Friday, 8 March 2024

महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी राजेंद्र मोहिते

 महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी राजेंद्र मोहिते

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पदग्रहण व गोपनीयतेची शपथ

 

            मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी नेमणूक झाल्याने राजेंद्र मोहिते यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  पद व गोपनीयतेची शपथ दिली.

            सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या पदग्रहण कार्यक्रम प्रसंगी त्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

००००

40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर येवून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार

 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर येवून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 9000 मे.वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र

 40,000 कोटींची गुंतवणूक25 हजार रोजगार

            मुंबईदि. 7 : राज्यातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून 40,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार असून25 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असूनशेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकारपत्र आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावीयासाठी 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती. त्यानंतरच्या काळात 2000 मे.वॉट पर्यंत निर्मिती करण्यात आली. आता 9000 मे.वॉट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहेत्यामुळे 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येतील.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची दिवसा वीजेची सातत्याने मागणी होती. ही मागणी आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन शक्य होणार आहे.  सर्वांत आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राळेगणसिद्धी जि. नगर येथे साकारण्यात आली. ती कमालीची यशस्वी झाली. आता जागा उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेने केलेल्या भरीव कार्यामुळे हे शक्य झाले. विकासकांना यापुढेही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील. कुठेही अडचण आल्यास त्या सोडविण्यासाठी शासन कायम पाठीशी असेल.

            राज्यात 3600 मेगॅवॉट सौर ऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे. पणआता अवघ्या 11 महिन्यात 9000 मेगॅवॉटची प्रक्रिया राबवून सरकारने एक नवा विक्रम घडविला आहे. सरकारने कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध केल्याने हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य झाले आहे. या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले. हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण करायचा असला तरी सोबत काम केले तर 15 महिन्यातच तो पूर्ण होऊ शकतो. आता हा प्रकल्प सुरू होणार म्हणून अधिकाऱ्यांनी थांबू नये. उर्वरित 50 टक्के कृषी फिडर सौरऊर्जेवर आणण्यासाठी नियोजनाच्या तयारीला तत्काळ लागावे. पुढील दोन ते तीन वर्षात 8 लाख सौर ऊर्जा पंपसुद्धा शासनाला द्यावयाचे आहेतत्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे दिले जाते. यावेळी हुडकोसोबत एक सामजंस्य करार सुद्धा करण्यात आला. यामधून 5 हजार कोटी रूपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मिळणार आहेत. रिलायन्ससोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी सामजंस्य करारसुद्धा करण्यात आला. या करारामुळे राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात बुस्ट मिळणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होतेतर सभागृहात अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रमहाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक कादंबरी बलकवडेमुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिकउपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदींसह विकासक उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली २७ गावे, नवी मुंबई १४ गावांतील नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत

 कल्याण डोंबिवली २७ गावेनवी मुंबई १४ गावांतील नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत

 आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ७ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावातील नागरिकांना २०१७च्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे जाहीर करतानाच संत सावळाराम स्मारकासाठी जागा देण्याची कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

            वर्षा निवासस्थानी कल्याण डोंबिवलीउल्हासनगरनवी मुंबईतील १४ गावे यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार राजू पाटीलडॉ. बालाजी कल्याणकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.

            या बैठकीत २७ गावेकल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पुनर्विकास१४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेशउल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करणेसंत सावळाराम स्मारकासाठी जागा आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

            कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये मालमत्ता कराचा विषय प्रलंबित होता. त्यावर मार्ग काढत २०१७ च्या दराप्रमाणे आता कराची आकारणी करावीअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या गावातील जी अनधिकृत बांधकामे आहेत ती संरक्षीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महापालिका हद्दीत १४ गावांचा समावेश करण्याची भूमिपुत्रांची मागणी मान्य केली असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेप्रमाणे विकास कामे होतीलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

            उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            वास्तविशारद संघटनेची देखील यावेळी बैठक घेण्यात आली. त्यानुसार ठाण्याच्या धर्तीवर इमारतींच्या उंचीबाबतचा नियम कल्याण डोंबिवली हद्दीत देखील लागू करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेकडीवर संत सावळराम स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय झाला असून त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करा

Thursday, 7 March 2024

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार -

  

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले

चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार

-  महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

 

            मुंबईदि. :- महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्याच्या महिला दिनी म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

          महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवयूएन वुमन्सच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सुझन फर्ग्युसनटाटा समाजिक विज्ञान संस्थेच्या लक्ष्मी लिंगममाविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे आदी उपस्थित होते.

          महिलांचा विकास हे उद्दिष्ट ठेऊन राज्यात आतापर्यंत 3 महिला धोरणं जाहीर करण्यात आल्याचे सांगून मंत्री अदिती तटकरे म्हणाल्याया तिन्ही धोरणांपेक्षा वेगळे आणि अंमलबजावणीवर भर देणारे असे हे चौथे महिला धोरण असणार आहे.  या धोरणामध्ये महिलांच्या आर्थिकसामाजिक उन्नतीसोबतच यामध्ये अष्टसुत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्यपोषक आहारशिक्षणकौशल्यमहिला सुरक्षामहिलाबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबवणेलिंग समानतापुरक रोजगारहवामान बदलनैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्यसांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग याचा समावेश या महिला धोरणामध्ये आहे. या धोरणामुळे समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता येण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभागाने हे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये अंमलबजावणीवर भर असणार आहे. त्यासाठी त्रिसुत्री ठरवण्यात आली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल. तर जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. या धोरणाच्या माध्यमातून महिला अधिक स्वावलंबी होतील. समाजामध्ये स्त्री-पुरूष समानता येण्यासाठी महिलांचे अवलंबित्व कमी होणे गरजेचे आहे. यासाठी या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे नियोजनही या धोरणामध्ये करण्यात आले आहे.

            मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्यासमाजामध्ये स्त्री - पुरुष समानतेविषयी नेहमीच चर्चा केली जाते. ही समानता येण्यासाठी पुरुषांनीही साथ देणे गरजेचे आहे. महिला दिन हा वर्षातून एकदा नाही तर रोज साजरा केला जावा. येत्या काळात माविमच्या माध्यमातून महिलांना आणखी चांगले अर्थसहाय्य मिळेल. त्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक निर्माण होतील व राज्यासह देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होतील. अनेक महिला नवनवीन उद्योग उभारत आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

          महिला व बाल विकास विभागाचे सविच श्री. यादव म्हणालेमहिलांना आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. लोणचीपापड यामधून बाहेर पडून इतर क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यास वाव आहे. या क्षेत्रामध्ये आता महिलांनी काम करावे.

 

          यावेळी बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समुद्री शैवाल उत्पादनामध्ये चांगले काम करणाऱ्या रत्नागिरीच्या वर्षा गोरिवलेहायड्रोफोनिक शेती करणाऱ्या लता जाधवदूध व दुग्धजन्य पदार्थामधून आर्थिक स्थैर्य साधणाऱ्या गोंदियाच्या ममता ब्राह्मणकरआदिवासी भागात काम करणाऱ्या यवतमाळच्या कल्पना लिंमजी मंगामसरपंच म्हणून ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार करणाऱ्या नंदुरबारच्या कैशल्या वडवी आणि छ. संभाजीनगरच्या वर्षा सांगळे यांच्या सन्मान करण्यात आला.

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

 कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोस्टल रोडवरळीदादर परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणाची पाहणी

 

            मुंबईदि. 7 :- धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळीदादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीतअसे निर्देशही त्यांनी मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणांना दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोडची पाहणी केली. त्यासाठी त्यांनी वरळी ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास केला. या भेटीत त्यांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासमवेत मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहलअतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.

            मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तयार होत असलेल्या या कोस्टल रोडचे काम वेगाने पूर्ण होत आहे. या कोस्टल रोडवर ३२० एकर जागेत भव्य असे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून२०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक दर्जाचे हे पार्क उभारण्यात येणार असल्याचे तसेच लवकरच हा कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत दाखल होईल असे  मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

            त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वरळी परिसरातील गणपतराव कदम मार्गनेहरू सायन्स पार्क येथील सेठ मोतीलाल सांघी मार्ग आणि दादर येथील दादासाहेब रेगे मार्ग याठिकाणी सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधला. ही सर्व कामे वेळेवर आणि दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्यावे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते काँक्रिटीकरणामुळे मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील. पावसाळ्यातील पाणी शोष खड्ड्यांद्वारे जमिनीत पुरवण्यासाठी या काँक्रिटीकरण कामांमध्ये शोषखड्यांचा देखील समावेश केला असल्याने ही कामे पर्यावरण पूरक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.

