Friday, 2 February 2024

मुंबई येथे वार्षिक जागतिक रंगभूमी महोत्सव व्हावा

 मुंबई येथे वार्षिक जागतिक रंगभूमी महोत्सव व्हावा

- राज्यपाल रमेश बैस

दशावतारनौटंकीयक्षगान यांसह सर्व नाट्य परंपरा जगापुढे आणाव्या

            मुंबई, दि. १ : भारताला रंगभूमीचा मोठा इतिहास लाभला आहे. प्रत्येक राज्याची आपली स्वतंत्र रंगभूमी आहे. तमाशायक्षगाननौटंकीजत्रादशावतार यांसारख्या अनेक परंपरा देशात आहेत. या सर्व नाट्य परंपरा जगापुढे आणण्याची गरज आहे असे सांगताना न्यूयॉर्क मधील 'मेट गालाफॅशन महोत्सवाप्रमाणे मुंबईत जागतिक रंगभूमीचा वार्षिक महोत्सव व्हावाअशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे व्यक्त केली.  

            राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे आयोजित २५ व्या भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन एनसीपीए मुंबई येथे झालेत्यावेळी ते बोलत होते.

            उद्घाटन सत्राला राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अध्यक्ष अभिनेते परेश रावल, 'भारंगममहोत्सवाचे ब्रँड ऍम्बॅसेडर पंकज त्रिपाठीअभिनेते रघुवीर यादवराष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी आदी उपस्थित होते.  

            रंगभूमी सर्वसमावेशक असावी. समाजाच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत रंगभूमीने पोहोचावे. लोकांचे दुःख आपण दूर करू शकत नाही. परंतु काही तासांकरिता तरी लोकांना मनोरंजनाच्या माध्यमातून दुःख विसरायला लावण्याची शक्ती कलाकारांकडे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

            आपण चाळीस वर्षे राजकीय मंचावर वावरत आहोत. परंतु, रंगकर्मींच्या मंचावर प्रथमच आलो असे सांगून राज्यातील व शहरातील नाट्यगृहे सुस्थितीत ठेवण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            नाट्यगृहाचे भाडे परवडणारे ठेवल्यास लोकांना नाटकांची तिकिटे कमी किमतीत मिळू शकतीलअसे त्यांनी सांगितले. रंगभूमी ही लोकचळवळ झाली पाहिजे व सर्व प्रादेशिक भाषा व बोलींमधून रंगभूमीला चालना दिली गेली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

            निवृत्त कलाकार व तंत्रज्ञ यांना दिली जाणारी पेन्शन वाढवली पाहिजे तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च देखील केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

प्रत्येक राज्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय असावे : परेश रावल

            मुंबई ही रंगभूमीची राजधानी आहे. येथे दररोज मराठीहिंदीगुजरातीइंग्रजीकोकणी नाटके होतात. परंतु राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे केंद्र दिल्लीत आहेमुंबईत नाहीयाकडे लक्ष वेधून 'एम्सप्रमाणे प्रत्येक राज्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय असावे व त्यासोबत कमी भाडे आकारणारे नाट्यगृह देखील असावे असे विद्यालयाचे अध्यक्ष श्री. रावल यांनी सांगितले.

            रंगभूमीचे ओटीटी प्रमाणे स्वतःचे हक्काचे असावे.  राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने आत्मनिर्भर बनावे व प्रत्येक विद्यापीठासोबत काम करावेत्यातून अनेक कलाकार निर्माण होतील असे त्यांनी सांगितले.

            आपण जबलपूर जवळील एका लहान गावातून आलो. तेथील पापड विक्रेताचणा विक्रेता आदी लोकांच्या लकबी शिकत येथवर आलो, असे श्री. यादव यांनी सांगितले.

            बिहारमध्ये रंगकर्मीला 'रंगबाजम्हणतात असे सांगून रंगभूमीशी  नवनवे प्रेक्षक जोडले पाहिजे, असे श्री. त्रिपाठी यांनी सांगितले.

            भारतीय रंग महोत्सव गेल्या २५ वर्षांपासून सुरु असून आज तो जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव झाला आहे, असे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक श्री. त्रिपाठी यांनी सांगितले. 

            एकूण २२ दिवस १५ शहरांमध्ये चालणाऱ्या या नाट्य महोत्सवात १५० नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या 'भारंगममहोत्सव गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

0000

 


 

Maharashtra Governor inaugurates International Theatre Festival of India

 

      Maharashtra Governor Ramesh Bais presided over the inauguration ceremony of the 25th Bharat Rang Mahotsav 'Bharangam' - the International Theatre Festival of India, organized by the National School of Drama at NCPA Mumbai.

