Thursday, 18 January 2024

असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी लोकार्पण

 असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते

सोलापूर जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी लोकार्पण

 

            मुंबईदि. १८ : सोलापूर जिल्ह्यातील रे नगरकुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण शुक्रवार १९ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

                हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाच स्वप्न यामुळे साकार होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी झाले होते.

गृहप्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती

             देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा गृहप्रकल्प आहे. हा प्रकल्प ३६५ एकर जागेवर असून प्रकल्पामध्ये एकूण ८३३ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत ३६ घरे आहेत. कचरा उचलणारेविडी कामगारबांधकाम कामगारवस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील  लाभार्थ्यांसाठी ही घरकुले आहेत.

            केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त पायाभूत सुविधा व बीज भांडवलाकरिता राज्य शासनाने अर्थसाहाय्य दिले आहे. पाणीपुरवठावीजपुरवठासांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सोलार व डिजिटल पत्ता या सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामध्ये उजनी जलाशयातून पाणी पुरवठामलशुद्धीकरण केंद्र (STP) स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणाशाळाअंगणवाडीखेळाचे मैदानरुग्णालयकौशल्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रुफटॉप सोलर योजनारेन वॉटर हार्वेस्टिंग या सुविधा आहेत.

*****

1201 कोटींच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी भूमिपूजन पीएम स्व-निधी योजनेच्या लाभार्थ्यांना होणार कर्जाचे वितरण

 1201 कोटींच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पांचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी भूमिपूजन

पीएम स्व-निधी योजनेच्या लाभार्थ्यांना होणार कर्जाचे वितरण

            मुंबईदि. 18 : पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने अमृत 2.0 अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीपुरवठा आणि प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवलीउल्हासनगरभिवंडी-निजामपूरसाताराशेगाव व भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा, तर सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 1,201 कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा तसेच मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएमस्वनिधी) प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येईल.

अमृत 2.0 अभियान

            देशातील शहरे पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने सन 2015 मध्ये अमृत अभियान सुरू केले आहे. 2021 पासून अमृत 2.0 अभियान या नावाने हे अभियान अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. अमृत 2.0 अभियानातील प्रकल्पांची कामे सन 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

            या अभियानात राज्यातील 145 शहरांचे 28315 कोटी रुपये किंमतीचे 312 प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. या अभियानातून 41.47 लाख इमारतींना नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असून 38.69 लाख इमारतींना मलनिःसारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानातून शहरातील सरोवर पुनरुज्जीवन आणि उद्यान विकासाचे प्रकल्प देखील राबविले जाणार असून त्याचा या शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे.

            भूमिपूजन करण्यात येणाऱ्या सात शहरांतील प्रकल्पांपैकी भिवंडी-निजामपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 426.04 कोटी रूपये इतका असून या माध्यमातून 84 हजार 500 नवीन नळ जोडणीद्वारे एक लाख 77 हजार 087 घरांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता 143 एमएलडी इतकी आहे. शेगाव येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 161.97 कोटी रूपये असून या प्रकल्पाच्या माध्यमातून 2662 हून अधिक नवीन जोडण्यांद्वारे 12 हजार 920 घरांना लाभ मिळू शकणार आहे. या प्रकल्पात पाणी प्रक्रिया क्षमता 11 एमएलडीने वाढून 34.89 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येईल.

            उल्हासनगर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून 40 हजार 709 नवीन नळ जोडण्यांद्वारे 46 हजार 840 घरांना लाभ दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 126.58 कोटी रुपये अपेक्षित आहे. सातारा येथील पाणीपुरवठा प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता 15 एमएलडीने वाढणार असून 7328 नवीन जोडण्यांद्वारे 50 हजार 454 घरांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 102.56 कोटी रूपये इतका खर्च येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील 77.58 कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार नवीन नळ जोडण्या दिल्या जाणार असून याचा लाभ 12 हजार 100 घरांना मिळणार आहे. तरचंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पाणीपुरवठा प्रकल्पात 5980 नवीन पाणी जोडण्यांद्वारे 7314 घरांना लाभ मिळेल. या प्रकल्पाची पाणी प्रक्रिया क्षमता 7.79 एमएलडीने वाढणार असून या प्रकल्पाचा खर्च 52.87 कोटी रूपये इतका अपेक्षित आहे.

            सांगली येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 253.41 कोटी रूपये इतका असून 41 हजार 277 नवीन जोडण्यांद्वारे एक लाख चार हजार 172 घरांना त्याचा लाभ होईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता 59 एमएलडीने वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

पीएम स्व - निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण

            कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी पीएम स्व-निधी योजना अंमलात आणली. राज्यात 17 जून 2020 पासून या केंद्र पुरस्कृत योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने राज्याला दिलेले सहा लाख 60 हजारांचे उद्दिष्ट नोव्हेंबर अखेर पूर्ण झाल्याने केंद्राने 22 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार या योजनेच्या सोलापूर शहरातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.

0000

पीएम स्व - निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण

 पीएम स्व - निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण

            कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी पीएम स्व-निधी योजना अंमलात आणली. राज्यात 17 जून 2020 पासून या केंद्र पुरस्कृत योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने राज्याला दिलेले सहा लाख 60 हजारांचे उद्दिष्ट नोव्हेंबर अखेर पूर्ण झाल्याने केंद्राने 22 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार या योजनेच्या सोलापूर शहरातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.


रोजगार


 

गोरेगाव फिल्मसिटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करणार

 गोरेगाव फिल्मसिटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान


जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करणार


- मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई दि. 17 :- गोरेगाव येथील फिल्मसिटी व बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करण्यात येतील. यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही वन, मत्स्यव्यवसाय, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे इलेक्ट्रीक गाड्या व बग्गीचे आणि व्याघ्रसफारीचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास खासदार गोपल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार विलास पोतनीस, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार सुनिल राणे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, पर्यटक, नागरिक उपस्थित होते.


            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वनासंबधी असलेला संकल्प व अज्ञावलीचे अनुपालन होणे गरजेचे आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण अभियानामुळे राज्यात वनक्षेत्र वाढत आहे हे वन विभागाबरोबरच राज्यातील जनतेचे यश आहे. आईच्या सेवेप्रमाणे वनराईची सेवाही अनमोल आहे. वन संवर्धनाची कामे मिशन मोडवर करण्यासाठीं आणि वन क्षेत्राच्या विकासाचा गोवर्धन उचलण्यास आपण सर्वांनी सहभागी होऊया, असे आवाहनही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.


            संजय गांधी राष्ट्रीय उद्यान शहराच्या मध्यवर्ती भागात आहे याचा अभिमान असल्याचे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले या परिसरातील विकास कामे करण्यास प्राधान्य देण्यात येऊन नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. वन विभागाशी असलेले प्रश्न सोडवण्यासाठी गठित केलेल्या समित्यांनी बैठका घेऊन याबतचे प्रस्ताव वन विभागाकडे पाठवावेत. याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येतील.


            खासदार श्री. शेट्टी म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकच्या सुविधा मिळाव्यात. यासाठी अधिकचा निधी मिळावा. पर्यटकांसाठी होत असलेल्या कामांबरोबरच स्थानिकांनाही येथे रोजगार उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत असलेल्या विविध कामांमुळे उद्यानात अधिक जिवंतपणा आला असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असणाऱ्या रहेजा वसाहती संदर्भातील प्रश्न वन विभागाने प्राधान्याने सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            प्रधान सचिव श्री. रेड्डी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा १६ जानेवारी हा स्थापना दिवस असून या दिनाच्या निमित्ताने बॅटरीवर चालणाऱ्या ६ बस व विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या ५ बग्गीचे लोकार्पण झाल्याने याचा लाभ पर्यटकांना होणार आहे. तसेच व्याघ्रसफारी सुरू झाल्याने या उद्यानात मुक्त संचार करणारा वाघ पर्यटकांना पहावयास मिळणार आहे.


            कार्यक्रमात वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यां

नी आभार मानले.


“छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव” चे आयोजन काटेकोरपणे करावे

  छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव चेआयोजन काटेकोरपणे करावे

- मंगलप्रभात लोढा

            मुंबईदि. 17 : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ग्रामीण स्तरावर पारंपरिक खेळ खेळले जायचे ते आज लुप्त होत चालले आहेत. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनजिल्हाधिकारीमुंबई व जिल्हाधिकारी मुंबई उपनगरमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग तसेच क्रिडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवचे आयोजन करण्यात येत आहे. या क्रीडा महोत्सवाचे आयोजन काटेकोरपणे करण्यात यावे यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केल्या.

            यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी विविध खेळप्रकाराच्या मुंबई उपनगर व मुंबई शहर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री.लोढा म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव हा मुंबई उपनगरात अंधेरीबोरीवलीकुर्लामुलुंड या चार तालुक्यांमध्ये तसेच मुंबई शहरात दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून त्यात लगोरीलेझिमलंगडीपंजा लढवणेदोरीच्या उड्यारस्सीखेचफगदीमल्लखांबकबड्डीमानवी मनोरेआखाडा कुस्तीपावनखिंड दौडखो-खोविटीदांडूशरीर सौष्ठवढोलताशा या 16 पारंपरीक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धा विविध वजनी गटात व वयोगटात घेण्यात येणार आहेत.आखाडा कुस्तीपावनखिंड दौडशरीर सौष्ठव व ढोलताशा हे चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.

            पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले कीतालुकास्तर मल्लखांबकबड्डी व खो-खो या खेळ प्रकारांच्या स्पर्धा उपनगर व शहर प्रत्येकी एक ठिकाणी आयोजित करून अंतिम सामने एका ठिकाणी होणार आहेत. इतर 9 खेळांच्या तालुकास्तरीय स्पर्धा 6 ठिकाणी होणार असून अंतिम स्पर्धा मध्यवर्ती एकाच ठिकाणी घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण 20 मैदान/सभागृहात ही स्पर्धा होईल. त्यातील अंतिम स्पर्धा ह्या 10 मैदान आणि सभागृहात होणार आहेत. या  स्पर्धेत तालुका स्तरावर सांघिक खेळांमध्ये प्रथम येणाऱ्या 4 विजयी उपविजयी संघाच्या खेळाडूंना वैयक्तिक चषकपदक व प्रमाणपत्र देऊन तसेच वैयक्तिक खेळांमध्ये प्रथम येणाऱ्या 4 विजयी, उपविजयी खेळाडूंना वैयक्तिक चषकपदक व प्रमाणपत्र व रोख बक्षीसांनी गौरविण्यात येणार आहेत.

            या स्पर्धा विविध खेळप्रकाराच्या मुंबई उपनगर व मुंबई शहर येथील विविध संघटनांमार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. संघटनेच्या पंचांना मानधन देण्यात येणार आहे तसेच खेळाडूंना काही दुखापत झाल्यास आपत्कालिन निधीची तरतूद करण्यात आली आहे.

            या स्पर्धेचे उ‌द्घाटन दि. 26 जानेवारी 2024 रोजी शिवसृष्टी मैदानकुर्ला पूर्व येथे होणार आहे तसेच या क्रिडा महोत्सवाचा समारोप जांभोरी मैदानवरळीमुंबई येथे संपन्न होणार आहे.

***************

कोल्हापुरी शान


 

Featured post

Lakshvedhi