Friday, 23 February 2024

महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी

 महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी

 

            मुंबई, दि. २२ : बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला नामवंताच्या भेटीसोबत मुंबईकरांनी मोठा प्रतीसाद दिला आहे. जेष्ठ दिगदर्शक राजदत्तसंगीतकार श्रीधर फडकेअभिनेत्री स्मिता तांबेमनवा नाईक या मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले आहे.

            या प्रदर्शनात राज्यातील १२५ पेक्षा जास्त लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात खादीपैठणीहिमरू शालमधहस्तकलावारली पेंटिंग्जबांबूपासून तयार वस्तूकोल्हापूरी चप्पलज्वेलरी, मसाले इत्यादी दर्जेदार गोष्टीं अत्यंत वाजवी किंमतीत उपलब्ध आहेत. प्रदर्शनातील एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये प्रत्यक्ष वस्तूंची निर्मिती सुद्धा पाहायला मिळते.

            याशिवाय स्वयं सहायता महिला बचत गटाच्या खाद्य पदार्थांची मेजवानीविविध प्रांतातील स्वादिष्ट व रुचकर पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल देखील या प्रदर्शनात अनुभवता येते.

            या प्रदर्शनाला आतापर्यंत हजारो मुंबईकरांनी भेटी दिल्या आहेत.

            हे प्रदर्शन २५ फेब्रुवारी पर्यंत बी के सी येथील एमएमआरडीए ग्राऊन्ड वर आहे. मुंबईकरांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी केले आहे.

0000

नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत २०४ कोटी निधीस मान्यता

 नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी

विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत २०४ कोटी निधीस मान्यता

- मंत्री अनिल पाटील

            मुंबईदि. २२ :-  नागपूर शहरात  सप्टेंबर२०२३ मध्ये  झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्यासाठी  राज्य शासनाने विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत २०४ कोटी ७१ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            या निधीस  प्रशासकीय मान्यता मिळाल्याने पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण होऊन याचा नागरिकांना लाभ मिळेलअसा विश्वास मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

            अतिवृष्टीमुळे नागपूर शहरात नुकसानग्रस्त पायाभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

            प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या या निधीमध्ये नुकसान झालेल्या नदी नाल्यांच्या ८.४१ कि.मी. लांबीच्या  बांधकामांसाठी १६३ कोटी २३ लाख ३१ हजार आणि नादुरुस्त झालेल्या ६१.३८ कि. मी. रस्त्यांच्या दुरस्तीच्या कामासाठी ४१ कोटी  ४८ लाख ३१ हजार रुपयांचा समावेश आहे.

            नागपूर शहरात २३ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबाझरी तलावनाग नदीपिवळी नदीआणि स्थानिक नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे शहरातील अनेक भागात विशेषत: अंबाझरी तलावनाग नदीजवळील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती व या भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. नागपूर महापालिका अग्निशमन दलएनडीआरएफएसडीआरएफभारतीय लष्कर आणि आपदा मित्र या बचाव पथकांनी या ठिकाणी अडकलेल्या ३४९ व्यक्तींची सुटका केली होती. अतिवृष्टीमुळे नागपूर शहरात २ व्यक्ती आणि १४ गुरे बुडून मृत झाली होती. दोन मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख प्रमाणे अनुदान मंजूर केले होते. तसेच मृत जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई पोटी एक कोटी १२ लाख ५०० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते अशी माहिती, मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/


 

महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार

 महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार

- मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर

‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ चे उद्घाटन

            मुंबईदि. २२ : महासंस्कृती महोत्सवामध्ये मर्दानी खेळ, शिववंदनासह राज्याच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडणार असून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

            शहीद भगतसिंग मैदानअभ्युदय नगरकाळाचौकी येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागमहाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने  महासंस्कृती महोत्सवाचे २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री दीपक केसरकर  बोलत होते.

            या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकरमुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव,अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र कटकधोंडनिवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी,सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीमुंबई शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबईतील पोलीस वसाहतींचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरच एक केंद्र सुरू करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी  गिरगाव येथे पहिले काळजी केंद्र  सुरू होणार आहे.मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय येथे दर बुधवारी आणि मुंबई महापालिकेत देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो असे मंत्री श्री.केसरकर म्हणाले.

            उद्घाटन समारंभानंतर 'जल्लोषया कार्यक्रमात सुशांत शेलारपूजा सावंतश्वेता खरात जुई बेंडखळेगौरी कुलकर्णीविश्वजीत बोरवणकरआनंदी जोशीकमलाकर सातपुतेअंशुमन विचारेकौस्तुभ दिवाण, पूर्वी भावे यांचा सहभाग होता.

            महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमात २३ ते २६ फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. प्रदर्शन दालनामध्ये शिवकालीन शस्त्रेनाणी व हस्तलिखीतेशिवसंस्कार काव्य दालनस्वराज्य ते साम्राज्य आर्ट गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच रंगमंचावरील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे महाराष्ट्राची लोकधारा व लोकनृत्यशिववंदनमराठी बाणाजल्लोषसप्तरंग-हास्य व नृत्य गाण्यांचा बहारदार नजराणादशावतार कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. तसेच मर्दानी खेळामध्ये मल्लखांबलेझीमपारंपारिक नृत्य कला प्रकारदेशभक्तीपर गीतेइ. चा समावेश असणार आहे. या कार्यक्रमामध्ये  स्थानिक कलावंताच्या कलेस वाव मिळणार आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/


 

वृत्त क्र. 701

भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन

 भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना   

आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विशेष मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्देश

 

            मुंबईदि. 22 : भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना जन्म दाखलाआधारकार्डमतदार ओळखपत्रशिधापत्रिकाआयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका देण्याबाबत कार्यवाही करावी. या समाजातील नागरिकांना आधारकार्ड देण्याबाबत महिनाभरात प्राधान्यक्रमाने शिबिरांचे आयोजन करण्यात यावेअसे निर्देश महसूलपशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले.

            भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर आणि भटके विमुक्त विकास परिषदेचे पदाधिकारी हजर होते. तसेच  सर्व विभागीय आयुक्तसर्व जिल्हाधिकारी आणि इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. सावे म्हणालेभटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना  विविध दाखले व प्रमाणपत्र मिळण्यासाठी विविध शासकीय विभागांमार्फत निर्देश झालेले आहेत.

            या समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी प्रामुख्याने जन्म दाखलाआधारकार्डमतदार ओळखपत्रशिधापत्रिकाआयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका,  जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र यांची गरज असते ते मिळताना विविध समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो.  हे टाळण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

             भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांना आधार कार्ड देण्याबाबत माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) यांनी क्षेत्रिय स्तरावर सुचना दिलेल्या आहेत तसेच या अनुषंगाने विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना  कळविण्यात आले आहे.

            भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांना शिधापत्रिकाचे वितरण व्हावे यासाठी विशेष मोहिम राबविण्याकरिता  अन्न व नागरी पुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड व सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी दिली.

००००

राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश नवजात मृत्यू कमी करण्यातही विभागाला यश बाल आरोग्य कक्षाची उल्लेखनीय कामगिरी

 राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश

नवजात मृत्यू कमी करण्यातही विभागाला यश

बाल आरोग्य कक्षाची उल्लेखनीय कामगिरी

 

            मुंबईदि. 22 : राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागामार्फत सातत्‍याने प्रयत्‍न करण्यात येत आहे.  या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र शासनाच्‍या २०१८ च्या एसआरएस अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति १००० जिवंत जन्मामागे १९ असा होतात्यात घट होऊन सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार तो १६ झाला  आहे.

            तसेच सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार राज्याचा नवजात मृत्यू दर हा ११ असून महाराष्ट्राने शाश्वत विकास ध्येयाचे (एसडीजी २०३०) नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठले आहे.

            आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी नियमित यासाठी बैठका घेतल्या.

            राज्यातील जिल्‍हा रुग्णालय,  स्त्री  रुग्णालय  व  काही  उपजिल्‍हा रुग्णालयांत शिशु अती दक्षता विभागाची  (एसएनसीयू)ची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण ५३ एसएनसीयू कक्ष स्थापन  करण्यात आले  आहेत. या ठिकाणी  बाळ  जन्मल्‍यानंतर बाळाचे वजन कमी असल्‍यासकाविळ झाली असल्‍यास किंवा त्याला इतर कोणताही त्रास असल्‍यास बाळाला  एसएनसीयू  कक्षामध्ये  दाखल  करुन  उपचार  केले  जातात. एसएनसीयुमध्ये  किमान  १२  ते  १६  खाटा  असून  हा  कक्ष  रेडियंट  वॉर्मरफोटोथेरपी युनिटइन्प्युजन पंपमॉनिटर्सनॉन इनवेसिव्ह व्हेंटीलेशन (सीपीएपी) यासारख्या उपकरणांनी सुसज्‍ज आहे. राज्यात माहे एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४  पर्यंत  एकूण ५६ हजार ४६७  बालकांना  एसएनएसीयुमध्ये  उपचार  करण्यात आले.  त्यांपैकी  १५००  ग्रॅम पेक्षा  कमी  वजनाच्या  ५ हजार ४५९  बालकांवर  उपचार करण्यात आले.

            राज्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्‍हा रुग्णालय येथे नवजात स्थिरीकरण युनिट (एनबीएसयू) कार्यरत  आहेत. राज्यात  एकूण २०० एनबीएसयु असून येथे सौम्य आजार असलेल्‍या नवजात बालकांवर उपचार केले  जातात.  या कक्षामार्फत  रेडियंट वॉर्मरफोटोथेरपी युनिटपल्‍स ऑक्सीमीटरकांगारु मदर केअरस्‍तनपानाची लवकर सुरुवात,  ऑक्स‍िजन सलाईन,  आदी सेवा देण्यात येतात. राज्यात माहे एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत एकूण २४ हजार ६३ बालकांवर उपचार करण्यात आले.

माँ ( मदर एब्सुल्युट अफेक्शन) कार्यक्रम

             स्तनपानाविषयी मातेलावडिलांना तसेच कुटुंबियांना योग्य माहिती पुरविण्यासाठी तसेच स्तनपान व शिशुपोषणास सक्षम असे वातावरण तयार करण्यासाठीचा हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमा अंतर्गत प्रचार व प्रसिध्दीस्तनदा व गरोदर मातांसाठी आशांमार्फत घेण्यात येणाऱ्या माता बैठकाआरोग्य कर्मचाऱ्यांना स्तनपान व शिशूपोषणाचे प्रशिक्षणसनियंत्रण व  मूल्‍यमापनसर्व आरोग्य संस्थांचे शिशू  मैत्रीकरण इ. उपक्रम राबविले जातात. यामध्ये ६ महिन्यापर्यंत निव्वळ स्‍तनपान व ६ महिन्यानंतर पूरक आहार देण्‍याबाबत समुपदेशन करण्यात  येते. माहे एप्रिल २०२३  ते  डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण १ लाख ७२ हजार ९४१ माता बैठका झाल्‍या असून यामध्ये १३लाख ७४ हजार ५१५ मातांना समुपदेशन करण्यात आले.

 

ॲनिमिया मुक्‍त भारत कार्यक्रम

            राज्यातील लहान बालकेकिशोरवयीन मुले व मुलीगर्भवती व स्तनदा मातांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत ॲनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ६ महिने ते ५९ महिने व ५ ते ९ वर्ष या वयोगटातील बालकांना१० ते १९ वर्षे वयोगटातील  किशोरवयीन मुला-मुलींनागर्भवती व स्तनदा माता व प्रजननक्षम वयोगटातील स्त्रिया यांना लोह व फॅालिक ऑसिड (IFA) या औषधाची प्रतिबंधात्मक पूरक मात्रा देण्यात येते. तसेच रक्तक्षय असलेल्‍या लाभार्थ्यांना  आवश्यक उपचार व संदर्भ सेवा देण्यात येते.

गृहस्तरावर नवजात बालकांची काळजी

            राज्यातील नवजात शिशु व अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या  कार्यक्रमांतर्गत आशा सेविकांना १ ते ४ टप्याचे प्रशिक्षण देण्यात येते. आशांव्दारे एच.बी.एन.सी. प्रशिक्षणाच्या आधारावर नवजात बालकांना ४२ दिवसात सहा ते सात गृहभेटी देण्यात येतात. आरोग्य संस्थेत प्रसूती झालेल्‍या माता व नवजात बालकांस आशा मार्फत ६ गृहभेटी या जन्मानंतर ३,,१४,२१,२८ व ४२ व्या दिवशी देण्यात येतात.

            तसेच घरी प्रसूती झालेल्‍या माता व नवजात बालकांस आशामार्फत ७ गृहभेटी या १,,,१४,२१,२८ व ४२ व्या दिवशी देण्यात येतात. या वेळापत्रकाप्रमाणे गृहभेटी दिल्‍यास प्रत्येक आशाला २५० रुपये इतके मानधन अदा करण्यात येते. प्रसूतीच्या ४२ दिवसांपर्यंत आई आणि नवजात  बालक दोघेही सुरक्षित राहतीलयाची  खात्री करण्यात येते. गृहभेटी दरम्यान जंतुसंसर्गन्युमोनियाहायपोथर्मियातापस्तनपान समस्याअतिसारकमी दिवसाची बालकेकमी वजनाची बालकेडोळयाने दिसणारे जन्मजात व्यंग अशी बालके  आढळल्‍यास नवजात शिशुंना जवळच्या शासकिय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येते. बालकांच्या तपासणी दरम्यान आढळलेल्‍या बाबींची नोंद करण्याकरिता आशांना एचबीएनसी बुकलेट उपलब्ध करुन दिले आहे. गृहभेटी दरम्यान पोषणआरोग्यप्रारंभिक बालपणातील विकास आणि वैयक्तिक व परिसर स्वच्छता या ४ प्रमुख बाबींवर भर देण्यात येतो.

००००

निलेश तायडे/विसंअ/


 


अष्टपैलू' अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा

 अष्टपैलूअशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगाला हेवा वाटेल अशी मुंबईची फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न

            मुंबईदि. २२ : आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यां


नी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेतअशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी जे जे आवश्यक आहेत्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करूअसे प्रतिपादन त्यांनी केले.

            महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज  प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. याशिवायमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारशालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकरआमदार मनीषा कायंदे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेमहाराष्ट्र राज्य चित्रपटरंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.

            यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीअष्टपैलूहा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे.  अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येत आहेहा अवघ्या महाराष्ट्रासाठी  केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

            गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाहीअसे त्यांनी सांगितले. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगितीक कारकीर्द उभी केली. मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध भाषांतील त्यांची गाणी विशेष गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतोअशा शब्दात त्यांनी  ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा गौरव केला.

            मुख्यमंत्री म्हणाले कीमुंबईतल्या फिल्मसिटीत शुटींगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेचमुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर 'वन विंडो सिस्टीम'चा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. या शुटींगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. राज्यात ७५ नवे चित्र नाट्यगृह उभारण्यासाठी ९ कोटी ३३ लाखाचा निधी  मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            आजचा  दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला. आज आपले कलाविश्व समृध्द करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. चित्रपट सृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृध्द करणारी ही मंडळी आहेत. अशोक सराफ यावर्षी ७५ वर्षाचे झालेत. त्यांच्या अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण देत आहोत. मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेतअशी भावना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

            ते म्हणाले कीमराठीहिंदी चित्रपटसृष्टीनाटक यामध्ये सर्व पद्धतीच्या भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्या. त्यांनी साकारलेला नायक हा स्वप्नातील नव्हे तर खऱ्याखुऱ्या जीवनातील नायक वाटायचे. त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो. याशिवायसुरेश वाडकर यांनी गेल्या कित्येक वर्षे त्यांच्या सुरेल आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. ज्या लोकांनी आपले जीवन आनंदमय केलेत्यांना पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळालीअशी भावनाही यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्राची भूमी ही कलाकारांची खाण : मंत्री सुधीर मुनगंटीवार

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीमहाराष्ट्र हे जसे आर्थिक शक्तिकेंद्र आहे तसे ते सांस्कृतिक शक्तिकेंद्र आहे.  महाराष्ट्राची भूमी ही आता कलाकारांची खाण झाली आहे.  या कलावंतांचा सन्मान करताना सांस्कृतिक कार्य विभाग सोनेरी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

            फिल्मसिटीच्या बाहेर जिथे चित्रीकरण असेल तिथे शुल्क आकारले जाणार नाही. मनोरंजन करातून सुट या अगोदरच दिली असल्याचे सांगून जगातील सर्वात उत्तम फिल्मसिटी करू शकतोअसा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील : अशोक सराफ

            महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलातयाचा खरोखर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भली मोठी. त्यात मला स्थान दिले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना त्यांनी मदत केली आहेही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडले तर डोक्यावर घेतात. रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिले. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या ह्रदयात हे प्रेम कायम राहीलअशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

लतादीदींच्या नावे पुरस्कार हा आशीर्वाद : सुरेश वाडकर

            यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लताजींच्या नावाचा पुरस्कार हा आशीर्वाद आहे. आजही लतादीदी आपल्यात आहेतहीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द असे आपले राज्य आहे. महान सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यात कलावंतांचा मोठा वाटा आहे. विविध सांस्कृतिक पुरस्कारमहोत्सव आयोजित करून व्यासपीठ निर्माण करण्याचे काम राज्य शासन करीत आहे. तीन वर्षाचे पुरस्कार यावर्षी देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते राजकपूर जीवनगौरव पुरस्कार २०२० ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणीसन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते  मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना प्रदान करण्यात आला.  तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक  जे. पी. दत्तासन २०२१ साठी ख्यातनाम गायक  सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही श्री. विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.  सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी (मरणोत्तर)सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र महाजनी यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र गश्मिर महाजनी यांनी तर श्रीमती उषा चव्हाण यांच्यावतीने विजय कोंडके यांनी पुरस्कार स्वीकारला.

            चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरेसन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक  रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

            यावेळी चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.

0000

दीपक चव्हाण/निलेश तायडे/विसंअ/


वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी एकसमान स्वीकार प्रणाली अवलंबावी

 वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी

एकसमान स्वीकार प्रणाली अवलंबावी

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

            मुंबईदि. २२ : ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या फेडरेशनच्या प्रस्तावानुसार देहदान स्वीकारण्यासाठी राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी एकसमान स्विकार प्रणाली (sop) अवलंबावी असे वैद्यकीय शिक्षणऔषधी द्रव्य आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            राज्यातील अवयवदान क्षेत्रात अधिक सुधारणा करण्यासाठी मंत्रालयात आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.

            फेडरेशनद्वारे अवयव दानाच्या प्रचार आणि प्रबोधनासाठी राज्यभरात  पदयात्राकार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे अशा विविध उपक्रमांचा आढावा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घेतला व त्याबद्दल फेडरेशनचे कौतुक केले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात नेत्र व त्वचा स्वीकारण्यासाठी (retrieval center) केंद्र उभारावे, असे निर्देश मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

            श्री. मुश्रीफ म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात फेडरेशनच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अवयव दान कार्यकारिणी समिती नेमावी. समितीमध्ये जिल्हाधिकारीसीईओजिल्हा माहिती अधिकारीवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापत्रकारपोलीस मित्ररेड क्रॉस सदस्यनिवृत्त प्रशासकीय अधिकारीमाजी सैनिक यांचा समावेश असावा. दि फेडरेशन ऑफ ऑर्गनबॉडी डोनेशन यांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किंवा शासकीय रुग्णालयात अवयव दानाविषयीचे माहिती केंद्र असावे  .

            यावेळी फेडरेशनचे संस्थापकअध्यक्ष पुरुषोत्तम पवारकोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य समन्वयक योगेश अग्रवालयशोदर्शन फाउंडेशन कोल्हापूरच्या रेखा बिरांजे, समीर पाटील उपस्थित होते.

0000

Featured post

Lakshvedhi