Saturday, 27 January 2024

एअर मिसाईल, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

 एअर मिसाईलपॅराग्लाइडर्समायक्रोलाइट

एअर क्राफ्टड्रोनच्या वापरावर बंदी

 

            मुंबईदि. 25 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक (जसे एअर मिसाइलपॅराग्लाइडर्सरिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्टड्रोनपॅरा मोटर्सहॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून) च्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहेअसे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

            मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाहीसामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाहीअति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाहीसार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे आदेश लागू आहेतअसेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

      या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येई

बृहन्मुंबई हद्दीत 9 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 बृहन्मुंबई हद्दीत 9 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 

            मुंबईदि. 25 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक बंदीचे आदेश निर्गमीत केले आहे.

           या आदेशानुसार शस्त्रेअग्निशस्त्रेबॅटनतलवारीभालेदंडुकेविना परवाना बंदुकाचाकूकाठ्या किंवा लाठ्या,इतर कोणतीही वस्तू जी शारिरिक हानी करण्यासाठी वापरली जाऊ शकतेअशी हत्यारे बाळगणेस्फोटके वाहून नेणेप्रेतआकृतीपुतळे यांचे प्रदर्शनसार्वजनिक टिकाकरण उच्चारगाणी गाणेसंगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात येत आहे.

         कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेतनोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार शस्त्रे बाळगण्यासाठी तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखाचौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहेअसे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहेअसे पोलिस उपआयुक्त, (अभियान) विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

 


जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र’ आणि दिलखुलास’ कार्यक्रमात

मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत

            मुंबईदि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात 'विश्व मराठी संमेलनया विषयावर शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने दि. 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत नवी मुंबई येथे दुसऱ्या 'विश्व मराठी संमेलनाचेआयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा वैश्विकस्तरावर प्रचार होण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई येथे तीन दिवस होणाऱ्या या संमेलनाचे नियोजनत्याचा मुख्य उद्देश तसेच कार्यक्रमांची रूपरेषा याबाबत मंत्री श्री. केसरकर यांनी  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांची मुलाखत शनिवार दि. 27 आणि सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 26 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा बांधवांना भेटले मुख्यमंत्री

 मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा बांधवांना भेटले मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण

सर्वसामान्यकष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर हितासाठी

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. २७ : मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहिरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्यशेतकरीकष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितले.

            मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि श्री. जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. श्री. जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

            आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले. त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी श्री. जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि श्री. जरांगे व्यासपीठावर आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल श्री. जरांगे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा यावेळी सत्कार केला. 

            यावेळी सकल मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमी आपल्या प्रेमापोटी ह्याठिकाणी आलो आहे. दिलेला शब्द पाळणे ही माझी कार्यपद्धती आहे. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्याने गरीब मराठा समाजाच्या दु:खाची जाणीव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठा समाजासाठी लढणारे कै. अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत हा कार्यक्रम होत आहे त्यांनाही मी अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीआमच्या सरकारने सर्वसामान्यांसाठीशेतकऱ्यांसाठीकष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नव्हे तर सर्व समाज घटकांच्या हितासाठी घेतले आहेत. 

            सकल मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे मत व्यक्त करतानाच कोणतेही गालबोट लागू न देता अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगेसोयऱ्यांचा देखील त्यात समावेश केला आहे. यासोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली. मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

            अन्य समाज घटकांवर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

            मनोगत व्यक्त करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पेढा भरवून त्यांचे  आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी सकारात्मक पद्धतीने निर्णय घेऊन काल अधिसूचना काढली त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

            यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरग्रामविकास मंत्री गिरीश महाजनकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार संजय शिरसाटसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेछत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दडठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेनवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

००००


विदेशात स्वदेश: २६ जानेवारी २०२४

 विदेशात स्वदेश: २६ जानेवारी २०२४ रोजी भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन भारतीय उच्चायुक्तालयाने पूर्ण उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. यावेळी उच्चायुक्त मा.डॉ. प्रदीप राजपुरोहित यांनी त्रिनिदाद व टोबॅगो (वेस्ट इंडिज) या देशात राष्ट्रध्वज फडकवला. या कार्यक्रमास भारतीय डायस्पोरा आणि भारतातील मित्रांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.




कान्सर्ट फॉर चेंज' या कार्यक्रमाने होणार 'मुंबई फेस्टीवल २०२४' ची सांगता

 'कान्सर्ट फॉर चेंजया कार्यक्रमाने होणार

 'मुंबई फेस्टीवल २०२४' ची सांगता

     

            मुंबई, दि.२७: महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत' मुंबई फेस्टिव्हल 2024' मुंबई येथे  दि. 20 ते 28 जानेवारी दरम्यान  सुरू आहे. या फेस्टीवलचा समारोप एमएमआरडीए मैदान क्र. 5 व 6 वांद्रे येथील महा मुंबई एक्सापो प्रदर्शनीमध्ये 'कॉन्सर्ट फॉर चेंजया कार्यक्रमाने होणार आहे.

             या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री गिरीश महाजन,मुंबई फेस्टीवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्रा, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा उपस्थित राहणार आहेत.

            'कॉन्सर्ट फॉर चेंज'  या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा, सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल, अभिनेत्री परिणीती चोप्रा, सोनाली कुलकर्णी   हे कलाकार सहभाग घेणार आहेत.                                                               

प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरावरील २८५ विजेत्यांचा सत्कार स्टार्टअपचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हे व्यासपीठ

 प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरावरील २८५ विजेत्यांचा सत्कार

स्टार्टअपचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हे व्यासपीठ

- मंत्री मंगलप्रभात लोढा

             मुंबईदि. २७ : विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देणे. महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांचा शोध घेणे. अशा विद्यार्थ्यांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करणे व त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध  करणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

            राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक विद्यार्थी वर्ग आहे. त्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांचा राज्याच्या विकास प्रक्रियेत लाभ घेता येणार आहे. राज्यातील २८५ जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले. मुंबई उपनगरमध्येही विजेते नवउद्योजकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्व विजेत्यांचे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिनंदन केले आहे.

            मंत्री  श्री. लोढा म्हणाले, हा उपक्रमाचा दुसरा टप्पा असून आता या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात  ३६ जिल्ह्यातील निवडलेल्या या २८५ नवउद्योजकांना पुढील १ वर्षासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडून  इन्क्युबेशन व अॅक्सेलेरेशन साहाय्य मिळेल. त्यानंतर राज्यस्तरावर १० विजेत्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल.

            महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी म्हणाल्या कीमहाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडून विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना वाव मिळण्यासाठी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचा दुसरा टप्पा विजेत्यांना सन्मानित करून पार पडला. या सर्व विजेत्यांना १ वर्षासाठी नाविन्यता सोसायटीकडून  इन्क्युबेशन व अॅक्सेलेरेशन साहाय्य देण्यात येणार आहे. या सर्व नवउद्योजकांना शासनाच्या वेगवेगळ्या विभागाबरोबर काम करण्याची संधीही दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000


Featured post

Lakshvedhi