Wednesday, 14 February 2024

पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार

 पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत

सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. १३ : पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

             राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

            या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमारकृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पीक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी केली.

            चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरघोस तरतूद केली. सन 2016 नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला. तथापियाबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने पिक विम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला असून त्याची कार्यपद्धतीयोजना व अंमलबजावणी यांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करावी असे आदेश कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

            या समितीची कार्यकक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करुन एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.

0000

वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील फळपीक बागायतदारांना वि

 वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील फळपीक बागायतदारांना

विमा भरपाईबाबत शासन सकारात्मक

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील काजू उत्पादकांना विमा भरपाई देण्याबाबत तसेच वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण मंडळातील पात्र शेतकरी बागायतदारांना फळ पीक विमा अनुदान देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी  सांगितले.

             शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडामकृषी संचालक दिलीप झेंडेअवर सचिव नीता शिंदे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी तसेच वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

            हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2022 -23 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील माडखोलशिरशिंगेकलंबिस्तओवाळीयेवेर्लेपालपोलीकारिवडे निरुखे व भोम गावातील काजू उत्पादकांची नुकसान भरपाईची मागणी होती. वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण मंडळांतर्गत बागायतदार शेतकऱ्यांचीही अनुदानासंदर्भात मागणी होती. माडखोल येथील शेतकऱ्यांना सावंतवाडीऐवजी आंबोली महसूल मंडळाच्या अंतराची तांत्रिक बाब दुरुस्त करण्यासाठी पीक विमा तक्रार निवारण समितीकडे तक्रारी दाखल करण्याच्या सूचना करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

0000

कलाकारांनी मुंबईला नवी दृश्य ओळख करून द्यावी

 कलाकारांनी मुंबईला नवी दृश्य ओळख करून द्यावी

- राज्यपाल रमेश बैस

जहांगीर कलादालन येथे ६३ व्या राज्य कला प्रदर्शनाला सुरुवात

 

            मुंबई, दि. १३ : दृश्य कला व वास्तुकला नगरांना तसेच महानगरांना दृश्य ओळख करून देतात.  'गेटवे ऑफ इंडियामुंबईची तर 'इंडिया गेटदिल्लीची दृश्य ओळख करून देतात. 'स्टॅचू ऑफ लिबर्टी'ने न्यूयॉर्कला तर 'आयफेल टॉवर'ने पॅरिसला दृश्य ओळख करुन दिली आहे. कला व वास्तुकलेत समृद्ध असलेल्या भारतातील कलाकारांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात मुंबईला एक नवी दृश्य ओळख देणारी कलाकृती निर्माण करावीअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. अशा प्रकारच्या नव्या दृश्य कलाकृतीमुळे देशाचा इतिहाससमृद्ध वारसा व जीवनमूल्ये जगापुढे येतील असे त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे (कलाकार विभाग) उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १३) जहांगीर कलादालन येथे झालेत्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते जाहिरात व डिझाईन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार अरुण पद्मनाभ काळे यांना 'कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरवपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. धातुकला क्षेत्रातील कलाकार विवेकानंद दास यांना ६३ वा महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन ज्येष्ठ कलाकार पुरस्कार देण्यात आला. यावेळी दृश्य कला क्षेत्रातील १५ कलाकारांना देखील सन्मानित करण्यात आले.

            आपण स्वतः काष्ठ कलाकार असून वेळ मिळेल त्यावेळी काष्ठशिल्पे व देवतांच्या मूर्ती तयार केल्या असल्याचे सांगून लाकूड पाहिल्यावर आपल्या मनात त्यात लपलेली कलाकृती दिसू लागते असे राज्यपालांनी सांगितले. दिवंगत मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या कलाकृती पाहिल्या त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता असे श्री. बैस यांनी सांगितले.  देशातील अनेक गावांमध्ये कलाकार आहेतपरंतु त्यांचे शोषण होते. हे शोषण बंद झाले पाहिजे व गावागावातील छुप्या कलाकारांना पुढे आणले गेले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.   

            ऐतिहासिक वास्तू व वारसा कलाकृती पर्यटन वाढविण्यासाठीलोकांमध्ये अभिमानाची भावना जागवितात तसेच रोजगार सृजनासाठी मदत करतात. मात्र आपल्याकडे इतिहासाची व वारस्याची उपेक्षा होताना दिसते. यादृष्टीनेसांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी कॉर्पोरेट्स व व्यावसायिक घराण्यांना सहभागी करून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

            महाराष्ट्राकडे अजिंठा - वेरूळ लेणीशिवकालीन किल्लेघारापुरी लेणीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी जगप्रसिद्ध वारसा स्थळे आहेत. वारसा जतनाच्या कार्यात नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

            जे जे कला महाविद्यालयाने देशाला जी के म्हात्रे व राम सुतार यांच्यासारखे मूर्तिकार तसेच  एमएफ हुसेनअकबर पदमसीएस एच रझाके के हेब्बरवासुदेव गायतोंडेतैयब मेहता यांसारखे चित्रकार दिले.  या महान कलाकारांच्या कलाकृती असलेले स्थायी प्रदर्शन भरवून मुंबईला दृश्यकलेची राजधानी बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.     

            नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेला महत्व देण्यात आले असून नजीकच्या काळात राज्य कला संचालनालयातील १५० पदे भरण्यात येतील असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

            कुलाबा या भागात जहांगीर कला दालनवस्तू संग्रहालयनॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांसारख्या अनेक संस्था असल्यामुळे कुलाबा हा महाराष्ट्राची कला राजधानी आहे असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.  कला प्रदर्शनातून उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळते असे त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीकला संचालक राजीव मिश्रा तसेच अनेक कलाकार उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या युवा कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून प्रदर्शन दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार आहे.

            यावेळी विविध क्षेत्रातील कलाकार नूरील भोसलेसुनील विणेकरप्रसाद मेस्त्रीनागनाथ घोडकेसचिन पखालेपूजा पळसंबकरअनिकेत गुजरेमुकेश पुरोप्रसाद गवळीअभिषेक तिखेश्रवण भोसलेसाक्षी चक्रदेवयोगेश आबुजप्रसाद निकुंभ व सोहेब कुरेशी या कलाकारांना प्रत्येकी ५०,००० रु. पारितोषिक रक्कम असलेले ६३ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन पुरस्कार प्रदान करण्यात आले.   

**

 

Maharashtra Governor inaugurates 63rd State Art Exhibition

Presents Vasudeo Gaitonde Life Time Award to Graphic Designer Arun Kale

 

            The 63rd Maharashtra State Art Exhibition organized by the Directorate of Arts, Government of Maharashtra was inaugurated by Governor Ramesh Bais at Jehangir Art Gallery in Mumbai. The Governor presented the 'Late Vasudeo Gaitonde Kala Jeevan Gaurav Award' to senior graphic design artist Arun Padmanabh Kale. Senior metal sculptor Vivekananda Das was also given the '63rd Maharashtra State Senior Artist award'. Fifteen artists from the field of Visual Art were also honoured.

            Minister of Higher and Technical Education Chandrakant Dada Patil, Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narwekar, Principal Secretary Higher and Technical Education Vikas Chandra Rastogi, Director of Arts Rajeev Mishra and artists from across the State were present.

            The works of many artists from the state have been displayed at the exhibition. The exhibition will remain open till 19th February.

**

प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्यानुसा प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी

 प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्यानुसा

प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी                                                        - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात

5 हजार 150 इलेक्ट्रिक बस दाखल


            ठाणे, दि. 13 (जिमाका) :- खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना “प्रवासी हाच आपला परमेश्वर” असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. 


            यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर, गोपाल लांडगे, मिनाक्षी शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5 हजार 150 इलेक्ट्रिक बस आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. “गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी” या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी एसटी ची बस सेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक-वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. एसटीचे ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान आहे. अविश्रांत काम करणारा एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. इलेक्ट्रिक बस, सीएनजी/एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरण पूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महानगरपालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एस.टी. प्रवासासाठी महिलांना 50 टक्के सवलतीत तिकीट योजना, 65 ते 75 वयातील नागरिकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत.


            एसटी नफ्यात येण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एसटी आपली आहे असे मानून तिचा सांभाळ करायला हवा, असे आवाहन करुन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी चांगली सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावेत, असे निर्देश दिले. ते म्हणाले की, एस.टी आगार स्वच्छ असले पाहिजे, तिथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असाव्यात. शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एसटी सुशोभिकरणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून एस.टी. आगारातील रस्ते चांगले व्हावेत, रंगकाम व्हावे, इतर सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यात, ही अपेक्षा आहे. नवनवीन कल्पना अंमलात आणून एस.टी अधिक लोकप्रिय होण्यासाठी सर्वांनी झटून काम करावे. डीप क्लीन ड्राईव्ह च्या माध्यमातून सर्वत्र उत्तम प्रकारे स्वच्छता होत आहे. शहरी व ग्रामीण भाग कचरामुक्त होण्यासाठी शासन स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न होत आहेत. एस.टी आगारांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित कराव्यात. तेथील स्वच्छतागृह उत्तम दर्जाचे असावेत. एस.टी.चालक-वाहक यांची विश्रांतीगृहे चांगली असावीत. एस.टी. कॅन्टीन चांगले असावे. तिथल्या अन्नाचा दर्जा उत्तम असावा. गाड्या स्वच्छ असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा मिळायला हवी. गेल्या आठ महिन्यांपासून आपण “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक” अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण योजना जाहीर केली आहे.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. “हात दाखवा एसटी थांबवा” या उपक्रमामुळे लोकांमध्ये आणि एस.टीमध्ये भावनिक नाते तयार झाले आहे. एस.टी कर्मचारी गावातील गरजूंना सेवा देतात. एस.टी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू. अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एसटीच्या सेवा दिल्या जातात. राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा देवून आपल्या एस.टी. ला नफ्यात आणूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव पराग जैन यांनी केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी खोपट बसस्थानकाची पाहणीही केली व संबंधित अधिकाऱ्यांना बसस्थानकात अधिक सोयीसुविधा निर्माण करण्याविषयी आवश्यक त्या सू

चना दिल्या.


0000



 


Tuesday, 13 February 2024

कडक कविता कोणाची माहिती नाही, पण कमी शब्दात खुप काही सांगून जाते*

 *कडक कविता कोणाची माहिती नाही, पण कमी शब्दात खुप काही सांगून जाते*


नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!! 😆


*वीज* कधी वाचवणार नाही

*बील* मात्र *माफ* पाहिजे....!!!! 😆


*झाड* एकही लावणार नाही

*पाऊस* मात्र चांगला पाहिजे....!!!! 😆


*तक्रार* कधी करणार नाही

*कारवाई* मात्र लगेच पाहिजे....!!!! 😆


*लाचेशिवाय* काम करणार नाही

*भ्रष्टाचाराचा* मात्र *अंत* पाहिजे....!!!! 😆


*कचरा* खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र *स्वच्छता* पाहिजे....!!!! 😆


कामात भले *टाईमपास* करीन

दर वर्षी नवा *वेतन आयोग* पाहिजे....!!!! 😆


*जातीच्या* नावाने *सवलती* घेईन 

देश मात्र *धर्मनिरपेक्ष* पाहिजे....!!!! 😆


मतदान करताना *जात* पाहीन

*जातीयता  मात्र बंद* झाली पाहिजे....!!!! 😆


*कर* भरताना पळवाटा शोधीन

*विकास* मात्र जोरात झाला पाहिजे....!!!! 😆


नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं *आयतं* पाहिजे.!


🙏🇮🇳🙏

वाद्य राम मंदीर प्रतिकृती

 


राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मंगळवारी वितरण ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासह विविध क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कारांचेही होणार वितरण

 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मंगळवारी वितरण

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासह विविध क्षेत्रातील

जीवनगौरव पुरस्कारांचेही होणार वितरण

 

            मुंबईदि. 12 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारभारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव  पुरस्कारनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभ मंगळवार13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सायंकाळी  6-30 वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी सन 2023 साठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. नारायण जाधव यांना,  भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी पं. उल्हास कशाळकर आणि सन 2023 साठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळेनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी श्रीमती सुहासिनी देशपांडे आणि सन 2023 साठी अशोक समेळसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी श्रीमती नयना आपटे आणि सन 2023 साठी पं. मकरंद कुंडलेतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सन 2021 साठी श्रीमती हिराबाई कांबळे आणि सन 2022 साठी अशोक पेठकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

            याशिवाय सन 2022 आणि सन 2023 साठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही या समारंभात प्रदान केले जाणार आहेतसन 2022 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये श्रीमती वंदना गुप्ते (नाटक)मोरेश्वर अमृतराव निस्ताने  (उपशास्त्रीय संगीत)अपर्णा मयेकर (कंठसंगीत)हिरालाल रामचंद्र सहारे (लोककला)शाहीर जयवंत अभंगा रणदिवे (शाहिरी),  लता सुरेंद्र (नृत्य)चेतन दळवी (चित्रपट)प्राची गडकरी (कीर्तन /समाजप्रबोधन)पं. अनंत केमकर (वाद्यसंगीत)डॉ. संगीता राजेंद्र टेकाडे (कलादान)अब्दुलरहेमान माशुम बेपारी उर्फ बुड्डणभाई बेपारी (वेल्हेकर) (तमाशा) आणि भिकल्या लाडक्या धिंडा (आदिवासी गिरीजन) यांचा समावेश आहे.

            सन 2023 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये ज्योती सुभाष (नाटक)पं.ह्रषिकेश बोडस  (उपशास्त्रीय संगीत)रघुनंदन पणशीकर (कंठसंगीत)कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज (लोककला)शाहीर राजू राऊते (शाहिरी),  सदानंद राणे (नृत्य)निशिगंधा वाड (चित्रपट)अमृताश्रम स्वामी महाराज (ह.भ.प. अमृतमहाराज जोशी) (कीर्तन /समाजप्रबोधन)शशिकांत सुरेश भोसले (वाद्यसंगीत)यशवंत रघुनाथ तेंडोलकर (कलादान)उमा खुडे (तमाशा) आणि सुरेश नाना रणसिंग (आदिवासी गिरीजन) यांचा समावेश आहे.

            या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणी सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.  

000

Featured post

Lakshvedhi