Saturday, 10 February 2024

१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी

 १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी

 - मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

१३ फेब्रुवारीला विशेष मोहीम

 

            मुंबईदि. ०९ : जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमियापोटदुखीउलट्याअतिसारमळमळभूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजार उद्भवण्याची शक्यता असते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याची मोहीम राबविली जाते. येत्या १३ फेब्रुवारीला ही विशेष मोहीम राबविली जाणार असून१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी या मोहिमेंतर्गत जंतनाशक गोळी घ्यावीअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

            राज्यातील आरोग्य विभाग या मोहिमेची जय्यत तयारी करीत असूनवैद्यकीय अधिकारीशिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना याविषयीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोहिमेत १३ फेब्रुवारीला गोळी न घेऊ शकणाऱ्या मुलांना २० फेब्रुवारीला जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. राज्यभरामध्ये १३ फेब्रुवारी रोजी जवळपास २ कोटी ८० लाख मुला-मुलींना १ लाख १० हजार ९४४ अंगणवाडी केंद्रे१ लाख २७ हजार ८४९ शाळा व महाविद्यालयांमध्ये जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभागशिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावाअसे आवाहनही करण्यात आले आहे.

            आरोग्य विभागाकडून सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. यंदा १३ फेब्रुवारी रोजी ही विशेष मोहीम राबविली जात असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये बैठकही घेतली जात आहे.

            जंतनाशक मोहिमेमध्ये १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी२ ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येतेतर ३ ते ६ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयाच्या मुला-मुलींना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास देण्यात येते. वर्षातून दोन वेळा ही गोळी घ्यायला हवी. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावीअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

            या मोहिमेविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.

मोफत मिळते जंतनाशक गोळी

            अल्बेंडाझोल ही गोळी मोहिमेच्या दिवशी मोफत दिली जाते. तसेच आरोग्य उपकेंद्रप्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयजिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडीशाळामहाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.

मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2023 जाहीर

 मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2023 जाहीर

            मुंबईदि. 9 : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या डॉ.अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 साठी डॉ. प्रकाश परब (व्यक्तीसाठी) यांची तर वाङ्मय चर्चा मंडळबेळगाव (संस्थेसाठी) यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी  भाषा संवर्धक पुरस्कार 2023 साठी डॉ. कौतिकराव ठाले पाटील (व्यक्तीसाठी) यांची तर कुसुमाग्रज प्रतिष्ठाननाशिक (संस्थेसाठी) यांची निवड करण्यात आली असल्याचे मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. प्रत्येकी दोन लाख रूपये रोखमानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

            मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षणसंगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस आणि संस्थेस भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांसाठी नेमलेल्या निवड समितीची बैठक दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.

०००००

ज्येष्ट नागरिक हो तुमच्यासाठी



Friday, 9 February 2024

श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावे

 श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगडसह्याद्री व्याघ्र प्रकल्प

पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावे

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई दि. 8 : पर्यटन विकास आराखड्यामध्ये महाबळेश्वरप्रतापगडसह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे करताना मूळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभीकरणाची कामे  नैसर्गिक रंग वापरूनबांधकामाचे साहित्य देखील पर्यावरण पूरक वापरण्यावर भर दिला जाईलया परिसराचे मूळ सौंदर्य राखले जाईल, अशी कामे प्रस्तावित करावीत. प्रशासनाने हे प्रस्ताव  तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या दालनात श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड, निसर्ग पर्यटन विकास आराखडा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याबाबतची आढावा बैठक आज झाली. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार मकरंद पाटील,  दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसलेनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेवित्त विभागाच्या सचिव ए.शैलासातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ,  पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीप्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन या बाबी लक्षात घेऊन गडावर जाणारे व येण्याचे मार्गबुरुज व तटबंदी  बांधकामकिल्ल्यावर झालेल्या पडझडीच्या दुरुस्तीची कामेपर्यटकांसाठी सोयीसुविधा या सर्व कामांचा पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करावा. किल्ल्याचे मूळ सौंदर्य कोणत्याही प्रकारे खराब दिसू नये याची खबरदारी घ्यावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन विकासाची कामे करताना या परिसरातील जैवविविधता राखली जावी. स्थानिक कृषी पर्यटनाला चालना मिळावीस्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या गोष्टी लक्षात घ्याव्यात.

            श्रीक्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास करताना स्थानिक ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे तसेच वास्तू यांच्या रचना लक्षात घेऊन नवीन कामे प्रस्तावित करावी. जी कामे करणार ती गुणवत्तापूर्ण करून, परिसराचे सुशोभीकरणासाठी पुरातन वास्तूंची रचना लक्षात घेऊन त्याच प्रकारे कामे करावीत. किल्ले विकसित करण्यासाठी  वापरण्यात येणारे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकणारे असावे, याची दक्षता घ्यावी. श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये असलेली पुरातन मंदिरनद्या आणि आजूबाजूचा परिसराची कामे करताना  स्थानिकांच्या सूचना विचारात घ्याव्यात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कायम टिकणारे पर्यटन विषयक कार्यक्रम राबवावा. राजस्थानकेरळ राज्याप्रमाणे पर्यटन महोत्सव राबवा. पर्यटन फेस्टिवलच्या दिनदर्शिकेमध्ये कांदाटी फेस्टिवलचा देखील समावेश करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

            आमदार श्री. भोसले यांनी प्रतापगडावरील पाणीटंचाई दूर करावी. श्री क्षेत्र महाबळेश्वरप्रतापगड किल्ला,सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देत ही कामे गतीने करण्याबाबतच्या सूचना केल्या.

            साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गत राबवण्याच्या संभाव्य उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. या परिसराचा विकास करताना स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

*****

पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील

 

पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग

सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना

विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            मुंबईदि. 8 - राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावीअशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. विभागामार्फत अभ्यास करुन तज्ज्ञांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतीलअसा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

            राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर मंत्री श्री. केसरकर यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञशिक्षण प्रेमीपालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.

            शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाहीयाची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावीअसेही या परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

            या अनुषंगाने केलेल्या अभ्यासामध्ये पुढील बाबी समोर आल्या आहेत. काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते. विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने ते शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात आणि रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. मोसमी हवामानविशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणेपावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते बहुदा आजारी पडतात.  सकाळी पाल्याला लवकर तयार करणेजेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुकेपाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

            यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावाअशी सूचनाही करण्यात आली आहे.

            या परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळेत बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत या सूचना निर्गमित करण्यात आल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

सायबर सुरक्षित राज्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पाची आखणी

 सायबर सुरक्षित राज्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पाची आखणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

            नाशिकदि. ८ : आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनविण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञानकुशल मनुष्यबळ व संसाधनानी परिपूर्ण अशा प्रकल्प निर्मितीची आखणी करण्यात येत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या उद्घाटन समारंभा प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसेआमदार सुहास कांदेसीमा हिरेपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाराज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसादविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेनाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकरअपर पोलीस महासंचालक निखील गुप्ताविशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. आरती सिंगनाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळेपोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमारपोलीस आयुक्त संदीप कर्णिकपोलीस अधीक्षक विक्रम देशमानेजिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तलअपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्यात सायबर सुरक्षेसाठी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरटेक्नॉलॉजी असिस्टेड इन्वेस्ट‍िगेशनसेंटर ऑफ एक्सलन्सक्लाऊड आधारित डेटा सेंटरसिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांचा समावेश असलेला 837 कोटींचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार असून 24/7 कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनीमोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयक तक्रार नोंदवून या गुन्ह्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येणार आहे. तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच पोलीस दलातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरण्याकरीता साधारण १७ हजार पदांची भरती प्रक्रियाही सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना घरबांधणीसाठी पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळे गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            जगातही महाराष्ट्र पोलिसांचा जसा लौकीक आहेतसाच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही दबदबा आहे. यावेळी भारतासाठी पहिलं ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. खेळखिळाडुवृत्ती आणि पोलीस दलाचे मनोबल यांचा परस्पर संबंध असल्याने राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात येतो आहे. खेळातूनच उत्तम पोलीस मनुष्यबळ मिळणार असल्याने क्रीडा सुविधांवरही भर देण्यात येतो. याचअनुषंगाने बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारयाचे नियोजित असून छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास ५०  कोटी रुपये व ४८ हेक्टर जागाही उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विभागीयजिल्हा आणि तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी विभागीय ५० कोटीजिल्ह्यासाठी २५ आणि तालुक्यासाठी ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रोख पारितोषिकांत पाच पटींनी भरीव वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडियाराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील खेळाडूंना २८ कोटी रुपयांची पारितोषिके वितरीत केली आहेत. राज्यराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण देण्यात येत आहे. क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरु केली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            राज्याच्या पोलीस दलातील खेळाडुंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शारिरीक तंदुरूस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमताताकद अंगी येते. पोलीस दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटूखेळाडू असतो. या खेळाडूंना पोलीस क्रीडा स्पर्धाच्या निमित्तानं चांगले मैदान मिळत असून हे मैदान जितके गाजवालतितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळातील या अपेक्षेसह सर्वांनी देशाचे आणि पर्यायाने आपल्या राज्याचे नाव राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावर उंचवाण्यासाठी योगदान द्यावेअशा शुभेच्छाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

