Wednesday, 28 February 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

             मुंबईदि. 27 : राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्गरस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 645 कोटी रूपये खर्चाच्या वर्धा ते कळंब (जि. यवतमाळ) या 39 कि.मी लांबीचा रेल्वे मार्ग  व अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील 645 कोटी रूपये खर्च आलेल्या न्यु आष्टी ते अंमळनेर (जि. बीड) या 32.84 कि.मी लांब रेल्वे मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी रोजी  यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. तसेच वर्धा- कळंब स्टेशनपर्यंत नवीन रेल्वेला व अंमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेचा आरंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

             रस्ते प्रकल्पांमध्ये 291 कोटी खर्चाच्या साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंत 55.80 कि.मी दुपदरी रस्ता काम378 कोटी रूपये खर्च असलेल्या सलाई खुर्द – तिरोडा (जि. गोंदीया) महामार्गावरील 42 कि.मी लांबीच्या क्राँक्रीटीकरण रस्ता कामतसेच 483 कोटी रूपये खर्च आलेल्या वरोरा – वणी (जि. यवतमाळ) महामार्गावरील 18 कि.मी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पणही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना कार्डही प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

कोकण विभाग राज्यस्तरीय मेळाव्याच्या तारीख आणि ठिकाणामध्ये बदल कोकण विभागस्तरीय "नमो महारोजगार मेळावा" 6 व 7 मार्च रोजी ठाणे येथे होणार

 कोकण विभाग राज्यस्तरीय मेळाव्याच्या तारीख आणि ठिकाणामध्ये बदल

कोकण विभागस्तरीय "नमो महारोजगार मेळावा"

6 व 7 मार्च रोजी ठाणे येथे होणार

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी,

तर बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करावी

            मुंबई, दि. 27 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय  कोकण   'नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचेआयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आधी दि. 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होता. त्यानंतर  ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी होईल असे जाहीर केले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव या होणाऱ्या मेळाव्याच्या तारखा मध्ये बदल झाला आहे. हा मेळावा दि. 6 व 7 मार्च रोजी मॉडेला मिल कपाऊंडवागळे इस्टेट ,चेक नाका ,ठाणे - ४००६०४ येथे होणार आहे, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवतीतसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  कोकण विभागांतर्गत ठाणेपालघररत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता  'नमो महारोजगार मेळाव्याचेआयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून ६ व ७ मार्च रोजी हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स,इनवेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

        या मेळाव्यात दहावीबारावी,आय.टी.आय.पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जावून उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी  उपस्थित राहू शकतात.एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

       कोकण विभागांतर्गत ठाणेपालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीयखाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 -120 -8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

-000000-

संध्या गरवारे/विसंअ/

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावी

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावी

- मंत्री संजय बनसोडे

             मुंबईदि. 27 : कोकणचा सर्वांगिण विकास होण्यासाठी कोकणातील बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी पायाभूत सोयी – सुविधांची विकास कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीअसे निर्देश बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

            कोकणातील विविध बंदर विकासाबाबत आढावा बैठक मंत्री श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरेबंदरे विभागाचे प्रधान सचिव संजय सेठीसहसचिव सिद्धार्थ खरातमुख्य अभियंता श्री. गोसावी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

            वाल्मिकी नगर जेट्टीचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. बनसोडे म्हणालेयेथील रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. जंजिरा येथे दोन रस्ते करून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात. आणखी एक रस्ता झाल्यास या भागाकडे पर्यटकांचा ओढा वाढेल. पर्यावरणाला कुठलीही हानी पोहचणार नाहीयाची काळजी घ्यावी. यासाठी पर्यावरण विभागाची मान्यता घेवून कामे करावीत.

            बंदरांमधील विकास कामांचे नकाशे तातडीने संबंधित यंत्रणेकडून मंजूर करून ऑनलाईन अपलोड करावीत. बागमांडला जेट्टीजवळ पार्किंग व इतर सुविधा देण्यात याव्यात. शेखाडी जेट्टीचे मजबूतीकरणाचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. आरावी व कोंडबील या जुन्या जेट्टी असून त्यांचे नूतनीकरण करण्यात यावेअसेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बंदर विकासाबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

            मुंबईदि. 27 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुखमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

            यावेळी विविध वाङ्मय पुरस्कार  प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रकार- प्रौढ वाङ्मय : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख)

1) काव्य:  श्रीकांत ढेरंगे यांना कवी केशवसुत पुरस्कार2) नाटक/ एकांकिका: डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांना राम गणेश गडकरी पुरस्कार3) कादंबरी: सुचिता खल्लाळ यांना हरी नारायण आपटे पुरस्कार4) लघुकथा: कीर्ती मुळीक यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार,  5) ललितगद्य (ललित विज्ञानासह) : अरुण खोपकर यांना अनंत काणेकर पुरस्कार,  6) विनोद: नीलिमा क्षत्रिय यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 7) चरित्र : डॉ. राजेंद्र मगर यांना न.चिं.केळकर पुरस्कार 8) आत्मचरित्र : संजीव सबनीस यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 9) समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन: सत्यशील देशपांडे यांना श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 10) राज्यशास्त्र/ समाजशास्त्र: नीलांबरी जोशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 11) इतिहास: पराग चोळकर यांना शाहू महाराज पुरस्कार 12) भाषाशास्त्र/ व्याकरण: डॉ. शैलजा बापट यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार 13) विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) :  मिलिंद किर्ती यांना महात्मा जोतीराव फुले पुरस्कार 14) शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन: मंदार मुंडले यांना वसंतराव नाईक पुरस्कार 15) उपेक्षितांचे साहित्य (वंचितशोषितपिडीतआदिवासीकष्टकरीअनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) : हिरामण तुकाराम झिरवाळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 16) अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन: डॉ. गिरीश वालावलकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार 17) तत्त्वज्ञान व मानसशास्त्र: डॉ. अलका देव यांना ना.गो.नांदापूरकर पुरस्कार 18) शिक्षणशास्त्र: डॉ.गणपती कमळकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 19) पर्यावरण : अतुल देऊळगावकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 20) संपादित/ आधारित: संपादक डॉ.मंदा खांडगेडॉ.स्वाती कर्वेडॉ.विद्या देवधरडॉ.कल्याणी दिवेकर यांना रा.ना.चव्हाण पुरस्कार 21) अनुवादित: अनुवादक अलका गरुड यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार तर 22) संकीर्ण (क्रीडासह) : जॉन गोन्सालविस यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालवाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) कविता:दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार 2) नाटक व एकांकिका: सुरेश शेलार यांना भा.रा. भागवत पुरस्कार  3) कादंबरी: सुभाषचंद्र वैष्णव यांना साने गुरूजी पुरस्कार 4) कथा (छोट्या गोष्टीपरिकथालोककथांसह) : नीलिमा करमरकर यांना राजा मंगळवेढेकर पुरस्कार 5) सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे): मालविका देखणे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार तर 6) संकीर्ण :  डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना ना.धो. ताम्हणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाङ्मय पुरस्कार प्रकार- प्रथम प्रकाशन : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) काव्य : पुनीत मातकर यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार 2) नाटक/ एकांकिका : शार्दूल सराफ यांना विजय तेंडूलकर पुरस्कार 3) कादंबरी: माणिक पुरी यांना श्री.ना.पेंडसे पुरस्कार 4) लघुकथा: विवेक वसंत कुडू यांना ग.ल.ठोकळ पुरस्कार 5) ललितगद्य : आशालता दिनेश पडवेकर यांना ताराबाई शिंदे पुरस्कार तर 6) समीक्षा सौंदर्यशास्त्र: भरतसिंग पाटील यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            वाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार:  विठ्ठल गावस यांना सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानासाठी सव्वातीन कोटीवर मदत मंजूर बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा

 जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानासाठी सव्वातीन कोटीवर मदत मंजूर

बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा

- मंत्री अनिल पाटील

            मुंबई दि. २७ :- जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यात जून२०१९ मध्ये वादळ व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  ३ कोटी २५ लाख ४२ हजार इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजूरी  दिली आहे.  याबाबतचा शासन निर्णय २६  फेब्रुवारी २०२४  रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना  मदत व दिलासा मिळेलअसे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

            जळगाव जिल्ह्यात जून२०१९ मध्ये वादळी वारा व गारपीटीमुळे ३ हजार ८५६ बाधित शेतकऱ्यांच्या २ हजार ३९०.०८ हेक्टरवरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केल्याचे  मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले

००००

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

            मुंबईदि. 27 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुखमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

            यावेळी विविध वाङ्मय पुरस्कार  प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रकार- प्रौढ वाङ्मय : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख)

1) काव्य:  श्रीकांत ढेरंगे यांना कवी केशवसुत पुरस्कार2) नाटक/ एकांकिका: डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांना राम गणेश गडकरी पुरस्कार3) कादंबरी: सुचिता खल्लाळ यांना हरी नारायण आपटे पुरस्कार4) लघुकथा: कीर्ती मुळीक यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार,  5) ललितगद्य (ललित विज्ञानासह) : अरुण खोपकर यांना अनंत काणेकर पुरस्कार,  6) विनोद: नीलिमा क्षत्रिय यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 7) चरित्र : डॉ. राजेंद्र मगर यांना न.चिं.केळकर पुरस्कार 8) आत्मचरित्र : संजीव सबनीस यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 9) समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन: सत्यशील देशपांडे यांना श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 10) राज्यशास्त्र/ समाजशास्त्र: नीलांबरी जोशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 11) इतिहास: पराग चोळकर यांना शाहू महाराज पुरस्कार 12) भाषाशास्त्र/ व्याकरण: डॉ. शैलजा बापट यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार 13) विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) :  मिलिंद किर्ती यांना महात्मा जोतीराव फुले पुरस्कार 14) शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन: मंदार मुंडले यांना वसंतराव नाईक पुरस्कार 15) उपेक्षितांचे साहित्य (वंचितशोषितपिडीतआदिवासीकष्टकरीअनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) : हिरामण तुकाराम झिरवाळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 16) अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन: डॉ. गिरीश वालावलकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार 17) तत्त्वज्ञान व मानसशास्त्र: डॉ. अलका देव यांना ना.गो.नांदापूरकर पुरस्कार 18) शिक्षणशास्त्र: डॉ.गणपती कमळकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 19) पर्यावरण : अतुल देऊळगावकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 20) संपादित/ आधारित: संपादक डॉ.मंदा खांडगेडॉ.स्वाती कर्वेडॉ.विद्या देवधरडॉ.कल्याणी दिवेकर यांना रा.ना.चव्हाण पुरस्कार 21) अनुवादित: अनुवादक अलका गरुड यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार तर 22) संकीर्ण (क्रीडासह) : जॉन गोन्सालविस यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालवाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) कविता:दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार 2) नाटक व एकांकिका: सुरेश शेलार यांना भा.रा. भागवत पुरस्कार  3) कादंबरी: सुभाषचंद्र वैष्णव यांना साने गुरूजी पुरस्कार 4) कथा (छोट्या गोष्टीपरिकथालोककथांसह) : नीलिमा करमरकर यांना राजा मंगळवेढेकर पुरस्कार 5) सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे): मालविका देखणे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार तर 6) संकीर्ण :  डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना ना.धो. ताम्हणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाङ्मय पुरस्कार प्रकार- प्रथम प्रकाशन : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) काव्य : पुनीत मातकर यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार 2) नाटक/ एकांकिका : शार्दूल सराफ यांना विजय तेंडूलकर पुरस्कार 3) कादंबरी: माणिक पुरी यांना श्री.ना.पेंडसे पुरस्कार 4) लघुकथा: विवेक वसंत कुडू यांना ग.ल.ठोकळ पुरस्कार 5) ललितगद्य : आशालता दिनेश पडवेकर यांना ताराबाई शिंदे पुरस्कार तर 6) समीक्षा सौंदर्यशास्त्र: भरतसिंग पाटील यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            वाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार:  विठ्ठल गावस यांना सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0000

पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ·

 पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

·       पंतप्रधान गगनयानच्या प्रगतीचाही घेणार आढावा

·       पंतप्रधान महाराष्ट्रात 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वेरस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि लोकार्पण

·       पंतप्रधान पीएम -किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत सुमारे 3800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता करणार जारी

·       पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार

·       संपूर्ण महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा पंतप्रधान करणार प्रारंभ

·       मोदी आवास घरकुल योजनेचा पंतप्रधान करणार प्रारंभ

Featured post

Lakshvedhi