Thursday, 8 February 2024

मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वैद्यकीय योजनांचे लोकार्पण

 मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी 

हॉस्पिटल, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वैद्यकीय योजनांचे लोकार्पण 

जामनेर : मा. ना. श्री.  गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नव वर्षात नवीन संकल्पनांसह विविध योजनाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या योजनांमध्ये जीवन संजीवनी योजना, दिपज्योती योजना, मातृवंदना योजना, आधार वड योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या योजनांतर्गत रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. रागिणी पारेख यांच्या सारख्या नामांकित डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा आता जामनेरमध्ये मिळणार आहे. जर एखादा रुग्ण सरकारी योजनेत बसत नसेल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा चॅरिटी बेडच्या माध्यमातून त्या रुग्णावर मोफत उपचार करण्यात येतील.

मंगळवारी पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, डॉ. रोहन पाटील, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ. सतीश पाटील, डॉ.नितीन महाजन, डॉ.तुषार पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, डॉ.सरिता महाजन, डॉ. प्रशांत भोळे, डॉ. मनोज विसपुते, डॉ.रितेश पाटील, डॉ.योगेश सरताळे, डॉ.स्वप्नील निकम, श्री. शिवाजी सोनार, श्री. चंद्रकांत बावीस्कर, श्री. विवेक पाटील, डॉ. किरण पाटील, न्यू रुबी स्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सीईओ डॉ. धनराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. तर ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, आरोग्यदूत श्री. रामेश्वर नाईक यांनी या लोकार्पण सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी विविध योजनांची माहिती दिली. 

डॉ. बशिरुद्दीन अन्सारी (कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट न्यू रुबी स्टार हॉस्पिटल) यांनी यावेळी जीवन संजीवनी योजनेविषयी माहिती दिली.  जीवन संजीवनी योजनेअंतर्गत हृदयरोग तपासणीपासून ते एंजियोप्लास्टीपर्यंत संपूर्ण उपचार केवळ ९९९ रुपयांमध्ये करण्यात येणार आहेत. यात ई.सी.जी, २डी ईको, स्ट्रेस टेस्ट, कॉर्डीओलॉजी कंसल्टेशन, एंजिओग्राफी, एंजियोप्लास्टी योजनेअंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. यानंतर डॉ सप्नील पाटील (नेत्ररोग तज्ज्ञ न्यू रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर) यांनी दिपज्योती योजनेची माहिती देताना सांगितले कि, दिपज्योती योजने अंतर्गत नेत्र तपासणी, चष्म्यांचे नंबर काढणे, सायेचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात येईल. तसेच अत्याधुनिक बिना टाक्याचे लेझर मशीन (फेको), मोतीबिंदु ऑपरेशन फक्त ७००० रुपयांमध्ये करण्यात येईल. यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे व डॉ. रागीनी पारेख मॅडम या सदरील योजनेसाठी दरमहा जामनेरला उपलब्ध असतील.

यानंतर डॉ. राजेश नाईक (स्त्रीरोग तज्ज्ञ, न्यू रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर) यांनी मातृवंदना योजने बद्दल सविस्तर माहिती दिली. मातृवंदना योजने अंतर्गत सर्व गरोदर मातांची तपासणी विनामुल्य होईल. पुर्वतपासणीसाठी आलेल्या गरोदर मातांची पहिली सोनोग्राफी मोफत करण्यात येईल. सर्व गरोदर मातांना पुढील ३ महिन्यापर्यंत रक्तवाढीसाठी हिमोग्लोबीनच्या व कॅल्शीयम गोळ्या मोफत  देण्यात येतील. प्राथमिक रक्त तपासणी व गरोदर मातांना धनुर्वात लस मोफत देण्यात येईल. पुढे आधार वड योजने विषयी डॉ. नितीन गायकवाड ( एमडी मेडिसीन) माहिती देतांना सांगितले की, योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरीकांसाठी हृदयरोग, ई.सी.जी, नेत्र तपासणी, दातांची तपासणी, मुखरोग व दंत तपासणी, गर्भाशयाचे कॅन्सरची व स्थनातील गाठीची मोफत तपासणी करण्यात येतील. तसेच अल्पदरात फिजीओथेरेपी आणि दर आठवड्याला योगासन वर्ग मोफत घेण्यात येणार आहेत.

न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जामनेर येथे सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. सदर योजना ६ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत कार्यान्वित असतील. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. धनराज चौधरी यांनी केले आहे.

चिऊताई चिऊ माझ्या अंगणात

 राकेश सुभाष शेलार

आर्वी राकेश शेलार

गाण्याचे बोल- चिऊताई चिऊ माझ्या अंगणात ये 

इयत्ता -अंगणवाडी

जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा गिम्हवणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी

वार्षिक स्नेहसंमेलन

सन-२०२३/२४

दिनांक-०६/०२/२०२४

Wednesday, 7 February 2024

राज्यातील ५००० एस टी बस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार

 राज्यातील ५००० एस टी बस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

महामंडळाची २३४ कोटी रुपयांची बचत होणार

प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सेवा

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ६ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

               या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाची दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैनकिंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरमहाव्यवस्थापक ( भांडार व खरेदी) वैभव वाकोडे उपस्थित होते.