            सांघिक क्रीडा प्रकारात हॉकीफुटबॉलव्हॉलिबॉलबास्केटबॉलहॅण्डबॉलकबड्डीखो-खो यांचा तर कुस्तीॲथलेटिकबॉक्सिंगवेट लिफ्टिंगस्वीमिंगज्युदोक्रॉस कंट्रीत्वायक्वांदोवु-शूशुटिंग (स्पोर्ट वेपन)शुटिंग (सर्व्हिस वेपन)पावर लिफ्टिंगबॉडीबिल्डिंगवरिष्ठ अधिकारी शुटींग, 05 कि.मी. चालणे इत्यादी वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. यास्पर्धेत दोन हजार 444 पुरुष, तर 888 महिला सहभागी झाल्या आहेत.

            यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. कराळे यांनी मानले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

क्रीडा स्पर्धेत सहभागी संघ….

            अमरावती परिक्षेत्रऔरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्रकोल्हापुर परिक्षेत्रनवी मुंबई / मीरा भाईंदर (कोकण परिक्षेत्र)मुंबई शहरनागपूर शहरनागपूर परिक्षेत्रनाशिक परिक्षेत्रपुणे शहर / पिंपरी चिंचवड आयुक्तालयरेल्वे परिक्षेत्रएस.आर.पी.एफ. परिक्षेत्रठाणे शहरप्रशिक्षण संचालनालय.

राज्य पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा वाढदिवस राज्य पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारीकर्मचारी कुटुंबीयांसमवेत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. भुसेपोलीस महासंचालक श्रीमती शुक्लापोलीस आयुक्त श्री. कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारीकर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू


पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू 

ओटीएममध्ये एमटीडीसीच्या दालनाला प्रतिसाद 

मुंबई, ९ फेब्रुवारी : कोकणमुंबईलोणावळामहाबळेश्वरनागपूरताडोबाशिर्डीछत्रपती संभाजी नगर तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले अशा महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळ आणि समृद्ध वारासंघाची ओळख जगभरात पोहचविणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दालन सध्या जगभरातील आकर्षण बनले आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरवांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ओटीएम प्रदर्शनी मध्ये असलेल्या या दालनाला भारतासह जगभरातील पर्यटक आणि पर्यटन संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्यांनाचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन  डॉ. बी.आर. पाटीलसंचालकपर्यटन संचालनालय यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय पाहुणे आणि पर्यटन भागधारकांच्या उपस्थितीत प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन केले.

  यावेळी जयस्वाल म्हणाले कीया प्रदर्शनीमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ट्रॅव्हल एजन्सीरिसॉर्टविविध पर्यटन संस्थांची माहिती असलेले माहितीपूर्ण स्टॉल आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योजकांशी  चर्चा करता येईल. पर्यटन क्षेत्रात इतर राज्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संवादातून समजतीलइतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा नक्कीच लाभ होईल. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना ‘ओटीएम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाची माहिती देशपातळीवर नेता येईल. "कोकणमुंबईलोणावळामहाबळेश्वरनागपूरताडोबाशिर्डीछत्रपती संभाजी नगर आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या कंपन्यांसह राज्यातील प्रादेशिक वैविध्य उत्कृष्टपणे पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केले जाईल." असे जयश्री भोजआयएएस मानद प्रधान सचिवपर्यटन यांनी यावेळी सांगितले. कॉन्क्लेव्हरोड शो आणि ट्रेड मेळावे अशा कार्यक्रमांची मालिका करण्यावर महाराष्ट्र टुरिझमचा भर आहे. या प्रक्रियेतदूरसंचार विभाग देशभरातील विविध प्रमुख पर्यटन व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होत आहे”अशी माहिती दिली.


