Tuesday, 30 January 2024

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात होणार मध निर्मिती ; विक्री केंद्रही सुरू

 बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात होणार मध निर्मिती विक्री केंद्रही सुरू

 

             मुंबई, दि. २९ :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधाचा सुप्रसिद्ध ब्रॅंड 'मधुबनआता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही उपलब्ध झाला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते उद्यानात मध विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी मंडळाचे सभापती रवींद्र साठेसंजय गांधी उद्यानाचे संचालक जी मल्लिकार्जुनमंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमलाउपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगतापसंजय सोनावाले,रेणुका कुलकर्णी आदी उपस्थित होते.

            संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात फुलझाडे असल्यामुळे येथे उत्तम दर्जाची मधनिर्मिती  होऊ शकते. त्यामुळे  खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उद्यानात मधमाशा पालन करण्यात येणार आहे. यासाठी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण येथील कर्मचाऱ्यांना खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने देण्यात येणार आहे. सोबतच मंडळ मधपेट्या उपलब्ध करून देऊन उद्यानाकडून तयार मध खरेदी देखील करणार आहे.

            यासोबतच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मधाचा गोडवा चाखता यावा यासाठी उद्यानात 'मधुबनमध विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

००००

मनीषा सावळे/विसंअ/

 


गीत, नृत्य, नाट्य कलाविष्कारातून ३०० पेक्षा जास्त कलाकार उलगडणार महाकाव्य रामायणातील प्रसंग ३१ जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे महाकाव्य रामायणातील प्रसंगांचे सादरीकरण कार्यक्रम

 गीतनृत्यनाट्य कलाविष्कारातून ३०० पेक्षा जास्त कलाकार उलगडणार

महाकाव्य रामायणातील प्रसंग

३१ जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे महाकाव्य रामायणातील प्रसंगांचे सादरीकरण कार्यक्रम

 

            मुंबईदि. २९ : देशभरासह अवघ्या विश्वातील नागरिकांच्या मनाला भावणाऱ्या महाकाव्य रामायणातील विविध प्रसंगांचे प्रयोगात्मक कलेतून सादरीकरण असलेला आणि गीतनृत्यनाट्यगायनवादन यामधून रामायण महाकाव्यातील प्रसंग जागविणारा कार्यक्रम बुधवारदि. ३१ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी सात वाजता सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात दूरचित्रवाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिकेतील काही कलाकारांचा सत्कारही करण्यात येणार आहेअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी सायंकाळी ७ ते ९.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना पुन्हा एकदा ग.दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि दि. सुधीर फडके (बाबूजी) यांच्या आवाजातून अजरामर झालेल्या गीतरामायणातील विविध प्रसंगांतील गीतांचे सादरीकरण पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या नृत्यनाट्यआणि वादनातून अनुभवता येणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

            या महाकाव्य रामायण सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकरसीतामाईच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत शुभंकर परांजपे हे सादरीकरण करणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून त्यासाठीच्या सन्मानिका मुंबईतील विविध नाट्यगृहेपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य विभाग येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे. 

परीक्षांमधील ताण कमी करण्यासाठी अभ्यासाचा नियमित सराव करावा

 परीक्षांमधील ताण कमी करण्यासाठी अभ्यासाचा नियमित सराव करावा

परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 

            मुंबईदि. 29 :- कोणत्याही दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव करून त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज साध्य करता येईलअसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

            परीक्षा पे चर्चा’ या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री. मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. मुंबईत राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी प्रतिभावान मित्र वाढवावेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावीअसा सल्ला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.

            विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणालेस्पर्धा नसेल तर जीवन चेतनाहीन बनेल. यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी इर्षा न ठेवता स्वतःशी स्पर्धा करून प्रगती होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेतआत्मविश्वास बाळगावाशिक्षणाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम आणि खेळ यांचाही मेळ साधावा. स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीराची आवश्यकता असून त्यासाठी सूर्यप्रकाशपूर्ण झोप आणि संतुलित आहार या बाबी गरजेच्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तंत्रज्ञानापासून आपल्याला दूर जाता येणार नाहीतथापित्याचा अती वापर टाळून योग्य वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लिहिण्याचा सराव कमी होत आहेयाचा दुष्परिणाम परीक्षेमध्ये दिसून येतो. यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिण्याचा सराव नियमित ठेवून ते तपासावे आणि त्यात सुधारणा कराव्यातयामुळे परीक्षेत येणारा ताण निश्चित कमी होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            विद्यार्थ्यांना ताण येणार नाही यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे सांगून श्री.मोदी यांनी त्यांना विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणालेशिक्षकांनी विद्यार्थ्यांशी बंध वाढवावेत. विद्यार्थ्यांची इतरांशी तुलना न करता त्यांच्यातील गुणांचे कौतुक करावेयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांची तुकडी बदलते तथापि शिक्षक तेच असतात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांच्यावरील ताण निश्चित कमी होऊ शकेल.

विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनविण्यावर भर देण्याची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस

            शिक्षणाला सुखद अनुभव बनवून तसेच नैतिक मूल्यांवर लक्ष देऊन विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा संदेश अंगिकारुन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावेअसा सल्ला त्यांनी दिला.

            राज्यपाल म्हणालेशिक्षण जितके वर्गामध्ये मिळते तितकेच ते वर्गाबाहेरही मिळते. यामुळे मध्यंतराची वेळ हा अपव्यय न समजता खेळण्यासाठीचा आणि मध्यंतराचा वेळ वाढवावा. शिक्षण अधिक प्रयोगआधारित आणि संवाद आधारित होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना अधिक गृहपाठ न देता शाळेतच अभ्यास आणि स्वाध्याय करून घ्यावा अशी सूचना करून विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठीचे हे पहिले पाऊल ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            ग्रामीण व शहरी क्षेत्रांतील शाळांमध्ये मोठी असमानता असल्याचे नमूद करून शाळांमधील ही असमानता कमी करण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी सांगितले. भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी व्हावा. ऑनलाईन तसेच ऑफलाईन शिक्षणाचा योग्य मेळ साधला जावा. शिक्षकांना आणखी सक्षम बनविण्यासाठी नियमित प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावेअशा सूचना करून शाळांचा परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

            महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना त्याचे मनोबल वाढविले होते. त्यांचे शब्द आज देखील प्रासंगिक आणि प्रेरणादायी ठरतातअसे सांगून राज्यपाल श्री.बैस यांनी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दहावीबारावीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवून सकारात्मक ऊर्जा देणारे ठरेलअसा विश्वास व्यक्त केला.

            परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री श्री.मोदी हे दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवित असल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून राज्यपालांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी मुंबईतील गोपी बिर्ला मेमोरियल स्कूलजी.डी.सोमाणी स्कूल तसेच सर तय्यबजी स्कूलच्या सुमारे 300 विद्यार्थी सहभागी झाले.

00000

शेतकरी शेतमाल आता थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टला विकणार

 शेतकरी शेतमाल आता थेट अ‍ॅमेझॉनबिग बास्केटफ्लिपकार्टला विकणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -2024

 

            मुंबई दि. 29 : अ‍ॅमेझॉनबिग बास्केटफ्लिपकार्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यांच्यासमवेत  झालेल्या करारामुळे शेतकरी आपला कृषीमाल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे सामंजस्य करार  झाले असून ज्याची आपल्या शेतकरी बांधवांना गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            कृषी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA ), मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -2024 सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी  कृषी मंत्री धनंजय मुंडेकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमारमहाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रविण परदेशीग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी  आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा आता प्रारंभ केला आहे. सबसिडीतूननुकसानभरपाईतून शेतीचे क्षेत्र बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. 2014-19 या काळात शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनास्मार्ट यासारख्या योजनांची आखणी झाली. वातावरणपूरक शेती हाही प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय झाला. त्यासाठीच कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजना प्रारंभ करण्यात आल्या. हा पुढचा टप्पा प्रारंभ केल्याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी अतिशय खंबीरपणे उभे असल्याचे श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व ओएनडीसी यांच्यात सामंजस्य करार झाला. शेतकऱ्यांची उत्पादने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी करार करण्यात आला आहे.

