Thursday, 18 January 2024

केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांना शंभर टक्के निधी; लाभार्थ्यांना निधी देणाऱ्या सर्व योजना ‘डीबीटी’ कराव्या

 केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांना शंभर टक्के निधी;

लाभार्थ्यांना निधी देणाऱ्या सर्व योजना डीबीटी’ कराव्या

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम 2024-25 च्या आखणीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

 

            मुंबईदि. 17 :- राज्याच्या विकासाची गती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावा. केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांसाठी शंभर टक्के निधीची तरतूद करण्यात येईलअशी ग्वाही वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्व योजना आधार लिंकींग करतानाच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रकमा डिबीटीच्या (डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर) माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश श्री. पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात गृह (पोलीस)ऊर्जाआदिवासीनगरविकासदिव्यांग कल्याणमहिला व बालविकासराज्य उत्पादन शुल्कसार्वजनिक आरोग्यमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयक्रीडा व युवक कल्याणगृह(बंदरे)खारभूमीलाभक्षेत्र विकाससामाजिक न्याय (सर्वसाधारण)वैद्यकीय शिक्षणमहसूलपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास अशा 18 विभागांच्या वार्षिक कार्यक्रम 2024-25 आखणी संदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय  (सर्वसाधारण) तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफआदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे  (व्हिसीद्वारे)सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंतक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे  उपस्थित होते. 

            विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीसर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडील सर्व योजनांचा फेरआढावा घ्यावा. एकसारख्या उद्देशाच्या व लाभांच्या योजनांना एकत्रित करावेकालसुसंगत नसणाऱ्या कालबाह्य योजना तातडीने बंद कराव्यातप्रत्येक योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. योजनायंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण करावे. अनुत्पादक अनुदानात कपात करतानाच उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

            प्रशासकीय खर्चावर नियंत्रण आणतानाच राज्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध आर्थिक स्रोत विकसित करावेत. राज्यातील सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी कृतीशील प्रयत्न करावेत. कामांचे प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक कामांसाठी निधी वापरावा. निधी खर्चाबाबत यंत्रणा उत्तरदायित्व निश्चित करुन कालमर्यादेत निधीचा वापर करावा. पूर्ण झालेल्या कामांची उपयोजिता प्रमाणपत्रे तातडीने सादर करावीत. कामाच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नयेअसे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

            यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिकक्रीडा व युवक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा व्यय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताउर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्लाआदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारेगृह(बंदरे) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियानगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराजवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेदिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजनमहिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळेसामाजिक न्याय(सर्वसाधारण) विभागाचे सचिव सुमंत भांगेआयुक्त ओमप्रकाश बकोरियावित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

*****

वंदना थोरात/विसंअ/

मुंबई फेस्टिवलचे दरवर्षी आयोजन करणार

 मुंबई फेस्टिवलचे दरवर्षी आयोजन करणार

- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            मुंबईदि. १७ : महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर होण्यासाठी येथील कला संस्कृती, मुंबईच्या समृद्ध वारश्याची माहिती सांगणाऱ्या महोत्सवाचे देशात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन केले आहे. ५० विविध ठिकाणावर ५० विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, फक्त एक वर्ष हा उपक्रम राबवून थांबणार नाही तर दरवर्षी मुंबई फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे "मुंबई फेस्टिवल 2024'च्या आयोजनाबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा, पर्यटन सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसीव्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्माविझक्राफ्ट संस्थेचे संस्थापक सबाज जोसेफ ,पर्यटन विभागाची राज्याची अॅम्बेसेडर ऑफ युथ टूरिझम नवेली देशमुख यावेळी उपस्थित होत्या. यावेळी मुंबई फेस्टिवलच्या आयोजनात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या  एसबीआईसाईनपोस्टएरिअन ग्रुपइज माय ट्रीपबिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रोजेक्ट मुंबईचा या सर्व सहभागीदारांचा सत्कार करण्यात आला

                    मंत्री,श्री महाजन म्हणाले, 'मुंबई फेस्टिवल 2024'च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमांच्या माध्यमातून  सर्वांचा मुंबईकडे पाहण्याचा दृष्ट‍िकोन बदलेल.या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाद्वारे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सहअध्यक्षतेखाली सल्लागार समिती देखील काम करत आहे. या फेस्टिवलमध्ये अभूतपूर्व आणि अविस्मरणीय कार्यक्रम आहेत या कार्यक्रमात संगीत, पर्यटन परिषद, बीच फेस्टिवल, खाद्य महोत्सव, चित्रपट, विविध साहसी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या फेस्ट‍िवलमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.

                 मंत्री श्री. केसरकर म्हणालेमुंबई फेस्टिवल २०२४ ही सुरुवात आहे. फेस्टिवल मध्ये आणि नामवंतांचा  सहभाग आहे. फेस्टिवलच्या माध्यमातून आपण जगभरात पोहचू. मुंबई ची  एक वेगळी ओळख जगात आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, मुंबईची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये जगासमोर येतील. मुंबईचे आकर्षण हे फक्त गेटवे ऑफ इंडिया पुरते मर्यादित नसून येथे असलेले सिद्धिविनायक मंदिर ते मुंबईची मेट्रोविविध वास्तु यांचा संगम आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाला हातभार लागेल. मुंबईची संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊया.

       पर्यटन सचिव जयश्री भोज म्हणाल्या, "महाराष्ट्र शासन आणि मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रसिध्द उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सहकार्याने आपण मुंबई फेस्टीवल 2024 यशस्वीपणे करूया. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविरत मेहनत करणाऱ्या प्रत्येक सहभागीभागीदार आणि सहयोगी यांचे मी मनापासून आभार मानते.जागतिक पातळीवर मुंबई फेस्टिवल पोहचवण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जाईल. राज्याची विविधता आणि संस्कृती याची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा फेस्टिवल मोलाची भूमिका बजावेल.

            मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणालेमुंबई फेस्टिवल २०२४' मध्ये अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक लहानातील लहान गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले गेले आहे. महाराष्ट्राच्या विविध पैलूंचे दर्शन या फेस्टिवलच्या माध्यमातून होईल. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी  आपण सर्वांनी सहभागी व्हावे, फक्त एक वर्ष महोत्सव करून थांबायचे नाही तर आज सुरू झालेला हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करुया.

            विझक्राफ्ट संस्थेचे संस्थापक सबाज जोसेफ यांनी फेस्टिवल मध्ये २० ते २८ जानेवारी रोजी दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली. या महोत्सवाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या वेळापत्रकासाठी, कृपया https://mumbai-festival.com/ ला भेट द्यावी किंवा इंस्टाग्राम @mumbai_festival वर आम्हाला फॉलो करावे.

            ‘मुंबई एक त्यौहार है’ हे मुंबई फेस्टिवल 2024 चे थीम साँग  सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी नृत्यदिग्दर्शित केलेले ही गीतअतिशय लोकप्रिय झाले आहे. प्रत्येकजण याच्या तालावर थिरकत आहे. 'मुंबई एक त्यौहार है हुकस्टेप चॅलेंज'ने सोशल मीडियावर धमाल केली आहे याबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.

'मुंबई फेस्टिव्हल 2024' मध्ये विविध कार्यक्रम

            'मुंबई फेस्टिव्हल २०२४चे उद्घाटन दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता  क्रॉस मैदान गार्डन, चर्चगेट येथे होणार आहे. तसेच एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे महा एक्स्पोचे आयोजन केले असून दि.२० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महा एक्सपोचे उद्घाटन होणार आहे. हा महा एक्सपो’ दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत तर शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असेल.

        मुंबईतील विविध ठिकाणी दिनांक १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी  रोजी शॉपिंग फेस्टचे आयोजन केलेले आहे. काळा घोडा येथे दिनांक २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगाफुटबॉलव्हॉलीबॉलबीच क्लीन अप आणि स्क्रिनींग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित केले आहेत. सिनेमा फेस्ट दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपट गृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन केलेले आहे. टुरिजम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू असेल. क्रिकेट क्लिनीक दिनांक २६ ते २८ जानेवारी दरम्यान सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ठाकूर क्रिकेट मैदान (कांदिवली पूर्व) येथे आयोजित केले आहे.

                 टाटा मुंबई मॅरेथॉनचे दिनांक २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे.टर्बो स्टार्ट फॉरईव्हर प्लॅनेट चॅलेंज दिनांक २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट दिनांक १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित केला आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी  https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

****

लक्ष्य हैं देश को सुधारणा हैं


 

Wednesday, 17 January 2024

अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात

 अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :  अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ चे काम देखील वेगाने सुरु आहे. संमेलनासाठी तीन भव्य सभागृह उभारण्यात येत आहेत.


पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात भव्य अशी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यात येत आहे. साहित्य संमेलनासाठी तीन सभागृह उभारण्यात येत असून सभामंडप क्र.१ ला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठ नाव देण्यात आले आहे तर सभामंडप क्र.२ ला कविवर्य ना.धो.महानोर सभागृह व  सभामंडप क्र.३ बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह असे नामकरण करण्यात आले आहे.


प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात तीन सभागृहांची उभारणी, व्यासपीठ, ग्रंथप्रदर्शन दालन उभारणी जागेचे सपाटीकरण, परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, स्वच्छतागृह उभारणी, पार्किंग व्यवस्था आदी कामे जोमाने सुरु असल्याची माहिती मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली. साहित्य संमेलनासाठी देशभरातून येणाऱ्या मंडळीची निवास व्यवस्था ज्या-ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे, त्याचीही स्वच्छता, रंगरंगोटी आदी कामे हाती घेण्यात आले असल्याचे डॉ.जोशी यांनी सांगितले.


संमेलनाचे उद्घाटन सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलन समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत, यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील काही तयारी करण्यात आली असल्याचे डॉ.जोशी यांनी नमूद केले.


प्रशासनाचा सक्रिय सहभाग

साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, प्रमुख संरक्षक व सल्लागार तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व  पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांनी पीडब्लूडी, तहसील, पोलीस, एमएसईबी, नगरपालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून संमेलनासाठी प्रशासनातर्फे प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


International invites you to the Meet & Greet with Tata Mumbai Marathon 2024 Intl. Event

 Procam International invites you to the Meet & Greet with Tata Mumbai Marathon 2024 Intl. Event Ambassador Katie Moon, Two-time pole vault World Champion and 2020 Olympic gold medalist. 

 

 

 

Day & Date of Press Meet 

Thursday, January 18, 2024 

 

Time 

3.15 pm onwards 

 

Venue 

Tata Mumbai Marathon Media Centre, Marathi Patrakar Sangh, Near CST, Mumbai 

 


दावोस येथे विविध देशांच्या शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट भेटीदरम्यान महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत चर्चा

 दावोस येथे विविध देशांच्या शिष्टमंडळांनी घेतली

 मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

भेटीदरम्यान महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत चर्चा

 

            मुंबई, दि. १७ : दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली.

            परिषदेच्या पहिल्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुला बिन टौक आणि लुलू हायपरमार्केटचे कार्यकारी संचालक एम.ए. युसुफ अली यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या दोघांसमवेत झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधी आणि त्या क्षेत्रात दीर्घकालीन संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला.

            शिंडलर इलेक्ट्रिकचे आंतरराष्ट्रीय कार्यान्वयन कार्यकारी तथा उपाध्यक्ष मनीष पंत यांच्याशी देखील चर्चा झाली. महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीच्या क्षेत्राबाबत संवाद साधतानाच औद्योगिक संबंध दृढ करण्याबाबत शिष्टमंडळासोबत चर्चा झाली.

            बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह या बहुराष्ट्रीय पेय आणि मद्यनिर्मिती कंपनीसोबत महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या ६०० कोटी रुपयांच्या (७३ दशलक्ष) सामंजस्य करारावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे राज्यात शेकडो रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

            गुंतवणूक संधींबद्दल ओमानचे उद्योग मंत्री एच.ई. कैर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी विविध विषयांवर संवाद साधतानाच ओमानच्या डिजिटल परिवर्तनाच्या ‘व्हिजन २०४०’ साठी महाराष्ट्र कशाप्रकारे सहकार्य करू शकतो यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दावोसमधील सीआयआयच्या इंडिया बिझिनेस हबला भेट दिली. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत भारतीय तिरंगा डौलाने फडकत असून ते अभिमानास्पद असल्याची भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली.

००००

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

            मुंबईदि. १५ :  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ३ फेब्रुवारी२०२४ रोजी महानगरपालिका विजय पार्क गार्डनमथुरादास रोड एक्स्टेंशनमखेचा हायस्कूल समोरहेमू कॉलनीकांदिवली (पश्चिम) येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे " आयोजन करण्यात आले आहे.

            या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी१२ वी उत्तीर्ण/आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वर नमूद पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगरचे सहायक आयुक्त  र.प्र. सुरवसे यांनी केले आहे.

****

Featured post

Lakshvedhi