Monday, 29 January 2024

पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देणार

 पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देणार

पर्यटन मंत्री गिरीश महाजन

 

            मुंबईदि. 28 : ग्रामीण पर्यटनाचा विकास करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची शपथ पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई फेस्टिव्हल 2024 समारोप प्रसंगी सर्वांना दिली. पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करु. असे आवाहन पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनी केले.

            राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत’ मुंबई फेस्टिव्हल 2024 मुंबई येथे  दि. 20 ते 28 जानेवारी दरम्यान सुरू होता. या फेस्टिव्हलचा समारोप एमएमआरडीए मैदान क्र. व वांद्रे येथील महा मुंबई एक्सापो प्रदर्शनामध्ये कॉन्सर्ट फॉर चेंज’ या कार्यक्रमाने झाला. त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते.

            या कार्यक्रमाला  मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्राअपर मुख्य सचिव भूषण गगराणीसंयुक्त राष्ट्र संघाचे स्थानिक सचिव शोभा शहापर्यटन सचिव जयश्री भोजपर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मासंयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झापर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीपर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगार निर्मितीही उपलब्ध होणार आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे. जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटनाला चालना देणार असून राज्याला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लाभलेला समुद्र किनारा लाभला असूनऐतिहासिक गड - किल्लेअजिंठावेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणीजैवविविधतेने समृद्ध वनेतेथील वन्य प्राणीधार्मिक स्थळे लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई फेस्टिव्हल 2024 हा आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली  उत्कृष्टपणे राबवला गेला पुढील वर्षीही यापेक्षा अधिक चांगले कार्यक्रम फेस्टिवल मध्ये आयोजित करण्यात येतील असेही ते म्हणाले.

            पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले कीधकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण मिळावेत हीच या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आहे. या उत्सवाचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.

 

पुढील वर्षी अधिक लोकप्रिय उपक्रम राबवणार : आनंद महिंद्रा

 

            मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्रा म्हणाले कीगेले आठ दिवस सुरू असलेला मुंबई फेस्टिवल 2024 चा आज समारोप होत आहे. एक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ती रेस आज संपली आहे असे वाटत आहे. गेले आठ दिवस विविध मनोरंजनपर आणि लोकांना आवडणारे विविध कार्यक्रम ठेवले आणि याला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबई फेस्टिवल ची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला  पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आणि त्यांच्या सहकारी टीमने आयोजन केले. विझ क्राफ्ट संस्थेने केलेले उत्कृष्ट काम मुंबई फेस्टिव्हलचे संकल्प गीत, ‘सपनो का गेटवे’ या  गीता ने सर्वांना मोहिनी घातली. सर्व मुंबईकरांचा मिळालेला प्रतिसाद पाहता पुढच्या वर्षी 2025 मध्ये  या पेक्षा अधिक लोकप्रीय उपक्रम राबवणार असे ही ते म्हणाले.

            यावेळी  शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारून गरजेचे आहे असा संदेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा यांनी दिला.

            कॉन्सर्ट फॉर चेंज’ या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झासुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलअभिनेत्री परिणीती चोप्रासोनाली कुलकर्णी   हे कलाकार सहभागी झाले होते.

            मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये गेले 20 ते 27 जानेवारी रोजी झालेल्या उपक्रमांचे यावेळी व्हिडिओ दाखवण्यात आला.

 

 

0000

 


निःशब्द.! पिवळ्या साडीत जी आई दिसतेय ना, तिचं नाव आहे यशोदा.!

 निःशब्द.! 


पिवळ्या साडीत जी आई दिसतेय ना, तिचं नाव आहे यशोदा.!


फक्त २० वर्षांच कोवळ वय होतं, तेंव्हा पतीचे देहावसान झाल.! एकटी राहिली.! पण तिला तिचे धैर्य सोडून गेले नाही.! वृन्दावन मध्ये बांके बिहारी ला आपलं सगळं जीवन समर्पित करून टाकल तिने.! 

