच्या 'डिव्हाइस'शी तडजोड करत आहेत आणि तुमचे डिव्हाईस' दुसरे तुम्हीच’ आहात. त्यात तुमची ओळखतुमचे बँकिंग तपशीलतुमचे मित्र आणि कुटुंबीयांचे तपशील असतो. अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी संदिग्ध होत्यात्यांचा आता या अहवालात खुलासा करण्यात आला आहे. आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस) चा अहवाल या बदलाची सुरुवात आहेअसे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. 

            आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझनेस) द्वारे सायबर सुरक्षेबाबत सर्वंकष अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरील अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहदक्षिण आशियाचे अमेरिकी बौद्धिक संपदा सल्लागार जॉन कॅबेका, प्रादेशिक संचालन प्रमुख नील गणे आणि आयएसबी ' 'इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सचे प्रा. मनीष गंगवार आदी मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य दूतावासमुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.  

            यावेळी कार्यकारी संचालक मनीष गंगवार,  ला ट्रोब युनिव्हर्सिटी (मेलबर्न) येथील सायबर सुरक्षा विभागाचे सहायक प्रा. डॉ. पॉल वॉटर्स,  कॅरिन टेंपल यांनीही आपली मते मांडली.

       आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’ चे प्रा. गंगवार आणि डॉ. श्रुती मंत्री,  मेलबोर्नच्या 'ला ट्रोब युनिव्हर्सिटीयेथील सायबर सिक्युरिटीचे सहायक प्राध्यापक डॉ. पॉल वॉटर्स यांनी 'दि पायरसी- मालवेअर नेक्सस इन इंडिया : अ परसेप्शन आणि अनुभव आणि अनुभवजन्य विश्लेषण'  या कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य दूतावासमुंबई येथे अलायन्स फॉर क्रिएटिव्हिटी अॅण्ड एन्टरटेन्मेट (एसीई)आयएसबी  इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स (आयआयडीएस ) आणि एसीई यांनी युनायटेड स्टेट्स पेटंट अॅण्ड ट्रेडमार्क ऑफिस (यूएसपीटीओ) च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

अहवालातील निष्कर्ष

            अहवालात प्रौढ उद्योग ५७ टक्के आणि जुगाराशी संबंधित जाहिरातीच्या ५३ टक्के तुलनेत पायरसी साइट्समध्ये प्रवेश केल्याने मालवेअर संसर्गाचा ५९ टक्के जास्त धोका उद्भवतो. वायरस टोटल’ चा उपयोग करून १५० वेबसाइट्सच्या विश्लेषणात मालवेअरसंशयास्पद क्रियाकलापफिशिंगचे प्रयत्न आणि स्पॅम यासारख्या सायबर जोखीम असल्याचे समोर आले.  मानक पायरसी संकेतस्थळांच्या तुलनेत स्कॅम पायरसी संकेतस्थळ उपयोग कर्त्यांना सायबर धोक्यांना समोर आणण्याचा धोका जास्त असतो. 

        मालवेअर वितरण पायरसी साइट संचालकांसाठी अतिरिक्त महसूल उत्पन्न करण्यासाठी भारतात ऑनलाइन पायरसी फायदेशीर राहिली आहे. भारतीय ग्राहक पायरसी साइट्सचा उपयोग करतांना त्यांच्या खऱ्या सायबर जोखमीला कमी लेखतातपायरसी संकेतस्थळाशी संबंधित सायबर सुरक्षा धोक्यांकडे लक्ष देण्याची तातडीची गरज आहे यावर भर देतात. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (आयएसबी ) सायबर सुरक्षा तज्ञांनी केलेल्या तळागाळातील धारणा आणि अनुभव अध्ययनात (ग्राऊंड पर्सेप्शन ॲण्ड             एक्सपिरिअन्स स्टडी) मालवेअर संसर्गाचा भारतीय ग्राहकांसाठी ५९ टक्के जोखीम असलेल्या पायरसी वेबसाइट्स एक प्रमुख धोका असल्याचे समोर आले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे १८-२४ वर्षे वयोगटातील उपयोगकर्ते जे या प्लॅटफॉर्मवर जास्त व्यस्त असतात त्यांच्यात सायबर धोक्यांबाबत कमी जागरूकता असल्याचे दिसून आले. 

            हे सर्वेक्षण हे २३ ते २९ मे २०२३ या कालावधीत करण्यात आले. ‘YouGov’ नॅशनल ऑम्निबसचा भाग म्हणून भारतातील १०३७ उत्तररदात्यांचा यात समावेश आहे. भारतातील प्रौढ नागरिकांच्या वारंवारतेच्या प्रमाणात लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांवर आधारित १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ऑनलाइन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डेटाचे संतुलन करण्यात आले. 

हा संपूर्ण अहवाल https://www.isb.edu/content/dam/sites/isb/India-Piracy-and-Cyber-Threats-Report-DM.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

0000

अखेर नियतीने ट्रिगर खेचला, पाणी वाचवा

 *🔴अखेर नियतीने ट्रिगर खेचला...🔴*


 *दक्षिण आफ्रिकेची राजधानी* *केपटाऊन* हे जगातील पहिले पाणी नसलेले शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे कारण तेथील सरकारने *१४ एप्रिल २०२४* नंतर पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे.


 तेथे आंघोळ करण्यास मनाई आहे.


 10 लाख लोकांचे कनेक्शन तोडण्याची तयारी सुरू आहे.