      Chairman of National School of Drama and senior actor Paresh Rawal, Brand Ambassador of 'Bharangam' festival Pankaj Tripathi, senior actor Raghubir Yadav, Director of National School of Drama Chittaranjan Tripathi, eminent personalities from theatre, critics and alumni of NSD were present.

      The Festival began with the group rendition of the 'Bharangam' Festival song penned by lyricist Swanand Kirkire.

      The 22 day long 'Bharangam' festival to be held in 15 cities will showcase 150 plays.

0000


 

वृत्त क्र. ४३२

 


कांदिवली पूर्वला समर्थ रामदास्वामी चरण पादुकांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात

 कांदिवली पूर्वला समर्थ रामदास्वामी चरण पादुकांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात


आमदार अतुल भातखळकर करणार स्वागत


मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रगुरू श्रीसमर्थ रामदास स्वामी यांच्या चरण पादुकांचा दौरा दि. 3 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. या दौऱ्याचे स्वागत भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या शुभहस्ते दि. 3 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री वंदना बॅंक्वेट, एस. सी. एन. हॉल, ठाकूर कॉम्प्लेक्स येथे होणार आहे.


श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांच्या वतीने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 3 ते 13 फेब्रुवारी या काळात दौरा आहे. मुक्काम वंदना बॅंक्वेट येथे असणार आहे. सकाळी 8 ते 12 या वेळेत विविध भागात सज्जनगडावरील समर्थ भक्त रामदासी मंडळी संप्रदायिक भिक्षेसाठी येणार आहेत. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र एनसीसी पथकाने सलग तिसऱ्यांदा मिळवलेले यश गौरवास्पद

 महाराष्ट्र एनसीसी पथकाने सलग तिसऱ्यांदा मिळवलेले यश गौरवास्पद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि सांघिक कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतूक

 

            मुंबईदि. १ : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचा प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान सलग तिसऱ्यांदा पटकविला आहे. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने मिळवलेले हे गौरवास्पद यश त्यांच्या मेहनतीचे आणि सांघिक कामगिरीचे आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

              सह्याद्री अतिथीगृहात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र छात्र सेना संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंगब्रिगेडिअर विक्रांत कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारीप्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री बॅनर सुपूर्द करण्यात आलातसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणालेमहाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरतावीरतेचा वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जनकल्याणाच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत. हे तुमचेलोकांचे सरकार आहे. अशा कामगिरीमुळे विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तुमच्या यशामुळे राज्याचा गौरव वाढला असून भविष्यातही हा बहुमान कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी. शासन सर्व सहकार्यासाठी संचालनालयाच्या पाठीशी आहेअशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एनसीसी पथकास मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारीशिक्षकांचे आणि एनसीसी छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.

          कार्यक्रमाच्या सुरुवातीला छात्र सैनिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश पटकावणाऱ्या छात्रसैनिकांना गौरविण्यात आले. एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी आभार मानले

0000


Thursday, 1 February 2024

आदिवासी व दुर्गम भागात सुरक्षित संस्थात्मक प्रसुतीसाठी माहेरघर योजनेत सुधारणा

 आदिवासी व दुर्गम भागात सुरक्षित संस्थात्मक प्रसुतीसाठी

माहेरघर योजनेत सुधारणा

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचना

            मुंबईदि. १ :  माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील आदिवासी व दुर्गम भागात माहेरघर योजना असून आदिवासी क्षेत्रातील सर्व आरोग्य संस्थेमध्येउपलब्ध जागा/खाटा व मनुष्यबळ वापरून योजनेंतर्गत गरजू मातांना माहेरघर सुविधा त्यामध्ये आहारबुडीत मजुरी व संदर्भ सेवा आदी देता येतील. जेणेकरून कोणत्याही गरोदर मातेची प्रसूती घरी किंवा रस्त्यात न होता आरोग्य संस्थेमध्ये होईल. आता यामध्ये या योजनेच्या सुविधा व कालावधीच्या व्याप्तीमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार बदल करण्यात आलेले आहेत.

                 माहेरघर योजनेचा उद्देश हा सुरक्षित व वैद्यकीय संस्थांमध्ये प्रसुतीसाठी गरोदर मातेला व लहान बालकास निवासाची सोयवैद्यकीय सुविधा व उपचार उपलब्‍ध करुन देणे आहे. माहेरघरामध्‍ये गरोदर मातेस तिच्या संभाव्य प्रसुतीच्या आधी तीन दिवस दाखल करून राहण्‍याची सोयआहाराची व्‍यवस्‍थावैद्यकीय तपासणीबाळंतपणाचा सल्‍लाउपचार व संदर्भ सेवा देण्यात येतात.