00000


शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे

 शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी

शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

·       शेतमाल आता अमेझॉनफ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरून मोठ्या बाजारपेठेत जाणार

·       कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -२०२४

 

            मुंबई दि. २९ : शेतकऱ्यांनी शेतीविषयक विचार बदलले पाहिजेत. शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली पाहिजे, तरच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील, असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शेतकरी कंपनीचा शेतमाल आता ॲमेझॉनफ्लिपकार्टहिंदुस्तान युनीलिव्हरटाटा यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन मोठ्या बाजारपेठेत थेट जाणार आहे.

            महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), कृषी विभाग, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मूल्य साखळी भागिदारी बैठक -२०२४ सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी  कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (MITRA) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी  आदी उपस्थित होते.

            कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले कीस्मार्ट प्रकल्प अंतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कृषी उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व देशातील महत्त्वपूर्ण कंपन्यांसोबत करार करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळेल.

            कृषी विभागामार्फत कृषी उत्पादनांची मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी कंपनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना सर्व मदत देण्यात येईल.

             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा एक ट्रिलियन राहणार आहे. त्यामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाटा सात टक्के आहे तो आता सोळा टक्के करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

            कॉर्पोरेट खरेदीदार आणि किरकोळ विक्रेत्यांशी थेट संबंध प्रस्थापित करण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मार्ग तयार करणेबाजाराच्या गरजागुणवत्ता मानके आणि खरेदी प्रक्रियांवर चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी सोळा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.

            आजच्या कृषी मूल्य साखळी बैठकीत मकाबाजरीकापूसकडधान्येसोयाबीनफळेभाजीपाला आदी शेतकरी उत्पादक ५९ कंपन्या सहभागी झाल्या.‌ या कंपन्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून ४२ हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडगोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडऍमेझॉनफ्लिपकार्टकोका-कोलापेप्सिकोओएनडीसीजैन इरिगेशनईटीजी ग्रुपएडीएम इंडियामॅरिकोटाटा केमिकल्सटाटा रॅलिसआणि अदानी विल्मर या कृषी व्यवसाय संस्था तसेच वर्ल्ड बँकएशियन डेव्हलपमेंट बँकनाबार्डनबकिसान फायनान्स लिमिटेडसिडबीआणि आयडीबीआय बँक या वित्तीय संस्था सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे TCS, सह्याद्री फार्म्समित्रा इस्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्यात सामंजस्य करार झाले.

00000

कृषी मूल्य साखळी विकासातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनाची संधी

 कृषी मूल्य साखळी विकासातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनाची संधी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कृषी मूल्य साखळी भागीदारीतील महाराष्ट्राचे पाऊल क्रांतिकारक

            मुंबईदि. २९ :-  शेतकरी राजाला नवनवीन तंत्रज्ञानकृषी व पणन प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल. महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारक ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्फार्मेशन- 'मित्रासंस्थाकृषी विभागबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पआणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हिएसटीएफ) यांच्यावतीने आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -२०२४ मध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगीळआमदार भरत गोगावलेआमदार अभिमन्यू पवार,  कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमारमित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडामकौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी आदी उपस्थित होते.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या भागीदारी बैठकीत पंधराहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व विविध ख्यातनाम विपणन कंपन्या यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीआज झालेल्या सामंजस्य करारांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्याना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. याचा शेतकरी आणि नागरिकांना फायदा होणार आहे. आपण

