Thursday, 15 February 2024

पुणे जिल्ह्याच्या निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला भाविकांसाठी उद‌्वाहनाची सोय करावी

 पुणे जिल्ह्याच्या निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध,

दिव्यांगमुलेमहिला भाविकांसाठी उद‌्वाहनाची सोय करावी

उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबईदि. 14 :- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकदिव्यांगमुलेमहिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची सोय होण्यासाठी अत्याधुनिक उद‌्वाहनाची सोय करावी. त्यासाठी लागणारी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात खंडोबा मंदिर येथे उद‌्वाहन बसविणे आणि इतर सोयीसुविधांबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवन वभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीवित्त विभागाच्या सचिव शैला ए.पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी सुहास दिवसे आदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीनिमगाव येथील खंडोबा मंदिर उंचावर असल्याने याठिकाणी भाविकांना विनासायास जाता येण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी रोप वेची मागणी केली होती. त्याठिकाणी रोप वेची योग्य उभारणी करता येत नसल्याने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून उद‌्वाहन उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उद‌्वाहनासह इतर सुविधांसाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव निधीमधून पैसे देण्यास मंजुरी मिळाली आहे. भाविकांना चांगल्या सोयीसुविधा दिल्यास येथे चांगले पर्यटनस्थळ निर्माण होऊ शकते. या सुविधांच्या उभारणीसाठी शासकीय जागेची आवश्यकता आहे. सार्वजनिक हितासाठी येथील जमिनीचा वापर होत असल्याने राज्य शासनाने जिल्हा परिषदेला निशुल्क जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी. संबंधित यंत्रणेने उद‌्वाहनाची सुविधा करताना सर्व खबरदारी घ्यावीत्याची देखभाल दुरूस्ती पहावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

            निमगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकभक्त निवासअॅम्पी थिएटरबगीचापार्किंगकार्यालयप्रसादालयस्वच्छतागृहेस्कायवॉक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. उद‌्वाहनामधून दिव्यांगवृद्धमहिलाबालके यांना प्राधान्य देण्यात येणार असून एकावेळी २६ नागरिकांना उद‌्वाहनामधून जाता-येता येणार आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.

००००

Wednesday, 14 February 2024

चारचाकी वाहनांच्या आकर्षक व पसंत क्रमांकाद्वारे 41 लाख रुपयांचा महसूल नवीन एमएच 03 ईएल श्रृंखलेत पसंती क्रमांक नोंदविण्याचे आवाहन

 चारचाकी वाहनांच्या आकर्षक व पसंत क्रमांकाद्वारे 41 लाख रुपयांचा महसूल

नवीन एमएच 03 ईएल श्रृंखलेत पसंती क्रमांक नोंदविण्याचे आवाहन

              मुंबईदि. 13 : नागरिकांनी विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी परिवहन कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर केले आहेत. मान्यतेअंती पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे व पसंती क्रमांकासाठी देय असलेले शासकीय शुल्क जमा केले आहे. यापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये 41 लाख 73 हजार 633 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

               परिवहन कार्यालयाच्या एमएच 03 ईएल या श्रृंखलेत विशेष करून 0001 या क्रमांकासाठी 4 लाख रूपयेदोन वेगवेगळ्या क्रमांकांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये, 8 वेगवेगळ्या पसंती क्रमांकासाठी प्रत्येकी 70 हजार रुपये, 16 पसंती क्रमांकांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयेएका पसंती क्रमांकासाठी 22 हजार 500, 49 वेगवेगळ्या आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये, 98 विविध आकर्षक व पसंती क्रमाकांसाठी प्रत्येकी 7 हजार 500 रुपये, 54 पसंती क्रमांकांसाठी 5 हजार रूपयेअशा प्रकारे एकूण 229 आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी 38 लाख 22 हजार 500 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.  12 फेब्रुवारी पर्यंत एकूण 234 अर्जदारांकडून आकर्षक व पसंती क्रमांकासाठी एकूण 41 लाख 73 हजार 633 रुपयांचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे.

               तसेच एकाच क्रमांकाला एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास त्या वाहन क्रमांकाचे लिलाव करून अर्जदाराला पसंती क्रमांकासाठी विहीत केलेल्या शासकीय शुल्का व्यतिरिक्तअतिरिक्त शुल्क जमा करावे लागते. त्यानुसार या कार्यालयामध्ये 0901, 5050, 3333, 1111 व 6699 या पाच क्रमांकांसाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी क्रमांक आरक्षित करण्याकरीता अर्ज सादर केला होता. या पाचही क्रमांकासाठी एकूण 11 अर्ज प्राप्त झाले होते. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने या पाच क्रमांकाचा लिलाव करण्यात आला व त्या – त्या क्रमांकासाठी अर्जदारांनी एकापेक्षा अतिरिक्त शुल्क संबंधित कार्यालयात जमा करून क्रमांक आरक्षित केला. या पाच क्रमांकांसाठी लिलावाद्वारे एकूण 3 लाख 51 हजार 133 रूपये शासकीय महसूल प्राप्त झाला आहे.

               दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी डिलर पॉइंट नोंदणी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. खासगी चारचाकी वाहनांची मालिका एमएच 03 ईएफ (MH03EF) ही पूर्ण झाल्याने चारचाकी वाहनांसाठी एमएच 03 ईएल ही नवीन मालिका 6 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे. या श्रृंखलेत आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

 मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी

निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीची बैठक

            मुंबईदि. 13 : महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार  प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा पोलीस विभाग करीत आहेत. निर्भया प्रकल्पांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करून मुंबईत महिलांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी विविध बाबींवर आज मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

            निर्भया योजनेंतर्गत मुंबई पोलिसांचे श्वान पथक’ सक्षम करून गुन्हे सिद्धतेसाठी अधिकचे पुरावे मिळणार आहे. त्यामुळे महिला अत्याचार गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्यास मदत होईल.  वितरीत करण्यात आलेला निधीमधून या पथकाचे सक्षमीकरण होईल. यामधून श्वान पथकाची निश्चितच क्षमतावृद्धी होणार आहे.

                 रेल्वे पोलिसांना निर्भया प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या निधीचा उपयोग करून रेल्वेलोकलमध्ये महिला सुरक्षेच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबई शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या निर्भया पथकातील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी वॉर्म कॅमेरे’ देण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सिद्ध करतेवेळी पुरावे गोळा करण्यासाठी  निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या अशा कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डींग उपयोगी ठरणार आहे.

              त्याचप्रमाणे या प्रकल्पांतर्गत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमधील तपास कार्य जलद गतीने पूर्ण  करण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने संवदेनशील भागात फिरत्या गस्त वाहनांची संख्याही वाढविण्यात येईल. तसेच महिला सुरक्षेबाबत जनजागृती मोहीमही राबविण्याचे प्रस्तावित आहे. अशा विविध बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

*****

नीलेश तायडे/विसंअ/

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी

 पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. 13 : देशात इंद्रधनुष्याप्रमाणे कृषी क्षेत्रात हरित क्रांतीदुग्ध उत्पादनात श्वेत क्रांतीडाळींच्या उत्पादनात पित क्रांतीमत्स्य उत्पादनात नील तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली. आगामी काळात पशुपालनमत्स्य शेती व दुग्धव्यवसाय हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक  होणार असून या क्षेत्रात गुंतवणूकउद्योग व रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतीलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

            राज्यपाल श्री. बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा (माफसू) ११ वा दीक्षांत समारंभ झालात्यावेळी ते बोलत होते.

            शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय व मत्स्यपालनाची भूमिका महत्वाची आहे, असे सांगून पशुविज्ञान विद्यापीठातील स्नातकांकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची तसेच  रोजगार निर्मिती करुन ग्रामीण भागात उपजीविका उपलब्ध करुन देण्याचे सामर्थ्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  या क्षेत्रातील स्नातकांनी पशुपालनदुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन या क्षेत्रात उद्योग सुरु करावेअसे आवाहन राज्यपालांनी केले. 

            विद्यापीठातील प्राध्यापक - स्नातकांनी २०२२ या वर्षी ‘लम्पी’ त्वचा रोगाच्या निर्मूलनाचे कार्य करताना अनेक प्राण्यांचे जीव वाचवले तसेच स्वदेशी गायींच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

            दोन महिन्यांपूर्वी आपण गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती असे सांगून मनुष्य व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.    

            आपल्या दीक्षांत भाषणात मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अनिलकुमार श्रीवास्तव यांनी दुग्ध उत्पादन क्षेत्रातील श्वेतक्रांतीचा प्रभाव व सकल मूल्य हरित क्रांतीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. अन्नधान्य उत्पादनात देश आत्मनिर्भर आहे. पोषण सुरक्षेची समस्या दूधअंडीमासे व मांस यांच्या माध्यमातून सोडविता येऊ शकते असे त्यांनी सांगितले.  वातावरणातील टोकाच्या बदलांचा मोठा परिणाम कृषी व अन्नधान्य उत्पादनावर होत असून राज्यात तसेच देशात पशुसंवर्धन व मत्स्यपालन उद्योग यातील मोठ्या क्षमतांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

            दीक्षांत समारोहात १७९० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या९५ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके देण्यात आली तर तीन स्नातक विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली. 

            यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. ‘माफसु’चे कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी विद्यापीठ अहवाल सादर केला.

            दीक्षांत समारोपाला विद्यापीठाचे माजी कुलगुरुइतर विद्यापीठांचे कुलगुरुविभाग प्रमुखशिक्षक व स्नातक उपस्थित होते. 

*****

Maharashtra Governor presides over

11th Convocation of MAFSU through online mode

      Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the 11th Annual Convocation of the Maharashtra Animal and Fishery Sciences University (MAFSU) through online mode.

      Degrees were awarded to 1769 candidates, while gold and silver medals were given to 95 candidates. Three graduating students were given cash prizes.

      The Message of Minister of Animal Husbandry and Dairy Development Radhakrishna Vikhe Patil was read out on the occasion.

      Vice Chancellor of Pt Deen Dayal Upadhyaya Veterinary Science University Mathura Dr A K Shrivastav delivered the Convocation address while MAFSU Vice Chancellor Niteen Patil read out the University's Report.

      Former vice chancellors of the University, vice chancellors of other universities, Heads of Department, teachers and graduating students were present.

0000

.

शिवजयंतीचे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात आयोजन

 शिवजयंतीचे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात आयोजन

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

            मुंबईदि. १३ : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीयसामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्याप्रति कृतज्ञता अर्पण करणेहे सर्वांचे कर्तव्य आहे. राज्यातील सर्वांनी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावीअसे आवाहन वनसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

            यासंदर्भातमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनीसर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईलत्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी रंग-रंगोटी करुन रोषणाई करणेरांगोळी काढणे आदी व्यवस्था करण्याबाबत कळविले आहे.

            शिवजयंती उत्सवाच्या आरंभी राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या आधी व कार्यक्रमादरम्यान शिववंदनास्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायनछत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धाशौर्यगीत स्पर्धावक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. यासंदर्भात स्थानिक जिल्हास्तरावर व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग असावाअशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

            कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रसिद्धीसाठी टीजरशॉर्ट क्लिपग्राफिक्सविविध मान्यवर यांच्या आवाहनाचे छोटे व्हिडिओ अशा पद्धतीने समाज माध्यमांचा उचित उपयोग करावा. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावेअशा सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या आहेत.

            राज्य शासनामार्फत दरवर्षी दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. दि. १९ फेब्रुवारीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेततेथे जयंती साजरी करण्यात यावीअसे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. त्याचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वर्षभरात विविध उपक्रम

            दरम्यान,  शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग आणि इतर विभागांच्या साह्याने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी झालेले अतिक्रमण वन विभागामार्फत हटविण्यात आले.

            दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आग्रा येथील दिवाण ए खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. राज्याभिषेकाच्या एक महिना आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी मातेसाठी छत्र अर्पण केले होते. त्या घटनेचे औचित्य साधून श्री. मुनगंटीवार यांनी यावर्षी दिनांक २१ मे २०२३ रोजी प्रतापगड येथील भवानी माता मंदिरास चांदीचे छत्र अर्पण केले.

             सन २०२३ च्या रायगड येथील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रा २६ मे २०२३ रोजी राजभवन येथून सुरू करण्यात आली व या जलाद्वारे रायगड येथे दि. २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात येते. या मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी मंत्री श्री. मुनगंटीवार यांचेमार्फत रायगड उत्सव समितीस भेट देण्यात आली.

            दिनांक १ जून २०२३ रोजी गेट वे ऑफ इंडियामुंबई येथे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचे प्रसारण करण्यात आले. किल्ले रायगड येथे दि. २ जून २०२३ रोजी तिथीप्रमाणेही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. दि. ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने "शिवकालीन होन" या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन, मुंबई येथे अनावरण करण्यात आले. मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास दि. १८ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी एक शिवविचार ऐकवण्यात येतो.

            छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालयात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. जम्मू - काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बसविण्यात आला. दि. १२ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मॉसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजाजिल्हा बुलढाणा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहेत. याचा आरंभ १३ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे करण्यात आला. "मराठा साम्राज्याचे चलन" या विषयासंदर्भात जनजागृतीसाठी एकदिवसीय शिबिर महाराष्ट्र राज्यात बारा ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच या विषयासंदर्भात मराठीहिंदीइंग्रजी या भाषांमध्ये कॉफीटेबल बुक तयार करण्यात येणार आहे.