बांके बिहारीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांचे चप्पल, बूट सांभाळायला लागली.! त्याबदल्यात लोक तिला काही ना काही पैसे द्यायला लागले.! 

गेल्या ३० वर्षात असेच थोड़े थोड़े पैसे एकत्र झाले, जी रक्कम ५१ लाख रूपयांची होती.!


जेंव्हा ह्या यशोदाआईला श्रीराम मंदिराच्या निर्माणाची बातमी समजली, तेंव्हा ह्या शबरी मातेने आपल्या रामलल्लाच्या मंदिराला रु.५१,१०,०२५/- समर्पित केले.!


हे आहेत हिन्दू धर्माचे खरे स्तंभ.! ह्यांचेच स्वप्न आज साकार होत आहेत.!


             लक्षात घ्या आपण कुणीच कुठेच नाहीयेत..आपण स्वतःला फक्त आणी फक्त विनाकारण मोठं समजतो वयाने/मानाने आणी पैशाने..खरी भक्ती आणी खरं हिंदुत्व हे आहे जे या महिलने जपलं.. 🙏🙏


Sunday, 28 January 2024

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

 

          मुंबई दि. २८ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे आज सपत्नीक आगमन झाले.

            राज्यपाल रमेश बैस, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेअतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडेतसेच  इतर विभागाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..!

 मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..!

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            ठाणे, दि.२७(जिमाका):- मराठी भाषा ही आपली संस्कृतीपरंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडीसंघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. या मराठी विश्व संमेलन-२०२४ च्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहेअसे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे काढले.

             विश्व मराठी संमेलन-२०२४ चा उद्घाटन सोहळा नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आज संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते.

             यावेळी मराठी भाषा, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई (शहर) पालकमंत्री दीपक केसरकरग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजनआमदार मंदा म्हात्रेमराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकरठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणेभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षितमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबेमाध्यम सल्लागार जयू भाटकरमराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधवराज्य मराठी भाषा कोष मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरेसाहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले व ते म्हणालेमराठी भाषा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले होते. विविध परिसंवादनाट्य संमेलनसाहित्य संमेलन अशा विविध माध्यमांतून "माय मराठी" चा गजर सुरू आहे. मराठी भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी याचप्रकारे आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा पंधरवडाही अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला. मराठी भाषेचा वापर वाढत आहे. आजच्या पिढीचा कल मराठी भाषेकडे वळविणे गरजेचे आहे मात्र यासाठी मराठी भाषेच्या लेखकांनी आजच्या पिढीची भाषा ओळखून त्याप्रमाणे साहित्य निर्मिती करायला हवीत्यातून त्यांच्या मनात मराठी भाषेसाठी आपुलकी निर्माण होईलअसेही ते म्हणाले.

            महाराष्ट्राला देशभरातून तसेच जगभरातून पसंती मिळत आहेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीजागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून 3 लाख 53 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले आहेत. महाराष्ट्र देशाचे "ग्रोथ इंजिन" आहे. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचे नाव उज्वल केले आहे. आपली अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आली आहे आणि आपले ध्येय आहे ते आपली अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मांडलेली पाच ट्रिलियन डॉलर संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. याचमुळे परदेशातील अनेक मराठी उद्योजक आपल्या देशात व महाराष्ट्रातही आपले उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेतत्यांना सर्व प्रकारचे सहकार्य हे शासन करील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

000


विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका

 विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी : भारतीय लोकशाही मार्गदर्शक

-लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे गौरवोद्गार

            मुंबई दि. २७ : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. तर देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी  असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे  असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गौरवोद्गार काढले.

            विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी दृकश्राव्यव्दारे (ऑनलाईन)  प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी या परिषेदेला संबोधित करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरराज्यसभेचे उपसभापती हरिवंश, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मा.आमदारविविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, देशाची प्रगती तेव्हाच होईलजेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल. त्यासाठी विधिमंडळातील सर्व घटकांनी लक्ष्य निश्चित करू सामाजिक हित जोपासत सकारात्मक भावनेने कार्य करावे. सन २०२१ मध्ये एक राष्ट्रएक विधानमंच यावर मी विधान केल होत. संसद आणि राज्ये विधानमंडळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यावर काम करीत आहेत हे ऐकून आनंद होत आहे.

एक काळ असा होता कीजेव्हा सभागृहातील कोणत्याही सदस्यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले तर त्याच्यांवर कारवाई केली जायची आता सदस्यांना पाठिंबा मिळतो ही परिस्थिती संसद असो वा विधानसभा यासाठी चांगली नाही.

            भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानंतर दुसऱ्याच दिवशी ही परिषद होत आहे. राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. मी देशवासियांच्या वतीने संविधान सभेच्या सर्व सदस्यांचे आदरपूर्वक स्वागत करतो. गेल्या वर्षी संसदेने 'नारीशक्ती वंदन कायद्या'ला मंजुरी दिली. अशा विषयांवरही या परिषदेत चर्चा व्हायला हवी. देशातील जनता  प्रत्येक लोकप्रतिनिधीचे जागरूकतेने परीक्षण आणि विश्लेषण करत आहे. त्यामुळे या परिषदेतील चर्चा उपयुक्त ठरेल. असा विश्वासही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

           

देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी : भारतीय लोकशाही मार्गदर्शक

-लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

            देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी  असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व राज्यातील विधिमंडळाच्यावतीने नवे कायदे  बनवण्यासाठी, विधीमंडळ कामकाजात पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमता वाढण्यासाठी या परिषदेत विचारमंथन होईल, महाराष्ट्राच्या पावन भूमीवर ही परिषद होत आहे. महाराष्ट्र भूमी ही शौर्यवीरताअध्यात्मिकसामाजिक परिवर्तनाचीस्वातंत्र्य चळवळीची आणि क्रांतिकारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या उच्चारणाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो. या भूमीने अनेक सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली आहे.

            विधिमंडळाच्या माध्यमातून कायदे तयार झाल्यामुळे नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाले आहेत. लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येतात त्यांच्यावर एक जबाबदारी असते. संसदीय विषयावर जी चर्चा या परिषदेत होईल, त्यामुळे विधान मंडळावर जनतेचा विश्वास आणि विधान मंडळाच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षाआकांक्षा पूर्ण करणे. देशातील जास्तीत जास्त विधानमंडळाचे कामकाज पेपरलेस करणे हा उद्देश आहे असेही श्री. बिर्ला यांनी सांगितले.

संसदीय लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ

करण्यासाठी परिषदेचे आयोजन

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

            अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद पहिल्यांदा सन 1921 मध्ये संसदीय कायदेमंडळ  बनले तेव्हा झाली. 1950 पर्यंत फक्त दिल्ली आणि शिमला मध्ये ही परिषद होत असे. लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांनी देशातील प्रत्येक राज्यात ही परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला.  संसदीय लोकशाहीवर जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने प्रभावशाली प्रयत्न कशा प्रकारे करता येतील यावर या परिषदे विचारमंथन होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. या परिषदेतील चर्चेअंती राज्यात उत्तम संसदीय कार्य पद्धती राबविण्यासाठी प्रयत्न होतील अशी आशा  व्यक्त केली.

            सामान्य जनता आपल्या समस्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यसभालोकसभाविधानसभाविधानपरिषदेत मांडत असते. त्यामुळे  लोकशाहीच्या संस्था उत्तमरित्या चालविणे हे अनिवार्य आहे. संविधानाने सरकारविधानमंडळ आणि न्यायपालिका हे लोकशाहीचे तीन स्तंभ दिले आहेत. यांचे कामकाज पारदर्शक आणि योग्यरीत्या चालणे म्हणजे लोकशाही मजबूत करणे होय, असे सांगून देशातील सर्व राज्यातील विधानसभा अध्यक्षविधान परिषद सभापतीआणि सचिवांचे विधानसभा अध्यक्ष ॲड.  राहुल नार्वेकर यांनी स्वागत केले आणि उपस्थितीसाठी आभार मानले.

संसदीय लोकशाहीला मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण

   - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            महाराष्ट्रात २१  वर्षानंतर परिषद होत आहे याचा आनंद आहे. विधीमंडळाचे कामकाज  करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी राज्यशासन कामकरित आहे. प्रत्येक नागरिकाचा आत्मसन्मान अबाधित राखण्यासाठी संविधान महत्वाचे आहे. संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांप्रती उत्तरदायी राहण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

            मुख्यमंत्री म्हणाले कीसंसदीय लोकशाहीत विधिमंडळ आणि कायदेमंडळयांची भूमिका महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेची आणि माहिती अधिकाराची अंमलबजावणी देशभर करण्यात आली. ही गौरवाची बाब असूनमहाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

            विधानसभेचे अध्यक्ष दादासाहेब मावळणकर स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते. अशा अनेक बाबतीत महाराष्ट्राचे योगदान मोठे राहिले आहे. श्री. मावळणकर यांनी ही परिषद सर्व राज्यांमध्ये आयोजित करण्याचे ठरविल्याने प्रत्येक राज्याच्या संस्कृती आणि परंपराचा परिचय देशाला होत आहे.

            या परिषदेत नवीन अनुभवनवीन कल्पनांवर चर्चा होईल  त्याचे सकारात्मक परिणाम विधिमंडळ कामकाजावर होतील. लोकशाही अधिक  मजबूत होण्यासाठी मदत होईल. देशातील सर्वात मोठा पूल अटलबिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा सागरी सेतू (अटल सेतू) बनविण्यास राज्य यशस्वी ठरले असूनप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            राज्यसभेचे उपसभापती म्हणाले, महाराष्ट्राला अनेक वीरांचा व महापुरुषांचा इतिहास लाभलेला आहे. विविध विचारधारेचे लोकप्रतिनिधीसमाजसुधारक यांनी देशपातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांना आजही आपण रोल मॉडेल समजतो. विधिमंडळाच्या कामकाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरेल असे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सांगितले.

            उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्यालोकांच्या कल्याणासाठी लोकशाही व्यवस्था सर्वात जास्त परिणामकारक आहे. लोकशाहीची जडणघडण कशी टिकवता येईल यासाठी  सकारात्मक चर्चा या परिषदेत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असतानानारीशक्ती वंदन कायदा करुन लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षणाचा कायदा केला. त्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.  महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. राजकीयआर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांचे योगदान या राष्ट्राच्या महासत्तेच्या प्रगतीला गती देणारे आहे असे श्रीमती गोऱ्हे यांनी सांगितले.

            विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवळ म्हणालेसंसदीय लोकशाहीला अधिक प्रगल्भ करण्यात महाराष्ट्राने मोठे योगदान दिले आहे. सभागृहातील बहुमताकडून नेहमीच अल्पमताचा आदर करण्याची लोकशाही परंपरा महाराष्ट्र विधानमंडळाने कायम वृद्धिंगत केली आहे. या परिषदेनिमित्त हे योगदान अधोरेखित तर होईलच परंतु पुढील वाटचालीसाठी सुध्दा मार्गदर्शक ठरेलअसा विश्वासही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केला.

            विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, भारतात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जनतेचे प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी विधिमंडळात करत असतात आणि पीठासीन अधिकारी यांच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय लोकांपर्यंत जात असतात असे सांगून उपस्थितांचे स्वागत केले.

            लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आणि भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६० वी परिषद विधान भवनमुंबई येथे  पुढील दोन दिवस होणार आहे. यामध्ये लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी संसद आणि राज्य / केंद्र शासित प्रदेशांतील विधिमंडळांमध्ये शिस्त आणि शिष्टाचार राखण्याची गरज, समिती पद्धती अधिक हेतुपूर्ण आणि परिणामकारक कशी करता येईल?  या विषयांवर चर्चा होणार आहे.

000

Featured post

Lakshvedhi