Tuesday, 30 January 2024

मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात

 मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :  अमळेनर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली. आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिने माझी माय सरस्वती, अग नाच नाच राधे, अवघे गरजे पंढरपूर या गाण्यावर आपल्या बहारदार नृत्याने सर्वांची मने जिंकली. नंतर सुनील वाघ व सहकारी यांनी मराठी पाऊल पडते पुढे हा बहारदार संगीत गायन कार्यक्रम सादर केला. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, पूज्य साने गुरुजी व प्रताप शेठजी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर माजी विधान परिषद सदस्या स्मिता वाघ, अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, साहित्य संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष  डॉ.अविनाश जोशी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण कोचर उपस्थित होते.


या प्रसंगी बोलतांना जयश्री पाटील म्हणाल्या की, अमळनेरला  मराठी साहित्य संमेलन व कॅबिनेट मंत्रीपद मिळाले या आनंददायी घटना घडल्या आहेत तर या कार्यक्रमाचे उद्घाटन आमच्या हातून होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे स्मिता वाघ म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  वसुंधरा लांडगे यांनी केले. डॉ.अमोघ जोशी यांनी आजच्या दिवसाची सर्व जबाबदारी सांभाळली.सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला 

आर्या शेंदूर्णीकर (कथ्थक) बहारदार संगीत व गीत गायन सुनील बळवंत वाघ, अनिल दत्तात्रय वैद्य,उज्वल शंकर पाटील,शिवानी सुनील वाघ, सुरश्री अनिल वैद्य, विजय गोविंद शुक्ल,मंगेश प्रभाकर गुरव, रूपक अनिल वैद्य, गिरीश दत्तात्रेय चौक, नितिन उत्तमराव गुरव, राऊफ शेख यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष व्याख्यानमालिका

 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दिलखुलास’ कार्यक्रमात

विशेष व्याख्यानमालिका

 

            मुंबईदि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'मराठी भाषा पंधरवड्यानिमित्तमराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी अभिजात मराठी पुस्तक परिचयाची विशेष व्याख्यान मालिका प्रसारित होणार आहे. ही विशेष व्याख्यानमा आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

            मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. दरवर्षी मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयामार्फत 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन केले जाते. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेतील साहित्यसंस्कृती आणि इतिहास भावी पिढीला कळावेयासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आले. या निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिलखुलासकार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तकांचा परिचय करून देणारी विशेष व्याख्यानमाला प्रसारित करण्यात येणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात होणारे व्याख्यानमालेचे प्रसारण असे :

 मंगळवार 30 जानेवारी 2024 रोजी कवी बा. सी. मर्ढेकरांच्या कविता’ या विषयावर लेखक/ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ माहिती देतील.

 बुधवार 31 जानेवारी 2024 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा.डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर काव्य समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांचे विवेचन.

 गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 रोजी साहित्यिक नरहर कुरुंदकर यांच्या जागर’ या वैचारिक लेखांच्या संग्रहावर लेखक विनोद शिरसाठ विवेचन सादर करतील.

०००

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक

 महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी

२७ फेब्रुवारी रोजी निवडणूक

 

            मुंबईदि. २९ : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या या जागांसाठी  २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे.

            भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसारया निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी  निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. दिनांक १५ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून १६ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार.  दिनांक २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून  सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याचे अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

0000

राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेस प्रारंभ

 राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेस प्रारंभ

            मुंबईदि. २९ : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील ६७ व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबाल (१९वर्ष मुली) क्रीडा स्पर्धेस काल सुरुवात झाली.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष रेल्वे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवेयांनी खेळाडूंनी सतत प्रयत्न करुन खेळामध्ये सातत्य राखावेउमेद न हारता खिलाडूवृत्तीने स्पर्धा पार पाडावी असे सांगितले.

            स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी कलीना कॅम्पसमुंबई विद्यापीठ येथे संपन्न झाला. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारार्थी मनीषा डांगेवर्षा उपाध्येशिवछत्रपती पुरस्कारार्थी,  दिपाली करमरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

            स्पर्धेत देशातील २८ राज्यातून जवळपास ४५० खेळाडू सहभागी होत असून २ फेब्रुवारी पर्यंत मुंबई विद्यापीठ कलीना कॅम्पस येथे ही स्पर्धा होत आहे.

            ६७ व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबाल (१९वर्ष मुली) क्रीडा स्पर्धेचा सुरुवातीचा सामना महाराष्ट्र व राजस्थान संघात होऊन महाराष्ट्राने राजस्थानवर एकतर्फी विजय मिळवला.

0000

मराठा समाजाचे सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकाला सहकार्य करण्याचे आवाहन

 मराठा समाजाचे सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकाला सहकार्य करण्याचे आवाहन

   

              मुंबईदि. २९ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिकशैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी २३ जानेवारी पासून सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पर्यत करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावेअसे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फ़त करण्यात येत आहे.

                सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेत आहेत. नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात येत आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाहीअशी माहिती आयोगामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये  कळविली आहे.

***

शैलजा पाटील/विसंअ/


 

नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा

 नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी प्रमाणेच मुख्यमंत्री सचिवालयातून संनियंत्रण

 

            मुंबईदि. २९ : तरूणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय आहे. एका तरुणाला रोजगार म्हणजेत्याच्या कुटुंबांचा आनंदसमाधान. त्यामुळे नमो रोजगार अभियानांतर्गत होणारा नमो महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विभागांनी मेहनत घ्यावी. त्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयातूनच संनियंत्रण केले जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            शासन आपल्या दारी प्रमाणेच नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न व्हावेतअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            नमो महारोजगार अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढामुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिककौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताकौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी आदी उपस्थित होते. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्माठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेशासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झाले आहे. त्याचप्रमाणे नमो महारोजगार अभियानांतर्गत नागपूर येथील महारोजगार मेळावा यशस्वी झाला आहे. त्याचप्रमाणे आता यापुढे होणारे महारोजगार मेळावे शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊनमेहनत घेऊन यशस्वी करणे आवश्यक आहे. एका तरूणाला रोजगार मिळालातर त्याच्या कुटुंबांलाही मोठा दिलासा मिळतो. त्यामुळेच या महारोजगार मेळाव्यात जास्तीत कंपन्यांनी यावे यासाठी प्रयत्न व्हावेत. या मेळाव्यात सहभागी तरुणांचीही कुशलनिमकुशल अशी वर्गवारीची माहितीही उपलब्ध करून देण्यात यावी. मोठ्या कंपन्यांसोबतआपले महानगरपालिकाबांधकाम क्षेत्रातील कंपन्यात्यांच्या संघटनातसेच मोठे उद्योग नोकऱ्यांचे ऑनलाईन प्लॅटफार्मसरिक्रुटमेंट कंपन्यांही यावेतअसे नियोजन करण्यात यावे.

            मंत्री श्री. लोढा यांनी देखील महारोजगार मेळावा हा महाराष्ट्र राज्याचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे तो यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले जावेत यासाठी समन्वयाने आणि एकजुटीने प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. ठाणे हा जिल्हा कोकणच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने हा मेळावा प्रचंड यशस्वी व्हावाअसे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            बैठकीत ठाणे येथील महारोजगार मेळाव्याच्या आयोजनाचे स्थळ निश्चितीतसेच रस्तेवाहतूक सुविधा अनुषांगिक बाबींबाबत आढावा घेण्यात आला.

००००


Featured post

Lakshvedhi