2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन बनवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. त्यासाठी इकॉनॉमिक ॲडव्हायझरी कौन्सिलची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये कृषीउद्योगसेवाक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. या कौन्सिलने कृषी क्षेत्रात २.४ पट वाढ करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था मजबूत करण्याची शिफारस केली आहे. आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे देशाची आर्थिक स्थिती दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स करण्याचा संकल्प केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून एकजुटीने प्रयत्न करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र हे लोकाभिमुखउद्योगस्नेही आणि विकासाभिमुख राज्य असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले कीआजच आम्ही हायड्रोजन ऊर्जापोलाद या क्षेत्रातील करार केले आहेत. नुकतेच दावोस दौऱ्यात ३ लाख ५३ कोटींचे करार केले आहेत. सर्वच क्षेत्रांत आपण अग्रेसर आहोत. आपला देश कृषीप्रधान आहे. जगभरात अन्न प्रक्रिया उद्योगअन्नसुरक्षा हे चर्चेचे विषय आहेत. त्यामुळे देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाताना प्रत्येकाचे योगदान मिळेल असा हा प्रयत्न असल्याचे उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी बांबू क्लस्टर विकासतृणधान्ये उत्पादनाला चालना दिल्याची माहिती दिली.

            कृषी मूल्य साखळी बैठकीत मकाबाजरीकापूसकडधान्येसोयाबीनफळेभाजीपाला आदी शेतकरी उत्पादक ५९ कंपन्या सहभागी झाल्या.‌ या कंपन्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून ४२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडगोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडऍमेझॉनफ्लिपकार्टकोका-कोलापेप्सिकोओएनडीसीजैन इरिगेशनईटीजी ग्रुपएडीएम इंडियामॅरिकोटाटा केमिकल्सटाटा रॅलिजआणि अदानी विल्मर या कृषी व्यवसाय संस्था तसेच वर्ल्ड बँकएशियन डेव्हलपमेंट बँकनाबार्डनबकिसान फायनान्स लिमिटेडसिडबीआणि आयडीबीआय बँक या वित्तीय संस्था सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे TCS, सह्याद्री फार्म्समित्रा इस्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्यात सामंजस्य करार झाले.

00000


 

कृषी विद्यापीठाकडून माजी विद्यार्थ्यांचा सन्मान होणे अभिमानास्पद - महसूल मंत्री विखे पाटील

 कृषी विद्यापीठाकडून माजी विद्यार्थ्यांचा सन्मान होणे अभिमानास्पद - महसूल मंत्री विखे पाटील




राधाकृष्ण विखे पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान


राहुरी/मुंबई, दि. २९ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी  प्रदान करीत एका माजी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान माझ्यासाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या आजोबा आणि वडीलांकडून मिळालेल्या संस्कारांचा आणि विचारांचा हा गौरव आहे. विखे पाटील परीवाराने दतक घेतलेल्या २०८ शेतकरी कुटूबियांना हा सन्मान समर्पित करीत असल्याची भावना महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. ते राहुरी  येथे बोलत होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित ३७व्या दिक्षांत समारंभात आज राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे विखे पाटील हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, विद्यापीठाने केलेला सन्मान अभिमान वाटावा असाच असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यापुर्वी माझे आजोबा आणि सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांना २२ ऑक्टोबर १९७८ रोजी आणि वडील लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांना २९ नोव्हेंबर २०१२ रोजी या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानित केले होते, याची आठवण करून देत या दोघानीही शेती आणि शेतकाऱ्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्यच समर्पित केले होते. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे जाताना कोणत्याही पदावर असलो तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी कायम राहीली  असल्याचे त्यांनी सांगितले.

२०८ दतक शेतकरी कुटूबियांना सन्मान समर्पित

विखे पाटील परीवाराचा डीएनए हा शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा आहे. या जिल्ह्यातील २०८ शेतकरी कुटूबियांना दतक घेवून त्यांच्या परीवारासाठी काम करण्याची सामाजिक बांधिलकी आजही जोपासली आहे. मिळालेला सन्मान या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित करीत असल्याची विखे पाटील यांनी अतिशय भावनिकतेने सांगितले.

कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान सोहळ्यास राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते. कुलगुरू डॉ प्रशांत पाटील यांच्या हस्ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. भारत सरकारच्या कृषी संशोधन व शिक्षण  विभागाचे माजी सचिव आर एस परोदा उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित केल्याबद्दल प्रवरा परीवारातील सर्व संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमास सर्व संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००
जनसंपर्क कक्ष (महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई)

Featured post

Lakshvedhi