Monday, 15 January 2024

दावोसमधील परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योजक, गुंतवणूकदार, विविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा होणार

 दावोसमधील परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य

मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योजकगुंतवणूकदारविविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा होणार

तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार होणार

नागरी क्षेत्रातील आव्हानेनाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात सहभागी होणार

           

            मुंबईदि. १५ :- स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी १६ जानेवारी रोजी दावोस येथे शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार असून या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते नागरी क्षेत्रातील आव्हानेनाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.

            दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसहउद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभागएमआयडीसीमुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे दहा जणांचे शिष्टमंडळ जात आहे. एमएमआरडीए व महाप्रित येथील ८ अधिकारी स्वतंत्ररित्या सहभागी होत असून या सर्वांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या दौऱ्यामध्ये खाजगी विमानाचा वापर होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून गेल्या वर्षी या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत.

            या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हिलियन) उभारण्यात आले असून याठिकाणी मुख्यमंत्री हे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करतील तसेच मुख्यमंत्री प्रमुख विदेशी उद्योगाच्या प्रमुखांशी देखील चर्चा करतील. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्राच्या घोडदौडीविषयी माहिती देणारे दृकश्राव्य प्रदर्शन देखील याठिकाणी असेल.

महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग करणार

            १६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. ओमानचे उद्योग मंत्रीसौदीचे वित्त मंत्रीदक्षिण आफ्रिकेचे उर्जा मंत्रीदक्षिण कोरियाच्या ग्योगी प्रांताचे गव्हर्नर तसेच डीपी वर्ल्ड ( DP World), लुईस ड्रेफस (Louis Dreyfus ) वित्कोविझ एटोमिका (Witkowitz Atomica), या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची चर्चा होईल. जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्न प्रक्रिया गटाचे सदस्य देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या दिवशी संध्याकाळी प्रमुख प्रतिनिधी व मान्यवरांना महाराष्ट्रातर्फे स्नेहभोजन आयोजित केले आहे.

            १७ तारखेस गौतम अदानी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट असून त्यानंतर मुख्य कार्यक्रमात काँग्रेस सेंटरमध्ये नागरी क्षेत्रातील आव्हानेनाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील. याशिवाय कृषीमहिला सहभाग व अन्न सुरक्षा’ या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रात देखील ते सहभागी होतील

            त्यानंतर मुख्यमंत्री मिशेल एडब्ल्यूएस (Michael aws), लिकस्टनस्टाईनचे (Liechtenstein)चे राजकुमारहिताची कंपनीचे एमडीकार्ल्सबर्ग ग्रुप (Carlsberg Group), दस्सो सिस्टिम्स (Dassault Systems), व्होल्व्हो कार्स च्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठकीत सहभागी होतील. स्विसच्या भारतातील राजदूतांसमवेत चर्चा देखील होणार असून यात ८ कंपन्यांचे सामंजस्य करार केले जातील. याशिवाय इतरही प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशीउद्योग क्षेत्रातील तज्ज्ञमाध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

            १८ तारखेस सीआयआयने गोलमेज परिषद आयोजित केली असून त्याला केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. कॅपजेमिनी (Capgemini), एपी मोलेर मर्स्क (AP Moller Maersk), बॉल कॉर्पोरेशन (Ball Corporation), यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येणार आहे.

तीन लाख दहा हजार कोटींचे करार करणार

            सुमारे अडीच लाख कोटीची गुंतवणूक या परिषदेच्या माध्यमातून होईल असे नियोजन आहे. ही गुंतवणूक वाढू देखील शकते. पोलादमाहिती तंत्रज्ञानमाहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योगआण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत – ग्रीन हायड्रोजनहिरे व आभूषणेडेटा सेंटरलॉजिस्टिक्सऑटोमोटिव्ह त्याचबरोबर कृषी- औद्योगिककृषी आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेतयासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले होतेत्यानुसार २० सामंजस्य करार केले जातील. यामध्ये निपॉन आर सेलर मित्तलइंडिया ज्वेलरी पार्ककंट्रोल एसआयनॉक्सए बी ब्रिव्हरीजिंदाल ग्रुप हुंदाई व अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सर्व करार परदेशी कंपन्यांशी केले जातील असे नियोजन करण्यात आले आहे. हे उद्योग मुंबईपुणे यासह छत्रपती संभाजीनगरगडचिरोलीनागपूरचंद्रपूरजालनारायगड या जिल्ह्यातही येतील.

--

 


जय हो

 


मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।*

 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞

*भास्करस्य यथा तेजो*

*मकरस्थस्य वर्धते।*

*तथैव भवतां तेजो"* 

*वर्धतामिति कामये।।*

*मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।*


❣️जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,

तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना. 


*म - मधुर सदैव वाणी असावी.*

*क -कटुता स्नेहात कधी न यावी.*

*र - रस गंधांची उधळण व्हावी.* 

*सं - संस्कारांची मांदियाळी दिसावी.*

*क्रां - क्रांती विचारांची मनी ठसावी.*

*ती - तीनही लोकी कीर्ती व्हावी.*         

 *मकर संक्रांती या शुभपर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!*


❤🧡💛🪷💛🧡❤️


*तीळ गुळ घ्या गोड गोड बोला....!*


🌻🌞🌹

मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार

 मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई दि. १४ :- शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात  मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार  आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. 

