Saturday, 20 January 2024

श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर

 श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त

राज्यात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर

 

          मुंबईदि. १९ : श्री रामलल्ला प्राण- प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य सरकारने सोमवार, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.


केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव आराधना पटनाईक यांच्याकडून राज्याच्या आरोग्य योजनांचा आढावा

  

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव

आराधना पटनाईक यांच्याकडून राज्याच्या आरोग्य योजनांचा आढावा

 

            मुंबईदि. १९: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव श्रीमती आराधना पटनाईक व वरिष्ठ सल्लागार डॉ. शशांक शर्मा यांनी आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या योजनापायाभूत सोयी सुविधांची कामे आदींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनाउपक्रम आदींबाबत निर्देश दिले. यावेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरसचिव नवीन सोनाआरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमारसंचालक (वित्त) जयगोपाल मेननसहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्करसहसंचालक विजय कंदेवाडसहसंचालक (अतांत्रिक) सुभाष बोरकरआदी उपस्थित होते. 

            यावेळी आयुक्त धीरज कुमार यांनी राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या योजनाउपक्रम यांची माहिती दिली. बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान,  आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाआयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आभा कार्ड वाटपमातृ वंदन योजनाराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सुविधांची कामेआयुष्यमान भव: मोहीमआयुष्यमान आरोग्य मंदिर,  सिकलसेल व  क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमअसंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आदींचा आढावा घेण्यात आला. सहसचिव श्रीमती पटनाईक २० जानेवारी रोजी रायगड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना भेटीसुद्धा देणार आहेत.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या निविदेमध्ये कुठलाही गैरव्यवहार नाही आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

 आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या निविदेमध्ये

कुठलाही गैरव्यवहार नाही

आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

            मुंबईदि. १९: आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा  प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी निविदा १२ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली होती. निविदा पूर्व सभेनंतर आतापर्यंत निविदेस तीन मुदतवाढी झालेल्‍या असून निविदा विहीत कार्यपध्‍दतीने राबविण्‍यात आलेली आहे.  यास शासनाची तसेच उच्‍चस्‍तर समितीची मान्‍यता असून यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही.  तसेच निविदा दि.२३ जानेवारी २०२४ पर्यंत खुली असल्‍याने सर्व इच्‍छुक निविदाकार निविदा भरु शकतातअसे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले असून निविदा भरण्याचे आवाहनही केले आहे.

            महाराष्ट्र राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी एम/एस. बीवीजी इंडिया लिमिटेड यांची नियुक्ती दि.०१.०३.२०१४ रोजी पुढील पाच वर्षासाठी करण्‍यात आलेली होती. तद्नंतर करार संपुष्‍टात आल्‍यापासून मंत्रीमंडळाच्‍या शिफारशीनुसार पुढील पाच वर्षाकरिता दि.३१.०१.२०२४ पर्यंत कंपनीला मुदतवाढ देण्‍यात आली. ही मुदतवाढ संपुष्टात येत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध स्वरूपांच्या माध्यमांनी (रस्ते  रुग्णवाहिकाबोट रुग्णवाहिका व इतर) त्याचप्रमाणे लोकसंख्येचे वाढते प्रमाणनवीन महामार्गाची होणारी निर्मितीमुळे अपघातांत होणारी वाढत्यासाठी तातडीने वैद्यकीय मदत देण्याकरिता आधुनिक स्वरूपाची आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्याकरीता ४ ऑगस्ट२०२३ नुसार प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. 

            पूर्वीच्‍या करारानुसार २३३ एडवांस्ड सपोर्टिंग रुग्णवाहिका (एलएलएस) आणि ७०४- बेसिक लाइफ सपोर्टिंग रुग्णवाहिका (बीएलएस) अशा एकूण ९३७ रुग्‍णवाहिकांची आपत्‍कालिन सेवा सुरु होती. त्‍याकरिता अंदाजित वार्षिक खर्च रु.३५७ कोटी एवढा होता.  तथापि या निविदेमध्‍ये एकूण १७५६ नवीन रुग्‍णवाहिका खरेदी करुन कार्यन्वित करावयाच्‍या असल्‍याने त्‍यासाठीचे प्रशासकीय मान्‍यतेनुसारचा अंदाजित वार्षिक खर्च रु. ७५९ कोटी एवढा अपेक्षित आहे.

            त्यानुसार आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा  प्रक्रिया राबवून मसुदयास मान्यता देणेनिविदेची तांत्रिक व वित्तीय छाननी करण्याकरिता शासन निर्णय २१ जून २०२३ नुसार अप्पर मुख्य सचिववित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समिती गठित करण्यात आलेली आहे.  प्राप्त प्रशासकीय व निविदा समितीच्या मान्यतेनुसारमहाराष्ट्रातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प अर्थात  टोल फ्री क्र.१०८ अंतर्गत २५५ एडवांस्ड सपोर्टिंग रुग्णवाहिका (एलएलएस) आणि १२७४  बेसिक लाइफ सपोर्टिंग रुग्णवाहिका (बीएलएस)३६ नियो नटल रुग्णवाहिका (नवजात शिशु करीता असलेली रुग्णवाहिका)166  बाइक रुग्णवाहिका व २५ वॉटर रुग्णवाहिका  अशा एकूण १७५६ रुग्णवाहिका आपत्कालीन वाहन सेवा राज्यात सुरू करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी सेवापुरवठादाराची नेमणूक करण्याकरिता निविदा १२ सप्टेंबर २०२३ रोजी महाटेंडर प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आली.

            या निविदेची निविदापूर्व सभा दि.१८.०९.२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. निविदापूर्व सभेत संभाव्य निविदाधारकांकडून बऱ्याच प्रमाणात सूचना प्राप्‍त झाल्‍या होत्‍या.

             या सूचनांवर चर्चा करणे व निर्णय घेण्याकरिता निविदा समितीची बैठक  दि.२४ नोव्हेंबर२०२३ रोजी अपर मुख्य सचिववित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  निविदापूर्व सभेचे इतिवृत्त महाटेंडर प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आलेले होते. तद्नंतर सदरील निविदेस दि २० डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार २० डिसेंबर २०२३ रोजी निविदेचा प्रतिसाद तपासाला असता एकही निविदाकारांनी सहभाग घेतलेला नसल्याचे दिसून आले.  त्यामुळे सदरील निविदेचा कालावधी ८ दिवसांकरिता २८ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आलेला होता. मुदतवाढ देवूनही २८ डिसेंबर २०२३ पर्यंत एकही निविदाकाराने निविदेमध्‍ये सहभाग घेतला नाही.

            या सर्व बाबीचा विचार करतादि.१२ सप्टेंबर २०२३ रोजी राबविण्यात आलेल्या निविदेतील अटी व शर्ती नुसार व निविदापूर्व सभेच्या इतिवृत्तानुसार तसेच वेळोवेळी महाटेंडर प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुध्दी पत्रक या सर्वांचे एकत्रीकरण करून व त्यास निविदा समितीची देखील मान्यता असल्याने निविदापूर्व सभा न घेता ८ दिवसांची निविदा प्रसिध्‍द करण्‍याबाबत शासनाकडून प्राप्‍त मान्‍यतेनुसार सदरची निविदा पुनश्‍चः ०४ जानेवारी २०२४ रोजी जुन्‍याच अटी व शर्तींनुसार महाटेंडर प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आली.

            या निविदेचा विक्री कालावधी दि.१३ जानेवारी २०२४ रोजी पर्यंत होता. तथापि १३ जानेवारी २०२४ पर्यंत केवळ एकाच निविदाकाराने सहभाग घेतल्‍यामुळे सदरच्‍या निविदेला पुनश्‍चः  २३ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आलेली आहेअसेही आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००


Friday, 19 January 2024

परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी तीन लाख 63 हजार रुपयांचा निधी मंजूर

 परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी

तीन लाख 63 हजार रुपयांचा निधी मंजूर

 

            मुंबई, दि. 19 : राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी रुपये 3.63 लाख निधी वितरित  करण्यास मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

               राज्यातील ठाणेपालघरपुणेनाशिकधुळेनंदुरबारजळगावअहमदनगरनांदेडयवतमाळगडचिरोलीचंद्रपूरअमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील ¨आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजनासाठी° सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी रुपये 3.63 लाख (रुपये तीन लाख त्रेसष्ट्ट हजार फक्त) इतकी रक्कम खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.

0000

नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा

 नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या

नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा

- नंदकुमार काटकर

दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखत

 

            मुंबईदि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'अभय योजनाया विषयी नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ग्राहकांना नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळावी यासाठी मुद्रांक सवलतीची 'अभय योजनालागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना सन 1980 ते 2000 या कालावधीतील तसेच 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील जुने दस्तऐवज आणि दंडामध्ये सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत दोन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 31 जानेवारी 2024 पर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत सवलत देण्यात येणार आहे.  ग्राहकांना ही सवलत कशा स्वरूपात दिली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे. याचबरोबर भारतीय नोंदणी कायदा आणि महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम काय आहेयाबाबतची माहिती 'दिलखुलासकार्यक्रमात सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक श्री. काटकर यांनी दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. काटकर यांची मुलाखत सोमवार दि. 22मंगळवार दि. 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत

 जय महाराष्ट्रदिलखुलास’ कार्यक्रमात

प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याची उल्लेखनीय कामगिरीया विषयावर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचेमहानगरपालिकासर्व नगरपरिषदानगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. राज्यातील स्वच्छता प्रेमीनागरिकांचे योगदान आणि स्वच्छता कामगारांच्या परिश्रमामुळे स्वच्छ भारत अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याबाबत  प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांनी  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

             ‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांची मुलाखत शनिवार दि. 20 जानेवारी 2024 रोजी प्रसारित होणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.  जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

मुंबई फेस्टिव्हल २०२४' चे होणार उद्घाटन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २० जानेवारी रोजी

'मुंबई फेस्टिव्हल २०२४चे होणार उद्घाटन

  

            मुंबईदि. १९ : राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये  20 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल 2024' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता  क्रॉस मैदान गार्डनचर्चगेट येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

                या कार्यक्रमात काला घोडा फेस्ट‍िवलतर्फे तुषार गुहा यांचा गीत सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. शारदा विद्यालयातर्फे लेझीम सादरीकरणनृत्यांगना सुप्रिया सेन यांचा ओडिशी नृत्याचा कार्यक्रममुंबई फेस्ट‍िवल थीम साँगमराठी आणि हिंदी काव्यवाचन कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेरसचिन खेडेकर यांचा सहभाग असेल. अभिनेत्री सारा अली खान यांचा नृत्याचा कार्यक्रमधारावी ड्रीम प्रोजेक्ट कार्यक्रम सादरीकरण होणार असून मराठी अभिनेते अमेय वाघ आणि हिंदी अभिनेत्री मिनी माथूर या कार्यक्रमाचे निवेदन करतील. या फेस्टिवलला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.

          उद्घाटन सोहळ्याला पर्यटन मंत्री गिरीश महाजनमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरविधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकरविधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारमुंबई फेस्ट‍िवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रासुप्रसिध्द अभिनेते अनुपम खेरसचिन खेडेकरकाला घोडा फेस्टीवलच्या आयोजक ब्रिंदा मिलेरपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजपर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी - शर्मा उपस्थिती राहतील.

महाएक्स्पोचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्या उद्घाटन

            एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे होणार महाएक्स्पोचे उद्घाटन २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व जपानच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत होणार आहे. एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे महा एक्स्पोचे आयोजन केले असून २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महा एक्सपोचे उद्घाटन होईल. महा एक्सपो’ दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत, तर शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील.

'मुंबई फेस्टिव्हल २०२४मध्ये विविध कार्यक्रम

             'मुंबई फेस्टिव्हल २०२४मध्ये विविध उपक्रम होतील. यामध्ये मुंबईतील विविध ठिकाणी १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी रोजी ‘शॉपिंग फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. काळा घोडा येथे २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सव होईल. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगाफुटबॉलव्हॉलीबॉलबीच क्लीन अप आणि स्क्रिनिंग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होईल. सिनेमा फेस्ट २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपटगृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन केले आहे. टुरिजम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू राहील. क्रिकेट क्लिनिक २६ ते २८ जानेवारी दरम्यान सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ठाकूर क्रिकेट मैदान (कांदिवली पूर्व) येथे आयोजित केले आहे.

          टाटा मुंबई मॅरेथॉनचे २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे. टर्बो स्टार्ट फॉरएव्हर प्लॅनेट चॅलेंज २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित केला आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी  https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

****

Featured post

Lakshvedhi