Tuesday, 5 March 2024

मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ ची ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

 मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ ची

ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

            मुंबईदि. ४ : वाचनाने माणूस अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होतो. प्रत्येकाने नॅशनल लायब्ररी येथे दोन दिवसीय सुरू असलेल्या या ग्रंथ महोत्सवाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केले.

             दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी कळवले आहे. नॅशनल लायब्ररी वांद्रे पश्चिम येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयमुंबई उपनगरतर्फे आयोजित ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ चे उद्घाटन मुंबई उपनगरचे आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेमुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद महाडिककोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवेराज्य ग्रंथालयाचे प्रशांत पाटील, अॅड. दीपक पडवळकरमुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड उपस्थित होते.

            आमदार अॅड. आशिष शेलार म्हणालेकाळाच्या ओघात वाचनाच्या पद्धती बदललेल्या आहेत. मात्र नव्या पिढीला दोन दिवस येथे सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या साहित्य संस्कृतीची माहिती मिळेल. ग्रंथ महोत्सवात विविध प्रकाशकांची पुस्तके देखील आहेत. शासनाच्या या  उपक्रमाचा येथील सर्व ग्रंथ प्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

            कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. बनसोड यांनी प्रास्ताविक केले. तर कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती साळवे यांनी आभार मानले.

ग्रंथ महोत्सव २०२३ मध्ये उद्या विविध परिसंवाद

            दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.५ मार्च रोजी पहिल्या सत्रात 'प्रकाशन व्यवसायातील आव्हानेया परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळेमॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळेजयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकरज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असेल.

            वाचन संस्कृतीसामाजिक बांधिलकी या विषयी चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. अवयव दान काळाची गरज हे पुरुषोत्तम पवार सादर करणार आहेत.

             याशिवाय राकेश तळगावकर यांची संकल्पना असलेले  मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रमात श्रीनिवास नार्वेकरअस्मिता पांडे राजश्री पोतदारआशुतोष घोरपडेसमीर दळवी आणि विनीत मराठे यांचा सहभाग असणार आहे.

            समारोपात वाचनाची आनंदयात्रा या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिलेविनम्र भाबलतसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे आपले मनोगत व्यक्त करतील. सोबत ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे स्टॉल असणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ग्रंथप्रेमी आणि वाचक प्रेमींसाठी विनामुल्य असणार आहेत.

००००

‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र

  ‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. 4 : ‘ताडोबाअंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतीलअसा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवेअसा विचार मनात आला. त्यामुळेच 4482 चौ. मीटरमध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते-बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे’असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

            चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमात वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)  शोमिता विश्वासमहिम गुप्ताताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरउपवनरंक्षक कुशाग्र पाठकजितेश मल्होत्रासार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणेकार्यकारी अभियंता मुकेश टांगलेविभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीदेशाचे रक्षण करणा-या जवानांना आपण सॅल्यूट करतोतसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणा-या वन अधिकारी व कर्मचा-यांना आज सॅल्यूट करण्याची गरज आहे. देशाची सेवा सर्वतोपरी आहेतशीच वसुंधरेचे रक्षण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्टच असला पाहिजे. जगायचा आनंद पैशाने विकत घेता येत नाहीतो पर्यावरणातूनच मिळू शकतो. त्यामुळे ताडोबा भवन हे पर्यावरणाचा आनंद देणारे केंद्र राहीलअसे त्यांनी नमूद केले.

            मंत्री म्हणालेताडोबा भवन हे इको – फ्रेंडली असावेया इमारतीमध्ये विजेचे बील येता कामा नयेत्यासाठी संपूर्ण इमारत सोलर पॅनलवर करावी. या इमारतीच्या बांधकामासाठी 18 कोटी 8 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहेमात्र इतर अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यासाठी अतिरिक्त 14 कोटी रुपये त्वरीत देण्यात येतील. वनविभागाच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.

वन विभागात पायाभूत सुविधा उत्तम

            वन विभागाच्या इमारतीविश्रामगृह अतिशय उत्तम करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यातील वन कर्मचा-यांच्या निवासी वसाहतीसुद्धा कॅम्पमधून उत्तम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

असे राहील ताडोबा भवन

            चंद्रपूर येथील मुल रस्त्यावर असलेल्या क्षेत्र संचालकताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत 18 कोटी 8 लक्ष खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर 100 आसन क्षमतेचे ऑडीटोरीयमपहिल्या माळ्यावर उपवनरंक्षक (बफर) आणि उपवनसंरक्षक (कोअर) यांचे कार्यालय तर दुस-या माळ्यावर क्षेत्रीय संचालक यांचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय संकीर्ण बांधकामामध्ये पेव्हींग ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामांचा समावेश आहे.

0000

हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द

वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 

            मुंबईदि. ४ :  वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वन विभागाने  ६५,७२४ रोपट्यांपासून भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. यामुळे  वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत वनविभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  नावावर करण्याचाही विक्रम केला आहे.

            चंद्रपूर येथे वनविभागाच्यावतीने १ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव २०२४’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प शनिवारी (२ मार्च) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या तब्बल ६५,७२४ रोपट्यांनी भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त केले.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आतापर्यंत वन विभागाने चार लिमका रेकॉर्ड केले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारीवन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपूर येथे ६५,७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या हरित भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असल्याचे त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वासमहिप गुप्ताताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकरवनअधिकारी प्रशांत खाडेमिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.