               सन २०२३-२४ मध्‍ये राज्‍यातील गोंदियाचंद्रपूरगडचिरोलीनंदुरबारनाशिकअमरावती,  यवतमाळ नांदेडपालघर या ९ जिल्ह्यातील एकूण ९० प्राथमिक आरोग्‍य केंद्रात माहेरघर बांधण्‍यात आले. ३९ व्या राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कार्यकारी समितीच्या ऑगस्ट २०२३ च्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सूचनेनुसारमाहेरघर ही योजना नवसंजीवनी कार्यक्षेत्रातील सर्व १६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.  यामध्ये प्राधान्याने जेथे आरोग्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात घरी प्रसुती होतातजेथे दळण-वळणाची साधने नाहीतअति दुर्गम व ज्या भागात पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटतो अशा ठिकाणी राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

         योजनेमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा व कालावधी व्याप्तीमध्ये करण्यात आलेले बदल

            गर्भवती महिला व  तिच्या सोबत येणाऱ्या दोन नातेवाईकास राहण्याचा कालावधी : गर्भवती महिलेस व तिच्या सोबत येणाऱ्या दोन नातेवाईकास अंदाजे सरासरी 7 दिवसापर्यंत माहेरघर सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार हा कालावधी जितके दिवस गर्भवती महिला प्रसूत होत नाहीतोपर्यंत वाढविण्‍यात येईल. माहेरघरमध्ये गर्भवती महिला व तिच्या सोबत येणाऱ्या दोन नातेवाईकास एक बालक व एक  जन्मावेळी असणारा साथीदार (Birth Companion) राहण्याच्या अधिकतम  कालावधीकरिता कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

                 गर्भवती महिलेस बुडीत मजुरी : गर्भवती महिला आरोग्य संस्थेत आणल्यापासूनतिला प्रसुतीपश्चात रुग्णालयातून सुट्टी मिळेपर्यंतच्या एकूण कालावधीसाठी बुडीत मजुरी रु. 300 प्रती दिवस प्रती महिला याप्रमाणे देण्यात येत आहे. जेवणाची सुविधा: गर्भवती महिलेस  व तिच्या सोबत येणाऱ्या 2 व्यक्तींकरिता जेवणाची सोय करण्यात  येत आहे

                माहेरघर देखभालीचा खर्च व अटेंडेंट (Care Taker)  खर्च देखील शासनामार्फत करण्यात येत आहे. माहेरघर योजनेसाठी निवडलेल्या आरोग्य संस्थासाठी सामायिक मार्गदर्शक सूचना 16 आदिवासी बहुल जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला कळविण्यात आलेल्या असून त्यांनी या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या यादीनुसार कृती आराखडा बनवला आहे. त्याद्वारेसंबंधित पात्र गरोदर महिलेस आरोग्य यंत्रणेमार्फत संपर्क साधून तिची सुरक्षित व संस्थात्मक प्रसूती निश्चित करण्यात येत आहे. यामुळे आदिवासी क्षेत्रातील गरोदरचे मातांचे व बालकांचे आरोग्य सुधारूनत्या क्षेत्रातील  माता मृत्यूउपजत मृत्यू व नवजात मृत्यूच्या प्रमाणात घट होईल. याकरिता सर्व आदिवासी क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क करून अधिक माहिती घ्यावी व योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

******

नीलेश तायडे/विसंअ/

मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार मंत्री संजय राठोड यांची मागणी मान्य ; शासन निर्णय निर्गमित

 विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गांचा

मोदी आवास घरकुल योजनेत समावेश

- मंत्री अतुल सावे

            मुंबई‍‍दि. १ : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश 'मोदी आवासघरकुल योजनेमध्ये करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

             इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयामधील नमुद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

वृत्त क्र. ४२०

विमुक्त जाती व भटक्या जमातींना आता

मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार

मंत्री संजय राठोड यांची मागणी मान्य ;  शासन निर्णय निर्गमित

            मुंबईदि. १ : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश 'मोदी आवासघरकुल योजनेमध्ये करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित   करण्यात आला आहे.

            विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणेच मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

            यापूर्वी २८ जुलै २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयातील नमूद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावाअशी अट या नव्या शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.

            शासन निर्णयामुळे आता राज्यातील  विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार होईल. या महत्त्वाकांक्षी निर्णयाबद्दल मंत्री श्री. राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारइतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आभार मानले आहेत.

००००

वस्त्रोद्योगोला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

 वस्त्रोद्योगोला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

गारटेक्स-टेक्स प्रोसेस इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन

 

            मुंबईदि. १ :  वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून उद्योजकांना सर्व सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. उद्योजकांनी वस्त्रोद्योगोला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

             जिओ सेंटर येथे गारटेक्स-टेक्स प्रोसेस इंडिया प्रदर्शनाचे (Gartex-TexProcess India) उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंहउपसचिव श्रीकृष्ण पवार,  अमर अख्तरशरद जैनपुरियासिमॉन-लीहिमानी गुलाटी उपस्थित होते.

              मंत्री श्री.पाटील म्हणाले कीवस्त्रोद्योगासाठी नवीन धोरण राज्यात आणले आहे. या धोरणाच्या माध्यमातून 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित आणि 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. राज्यात वस्त्रोद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार श्रृंखला निर्माण होण्यासाठी शेतकरीवस्त्रोद्योग घटक आणि रोजगार निर्मितीवर अधिक भर देण्यात येणार आहे. देशातील दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे देशभरातील कापड क्लस्टर्सच्या व्यावसायिक मागण्या पूर्ण होतील.

                वस्त्रोद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. ज्याचा देशाच्या औद्योगिक उत्पादनापैकी एक पंचमांश वाटा आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र हा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. हा वाढणारा उद्योग जगातील सर्वात मोठ्यासर्वात आकर्षक प्रकारच्या ऑटोमोबाईल्सफॅब्रिक्सपोशाखहोम टेक्सटाइल्सहोम फर्निशिंग आणि इतर कापड उत्पादनांचे उत्पादन करून लोकांना रोजगार देतो. आजएकूण निर्यातीपैकी सुमारे 11 टक्के भारताच्या निर्यातीत वस्त्रोद्योग क्षेत्र हे सर्वात मोठे योगदान देणारे क्षेत्र आहे. वोकल फॉर लोकललोकल टू ग्लोबल या संकल्पनेला शासन प्रोत्साहन देत आहे. स्थानिक ब्रॅण्डसउत्पादन आणि पुरवठा साखळींना प्रोत्साहन देण्यावर भर आहे. स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि उत्पादकांना स्थानिक स्तरावर उद्योग उभारणे हे ध्येय आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रादेशिक उद्योजकांना व्यासपीठ मिळणार आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

****

तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार

 तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पी.एम. विश्वकर्मा योजनेच्या  १०१ कौशल्य केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

            मुंबईदि. १ : पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी.एम. विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहीलअसा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावे. या योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सांगितले.

               सह्याद्री अतिथीगृह येथे पी. एम. विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील१०१ केंद्रांच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढामहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरीमहाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमलाराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेद मनीकेंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सचिव अतुल तिवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकरव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवीव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटीलराज्यातील १५ जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधीविश्वकर्मा केंद्राचे संचालकस्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अधिकारीप्रशिक्षणार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित  होते.

           मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून राज्यात नवनवीन  स्टार्टअपही सुरू व्हावीत. या स्टार्टअपनी जागतिक स्पर्धेत उतरावे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजेनेच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील १०१ तुकड्यांना हे प्रशिक्षण देतोय. आगामी काळात अन्य जिल्ह्यांतही या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल. त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल.

            राज्यात कौशल्य विकासासाठी मुंबईसहनागपूरपुणे येथे कौशल्य विकास विद्यापीठ सुरु केली आहेत. राज्यात नमो रोजगार अभियानांतर्गत नमो महारोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये मेळावा आयोजित केला होता. लवकरच ठाण्यामध्ये हा मेळावा होईल. महाराष्ट्र हे उद्योगाभिमुखउद्योजकतेला प्रोत्साहन आणि प्राधान्य देणारे राज्य आहे. त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येतेय. दावोस मध्ये ३ लाख ८३ हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून अनेक रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

           प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील १०१ केंद्रांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला.

राज्यात अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

           कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले कीकौशल्य विकास विभाग राज्यात जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर देत असूनराज्यात ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे सुरू झाली आहेत. आज पी. एम. विश्वकर्मा सन्मान योजना देखील १५ जिल्ह्यात १०१ ठिकाणी सुरू करत आहोत. यापुढे ही संख्या वाढविण्यात येईल. नमो महारोजगार मेळावेरोजगार मेळावे यातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन प्रत्येक हाताला काम देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

कौशल्य विद्यापीठाचा एन.एस.डी.सी. आणि रुबिका फ्रान्स सोबत सामंजस्य करार

                 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (NSDC) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ बरोबर कौशल्य विकासाच्या विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार केला. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण व प्रमाणपत्र तसेच क्रेडिट ट्रान्सफरचाही समावेश आहे.

           महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने रुबिका फ्रान्स या जागतिक दर्जाच्या विख्यात डिझाईन संस्थेसोबत सामंजस्य करार केला. या करारांतर्गत विद्यापीठाने या अंतर्गत डिझाईनॲनिमेशनगेमिंगयू आय स्किल्स या अभ्यासक्रमाचे तसेच आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटस्टुडंट एक्स्चेंज चा अंतर्भाव असून यातून विद्यार्थाना डिझाईन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील.


Featured post

Lakshvedhi