Tuesday, 13 February 2024

बारा बलुतेदारांसाठी संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना

 बारा बलुतेदारांसाठी संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाला ग्वाही

 

            मुंबईदि. 12 :- बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईलअसे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईलअशी निसंदिग्ध ग्वाही आज येथे दिली.

            प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले स्मारकासाठी जागा दिली जाईल. बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजना म्हणून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तेर- ढोकी येथील संत गोरोबा काका समाधीस्थळास 'वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. ऋणमोचन येथील संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारकाच्या तसेच पंढरपुरातील नामदेव महाराज समाधीस्थळ विकासासाठी गती दिली जाईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            राज्यातील बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. 

            कोविड काळात लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक विवंचनेतून नाभिक समाजातील काही व्यक्तिंनी आत्महत्या केली होतीअशांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

            बैठकीत सुरुवातीलाच बारा बलुतेदार ओबीसी समाज संघटनांच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी ओबीसी समाजाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल आभार मानले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी म्हणणे मांडलेत्यावर मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाहीयाचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुनरूच्चार केला. ते म्हणाले कीराज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत राहून आणि न्यायालयात टिकणारं आरक्षण दिले जाईल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहोत. त्यामुळे कुठल्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. एकाच्या ताटातला घास अन्य दुसऱ्याच्या ताटात दिला जाणार नाहीयाबाबत बारा बलुतेदार समाज बांधवांनी निश्चिंत रहावेअसेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

            यावेळी शिष्टमंडळातील योगेश केदार यांच्यासह माजी आमदार हरिभाऊ राठोडबालाजी शिंदेसोमनाथ काशिदडॉ. पी. बी. कुंभारबाळासाहेब सुतार आदींनी समाज बांधवांच्यावतीने मांडणी केली.

००००

प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय

 प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय

होणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            ठाणेदि. 12 :- राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते

             याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटीलखासदार श्रीकांत शिंदेसार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणआमदार कुमार आयलानी,आमदार डॉ.बालाजी किणीकर,प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसुपर स्पेशालिटी रुग्णालय ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून हे शासन नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ठाणे जिल्ह्यातून कॅशलेस सेवा देणारे पहिले रुग्णालय सुरू करण्यात आलेत्यानंतर आता हे उल्हासनगर महानगरपालिकेचे कॅशलेस सेवा देणारे दुसरे सुपर स्पेशलिटी रुग्णालय. अशाच प्रकारे काही दिवसातच मीरा-भाईंदर येथेही कॅशलेस सेवा देणारे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहोत.

             रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पैशांची चिंता भेडसावते. मात्र आता शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती ही दीड लाखाहून पाच लाखावर आणली आहे. त्यामुळे आता कोणालाही आपल्या रुग्णाच्या उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. शासनाकडून पाच लाखापर्यंतचे उपचार विनामूल्य करून देण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देताना ठाणेमुंब्रा येथे कॅन्सर हॉस्पिटल चे काम सुरू आहे. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून चार हजार कोटी रुपयांची मदत राज्य शासनाला मिळणार असून त्यातून आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे,असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेहे राज्य प्रगतीपथावर आहे. विशेषतः कृषीआरोग्यशिक्षणपर्यावरण आणि पायाभूत सुविधा या विषयांवर राज्य शासनाकडून नियोजनबद्ध काम करण्यात येत आहे. लेक लाडकी योजनाएसटीमध्ये महिलांना तिकीटात 50 टक्के मोफत सवलतचार कोटी महिलांची आरोग्य तपासणी अशा विविध माध्यमातून शासन महिलांसाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लवकरच राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील केंद्राच्या बळकटीकरणाबाबतचे कामही सुरू होणार आहे. ठाण्यातील 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

             राज्य शासन आरोग्य व्यवस्था अधिकाधिक उत्तम दर्जाची करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनीडॉक्टरांनी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावाअसे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

            या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलमंत्री रवींद्र चव्हाणखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

            उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तेजल बोडके-नागरे यांनी केले.

0000


Monday, 12 February 2024

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मंगळवारी वितरण ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासह विविध क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कारांचेही होणार वितरण

 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मंगळवारी वितरण

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासह विविध क्षेत्रातील

जीवनगौरव पुरस्कारांचेही होणार वितरण

 

            मुंबईदि. 12 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारभारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव  पुरस्कारनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभ मंगळवार13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सायंकाळी  6-30 वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी सन 2023 साठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. नारायण जाधव यांना,  भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी पं. उल्हास कशाळकर आणि सन 2023 साठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळेनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी श्रीमती सुहासिनी देशपांडे आणि सन 2023 साठी अशोक समेळसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी श्रीमती नयना आपटे आणि सन 2023 साठी पं. मकरंद कुंडलेतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सन 2021 साठी श्रीमती हिराबाई कांबळे आणि सन 2022 साठी अशोक पेठकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

            याशिवाय सन 2022 आणि सन 2023 साठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही या समारंभात प्रदान केले जाणार आहेतसन 2022 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये श्रीमती वंदना गुप्ते (नाटक)मोरेश्वर अमृतराव निस्ताने  (उपशास्त्रीय संगीत)अपर्णा मयेकर (कंठसंगीत)हिरालाल रामचंद्र सहारे (लोककला)शाहीर जयवंत अभंगा रणदिवे (शाहिरी),  लता सुरेंद्र (नृत्य)चेतन दळवी (चित्रपट)प्राची गडकरी (कीर्तन /समाजप्रबोधन)पं. अनंत केमकर (वाद्यसंगीत)डॉ. संगीता राजेंद्र टेकाडे (कलादान)अब्दुलरहेमान माशुम बेपारी उर्फ बुड्डणभाई बेपारी (वेल्हेकर) (तमाशा) आणि भिकल्या लाडक्या धिंडा (आदिवासी गिरीजन) यांचा समावेश आहे.

            सन 2023 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये ज्योती सुभाष (नाटक)पं.ह्रषिकेश बोडस  (उपशास्त्रीय संगीत)रघुनंदन पणशीकर (कंठसंगीत)कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज (लोककला)शाहीर राजू राऊते (शाहिरी),  सदानंद राणे (नृत्य)निशिगंधा वाड (चित्रपट)अमृताश्रम स्वामी महाराज (ह.भ.प. अमृतमहाराज जोशी) (कीर्तन /समाजप्रबोधन)शशिकांत सुरेश भोसले (वाद्यसंगीत)यशवंत रघुनाथ तेंडोलकर (कलादान)उमा खुडे (तमाशा) आणि सुरेश नाना रणसिंग (आदिवासी गिरीजन) यांचा समावेश आहे.

            या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणी सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.  

000

दीपक चव्हाण/विसंअ/

धाराशिव येथे सुसज्ज ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीची कार्यवाही त्वरित सुरु करावी

 धाराशिव येथे सुसज्ज ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीची

कार्यवाही त्वरित सुरु करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील जिल्हा रुग्णालयेवैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट होणार

आशियाई विकास बँकेकडून चार हजार कोटींचे कर्ज मंजूर

पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी कर्ज मिळणार

 

            मुंबई, दि. १२ : आशियाई विकास बँकेने इतके दिवस  प्रलंबित चार हजार कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातून राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपये तत्वत: उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे,  यातून आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालये उभारावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत दिले. सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यात सर्वसुविधायुक्त ५०० बेड्सचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            या बैठकीस आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच आशियाई विकास बँकेचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. राज्य सरकारने आशियाई विकास बँकेने दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रशासकीय सुधारणा केल्यामुळे हे प्रलंबित कर्ज मंजूर झाल्याचे प्रारंभी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सांगितले.

            आशियाई विकास बँकेच्या या कर्जातून राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचे तसेच आरोग्याच्या तृतीयक सेवेचे  ( Tertiary Care) बळकटीकरण होणार आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देखील यापूर्वीच आरोग्य यंत्रणेत आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे.

सुधारणांमुळे कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा

            आशियाई विकास बँकेने इतके मोठे कर्ज मंजूर करण्यापूर्वी सात प्रशासकीय व शैक्षणिक सुधारणा सुचवल्या होत्या. यासंदर्भात सध्याच्या राज्य शासनाने वेगाने पाऊले उचलल्यामुळे कर्ज मंजुरी शक्य झाली असे बँकेचे टीम लीडर डॉ. निशांत जैन यांनी सांगितले. यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सडिजिटल मेडिकल एज्युकेशन आणि हेल्थ पॉलिसी तसेच ई हॉस्पिटलवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनमालमत्ता नियोजनव्यवस्थापन आणि शाश्वतता धोरणउमेदवार भरती कक्षऔषध खरेदी अधिकाराचे विकेंद्रीकरण अशा सुधारणा शासनाने केल्या.

धाराशिव येथे सुसज्ज रुग्णालय उभारावे

            १५० मिलियन डॉलर्स म्हणजेच १२०० कोटी रुपये प्रकल्पाशी संबंधित बांधकामेधोरणात्मक बाबींसाठी बँकेकडून देण्यात येणार असून ३५० डॉलर्स म्हणजेच २८०० कोटी रुपये बांधकाम आणि यंत्रसामुग्रीसाठी दिले जातील. सध्या अलिबाग येथे बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे.

            आज आशियाई विकास बँकेने १२०० कोटींची तत्वत: मान्यता दिली. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्याने याठिकाणी ५०० बेड्सचे सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवावी व कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बैठकीदरम्यान  दिले. परभणी येथे देखील जिल्हा रुग्णालय उभारण्याचे विचाराधीन आहे.

            धाराशिव येथे जिल्हा रुग्णालय उभारण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लगेचच जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

आरोग्यमंत्र्यांकडून समाधान

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी समाधान व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले कीया सुसज्ज रुग्णालयामुळे या भागातील व नजीकच्या जिल्ह्यातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मोठा लाभ होईल. आकांक्षित जिल्हा असल्याने धाराशिवला अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य प्रकल्पाची गरज होतीच असेही ते म्हणाले.

            याप्रसंगी आशियाई विकास बँकेच्या कंट्री डायरेक्टर मिओ ओका यांनी देखील राज्य शासनाने कर्ज मंजुरीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मित्रा तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्य सचिव डॉ नितीन करीरसार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरवैद्यकीय शिक्षण विभाग आणि आयुक्तालयाचे अधिकारी तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

००००


 

वृत्त क्र. 543

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मंगळवारी 

4pilers of life


 

ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहीम; 339 वाहनचालकांची तपासणी

 ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहीम339 वाहनचालकांची तपासणी

 

            मुंबईदि. 09: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात येत आहे. दारू पिऊन नशेच्या अंमलाखाली वाहने चालविली जाऊ नयेतअपघातांची व अपघाती मृत्यूंची रोखणे या उद्देशाने अशा वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्याकरीता ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 339 वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली.

            या मोहिमे अंतर्गत आरटीओ व वाहतूक विभागातील अधिकारी यांनी सायन सर्कलसुमन नगर चौकएडवर्ड नगरअमर महल चौक चेंबूरएलबीएस रोड घाटकोपरविक्रोळीदेवनारमानखुर्द शिवाजी नगर चौक आदी ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली. ही मोहिम 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान  सायं 7 ते रात्री 11.30 या दरम्यान राबविण्यात आली. यावेळी दुचाकीऑटोरिक्षाटॅक्सीमालवाहतूक करणारे हलके वाहनअवजड वाहन व बसचालकांची तपासणी करण्यात आली.

            दारू पिऊन वाहने चालविल्यास निश्चितपणे अपघात होऊन मृत्यूमुखी पडण्याची सर्वात जास्त शक्यता असल्याने वाहनचालकांनी नशेच्या अंमलाखाली वाहने चालवू नयेत. पुढील काळातही ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी दारूच्या अंमलाखाली वाहने चालवू नयेअसे आवाहन प्रादे‍शिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी केले आहे.

डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव तर मनोविकास प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर

 डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव तर

मनोविकास प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर

 

            मुंबईदि. 9 - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व प्रकाशन संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार प्रदान केला जातो. सन 2023 या वर्षासाठी डॉ. रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप पाच लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे असून श्री.पु.भागवत पुरस्काराचे स्वरुप तीन लक्ष रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

            श्री.केसरकर म्हणालेसाहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकाची विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराकरिता निवड करण्यासाठी तसेच साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेची श्री. पु. भागवत पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता या पुरस्काराच्या निवड समितीची बैठक 7 फेब्रुवारी2024 रोजी झाली. या बैठकीत सर्व निकषांचा समग्र विचार करुन साहित्यिकाचे साहित्य क्षेत्रातील भरीव व गुणात्मक योगदानत्यांनी केलेले सृजनात्मक स्वरूपाचे वैविध्यपूर्ण लेखन व महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रासाठी त्यांचे संस्थात्मक योगदान या मुख्य बाबी विचारात घेऊन डॉ.रवींद्र शोभणे यांची विंदा करंदीकर पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

            याबरोबरच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी सर्व निकषांचा समग्र विचार करुन पुस्तक प्रकाशन विषयातील विविधतासंस्थेने आजपर्यंत प्रकाशित केलेली ग्रंथांची संख्या व ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील त्या संस्थेचे भरीव योगदान या मुख्य बाबी विचारात घेऊन मनोविकास प्रकाशनपुणे या प्रकाशन संस्थेची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ


 

वृत्त क्र. ५३०


Featured post

Lakshvedhi