Wednesday, 24 January 2024

साडी वाटपाचे जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे

 साडी वाटपाचे जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि.२३ : वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्यासाठी  'कॅप्टिव्ह मार्केट योजनाराबविण्यात येत आहे. या योजनेला अधिक गती देऊन तातडीने साडी वाटप होईल यासाठी जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे, अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

            मंत्रालयात आज वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभागाची एकत्रित कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप नियोजनाबाबत आढावा बैठक वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंहवस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकरउपसचिव कृष्ण पवारअन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली असून  राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे रेशन दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्याचा लाभ जवळपास २४ लाख ८० हजार ३८० कुटुबांना होणार आहे.

            कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप होणार आहे. त्याचे वस्त्रोद्योग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी कालबद्ध नियोजन करून १ फेब्रुवारी २०२४ पासून साडी वाटप सुरू होईल आणि सर्वांना लाभ मिळेल, असे जिल्हानिहाय नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

0000

बामु'च्या कुलगुरुपदी डॉ विजय फुलारी, तर डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती राज्यपालांकडून सीओईपी'च्या कुलगुरुपदी डॉ सुनील

 बामु'च्या कुलगुरुपदी डॉ विजय फुलारीतर डॉ. मिलिंद बारहाते यांची

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

राज्यपालांकडून सीओईपी'च्या कुलगुरुपदी डॉ सुनील भिरुड यांची नियुक्ती

 

            मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.

            डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

            राज्यपालांनी नागपूर येथील सी पी ॲण्ड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. 

            राज्यपाल श्री. बैस यांनी डॉ. सुनील गंगाधर भिरुड यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर नियुक्ती केली आहे.  डॉ. भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत.

            सर्व कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत-यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत - करण्यात आली आहे.

०००००

 

Dr Vijay Fulari appointed as Vice-Chancellor of BAMU; Dr Milind Barhate to be Vice-Chancellor of Sant Gadgebaba Amravati University

 

            Mumbai Dated 23 : Governor appoints Dr. Sunil Bhirud as Vice-Chancellor of COEP Technological University

            Maharashtra Governor and Chancellor of state universities Ramesh Bais today appointed Dr. Vijay Janardan Fulari as the Vice-Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar. Dr. Vijay Fulari is a Senior Professor and former Head of the Department of USIC & Physics, Shivaji University, Kolhapur .

            The Governor has also appointed Dr. Milind Arvind Barhate, Principal of CP & Berar ES College, Nagpur as the Vice-Chancellor of Sant Gadgebaba Amravati University. Further, the Governor has appointed Dr. Sunil Gangadhar Bhirud as the Vice Chancellor of COEP Technological University, Pune.

            Dr. Bhirud is working as a professor in the Department of Computer Engineering and Information Technology at Veermata Jijabai Technological Institute. All Vice Chancellors have been appointed for a tenure of five years from the date of assumption of office or till they attain the age of 65 years - whichever is earlier.

स्थानिक ‘शिवप्रेमीं’च्या सहकार्य, समन्वयातून शिवनेरीवरील ‘महादुर्ग’ महोत्सव यशस्वी करा

 स्थानिक शिवप्रेमींच्या सहकार्यसमन्वयातून

शिवनेरीवरील महादुर्ग’ महोत्सव यशस्वी करा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. २३ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून किल्ले शिवनेरी (जि.पुणे) परिसरात आयोजित महादुर्ग 2024’ महोत्सव सर्वांना सोबत घेऊन भव्य-दिव्य प्रमाणात साजरा व्हावा. महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजनात स्थानिकांचा सहभाग वाढवावा. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन नियोजन करण्यात यावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या पर्यटन विभागाच्यावतीने जुन्नर येथील शिवनेरी किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महादुर्ग 2024’ महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. या बैठकीस जुन्नरचे आमदार अतुल बेणकेनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजवित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करुन रयतेचे स्वराज्य स्थापन केले. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा व्हावा. पर्यटन विभागाच्यावतीने दि. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान किल्ले शिवनेरीवर घेण्यात आलेला महादुर्ग’ महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीस्थानिक स्वराज्य संस्थाविविध सामाजिकस्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून त्यांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. यंदाच्या महोत्सवाला भेट देणाऱ्या शिवप्रेमी व दुर्गप्रेमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भातही उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत दिल्या.

            तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करुन देण्यासाठी, देशी-विदेशी पर्यटकांमध्ये राज्यातील गड-किल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी, राज्यातील पर्यटन स्थळेकला संस्कृती व पाककृती यांचे दर्शन घडविण्यासाठी महादुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन सचिव श्रीमती भोज यांनी या बैठकीत दिली.

मुंबई उपनगरातील संभाव्य धोकादायक दरडप्रवण भागात महानगरपालिकेने तातडीने संरक्षक भिंती बांधाव्यात

 मुंबई उपनगरातील संभाव्य धोकादायक दरडप्रवण भागात

महानगरपालिकेने तातडीने संरक्षक भिंती बांधाव्यात 

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. २३ :- मुंबई उपनगरातील चेंबूरघाटकोपरभांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती बांधण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होताच त्या खर्चाची प्रतिपूर्ती मुंबई महानगरपालिकेला करावीअशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिल्या.

            मुंबई उपनगरातील चेंबूरघाटकोपरभांडूप व अन्य  ठिकाणी टेकडीखाली असलेल्या वस्तींच्या संक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहमुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए.आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुंबई उपनगरातील चेंबूरघाटकोपरभांडूप आदी भागात टेकडीखाली दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या अनेक वस्त्या आहेत. अशा धोकादायक ठिकाणी अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा धोकादायक ठिकाणी दुर्घटना घडू नयेजीवित व वित्त हानी होऊ नयेयासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने या भागात संरक्षक भिंती बांधण्यासह इतर आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे. मुंबई उपनगरातील अशा धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयआयटी-मुंबई मार्फत केले असून त्याची यादी तयार करण्यात आली आहे. अशा संभाव्य धोकादायक भागात मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना राबवाव्यात. आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळताच मुंबई महानगर पालिकेला खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येईल. राज्य सरकारनच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून ही प्रतिपूर्ती  करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत दिल्या.


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीतून वगळलेल्या सात खेळांचा पुन्हा समावेश करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीतून वगळलेल्या

सात खेळांचा पुन्हा समावेश करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 23 :- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फपॉवरलिफ्टिंगबॉडीबिल्डिंगकॅरमबिलियर्डस ॲण्ड स्नूकरयॉटिंग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडा प्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे. तसेच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्याने सामावेश करावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. यंदाच्या (सन 2022-2023) पुरस्कारांसाठी फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने तातडीने मागवून तेही विचारात घ्यावेतअशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            राज्य शासनाने अलिकडे जारी केलेल्या सुधारित शासन निर्णयातगोल्फपॉवरलिफ्टिंगबॉडीबिल्डिंगकॅरमबिलियर्डस ॲण्ड स्नूकरयॉटिंग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना वगळण्यात आले होते. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खेळांच्या संघटनांनी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याबाबत तसेच त्यांच्या खेळांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी पात्र क्रीडाप्रकारांमध्ये समावेश करण्याबाबत क्रीडा संचालनालयास पत्रव्यवहार केला होतात्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेउद्योग मंत्री उदय सामंतक्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्तादूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसेमहाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटेमहाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)अरुण केदारअजित सावंत (कॅरम)संजय सरदेसाईसंजय माधव (पॉवर लिफ्टिंग)महेंद्र चेंबूरकर ( जिम्नॅस्टिक्स)देवेंद्र जोशीक्षितिज वेदक (बिलियर्ड्स आणि स्नूकर)विजय झगडेराजेश सावंत (बॉडीबिल्डिंग)विठ्ठल शिरगावकर (मॉडर्न नेन्थोलॉन) आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीकोणताही खेळाडू तो खेळत असलेल्या क्रीडा प्रकारात यश मिळविण्यासाठी त्याची उमेदीची वर्षे खर्च करतो. आपले सर्वस्व पणाला लावतो. आपल्या कौशल्यमेहनतीच्या बळावर राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करतो. अशा खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतात. त्यामुळे कुठल्याही खेळावर आणि खेळाडूंवर अन्याय होऊन चालणार नाही.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पात्र असलेल्या 44 खेळांपैकीवगळण्यात आलेल्या इक्वेस्टेरियनगोल्फपॉवर लिफ्टिंगबॉडीबिल्डिंगकॅरमबिलियर्डस ॲण्ड स्नूकरयॉटिंग या सात खेळांना पुन्हा यादीत सामावून घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणाऱ्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत नव्याने समावेश करण्याचे ठरविण्यात आले. सन 2022-23 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची मुदत 22 जानेवारीपर्यंतच होती. ही मुदत वाढवून या नव्याने समाविष्ट केलेल्या खेळांसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा

 प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सकाळी

९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा


            मुंबईदि. २३ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज निर्गमित केले.

या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीयअर्धशासकीय समारंभ आयोजित करून नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेलत्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजेच्यापूर्वी किंवा सकाळी १० वाजेनंतर करावा.

            मुंबई येथील शिवाजी पार्कदादर येथे राज्यपाल रमेश बैस हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पुढील प्रमाणे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्रीमंत्री ध्वजारोहण करतील (अनुक्रमे मा. पालकमंत्रीमा. मंत्री यांचे नाव आणि ध्वजारोहण करण्यात येणाऱ्या जिल्ह्याचे नाव या क्रमाने). देवेंद्र फडणवीस- नागपूरअजित पवार- पुणेराधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगरसुधीर मुनगंटीवार- चंद्रपूरदिलीपराव वळसे पाटील- बुलढाणाडॉ. विजयकुमार गावित- भंडाराहसन मुश्रीफ- कोल्हापूरअब्दुल सत्तार- हिंगोलीचंद्रकांत पाटील- सोलापूरगिरीश महाजन- धुळेसुरेश खाडे- सांगलीतानाजी सावंत- धाराशीवउदय सामंत- रत्नागिरीदादाजी भुसे- नाशिकसंजय राठोड- यवतमाळगुलाबराव पाटील- जळगावसंदिपान भुमरे- छत्रपती संभाजीनगरधनंजय मुंडे- बीडरवींद्र चव्हाण- सिंधुदुर्गअतुल सावे- जालनाशंभूराज देसाई- सातारामंगल प्रभात लोढा- मुंबई उपनगरधर्मरावबाबा आत्राम- गोंदियासंजय बनसोडे- लातूरअनिल पाटील- नंदुरबारदीपक केसरकर- ठाणेआदिती तटकरे- रायगड.

            इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतीलतथापिराष्ट्रध्वजारोहण करणारे मा. मंत्री  अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिका-यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित प्रांताधिकारीतहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. राज्यात या दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवरकिल्ल्यांवरतसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारावेत.  राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक दि. ५ डिसेंबर१९९१११ मार्च१९९८ रोजी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालनाची दक्षता घ्यावी. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावायासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा.

दिवसभरातून वृक्षारोपणआंतर शालेय/आंतर महाविद्यालयस्तरावर वक्तृत्व स्पर्धाप्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात.             सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावाशासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावीएनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर मोहीम राबवावी.  काही ठराविक जिल्ह्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात पुढीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यातत्यात ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये. कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये. मा. पालकमंत्री हे भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्वबलिदान केलेल्या हुतात्म्यांचा तसेच देशाचा गौरव यापुरतेच मर्यादित असावेअसेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी - मंत्री हसन मुश्रीफ सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाचे लोकार्पण

 मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी

- मंत्री हसन मुश्रीफ

सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाचे लोकार्पण

 

            मुंबईदि.२३ : मौखिक आजारांचा प्रार्दुभाव वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्यविशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले

            फिरते दंत रुग्णालय हे शासनाच्या निधीतून झाले असून या रुग्णालयास जिल्हा नियोजन समिती,मुंबई शहर यांनीही सहकार्य केले आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाचे लोकार्पण आणि या चिकित्सालयाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन दंत वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

            यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकरसहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भट, सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख संध्या डॉ.चव्हाण यांची उपस्थिती होती.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, नाविन्यपूर्ण आधुनिक सुविधा असलेले सुसज्ज फिरते दंत रुग्णालय स्टेट ऑफ आर्टस् या आधुनिक संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे थेट जनतेपर्यंत पोहोचवून आधुनिक सेवा प्रदान करणे सहज शक्य होईल.

            प्राथमिक मौखिक आरोग्य सुविधा तसेच उत्तम उपचार  अधिकाधिक सुलभ करून फिरते दंत चिकित्सालयाद्वारे जनतेपर्यंत पोहोचून सेवेचा अभाव असलेल्या दुर्गम भागांमध्ये जास्तीत जास्त सेवा पुरवावी व मौखिक रोगांचे प्रमाण कमी करावे. तसेच जनतेस मौखिक आरोग्याबद्दल संवेदनशील करणे,  तंबाखू व्यसनामुळे वाढणारे मौखिक कर्करोग यावर जनतेस जागरुक करून मौखिक कर्करोगावर नियंत्रण आणणे हे सामाजिक दंत शास्त्र विभाग,शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यांनी करावे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्ण्यालयमुंबई  येथील सामाजिक दंत शास्त्र विभाग अधिक अधिक जनतेपर्यंत पोहोचून सेवा प्रदान करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

                                                सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाची माहिती  

            दंतचिकित्सालयात आधुनिक पद्धतीच्या दोन दंत खुर्च्या व यंत्रणा असून  रुग्ण सेवेसाठी तत्पर आहे. फक्त मौखिक तपासणी व उपचार या करिताच नव्हे, तर आधुनिक उपचार पद्धती यंत्रणा जसे की पोर्टेबल एक्सरे युनिटकर्करोग तपासणीत्वरित आरोग्य चाचणी सुविधा यांनी सुसज्ज आहे. ज्यामुळे रुग्णांचे जागीच निदान करून त्वरित उपचार सेवा देणे सोपे होईल. दातांची कीड यावर उपचार व प्रतिबंधहिरड्यांचे आजार यावर उपचार, रूट कॅनॉल उपचारमौखिक कर्करोग तपासणीव्हीडिओद्वारे रुग्णांचे मौखिक आरोग्य संबंधित जागरूकतातंबाखू व्यसन  समुपदेशन या सेवा पुरविल्या जातील.

            यावेळी श्री.निवतकरडॉ. पाखमोडेडॉ. भट यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संध्या चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन अब्रार सय्यद यांनी केले, तर आभार प्रियांका मचाले यांनी मानले.


Featured post

Lakshvedhi