 भारतात ज्या प्रकारे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल खरेदी केले जाते, त्याचप्रमाणे केपटाऊनमध्ये पाण्याचे टँकर असतील जिथे 25 लिटर पाणी उपलब्ध असेल, अधिक पाणी मागणाऱ्या किंवा पाण्याची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.


जगाचा हा दु:खद प्रवास शेवटी कोणाच्याही वाट्याला येईल, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा.

 पाण्याचा अपव्यय थांबवा रेल्वेने लातूरला (महाराष्ट्र) पाणी पाठवले जात असल्याचेही आपण पाहिले आहे.


 *जगातील फक्त 2.7% पाणी पिण्यायोग्य आहे.*


 *सर्व भारतीयांना नम्र आवाहन*!!

          *👇*

 नजीकच्या सर्व धरणांतील पाणीपातळी घटल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.


एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा अपव्यय थांबवून पाण्याची बचत करू.  तुम्ही ते सहज करू शकता. :-


 1. *रोज कार/बाईक धुवू नका*.

 2. *अंगण/जिने/फरशी धुणे टाळा किंवा धुताना कमीत कमी पाण्याचा वापर करा*.

 3.. *टॅप सतत चालू ठेवू नका.*.

 4. *इतर अनेक चांगले उपाय करून पाणी वाचवा*.

 5. *घरातील गळती नळ दुरुस्त करा.*

 6. *झाडाच्या भांड्यात कमीत कमी पाणी टाका.*

 7. *रस्त्यावर पाणी शिंपडू नका*

8. *पाणी पिताना ग्लासभर घेऊन अर्धा ग्लास पाणी न पिता वाया घालवू नका*


 या संकटाला एकजुटीने सामोरे जाऊया.

 

 *वरील मेसेज 5 ग्रुप वर पाठवा.. यातून काही जादू होणार नाही, पण महत्वाची बातमी पसरवल्याचे समाधान नक्कीच मिळेल आणि येणाऱ्या दुष्काळात पाणी वाचवण्याचे पुण्य मिळेल, चार तहानलेल्या लोकांची तहान भागेल. शमले आणि पुढच्या पिढीलाही पाणी मिळेल.*

    🙏🏻🌹🙏🏻

महाराष्ट्र शासनाचे 18 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 18 वर्षे मुदतीचे

2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

            मुंबईदि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या अठरा वर्षे मुदतीच्या 2 हजार  कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

            अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. 26 मार्च  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् 26 मार्च  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ मार्च २०२४  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

            कर्जरोख्याचा कालावधी १८ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २७ मार्च २०२४ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ मार्च २०४२  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी सप्टेंबर २७  आणि मार्च २७  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ

 नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ

 

            निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार ६६१ इतकी वाढ झालेली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या ८,८५,६१,५३५ इतकी होती. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४,६३,१५,२५१ तर महिला मतदार ४,२२,४६,८७८ इतकी संख्या होतीतसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या २,४०६ इतकी होती. यामध्ये  वाढ झालेली असूनदि. १८ मार्च २०२४ रोजी अद्ययावत मतदारांची एकूण संख्या ९,२०,५५,१९६ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदार संख्या ४,७८,६२,३३७ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४,४१,८७,३०१ तसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५ हजार ५५८ इतकी आहे.

हजार पुरुष मतदारांमागे ९२३ महिला मतदार

             सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१९ साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे ९११ इतके होते. याकरिता महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे २०२४ मध्ये या प्रमाणात ९२३ अशी लक्षणीय सुधारणा झाल्याचे बघायला मिळत आहे.

नवमतदारांचादिव्यांगाचा वाढता टक्का

            मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी सध्याच्या मतदार यादीत झालेली आहे. यामध्ये  १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची टक्केवारी  १.२७  तर २०-२९ वयोगटाची १८.१७ % आहे.  तसेच ३०-३९ वयोगटाची २२.५९ %४०-४९ वर्ष वयोगटाची २१.९८ %तर ५०-५९ वयोगटाची  १६.६८ % आहे. तसेच  ६०-६९ वयोगटाची १०.६६ %तर ७०-७९ वयोगटाची ५.८० % आणि  ८०-८९ वयोगटाची २.२८ %नोंदणी झाली आहे.

इच्छुक ज्येष्ठ मतदारांना गृह मतदानाची सुविधा

            अद्ययावत मतदार यादीमध्ये ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १३१३६२३ इतकी आहे.  यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.  मतदार यादीतील अद्ययावत आकडेवारीनुसार  ५२,७६९  मतदार  हे शंभर वर्षावरील आहेत.

            याशिवाय ११८१९९ इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  या वर्षी दिव्यांग मतदारांची नोंदणी देखील मोठ्या संख्येने झाली असून  मतदार यादीमध्ये एकूण ५९९१६६ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत.  त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्या पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.                 

निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

            निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाहीअशा नागरिकांकडून त्या - त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र.६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेतले जाणार आहेत.

            तसेच मतदार यादी अद्ययावत व शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत जुलै-ऑगस्ट २०२३ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून अर्ज प्राप्त करुन घेतले आहेत. तसेच भावी मतदारांची ही माहिती घेण्यात आली आहे. तसेच  ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.त्याचप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारांच्या माध्यमातून ही शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत. स्वीप या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले असून इतर शासकीय विभागअशासकीय संस्थाविद्यापीठेमहाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहोचविण्यात आलेला आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मृत मतदारांच्या संदर्भात विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे जास्तीत जास्त शुध्दीकरण करण्यात आले असून दि.२३ जानेवारी २०२४ रोजी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
image.png

वंदना थोरात,

Featured post

Lakshvedhi