त्वरित उद्यान करण्याच्या सूचना

             ‘भारतमाता’ शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वनविभागाने एक चांगले उद्यान त्वरीत साकारावे. तसेच आज मिळालेले प्रमाणपत्र हे तेथे दर्शनी भागात लावावे. विशेष म्हणजे ही रोपटे सुध्दा नवनिर्मित उद्यानामध्ये भारतमाता’ याच शब्दाप्रमाणे लावावीतअशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

अनेक वर्षांची मागणी पूर्णवाशिमकरांमध्ये उत्साह

 

            वाशिमदि. 4 : वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेला होता.

            सोहळ्याला संभाजीराजे छत्रपतीपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलखासदार भावना गवळीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरेआमदार ॲड. किरण सरनाईकमाजी मंत्री महादेव जानकरगोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेयजिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारेपोलीस अधीक्षक अनुज तारेसहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आदी सोहळ्याला उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले.  सोहळ्याला स्थानिक नागरिकशिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी नगरपरिषदेमार्फत १.२५ कोटी खर्च करण्यात आला आहे. हा पुतळा जमिनीपासून ३५ फूट उंच तर अश्वारुढ पुतळा १३ फूट उंच आहे.

०००

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल

 शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी

प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व

शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण

            वाशिमदि. 4 :  शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असूनअनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलखासदार भावना गवळीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरेआमदार ॲड. किरण सरनाईकमहादेव जानकरगोपीकिशन बाजोरियाजिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.पोलीस अधीक्षक अनुज तारेसहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुरकृषी सहसंचालक किसन मुळेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, 'आत्मा'च्या प्रकल्प संचालक अनिसा इस्माईल महाबळे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेशेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक रूपयांत पीक विमाकिसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे येथील स्थानिक शेतीमालाला विक्रीची सुविधा,  तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. 

            केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसेच मूल्य साखळी विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन  शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेजक्लिनिंगग्रेडीगपॅकेजिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

            सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणाऱ्या रथाला यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटी ८४ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याचप्रमाणेअडीच कोटी रुपये निधीतून शेतकरी प्रशिक्षण गृह निर्माण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी व संलग्न विभागाच्या तंत्रज्ञानविषयक गरजेवर आधारित प्रशिक्षण देणेनाशवंत शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा केंद्राचा उद्देश आहे. केंद्राची क्षमता प्रीकूलिंग १० मे.टनकोल्ड स्टोरेज ४० मे.टनरायपेनिंग चेंबर १५ मे.टनग्रेडिंग अँड पॅकिंग२ व्यावसायिक गाळे आहेत. जिल्ह्यातील एकूण ९० शेतकरी उत्पादक कंपनी२ हजार २१४ शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे ३० हजार २१० शेतकऱ्यांना संघटित करण्यात आले आहे.

०००


Monday, 4 March 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान शासकीय गटात जिल्हा परिषद शाळा साखरा तर खाजगी शाळा गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूल प्रथम

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान

शासकीय गटात जिल्हा परिषद शाळा साखरा तर

खाजगी शाळा गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूल प्रथम

                                             शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

 

            मुंबईदि. 3 :-  राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव ढगा) शाळेने पटकावले आहे. शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. कर्जत जि. रायगड)तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली.) यांनी मिळविला तर  खाजगी शाळा गटात शारदाबाई पवार विद्यानिकेतनशारदानगर (ता. बारामती जि. पुणे)  द्वितीय आणि भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शालेय शिक्षण मंत्री  दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती दिली. पारितोषिक प्राप्त शाळांना येत्या मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाया उपक्रमांत  1 लाख  3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या. यामध्ये 64 हजार 312 शासकीय शाळा आणि 39 हजार खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये कोटी लाख 64 हजार 420 विद्यार्थी व 94 लाख 97 हजार 166 मुलींचा सहभाग होता. 

अभियानात बक्षिसांची रक्कम 66 कोटीवर

            राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस 51 लाखद्वितीय क्रमांक 21 लाख आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेस 11 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.  या  अभियानात राज्यस्तरावर-1, बृहन्मुंबई मनपा-1, अ व ब वर्ग मनपा-1, विभागस्तरीय-8, जिल्हास्तरीय-36, तालुकास्तरीय-358 अशी प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका व ’ व ’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाखदुसरे 11 लाख व तिसरे पारितोषिक लाख रूपयांचे असेल. विभागीय स्तरावर पहिले 21 लाखदुसरे 11 लाखतिसरे लाख रूपयांचेजिल्हास्तरावर पहिले 11 लाखदुसरे लाखतिसरे लाख रुपये तर तालुकास्तरावर पहिले लाखदुसरे लाखतिसरे लाख रुपयेअशी 66 कोटी 10 लाखाची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम नियमितपणे राबविणार

            विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येईलअसेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. ते म्हणालेशिक्षकपालकविद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेऊन 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाहा उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला. या उपक्रमातून शाळांच्या बाह्य घटकांसोबत व आंतर घटकांवर देखील प्रभावी काम करण्यात आले. या उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला यातून या उपक्रमाचे महत्व अधोरेखित होते शाळा व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून प्रेरणा मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून प्रोत्साहित केले हेही या उपक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.

वाचन सवय प्रतिज्ञा मध्ये 18 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग : गिनीज बुक ने घेतली दखल

            वाचन चळवळीमध्ये 18 लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञा मध्ये सहभाग घेतला असून शिक्षण विषयक हस्तलिखित स्पर्धेत 13 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एका दिवसात हस्ताक्षरातील अभिप्रायांचा फोटो संकेत स्थळावर अपलोड केला आहे. याची दखल गिनीज बुक मार्फत घेण्यात आली असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियान पेपर लेस पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात आल्याचे सांगून श्री. केसरकर यांनी सांगितले,  वीज बचतआर्थिक साक्षरताडिजिटल उपक्ररणाचा वापरलोकशाही संसदीय मूल्यांचा वापरवैज्ञानिक दृष्टिकोन विकसन याकडे अभियानात विशेष लक्ष देण्यात आले.  

000000

 

 

हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ आजच्या उपक्रमात नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

  

हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत

एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

आजच्या उपक्रमात नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

 

ठाणे,दि.3 (जिमाका):-  "शासन आपल्या दारी" हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणेहे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचेकष्टकऱ्यांचेशेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी "शासन आपल्या दारी" च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. दि.15 एप्रिल 2023 पासून "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हयात एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.

            "शासन आपल्या दारी" या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदानकल्याण शिळफाटाकोळेकल्याण येथे करण्यात आले होतेत्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार सर्वश्री निरंजन डावखरेकिसन कथॊरे,  संजय केळकरकुमार आयलानीविश्वनाथ भोईरशांताराम मोरेआमदार गीता जैनआमदार मनिषा कायंदेमाजी आमदार रविंद्र फाटकएम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त संजय मुखर्जीसिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोलेजिल्हाधिकारी अशोक शिनगारेसर्व महानगरपालिकांचे आयुक्तजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुतेअपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळेनिवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीहे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. शेतकरीसर्वसामान्य माणूसगरजूवंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली. यातून समृध्दी महामार्गअटल सेतू, मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत आपण पहिल्या क्रमांकावर आणला.

            स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. यामुळे प्रदूषण झपाट्याने कमी होत आहे. हे राज्य शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. यातूनच मराठा आरक्षणाचाही प्रश्न आपण सोडवला. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्य सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान पद्धतीने होत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यामुळे देशाचा सन्मान जगात वाढल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी हे शासन आता ठाणे जिल्ह्यात 6 व 7 मार्च रोजी "नमो महा रोजगार" मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे. या महारोजगार मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावाअसे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. ते म्हणाले कीएमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करीत आहे. हे राज्य शासन जनतेसाठी काम करत असल्याने जनता "शासन आपल्या दारी" या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "शासन आपल्या दारी" हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पहिल्यांदाच सुरू केला. सामान्य माणसाला आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात सतत जावे लागायचे. त्यापेक्षा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा.  या उद्देशाने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे एकही पात्र लाभार्थी लाभापासून  वंचित  राहणार नाहीअसे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना  पोचविण्यासाठी काम सुरु आहे. "शासन आपल्या दारी "या योजनेच्या माध्यमातून शासनाचा  प्रत्येक अधिकारी प्रत्येक गरजू लाभार्थ्याच्या  घरापर्यत  जावून योजना पोहोचवित आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून  जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब व्यक्तीचे बँकेमध्ये खाते सुरू केले आहे. "शासन आपल्या दारी" योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जातो. जनसामान्यांच्या हिताचा असा हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी व संबधीत अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

      खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की,  जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी आले आहेत. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे. कल्याण पूर्व मध्ये सर्वात प्रथम "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम झाला. यामध्ये 20 हजार  लोकांना याचा लाभ दिला. तळागाळातील लोकांपर्यंत योजना  पोहोचण्यासाठी "शासन आपल्या दारी" हा  कार्यक्रम घेण्यात आला आहे.

            ते म्हणाले की, मेट्रो- 12 च्या निविदाचे काम पूर्ण झाले असून त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे पसरत आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो होत आहे. येणाऱ्या काळात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आणणार आहोत. तिसरी मुंबई ही नवी मुंबई ते कल्याण यामध्ये विकसित होत आहे. एम.एम.आर.डी.ए. नवीन डीपीआर तयार करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरविले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम येथे होत आहे. अंबरनाथ मध्ये दीडशे कोटी अनुदान मिळालेत्याचे आज भूमीपूजन झाले.

             कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली तसेच सभामंडपात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोबाईल टॉर्च दाखवून आणि त्याला उपस्थित नागरिकांनीही आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले. तसेच या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचे लाभ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई मेट्रो – 12 (कल्याण ते तळोजा) प्रकल्प कामाचा ई शुभारंभ आणि कल्याण पश्चिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ई उद्धाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

ooooo

Featured post

Lakshvedhi