Procam International invites you to the Meet & Greet with Tata Mumbai Marathon 2024 Intl. Event Ambassador Katie Moon, Two-time pole vault World Champion and 2020 Olympic gold medalist.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 17 January 2024
दावोस येथे विविध देशांच्या शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट भेटीदरम्यान महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत चर्चा
दावोस येथे विविध देशांच्या शिष्टमंडळांनी घेतली
मुख्यमंत्री शिंदे यांची भेट
भेटीदरम्यान महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत चर्चा
मुंबई, दि. १७ : दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली.
परिषदेच्या पहिल्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुला बिन टौक आणि लुलू हायपरमार्केटचे कार्यकारी संचालक एम.ए. युसुफ अली यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या दोघांसमवेत झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधी आणि त्या क्षेत्रात दीर्घकालीन संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला.
शिंडलर इलेक्ट्रिकचे आंतरराष्ट्रीय कार्यान्वयन कार्यकारी तथा उपाध्यक्ष मनीष पंत यांच्याशी देखील चर्चा झाली. महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीच्या क्षेत्राबाबत संवाद साधतानाच औद्योगिक संबंध दृढ करण्याबाबत शिष्टमंडळासोबत चर्चा झाली.
बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह या बहुराष्ट्रीय पेय आणि मद्यनिर्मिती कंपनीसोबत महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या ६०० कोटी रुपयांच्या ($ ७३ दशलक्ष) सामंजस्य करारावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे राज्यात शेकडो रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
गुंतवणूक संधींबद्दल ओमानचे उद्योग मंत्री एच.ई. कैर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी विविध विषयांवर संवाद साधतानाच ओमानच्या डिजिटल परिवर्तनाच्या ‘व्हिजन २०४०’ साठी महाराष्ट्र कशाप्रकारे सहकार्य करू शकतो यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दावोसमधील सीआयआयच्या इंडिया बिझिनेस हबला भेट दिली. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत भारतीय तिरंगा डौलाने फडकत असून ते अभिमानास्पद असल्याची भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली.
००००
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
मुंबई, दि. १५ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी महानगरपालिका विजय पार्क गार्डन, मथुरादास रोड एक्स्टेंशन, मखेचा हायस्कूल समोर, हेमू कॉलनी, कांदिवली (पश्चिम) येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे " आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वर नमूद पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांनी केले आहे.
****
पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार
पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना
महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणा
र
- मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. “देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी तर उपलब्ध आहेतच परंतु पगार देखील आकर्षक आहेत. या क्षेत्रात झपाट्याने बदलत जाणारे तंत्रज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नवीन कौशल्य, री-स्किलिंग व अप-स्किलिंगद्वारे नियमित प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून राज्य शासन उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहे.
महसूल आणि रोजगार या दोन्ही बाबतीत आरोग्यसेवा हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल चाचण्या, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा, वृध्दांची काळजी आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश होतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MOHFW) तयार केलेला अहवाल सूचित करतो की भारतातील प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची मागणी 50 लाख आहे, तर उपलब्धता केवळ 12 लाख आहे. तसेच एका डॉक्टर मागे साधारणत: 5 क्लिनिकल आणि 5 नॉन-क्लिनिकल आरोग्य सेवकांची आवश्यकता असते. कोविड व त्यानंतरच्या काळात मोठ्याप्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची आवश्यकता निर्माण झाली आहे. विकसित देशात वृध्दांची काळजी घेण्याच्या (Old age care) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.
भारतात वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षण उच्चत्तम गुणवत्तेचे आहे. वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षणानंतर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याच प्रमाणे आरोग्य सेवकांसाठी पदविका (Diploma) अभ्यासक्रमांत व प्रमाणपत्र (Certificate) अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्याचे निर्देशीत आहे.
मंडळाद्वारे पॅरामेडिकल गटातील 30 प्रमाणपत्र अभ्यासक्रम व 11 पदविका अभ्यासक्रमात प्रति वर्षी राज्यभरातील 300 संस्थांमधून साधारणत: 10 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येते. तथापि, विविध नियामक संस्थांच्या अटी व परदेशात आरोग्य क्षेत्रात नोकरीसाठी सक्षम यंत्रणेकडे नोंदणी असणे अनिवार्य असल्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्यास प्रारंभ झाला आहे. मंडळाने पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत मागील ३ वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे निकालपत्र महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याकडे नोंदणी प्रक्रियेत पडताळणीसाठी सादर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र व गुणपत्र पडताळणी सोयीस्कर झाले आहे.
नोंदणीकरिता अर्ज करण्याची पद्धत
https://www. maharashtraparamedicalcouncil. org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. वैयक्तिक दस्तऐवज, मंडळाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र व गुणपत्र अपलोड करावे व अर्ज शुल्क भरावे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याद्वारे अर्जांची छाननी व पडताळणी करण्यात येईल. कौन्सिलद्वारे ई-मेलद्वारे कळविण्यात आल्यावर नोंदणीशुल्क भरावे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याद्वारे नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल. अधिक माहितीकरीता मंडळाचे संकेतस्थळ https://msbsvet. edu. in वर माहितीपुस्तिका उपलब्ध आहे.
पॅरामेडिकल क्षेत्रातील लोकप्रिय अभ्यासक्रमामध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Laboratory Technician), किरणोपचार/ अल्ट्रासोनिक तंत्रज्ञ (Radiography & Ultra-Sonography Technician), हृदयचिकित्सा तंत्रज्ञ (Cardiology Technician), मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ (Neurology Technician), रक्तपेढी तंत्रज्ञ (Blood Bank Technician), ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ (Optometry Technician), शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ (Operation Theatre Technician), रक्तशुद्धीकरण तंत्रज्ञ (Dialysis Technician) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
००००
संध्या गरवारे/विसंअ/
वृत्त क्र. 185
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होत असलेल्या ग्रंथ प्रदर्शन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वितरक, प्रकाशकांच्या मागणीनुसार नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ३० रोजी सोडत काढण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे, वाचक, साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा. संमेलनादरम्यान, ग्रंथ, पुस्तके, साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यासाठी संमेलनस्थळी ग्रंथ दालनासाठी प्रकाशक, ग्रंथ वितरक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रंथ दालन मागणीचा अर्ज. अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच म.वा.मंडळ, अमळनेर कार्यालयातही ग्रंथदालन नोंदणी करता येवू शकते. नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अधिक माहितीसाठी श्यामकांत भदाणे ९४२३९०३०४४ यांच्याशी संपर्क साधावा.
संमेलन सर्व वाचक, साहित्यिक व नागरिकांसाठी खुले आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र ज्यांना निवास व भोजनाची व्यवस्था हवी असल्यास त्यांनी चार हजार रुपये भरुन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. ही व्यवस्था २, ३ व ४ फेब्रुवारी दरम्यान असेल. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.पी.बी.भराटे ९४२३९३४७९७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा : https://forms.gle/
पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार
पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना
महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार
- मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. “देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी तर उपलब्ध आहेतच परंतु पगार देखील आकर्षक आहेत. या क्षेत्रात झपाट्याने बदलत जाणारे तंत्रज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नवीन कौशल्य, री-स्किलिंग व अप-स्किलिंगद्वारे नियमित प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून राज्य शासन उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहे.
महसूल आणि रोजगार या दोन्ही बाबतीत आरोग्यसेवा हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल चाचण्या, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा, वृध्दांची काळजी आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश होतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MOHFW) तयार केलेला अहवाल सूचित करतो की भारतातील प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची मागणी
झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार
झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत
बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार
दावोस, दि. 16 :- जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची 2024 ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधील भारतीयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये विविध भागात राहणाऱ्या भारतीयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे मोठ्या अपूर्वाईने स्वागत करण्याचे निश्चित केले आहे.
भारतीयांच्या विशेषतः या मराठी भाषिकांनी झुरीक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास येण्याचे मान्य केल्याबद्दल या सर्व मराठी बांधवांनी विशेष आनंदही व्यक्त केला आहे. या निमित्ताने स्वित्झर्लंडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या मराठीजनांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत स्वागताच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या परिषदेच्या यशासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.
बृहन्महाराष्ट्र स्वित्झर्लंडचे (जीनिव्हा) अध्यक्ष अमोल सावरकर म्हणाले, मुख्यमंत्री श्री. शिंदे हे एका महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी इथे येत आहेत. इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी मराठी जनसमुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे, हे विशेष. म्हणूनच आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देत आहोत.
महेश बिराजदार (मुळचे लातूर), मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे नेतृत्व आम्हा मराठी जनांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करताना, त्यांना शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत आहे.
श्रीमती किर्तीमालिनी गद्रे (पदाधिकारी महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड), मी मुळची ठाण्याची आहे. त्यामुळे आमच्या ठाण्यातील श्री. शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येथे येत आहे. याचा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे मोठी तयारी केली आहे. त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे, याचाही खूप मोठा आनंद आहे.
शेखर काकडे यांनी पत्नी विद्या, कन्या बिल्वा काकडे (झुरीक) यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, आम्ही झुरीकमध्ये गेली दहा वर्षे राहत आहोत. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी येत आहेत. याचा खूप मोठा आनंद आहे. स्वित्झर्लंडमधील तमाम महाराष्ट्रीयन बांधवांच्यावतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्या या दौऱ्यालाही शुभेच्छा देतो.
प्रभूद्य यत्नाळकर हे मुळचे पुण्याचे आहेत. ते झुरीकमध्ये राहतात. त्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी स्वागत केले आहे. सौ. मंजिरी यत्नाळकर यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे झुरीकमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...