दुनिया के लिए महाराष्ट्र, अब एक विश्वव्यापी आकर्षण 

ओटीएम में एमटीडीसी की गैलरी पर प्रतिक्रिया

मुंबई, 9 फरवरी: महाराष्ट्र पर्यटन विकास निगम का हॉल, जो कोंकण, मुंबई, लोनावाला, महाबलेश्वर, नागपुर, ताडोबा, शिरडी, छत्रपति संभाजी नगर के साथ-साथ महाराष्ट्र के गढ़ किलों जैसे विभिन्न पर्यटन स्थलों और समृद्ध वारसा  का ज्ञान लाता है। दुनिया के लिए महाराष्ट्र, अब एक विश्वव्यापी आकर्षण बन गया है। जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में ओटीएम प्रदर्शनी में स्थित इस प्रदर्शनी को पूरे भारत के साथ-साथ दुनिया भर से पर्यटकों और पर्यटन से संबंधित सेवा कंपनियों से प्रतिक्रिया मिल रही है। महाराष्ट्र पर्यटन विकास निगम के महाप्रबंधक चंद्रशेखर जयसवाल, पर्यटन निदेशालय कोंकण संभागीय पर्यटन उपनिदेशक हनुमंत हेडे, पर्यटन डॉ. बी.आर. पर्यटन निदेशालय के निदेशक पाटिल ने महाराष्ट्र की कंपनियों के प्रमुख प्रतिनिधियों, अंतरराष्ट्रीय मेहमानों और पर्यटन हितधारकों की उपस्थिति में प्रदर्शनी स्टाल का उद्घाटन किया। इस अवसर पर जयसवाल ने कहा कि इस प्रदर्शनी में देश के हर राज्य के पर्यटन क्षेत्र की ट्रैवल एजेंसियों, रिसॉर्ट्स, विभिन्न पर्यटन संगठनों की जानकारी वाले ज्ञानवर्धक स्टॉल लगे हैं. घरेलू पर्यटन को बढ़ावा देने के लिए अन्य राज्यों के पर्यटन क्षेत्र के विभिन्न उद्यमियों से चर्चा की जा सकती है। संवाद के माध्यम से अन्य राज्यों द्वारा पर्यटन के क्षेत्र में की जा रही नवीन गतिविधियों को समझा जाएगा, इससे निश्चित रूप से अन्य राज्यों की पर्यटन क्षेत्र में की जा रही नवीन गतिविधियों को जानने से राज्य में पर्यटन के विकास में लाभ होगा। 'ओटीएम' प्रदर्शनी के माध्यम से राज्य के पर्यटन क्षेत्र के उद्यमी स्थानीय पर्यटन की जानकारी राष्ट्रीय स्तर तक पहुंचा सकेंगे। "कोंकण, मुंबई, लोनावाला, महाबलेश्वर, नागपुर, ताडोबा, शिरडी, छत्रपति संभाजीनगर और अन्य जगहों से आने वाली कंपनियों के साथ राज्य की क्षेत्रीय विविधता को मंडप में अच्छी तरह से प्रदर्शित किया जाएगा।" जयश्री भोज, आईएएस मानद प्रमुख सचिव, पर्यटन ने इस अवसर पर कहा। महाराष्ट्र पर्यटन कॉन्क्लेव, रोड शो और व्यापार मेलों जैसे कार्यक्रमों की एक श्रृंखला आयोजित करने पर ध्यान केंद्रित करता है। इस प्रक्रिया में, दूरसंचार विभाग देश भर के विभिन्न प्रमुख पर्यटन व्यापार मेलों में भाग ले रहा है", बताया गया।

Featured post

Lakshvedhi