            राज्याचे वित्त व नियोजन मंत्री असताना श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन श्री शिवाजी मेमोरियल कमिटीश्रीशैल्यमआंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीशैल्यम येथे ध्यानमंदिर बांधण्यासाठी रुपये ३ कोटी ३८ लाख आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली होती.  

000

सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सैनिक कल्याण कार्यालयातील

पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबईदि. १३ : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०वसतिगृह अधीक्षक-१७कवायत प्रशिक्षक-०१शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१तर गट "क" या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिकागट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी ०१ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे.

            ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्या मार्फत होणार आहे.  परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे ३ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होणार असल्याचे सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

शिवजयंतीचे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात आयोजन

 शिवजयंतीचे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात आयोजन

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

            मुंबईदि. १३ : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीयसामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्याप्रति कृतज्ञता अर्पण करणेहे सर्वांचे कर्तव्य आहे. राज्यातील सर्वांनी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावीअसे आवाहन वनसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

            यासंदर्भातमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनीसर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईलत्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी रंग-रंगोटी करुन रोषणाई करणेरांगोळी काढणे आदी व्यवस्था करण्याबाबत कळविले आहे.

            शिवजयंती उत्सवाच्या आरंभी राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या आधी व कार्यक्रमादरम्यान शिववंदनास्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायनछत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धाशौर्यगीत स्पर्धावक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. यासंदर्भात स्थानिक जिल्हास्तरावर व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग असावाअशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

            कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रसिद्धीसाठी टीजरशॉर्ट क्लिपग्राफिक्सविविध मान्यवर यांच्या आवाहनाचे छोटे व्हिडिओ अशा पद्धतीने समाज माध्यमांचा उचित उपयोग करावा. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावेअशा सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या आहेत.

            राज्य शासनामार्फत दरवर्षी दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. दि. १९ फेब्रुवारीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेततेथे जयंती साजरी करण्यात यावीअसे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. त्याचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वर्षभरात विविध उपक्रम

            दरम्यान,  शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग आणि इतर विभागांच्या साह्याने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी झालेले अतिक्रमण वन विभागामार्फत हटविण्यात आले.

            दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आग्रा येथील दिवाण ए खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. राज्याभिषेकाच्या एक महिना आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी मातेसाठी छत्र अर्पण केले होते. त्या घटनेचे औचित्य साधून श्री. मुनगंटीवार यांनी यावर्षी दिनांक २१ मे २०२३ रोजी प्रतापगड येथील भवानी माता मंदिरास चांदीचे छत्र अर्पण केले.

             सन २०२३ च्या रायगड येथील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रा २६ मे २०२३ रोजी राजभवन येथून सुरू करण्यात आली व या जलाद्वारे रायगड येथे दि. २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात येते. या मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी मंत्री श्री. मुनगंटीवार यांचेमार्फत रायगड उत्सव समितीस भेट देण्यात आली.

            दिनांक १ जून २०२३ रोजी गेट वे ऑफ इंडियामुंबई येथे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचे प्रसारण करण्यात आले. किल्ले रायगड येथे दि. २ जून २०२३ रोजी तिथीप्रमाणेही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. दि. ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने "शिवकालीन होन" या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन, मुंबई येथे अनावरण करण्यात आले. मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास दि. १८ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी एक शिवविचार ऐकवण्यात येतो.

            छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालयात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. जम्मू - काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बसविण्यात आला. दि. १२ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मॉसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजाजिल्हा बुलढाणा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहेत. याचा आरंभ १३ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे करण्यात आला. "मराठा साम्राज्याचे चलन" या विषयासंदर्भात जनजागृतीसाठी एकदिवसीय शिबिर महाराष्ट्र राज्यात बारा ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच या विषयासंदर्भात मराठीहिंदीइंग्रजी या भाषांमध्ये कॉफीटेबल बुक तयार करण्यात येणार आहे.

            राज्याचे वित्त व नियोजन मंत्री असताना श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन श्री शिवाजी मेमोरियल कमिटीश्रीशैल्यमआंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीशैल्यम येथे ध्यानमंदिर बांधण्यासाठी रुपये ३ कोटी ३८ लाख आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली होती.  

000

Featured post

Lakshvedhi