            एकूण ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण हे तीन वर्षामध्ये एकूण ६ टप्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईलअसे श्री. जैन यांनी सांगितले. राज्यातील ९० आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेल इंधनावर चालणारी सुमारे १६ हजार  प्रवाशी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च डिझेलवर केला जातो. हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स् गॅस प्रा.लि. यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. रुपांतरीत झालेल्या वाहनांची देखभाल ही रुपांतरण केलेल्या कंपनी मार्फत करण्यात येणार असून त्याचा देखभालीचा खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.

००००

श्री क्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा

 श्री क्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

            मुंबईदि. ६: श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरीभाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूरचा सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात दर्शन रांगमंदिर व परिसराचा विकासघाट बांधकामआपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावाअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमुख्य सचिव डॉ. नितीन करीरसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकनियोजन विभागाचे सचिव सौरव विजयपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारसोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ अवसेकर महाराज आदी दुरदृष्य संवादप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            पंढरपूर यात्रा कालावधीत गर्दीचे विकेंद्रीकरण करणे तसेच गर्दीचे व्यवस्थापन करणे अत्यंत जिकिरीचे होते. याकरिता मंजूर विकास योजनेतील प्रदक्षिणा मार्गाकडून मंदिराकडे येणारे आणि प्रदक्षिणा मार्गाकडून नदी पात्राकडे जाणारे विकास योजनेतील रस्ते विकसित झाल्यास पोलीस विभागाला आणि प्रशासनाला एकेरी मार्ग नियोजनगर्दी विकेंद्रीकरण व व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

            आराखड्यामध्ये समाविष्ट कामांबाबत एकसूत्रता व सुसंगतता असावी तसेच तीर्थक्षेत्राला अनुषंगिक कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी देशपातळीवरील वास्तूविशारदपुरातत्व शास्त्रज्ञअभियंत्यांच्या कल्पाना स्वीकारून कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत संकल्पना स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात सहभागी झालेल्या सल्लागारांचे सादरीकरण विभागीय आयुक्तांच्या तांत्रिक सल्लागार समिती समोर झाले. आज त्यातील तीन सल्लागारांनी या बैठकीत आराखड्याबाबत सादरीकरण केले.

            वाराणसी येथील काशी विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना सुविधा देतानाच परिसराचा विकास करण्यासाठीचा आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार प्रस्तावित आराखडा अंतिम करताना वारकरी संप्रदायमंदिर समितीनागरिकपंढरपुरातील लोकप्रतिनिधी या सर्वांशी चर्चा करून आराखडा करावाअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जे निवासीव्यापारीदुकानदार बाधित होणार आहेत त्यांना योग्य मोबदला देणे व योग्य ते पुनर्वसनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.

धरणातील गाळ

एमएमआर क्षेत्र नवे ग्रोथ इंजिन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेसकोर्स परिसरात थीम पार्कच होणार

 एमएमआर क्षेत्र नवे ग्रोथ इंजिन

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रेसकोर्स परिसरात थीम पार्कच होणार

            मुंबईदि.६:  मुंबई एमएमआर क्षेत्राचा कायापालट झाल्याने ते नवे ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात भव्य असे थीम पार्क विकसित केले जाईल. ते ऑक्सिजन पार्क असेलअशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

            दैनिक लोकसत्ताच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते लोकसत्ता 'वर्षवेध २०२३या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी इंडियन एक्स्प्रेस वृत समुहाचे संचालक विनीत गोयंकालोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शासनाच्या गत वीस महिन्यातील वाटचालीचाही आढावा घेतला. ते म्हणाले कीशपथविधी नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच आम्ही आपले शासन सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे असेल असा निर्धार केला होता. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास असा ध्यास घेऊन कामाला सुरुवात केली होती. आज महाराष्ट्रात सर्वाधिक पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गशिवडी - न्हावा शेवा अटल सेतूमेट्रोचे जाळेसागरी किनारा मार्ग हे सर्व गेमचेंजर प्रकल्प आहेत. या सुविधांमुळे त्या त्या प्रदेशाचा कायापालट होणार आहे. समृद्धी महामार्गावर १८ ठिकाणी नोड आहेतयाठिकाणी विकासाची केंद्र उभी राहतील. अटल सेतूमुळे मुंबई एमएमआर क्षेत्राचा कायापालट होईल. ते नवे आर्थिक विकास केंद्र आणि मुंबई बरोबरच देशाचे नवे ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य असल्याचा उल्लेख केला. दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेतून सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा जगभर सन्मान केला जातो. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले कीआपले राज्य उद्योगस्नेहीउद्योजकताभिमुख आहे. आपल्याकडे उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक त्या गोष्टी आहेत. यात कुशल मनुष्यबळ आणि उद्योगस्नेही धोरण यांचा समावेश आहे. आपण पर्यावरणाचीही काळजी घेतो. त्यामुळे उद्योजकाचीही आपल्या राज्याला पसंती असते.

            लोकसत्ताच्या मराठी भाषा जतन-संवर्धनाच्या भूमिकेचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. परखड लेखन आणि विश्वासार्ह बातम्या यासाठी लोकसत्ताने आपले वेगळे स्थान निर्माण केल्याचेही ते म्हणाले.

Featured post

Lakshvedhi