0000

भारताचा विकास सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाने

 भारताचा विकास सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाने

केंद्रीय मंत्री अमित शाह

 

            मुंबईदि. : मागील काही वर्षांत भारताचा वेगाने विकास झाला आहे. या विकासात सरकारच्या महत्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. 

            केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी आज मुंबईत आयजीएफ वार्षिक गुंतवणूक शिखर परिषद - एनएक्सटी 10 ला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            श्री. शाह म्हणालेकेंद्र सरकारने 2047 या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंतचा विकासाचा आराखडा तयार केला आहे. मागील 10 वर्षांच्या काळात 50 हून अधिक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे भारताची दिशा आणि स्थिती बदलल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. नोटबंदीवस्तू आणि सेवा करनॉन परफॉर्मिंग असेटसची समस्या सोडवणेजन-धन-आधार-मोबाईलच्या रूपात डिजिटल व्यवहारांची व्याप्ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत वाढवणेभविष्यातील भारत आणि आपली मूल्ये या दोन्हीचा समावेश असलेले नवीन शैक्षणिक धोरण असे अनेक निर्णय घेतले. सर्जिकल आणि हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या आणि सीमेच्या सुरक्षेला कोणीही बाधा पोहोचवू शकत नाहीअसा संदेश भारताने जगाला करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            मुंबई शेअर बाजाराचा 22 हजारांवरून वाढत 73 हजारांवर पोहोचलेला निर्देशांक हा आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेचे मोठे द्योतक आहे असे केंद्रीय मंत्री श्री.शाह यांनी नमूद केले. प्रत्यक्ष करदात्यांची संख्या 8.18 कोटी झाली असून अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या वाढून 1 कोटी 40 लाख झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्ष 2027 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्ससह जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणे, 2030 पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर्सची निर्यात, 2025 पर्यंत अंतराळ स्थानक उभारणे, 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणे, 2040 मध्ये चंद्रावर मानव पाठवणे आणि 2047 पर्यंत पूर्ण विकसित राष्ट्र म्हणून विश्वगुरू बनण्याचे देशासमोरील उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

००००

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महो

 पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि

अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने

८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्री शक्तीचा

 

            मुंबईदि. ६ : सांस्कृतिक कार्य विभागपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळदादर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कला महोत्सव 2024- उत्सव स्त्री शक्तीचा’ या महोत्सवाचे आयोजन शुक्रवार8 मार्च ते रविवार10 मार्च2024 या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात रोज  संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत  विविध चर्चासत्रमुलाखतीनृत्यगाण्याचे कार्यक्रमनाटक सादर केले जातील.

            महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 8 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून त्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी घेतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीत शेतक-यांच्या विषयांवर भाष्य करणारे विनोदी लोकनाट्य दादला नको  गं बाई’ याचे सादरीकरण सम्यक कलांश  प्रतिष्ठानचे कलाकार सादर करतील.

            9 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मिशन विश्व ममत्व फाऊंडेशननागपूर या संस्थेचे तृतीयपंथी कलाकार तू है शक्ति’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर करतील. त्यानंतर सायंकाळी 6:45 ते 9.30 या कालावधीदरम्यान  प्रसिद्ध यूट्युबर आणि शेफ मधुरा बाचलवित्तीय सल्लागार रचना रानडे आणि वन्यजीव छायाचित्रकार ॠता कळमणकर यांची मुलाखत अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले घेतील. या कार्यक्रमांतर्गत धनश्री देशपांडे आणि श्रावणी वागळे यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही होईलया कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित करतील.

            10 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावेअभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी करतील आणि सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा देवी - दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर होतील. त्याचे सूत्रसंचालन  डॉ. समीरा गुजर-जोशी करतील.

            अमर हिंद मंडळदादर येथे आयोजित हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi