Wednesday, 21 February 2024

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 23.37 कोटी रुपये वितरित.

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 

23.37 कोटी रुपये वितरित.

            मुंबई दि. 20 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत  23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला आहे.

            राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 23.37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

0000

कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार

 कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

            मुंबईदि. 20 : कोल्हापूर, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न  100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. एकूण 7 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.

            कोल्हापूरसह इतर 4 परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकामफर्निचरयंत्रसामुग्रीमनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी अंदाजे 107 कोटी 94  लाख  इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येतील, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

Tuesday, 20 February 2024

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे 26 फेब्रुवारीपासून

 राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई येथे 26 फेब्रुवारीपासून

27 फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार

            मुंबई, दि. 20 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार, दि. 26 फेब्रुवारी ते शुक्रवार, दिनांक 1 मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यान, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे.

            विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. 

            या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

            अर्थसंकल्पिय अधिवेशन 26 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024 या कालावधीत होणार असून, एकूण पाच दिवस कामकाज चालणार आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे 26 फेब्रुवारीपासून

 राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई येथे 26 फेब्रुवारीपासून

27 फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार

            मुंबई, दि. 20 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवारदि. 26 फेब्रुवारी ते शुक्रवारदिनांक 1 मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यानराज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे.

            विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. 

            या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलविधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारविधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्यविधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी  मान्यवर उपस्थित होते.

            अर्थसंकल्पिय अधिवेशन 26 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024 या कालावधीत होणार असूनएकूण पाच दिवस कामकाज चालणार आहे.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा

 ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता

मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 20 : राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात शिक्षण व नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे एकाच गावात नांदणारे मराठा व ओबीसी बांधव यापुढेही गुण्यागोविंदाने नांदतील व दोन्ही समाजाचा विकास होईलअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केले.

            विधीमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर श्री. फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले कीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले. दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

            यापूर्वी मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला. उच्च न्यायालयात तो कायदा टिकला मात्रसर्वोच्च न्यायालयात यामध्ये त्रुटी काढून आरक्षण रद्द करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी दूर करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने माजी मुख्य न्यायमूर्ती श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने सुचविलेल्या उपाययोजनानुसार मराठा समाजाला आरक्षण देता यावे यासाठी मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आले. अडीच कोटीहून जास्त घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण देणे योग्य ठरेलअसे मत राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री. शुक्रे व आयोगाने मांडले होते. या अहवालाच्या शिफारसी मंत्रीमंडळाने स्वीकारल्या. समितीच्या शिफारशींवर आधारित हे आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगया सर्वेक्षणाचे काम करणारे सुमारे 3.50 लाख शासकीय कर्मचारी आणि या विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल विरोधी पक्ष यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

            मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला असून दुसरीकडे मराठा समाजाच्या उत्थानासाठी राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज संशोधन संस्था म्हणजेच सारथीअण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ अशा विविध संस्थांच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणाईला निश्चितपणे न्याय मिळेलअसा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

            मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला कुठेही अडचण होईलत्यांचे आरक्षण कमी होईलत्यात कुठला वाटेकरी होईलअशा प्रकारचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही. ओबीसी समाजाला पूर्णपणे संरक्षित केले आहेअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

०००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार

 कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’

 ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवण्याचे,

बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन

            मुंबईदि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवतीतसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंडढोकाळीमाजीवाडाठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागातंर्गत ठाणेपालघररायगड, सिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील  नोकरीइच्छुक युवक व युवतींकरिता  'नमो महारोजगार मेळाव्याचेआयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दि. २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४  रोजी आयोजित केला जाणार असे घोषित करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव या तारखांमध्ये बदल झाला असून ठाणे येथे होणारा मेळावा २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनवेस्टर्स व इनकुबेटर्स या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

            कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले कीदहावीबारावी,आय.टी.आय.पदविकापदवीधरपदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जावून उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

            ‘नमो महारोजगार’ मेळाव्याकरिता जास्तीत जास्त नोकरीच्या रिक्तपदे संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

            कोकण विभागातंर्गत ठाणेपालघररायगड,सिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीयखाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

Featured post

Lakshvedhi