Friday, 19 January 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी जागतिक आर्थिक परिषदेत 3 लाख 53 हजार कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करार स्वाक्षांकित

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी

जागतिक आर्थिक परिषदेत 3 लाख 53 हजार कोटींपेक्षा

जास्त सामंजस्य करार स्वाक्षांकित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 19 : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून या वर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षांकित झाले. त्याचप्रमाणेजवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षरीत होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितले.

            जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य व केंद्र शासनाचे शिष्टमंडळ दावोस येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेअमेरिकास्वित्झर्लंडसिंगापूर,  दक्षिण कोरीया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यूएईओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे.  त्याचबरोबर आर्सेलर मित्तलजिंदालगोदरेजअदानी या  कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला असल्याचे मत मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केले. 

            ते पुढे म्हणाले कीमागील वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी 75 ते 80 टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले. या करारामुळे 2 लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहे. जेम्स आणि ज्वेलरीमाहिती तंत्रज्ञानहरित हायड्रोजनहरित ऊर्जापेपर आणि पल्पखाण उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर,  इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात 1 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधामुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पायाभूत सुविधादळणवळणाच्या उत्तम सुविधाकुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व्हिजनडॉयनॅमिक लिडरशीपग्लोबल लिडर म्हणून त्यांची ओळख झाली  असल्याचे दावोस दौऱ्यात अनेक देशातील लोकांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव जगभरात असून त्यांचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

0000

Thursday, 18 January 2024

औद्योगिक क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ संपादित करण्यास भारत सज्ज

 औद्योगिक क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ

संपादित करण्यास भारत सज्ज

कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

 

            मुंबई, दि. 17 :- भारत औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून सुरक्षेला प्रथम  प्राधान्य देण्यात येत आहे. अग्नी सुरक्षेत मोठया प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. भारत अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास नेहमीच अग्रगण्य राहिलेला आहे. भारत औद्योगिक क्षेत्रांमध्ये ग्लोबल प्लेयर बनला असून जागतिक बाजारपेठ संपादित करण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

            दुबई स्थित मे. फ्रँकफोर्ट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इंटरसेक एक्झिबिशन-२०२४" चे आयोजन केले होते. फायर प्रोटेक्शन असोशिएन ऑफ इंडिया आणि सेफ्टी अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन यांच्या प्रदर्शनात असणाऱ्या राज्याच्या आणि भारताच्या विविध दालनांचे उद्घाटन मंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते झाले   यावेळी ते बोलत होते.

            या प्रदर्शनामध्ये फायर सेफ्टी व सेक्युरिटी यांचेशी निगडित असणारे सुमारे एक हजार कंपनीच्या उत्पादनांचे स्टॉल्स आहेत. यामध्ये भारतातून आणि विशेषत: महाराष्ट्रातुन सुमारे १०० पेक्षा जास्त उद्योजकांचे स्टॉल्स आहेत.

            यावेळी मंत्री डॉ. खाडे म्हणालेया प्रदर्शनात मी भारताचा व  महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो आहे. महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून जागतिक व्यापारासाठी आपल्या सर्वांसाठी खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. फायर सिक्युरिटी आणि सेफ्टीला प्राधान्य देत असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि करारासाठी  तयार आहोत. महाराष्ट्रातीलभारतातील कोणत्याही उद्योजकांना या ठिकाणी कोणतीही मदत लागल्यास संपर्क साधावा.

            यावेळी मंत्री श्री. खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव  विनीता वेद सिंगल यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

            उद्घाटन सोहळ्यास  भारताच्या वाणिज्य दूतावासचे  के. कालिमुथुदुबई हेड फ्रँकफोर्टचे आयोजक प्रतिनिधी श्रीमती सोमय्याप्रसार भारतीचे सह संचालक विनोदकुमारराज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक  देविदास गोरेमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभारमहाराष्ट्र फायर सेफ्टीचे श्री. वारीकफायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

५४ लाख नोंदीच्या आधारे कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत -

 ५४ लाख नोंदीच्या आधारे

कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत

- अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांचे निर्देश

           

            मुंबईदि. १८ :-  कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करावे. पात्र व्यक्तींना तातडीने जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करावीअसे निर्देश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिले आहेत.

याद्या गावस्तरावर प्रसिद्ध कराव्यात

            ज्यांच्या कुणबीमराठा- कुणबीकुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना पाहण्यासाठी या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरुपात प्रसिद्ध करण्यात याव्यातजेणेकरुन पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरीता सदर नोंदी या पुरावा म्हणून सादर करता येतील.

            राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबीमराठा- कुणबीकुणबी - मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसुली पुरावे. निजामकाळात झालेले करारनिजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदीराष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती कुणबीमराठा- कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी  न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

            न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समितीस विविध जिल्ह्यांमध्ये आढळून आलेल्या ५४ लाख कुणबी नोंदी संदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करणे आवश्यक आहे. यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र अनुसूचित जातीअनूसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम२००० तसेच नियम २०१२ व त्याअंतर्गत केलेल्या सुधारणांनुसार जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करावी.

००००

अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल

  अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार

दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी

राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. १८ : राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्णजलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

             एमएसटीएआर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर काल चर्चा केली.

            एमएसटीएआर हा एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म असून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अनुरूप डिजिटल आरोग्य सेवा राज्यातील जनतेला देण्याची सुविधा यामध्ये आहे.

            या भागिदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होईल. नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल. शिवाय प्रत्येकाचे आरोग्य रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात येईल. रिमोट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या व तपासणी करण्यात येतील.  

            यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे.यामुळे या सेवा देण्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

            हिताची एमजीआरएम नेटचा एमएसटीएआर प्लॅटफॉर्म हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.आरोग्य सेवा देण्यातील अडचणी ओळखून सुलभरीत्या या सेवा देण्याची व्यवस्था यात विकसित करण्यात आली आहे. या भागिदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होऊन त्या अधिक कार्यक्षम बनतील.

0000

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी ‘ग्रंथचर्चा व अभिवाचन’

 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त

शुक्रवारी ग्रंथचर्चा व अभिवाचन

 

            मुंबईदि. 18 : मराठी भाषा विभागामार्फत दिनांक 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या भारतीय विरागिनी’ या पुस्तकावर ग्रंथचर्चा व अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिरप्रभादेवीमुंबई येथे हा कार्यक्रम होईल.

            ग्रंथचर्चा व अभिवाचन कार्यक्रमात डॉ.अरुणा ढेरे व डॉ.सिसिलिया कार्व्हालो हे चर्चक म्हणून तसेच श्रीमती योजना शिवानंद यांचा अभिवाचक म्हणून सहभाग असणार आहे. भारतीय पातळीवरील काव्यविश्वात स्त्रियांच्या कवितेचे स्थान स्वतंत्र आणि महत्त्वाचे असून काश्मीरच्या लल्लेश्वरीपासून तामिळनाडूच्या अवैयारपर्यंत आणि गुजरात-राजस्थानच्या मीरेपासून ओरिसाच्या माधवी दासीपर्यंत मध्ययुगीन स्त्रीसंतांची काव्यरचना ही भारतीय काव्यधारांतली अतिशय सशक्त अशी धारा आहे. एकूणच गौतम बुद्धाच्या काळापासून सतराव्या-अठराव्या शतकातल्याम्हणजे सुमारे दोन हजार वर्षाच्या कालखंडातल्या भारतीय विरागिनींचा विचार केवळ पारमार्थिक नव्हेतर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाचा आहे.

            या कवयित्रींची - संत आणि भक्त अशा स्त्रियांची कालसंबद्ध पार्श्वभूमीत्यांनी निवडलेले भक्तिमार्गत्यांचा परमार्थविचारलौकिकाविषयीची त्यांची दृष्टीत्यांनी केलेले कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षत्यांची जीवनसाधना आणि त्यांनी व्यक्त केलेले स्त्रीत्वाचे संवेदन यांचे दर्शन मराठी साहित्यविश्वात एकत्रितपणे व्हावे आणि मराठी विरागिनींचे भारतीय भक्तिक्षेत्राशी असलेले नाते स्पष्ट व्हावेअशा भूमिकेने प्रस्तुत ग्रंथ हा मौलिक व संदर्भमूल्य असलेला ग्रंथ आहे.

            हा कार्यक्रम सर्वांकरिता खुला असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

0000

दिलखुलास’मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाचे बिपिन जगताप यांची मुलाखत

 ‘दिलखुलास’मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाचे

बिपिन जगताप यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव 2024’ या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरसभागृह येथे देशातील पहिला मध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या मध महोत्सवाचा मुख्य उद्देशत्याचे नियोजन व अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे याविषयीची माहिती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगताप यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगताप यांची मुलाखत शुक्रवार दि. 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख पर्यटन उपक्रमात सहभागी होणार

 पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख

पर्यटन उपक्रमात सहभागी होणार

- पर्यटनमंत्री गिरीश महाजन

 

             मुंबई, दि. १८ : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता,माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. नवेली देशमुख या राज्यभरात ‘पर्यटन सदिच्छा दूत’ म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी सहभागी होतीलपर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही सहभागी होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

           पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा - वेरूळ सारखी इ.स. सन पूर्व दुसऱ्या शतकातील लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची स्थाने आहेत. राज्यात देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. हाच विचार घेऊन महाराष्ट्र शासन राज्यात समृद्ध आणि जबाबदार पर्यटन योजना राबवत आहे.

            देशातील बहुतांश राज्यात पर्यटनाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. त्याकरीता अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सहभागी करून पर्यटन क्षेत्रातील विविध स्थळांची प्रसिद्धी करण्यात येत असते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याची ‘ॲम्बेसेडर ऑफ यूथ टुरिझम’ म्हणून मिस इंडिया ठरलेली नवेली देशमुख यांची राज्य शासनाने राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

                  पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख या  छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. नवेली या यूथ आयकॉन म्हणून विविध शासकीय विभागात योगदान देतील. राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी त्या पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध पर्यटन महोत्सव,रोड शो विविध कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही प्रचार व प्रसिध्दीसाठी सहकार्य करत आहेत.

                 पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख आपल्या निवडीबाबत म्हणाल्या की, राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. नव्या पिढीची आयकॉन म्हणून काम करताना युवा पिढीला साजेसे प्रचाराचे उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतील. शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक पर्यटनाला महत्व देण्यासाठी तसेच जबाबदार पर्यटनाची प्रसिध्दी करणार आहे. पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही मी सहभागी असून नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमांचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi