Thursday, 25 January 2024

अयोध्या दर्षण,,प्रवास, तिर्थक्षेत्र, परीतन बाबत माहिती

 


















श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखांपेक्षा जास्त खेळाडू सज्ज

 श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी

 २ लाखांपेक्षा जास्त खेळाडू सज्ज

            मुंबईदि २४ : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभस्पर्धा २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. 'श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उ‌द्घाटन २६ जानेवारी २०२४ रोजी वरळीतील जांभोरी मैदानात होईल.

                                                सव्वादोन लाख खेळाडूंची नोंदणी

            छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात लगोरीलेझिमलंगडीपंजा लढवणेदोरीवरील उड्यारस्सीखेचफुगडीमल्लखांबकबड्डीमानवी मनोरेआखाडा कुस्तीपावनखिंड दौडखो-खोविटीदांडूशरीर शौष्ठवढोलताशा या १६ पारंपारिक खेळांचा समावेश आहे. यासाठी सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या स्पर्धा विविध वजनी गटात व वयोगटात होतील. आखाडा कुस्तीपावनखिंड दौडशरीर शौष्ठव व ढोलताशा है चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी होतील.

२७ गडकिल्ल्यांचे प्रदर्शन

            शिवकालीन खेळ स्पर्धेच्या अनुषंगाने उद्घाटन प्रसंगी राज्यातील २७ किल्ल्यांचे प्रदर्शन उभारले जात असूनउपस्थित नागरिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून या किल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. त्याचसोबत दांडपट्टालाठीकाठी या सारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके सुद्धा उद्घाटन प्रसंगी सादर केली जातील. या स्पर्धेचे पावित्र्य जपण्यासाठी रायगडावरून शिवज्योतिचे मुंबईमध्ये आगमन होणार आहे.

स्पर्धेसाठी मुंबई शहरातील आणि उपनगरातील मैदाने सज्ज

            हा क्रीडा महोत्सव मुंबई उपनगरात अंधेरीबोरीवलीकुर्लामुलुंड या चार तालुक्यांमध्ये तसेच मुंबई शहरात दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. मल्लखांबकबड्डी व खो-खो या खेळ प्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धा उपनगर व शहर प्रत्येकी एक ठिकाणी आयोजित करून अंतिमस्तराचे सामने एका ठिकाणी होणार आहेत. इतर ९ खेळांच्या तालुकास्तरीय स्पर्धा ६ ठिकाणी होणार असून अंतिम स्पर्धा मध्यवर्ती एकाच ठिकाणी घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण २० मैदान/सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. त्यातील अंतिम स्पर्धा १० मैदान आणि सभागृहात होणार आहेत.

००००

युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करू या

 युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करू या

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा गौरव

            मुंबई, दि. २४ : प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २५ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक प्रक्रियेची आस्था वाढावी यासाठी राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम केले आहे. ही प्रक्रिया अविरत सुरू असूननव मतदारांनी नाव नोंदणी करावी. राज्यातील सर्व युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

            जयहिंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २४ व २५ रोजी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते.  मतदानाबद्दल ज्यांनी साक्षरता वाढविण्याचे काम केलेमतदार जनजागृतीचे काम केले अशा स्वयंसेवी संस्थामहाविद्यालयविद्यार्थीअधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक आयोगामार्फत गौरव करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगमुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जयहिंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरउपनगरचे डॉ. राजेंद्र भोसलेजय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकरव्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक वाडियानिवडणूक सदिच्छा दूत प्रणित हाटेचित्रपट समीक्षक डॉ. संतोष पाठारेलेखिका डॉ. निर्मोही फडकेदिग्दर्शक प्रकाश कुंटेअभिनेता विकास पाटील उपस्थित होते.

            श्री. देशपांडे म्हणाले कीविद्यार्थी देशाचा आशावाद आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थी सोबत असेल, तर भरीव कामगिरी करेल.  सदिच्छा दूतलोकशाही मित्रउत्कृष्ट वार्तांकनभित्तीचित्रेघोषवाक्यजाहिरात निर्मिती अशा विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले. याचबरोबर जिल्हाधिकारीउप जिल्हा निवडणूक अधिकारीउत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी माहिती व तंत्रज्ञान समन्वयकउत्कृष्ट समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी उत्तम कार्य केले आहे. आपण सर्वांनी मिळून राज्यातील सर्व युवा-युवतींची नावे मतदार यादीत नोंद व्हावी यासाठी आपले कार्य असेच यापुढेही सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे आहे.

            एकत्रित संख्येने काम केल्यास काहीही शक्य नाही. आणि एकी चा प्रत्यय मुंगी देतेम्हणूनच निवडणूकीचे शुभचिन्ह म्हणजेच मॅस्कॉटचे आज सदिच्छा दूत प्रणित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचे राहुल कर्डिलेअकोला जिल्ह्याचे अजित कुंभारपुणे विभागात जितेंद्र डुडीनाशिक विभाग मनीषा खत्रीछत्रपती संभाजीनगर विभागात डॉ. सचिन ओम्बासेकोकण विभागात किशोर तावडे यांना प्रदान करण्यात आला.

            मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग- स्वीप उपक्रम राबवून मतदार यादी दुरूस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि स्वीप नोडल अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर विभागात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरउपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरेअमरावती विभागात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एसउप जिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरेमतदार नोंदणी अधिकारी वैशाली देवकरपुणे विभागात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखउप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकरस्वीप नोडल अधिकारी डॉ. अर्चना तांबेनाशिक विभागात जिल्हाधिकारी जलज शर्माउप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळेस्वीप नोडल अधिकारी शुभांगी भारदेनांदेड विभागात जिल्हाधिकारी अभिजित राऊतउपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चव्हाणमतदार नोंदणी अधिकारी शरद मंडलिककोकण विभागाचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहउप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडमतदार नोंदणी अधिकारी जीवन देसाई यांना  उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट उप जिल्हा निवडणूक अधिकारी नागपूर विभाग:- उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावितअमरावती विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकरपुणे विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी  भगवान कांबळेनाशिक विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश मिसाळछत्रपती संभाजी नगर विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादवकोकण विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार पुणे विभाग :- मतदार नोंदणी अधिकारी अतुल म्हेत्रेमतदार नोंदणी अधिकारी सुरेंद्र नवलेनागपूर विभाग मतदार नोंदणी अधिकारी वंदना सौरंगपतेकोकण विभाग मतदार नोंदणी अधिकारी अमित सानपआकाश लिगाडेनाशिक विभाग मतदार नोंदणी अधिकारी विशाल नरवडेमतदार नोंदणी अधिकारी सुभाष दळवीअमरावती विभाग मतदार नोंदणी अधिकारी अनिता भालेरावमतदार नोंदणी अधिकारी ललितकुमार वराडेछत्रपती संभाजी नगर विभाग मतदार नोंदणी अधिकारी सुशांत शिंदेमतदार नोंदणी अधिकारी संजय पाटील यांना प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट माहिती व तंत्रज्ञान समन्वयक पुरस्कार राज्य माहिती व तंत्रज्ञान समन्वयक कैलास हिरे यांना प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट समाजमाध्यम पुरस्कार :- रत्नागिरी जिल्हा जिल्हाधिकारी वैभव आंबेरकरठाणे जिल्हाधिकारी अजिंक्य दिवेकरपुणे जिल्हामनोज पुराणिकठाणे जिल्हा विलास पाटील यांना समाजमाध्यम समन्वयक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार :- सोसायटी फॉर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्चपुणेडॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयपुणेआर.एन.सी. महाविद्यालय नाशिकपुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयपुणेरयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी महाविद्यालयसाताराकॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरअहमदनगर या महाविद्यालयांनी निवडणूक साक्षरता मंडळांसाठी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने त्यांना गौरविण्यात आले.

            उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. पुनम शिंदेपुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे शरद गव्हाळेसुशिलादेवी महाविद्यालयाचे शिवाजी मोहळे यांना प्रदान करण्यात आला.

            विनयन वाघमारेनिकीता सालगुडेभारती डोईफोडे यांना उत्कृष्ट विद्यार्थी सदिच्छा दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमोक्रॅसी सोबत सहयोगी संस्थांना विशेष संस्थात्मक मतदार मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            विशेष संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार बबन पारधीचंद्रकांत गडेकरअरुण जाधवराजू अवताडेकडुदास कांबळेमारूती बनसोडेशैला यादव यांना प्रदान करण्यात आला.

            विशेष जिल्हाधिकारी पुरस्कार सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादधाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना प्रदान करण्यात आला.  टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार निशा नांबियार यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिव्यक्ती मताच्या स्पर्धेत उत्कृष्ट भित्तिपत्रकासाठी धनश्री भागडकर यांना प्रथम पुरस्कारउत्कृष्ट घोषवाक्यास साक्षी चक्रदेव यांस प्रथम पुरस्कारउत्कृष्ट जाहिरातनिर्मिती स्पर्धेत तेजस साळगावकर यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

०००

अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये

 अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबई दि. २४ : शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाहीयाची दक्षता घ्यावीअसे निर्देश महसूलपशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले.

            राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी शासनाने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या दूध अनुदानाबाबत मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीत आढावा घेतला.

            या बैठकीस पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढेआयुक्त प्रशांत मोहोडसहा निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) शहाजी पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

जनावरांचे टॅगिंग  होणे महत्त्वाचे

            शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यास मिळण्यासाठी त्यांच्या जनावरांचे  टॅगिंग होणे महत्त्वाचे आहे. पशुधनाचे टॅगिंग व्हावेयासाठीचे यंत्रणेने  हे काम अचूकरित्या पूर्ण केल्यास सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यास अनुदानाचा लाभ मिळेलअसेही मंत्री श्री. विखे - पाटील यांनी सांगितले.

०००००

प्लास्टिकसह कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी समिती स्थापन

 प्लास्टिकसह कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी समिती स्थापन

 

            मुंबई, दि. २५ : प्रजासत्ताक दिनी वापरले जाणारे प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी व जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर व अंधेरीबोरिवली तसेच कुर्ला या प्रत्येकी तीन तालुक्यांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय दिनाच्या दिवशी वापरले जाणारे राष्ट्रध्वज,  खराब झालेलेमाती लागलेलेमैदानात किंवा रस्त्यावरकार्यक्रमाच्या स्थळी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसील कार्यालयात व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटना देण्यात आलेले आहेत, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे तहसीलदार (रजा राखीव) सचिन चौधरी यांनी कळविले आहे.

०००

१९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता ३२ जिल्हा दक्षता समित्या स्थापन

  १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

३२ जिल्हा दक्षता समित्या स्थापन


            मुंबई, दि.२५ : राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापनाकॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडिची आर्थिक मदत देण्यात येत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी समाजातील होते.

            शासन अधिसूचना दि.१७/०६/२००२ व दि.०५/०८/२००८ अन्वये वेठबिगार अधिनियम १९७६ च्या अंमलबजावणीकरिता राज्यामध्ये ३२ जिल्हा  दक्षता समित्या स्थापन केल्या असून उप विभागीय स्तरावर एकुण १२४ उप विभागीय दक्षता समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या दक्षता समित्यांचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असून उप विभागीय दक्षता समित्यांचे विभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत. सदर दक्षता समित्यांची व उप विभागीय समित्यांची वेळोवेळी बैठका होत आहेत. कातकरी निर्मुलनासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांची अंमलबजावणी या समित्यांच्या माध्यमातुन करण्यात येते.

            राज्यात मागील दोन वर्षात १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्हयामध्ये जानेवारी२०२१ ते डिसेंबर२०२३ या कालावधीत कातकरी समाजातील एकूण ६७ बेठबिगार आढळुन आलेले आहेत.  पालघर जिल्हयाचे रहिवासी असलेले एकुण २३ वेठबिगार कामगार हे सन २०१९ मध्ये १३ व सन २०२० मध्ये ५ असे एकुण १८ वेठबिगार ठाणे जिल्ह्यात आढळुन आलेले आहेत. तसेच सन २०२२ मध्ये ५ कामगार अहमदनगर जिल्ह्यात काम करताना आढळून आलेले असून त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये कातकरी समाजातील एकुण ३७ वेठबिगार कामगार (नाशिक जिल्हयातील १ व अहमदनगर जिल्हयातील ३६) आढळुन आलेले आहेत तर  रायगड जिल्ह्यामध्ये जानेवारी२०२१ ते डिसेंबर२०२३ या कालावधित कातकरी समाजातील एकही बेठबिगार आढळून आलेला नसल्याची माहिती कामगार विभागाने दिली आहे.

            कामगार विभागाच्या पाठपुराव्याने  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या  दिनांक २३.१२.२०१६ शासन निर्णया नुसार एकुण ५ कामगारांना प्रत्येकी रु. २५,०००/- प्रमाणे  रुपये १,२५,०००/- इतको आर्थिक मदत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आलेली आहे.

            नाशिक जिल्ह्यात आढळलेल्या कातकरी समाजातील एकुण ३७ वेठबिगार कामगारपैकी  (नाशिक जिल्हयातील १ व अहमदनगर जिल्हयातील ३६ ) २५ वेठबिगारांना प्रत्येकी रु. ३०,०००/- प्रमाणे एकूण रक्कम रु.७,५०,०००/- एवढी तातडीची आर्थिक मदत करण्यात आलेली तसेच पीएफएमएस प्रणाली मार्फत नाशिक जिल्हयातील १ कामगारास पहिला हप्ता रु. २५,०००/- व दुसरा हप्ता रुपये ५०,०००/- देण्यात आलेला आहे.

            भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयने वेठबिगार कामगारांच्या पुनर्वसनाकरिता Central Sector Scheme for Rehabilitation of Bonded Labour-2016  या योजनेत सुधारणा करुन वेठबिगार पुनर्वसन योजना२०२१ ही सुधारित योजना सन २०२१  ते सन २०२५ २०२६ या कालावधीकरिता दिनांक जानेवारी २०२२ पासून लागू केलेली आहे. सदर याजनेमध्ये प्रौढ पुरूष लाभार्थीस रु. १,००,०००/-विशेष प्रवर्गातील लाभार्थीस रु. २,००,०००/-, तीव्र स्वरुपाच्या वेठबिगारीशी संबंधित दुर्लक्षित प्रकरणांमध्ये प्रत्येकी रु. ३,००,०००/- इतके पुनर्वसनाकरिता आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच सदर योजनेमध्ये वेठबिगार कामगारांच्या पुनर्वसनाकरिता जिल्हा स्तरावर निधी उभारुन त्यामध्ये कमीत कमी रु. १०,००,०००/- इतका कॉपर फंड ठेवण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारीठाणे व  पालघर यांच्यामार्फत शासनास वेळोवेळी कॉर्पस फंडाची मागणी करण्यात आलेली आहे.

०००

टर्बो स्टार्ट' चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येणार

 'टर्बो स्टार्टचर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येणार

                                            -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

       मुंबई,दि.25: 'मुंबई फेस्टिवल 2024अंतर्गत आयोजित 'टर्बो स्टार्टचर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील.'स्टार्ट अप'ची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखले जाते. आज झालेल्या चर्चासत्रातून अधिकाधिक नाविन्यपूर्ण संकल्पना सुचवणारा स्टार्ट अप जर एखादा उद्योग करण्यासाठी पुढे आल्यास शासन सहकार्य  करेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

              मुंबई स्टॉक एक्सचेंज येथे 'मुंबई फेस्टिवल 2024अंतर्गत मुंबई फेस्टिवल रिंगिग बेल सोहळा आणि 'टर्बो स्टार्टचर्चासत्र उदघाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते यावेळी पर्यटनमंत्री गिरीश महाजनउपमुख्यमंत्र्याचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,पर्यटन सचिव जयश्री भोज,मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रापर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटीलएमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मामुंबई स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी सुभाष केळकरमुख्य सनिंयत्रण अधिकारी के. कमलाविझ क्राफ्ट संस्थेचे संस्थापक सबा जोसेफ यांची उपस्थिती  होती.

              उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, 'मुंबई फेस्टिवल 2024अंतर्गत 'टर्बो स्टार्टया चर्चासत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार निश्चित सर्वांना मार्गदर्शक ठरतील. कोणत्याही नावीन्यपूर्ण संकल्पना अंमलात येण्यासाठी त्यावर अगोदर विचार  विनिमय आणि मंथन होणे आवश्यक असते. मुंबई फेस्टिवलच्या माध्यमातून या नाविन्यपूर्ण विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे. यामध्ये अनेक तज्ज्ञ मान्यवर आहेत. देशातील सर्वाधिक स्टार्ट अप आणि युनिकॉन हे एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत.कृषी क्षेत्रात 40 टक्के 'स्टार्ट अपकाम करत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी 'स्टार्ट अपमहत्वूपर्ण भूमिका बजावतील, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

          उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीभारतात झालेल्या जी20 परिषदेचे ब्रीदवाक्य हे 'वसुधैव कुटुंबकम्' - 'एक पृथ्वीएक कुटुंबएक भविष्यअशी संकल्पना आहे.या माध्यमातून पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारून  सर्वांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.शाश्वत विकासासाठी आपल्याला  भविष्याचा वेध घेऊन विकास धोरणे ठरवली पाहिजेत. सध्या जग हे जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नाला सामारे जात आहे. जागतिक हवामान बदलामध्ये सर्वाधिक तीन प्रभावीत देशांपैकी एक देश भारत हा आहे. आपल्या देशातील बदलते हवामान बदल लक्षात घेऊन शेती आणि उद्योगांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान येणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपाययोजना सूचवणाऱ्या स्टार्ट करिता शासन सहकार्य करून सुचवलेल्या उद्योगांमध्ये शासन गुंतवणूक करेल, असेही ते म्हणाले.

            'मुंबई फेस्टिवल 2024मध्ये गेले पाच दिवस अत्यंत नाविन्यपूर्ण कार्यक्रम ठेवले आहेत.मनोरंजन आणि विविध स्पर्धांचा संगम असलेला महोत्सव आगामी कालावधीत नक्कीच आपल्या या विविधपूर्ण उपक्रमांनी ओळखला जाईल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

             'मुंबई फेस्टिवल 2024'  'टर्बो स्टार्टअंतर्गत 'पृथ्वीच्या संवर्धनासाठीया विषयावरील चर्चासत्रात  स्वदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष रोनी स्क्रूवालाड्रीम अकराचे संस्थापक हर्ष जयइन मोबी ग्लोबल बेसचे संचालक विकास अग्निहोत्रीटर्बो स्टार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट राजू यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला, तर आयेशा फरीदी यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

      यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आठ वर्षे कार्यरत असलेले अंकित भाटेजा आणि राघव शर्माकचरा व्यवस्थापनात कार्यरत असलेले कबाडीवाला,आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या लिव्हप्रोटेक कंपनीच्या कामाबद्दल डॉ.राजा विजयकुमार आणि आलोक शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.

0000

संध्या गरवारे/वि.स.अ


Featured post

Lakshvedhi