            डीप क्लिन ड्राइव्हअंतर्गत आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव वल्लभ छेद रस्तानाना - नानी उद्याननॅन्सी  कॉलनीसावरकर नगरदहिसर पूर्वसिंह इस्टेटमार्ग क्र. ०२ ठाकूर गावकांदिवली पूर्वदफ्तरी मार्गमालाड पूर्वतपोवन मालाड पूर्व येथे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ्ता मोहिमेत सहभाग घेतला. 

            या स्वच्छ्ता मोहीम दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सिद्धेश कदम यांनी वडारपाडाकांदिवली पूर्व येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला भेट दिली. तदनंतर बुवा साळवी मैदानदिंडोशी येथील  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण केले.

            स्वच्छ्ता मोहीम प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत खासदार  गोपाळ शेट्टीआमदार प्रकाश सुर्वेआमदार अतुल भातखळकरमहानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहलअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.

 

                       स्वच्छता मोहीम व्यापक लोकचळवळ

 

            स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे.  स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावातघरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छ्ता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारूयाअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुंबईत राबविण्यात येत असलेल्या या स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकसामाजिक संस्थामोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे. स्वच्छता मोहीम आता व्यापक लोक चळवळ बनली आहे असे गौरवोद्गार  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले. लोकांनी हातात घेतलेली स्वच्छतेचे अभियान लोक चळवळ बनून यशस्वी होत आहे. या अभियानात यापुढे  सातत्य ठेवून प्रत्येकाने यात सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

            देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. त्याचे महत्त्व आता सर्वांना कळत आहे. ही चळवळ फक्त सरकारची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे. स्वच्छता अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छता अभियानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

स्वच्छता अभियानामुळे प्रदूषणात घट

 

            मुंबईत राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे  प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषणाची पातळी 300 वरून 100 पर्यंत खाली आली आहे हे या अभियानाचे यश म्हणावे लागेल.  याचे सारे श्रेय मुंबईच्या सफाई कामगार व अभियानात सहभागी होत असलेल्या मुंबईकरांचे आहे. स्वच्छ्ता अभियान सतत चालणारे अभियान आहे. यापुढे या अभियानात सातत्य ठेवून  मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना  राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

              

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना

 

            आजच्या स्वच्छ्ता मोहीम दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजी आजोबा पार्क मध्ये ज्येष्ठ नागरिकांसमवेत संवाद साधला. यावेळी ते म्हणालेज्येष्ठ नागरिकांकडून ऊर्जा व प्रेरणा मिळते. आपला आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन अनेक योजना राबविल्या जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू करण्यात येत असून लवकरच या योजनेचा शासन निर्णय काढण्यात येईल.ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महापालिकेने त्यांच्या रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था सुरू करावी. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू करावीतअशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

 

कांदिवली पूर्व येथे मुख्यमंत्र्यांचा शिक्षक व जनतेशी संवाद

 

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉलेज समोरील सिंग इस्टेट रोड नं. २ ची पाहणी करून उपस्थित शिक्षक व जनतेची संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह बाबत माहिती दिली. स्वच्छता हा आरोग्याचा मुलमंत्र घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावेअसे आवाहन त्यांनी केले. या परिसरातील लोकांच्या घरा संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्न संदर्भात आनंद महिंद्रा यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रश्नातून मार्ग काढला जाईल. वन विभागाकडील प्रश्नाबाबत वनविभागाच्या सचिवांना योग्य त्या सूचना दिल्या जातीलअसे  सांगून  शिक्षकांच्या प्रश्न संदर्भात ही बैठक घेतली जाईलअसे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

 

महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

 

            सिद्धेश कदम यांनी वडारपाडा कांदिवली येथील हनुमान मंदिर येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन या शिबिराचे उद्घाटन केले. या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून संयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले. 

 

मुंबईत २५०  आपला दवाखाने सुरू करणार

 

            दिंडोशी येथील बुवा साळवी मैदान परिसरात  सुरू करण्यात आलेल्या  हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर त्यांनी या दवाखान्यातील नोंदणी कक्षचिकित्सा कक्षऔषध निर्माता कक्षनर्सिंग रूम या  ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत 250 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार असून आतापर्यंत 202 दवाखाने सुरू झाले आहेत. 

            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लघु अग्निशमन केंद्राचे उद्घाटन आणि शारदाबाई गोविंद पवार गार्डनचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच  दहिसर पूर्व येथे हुनमान मंदिरात मुख्यमंत्री महोदयांनी स्वच्छता केंली.     

 

कृषी पणन मंडळाच्यावतीने १७ जानेवारीपासून ‘मिलेट महोत्सवा’चे पुण्यात आयोजन

 कृषी पणन मंडळाच्यावतीने १७ जानेवारीपासून

 मिलेट महोत्सवाचे पुण्यात आयोजन

 

            मुंबईदि. १५ :- कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित 'मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुणे येथे होणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेटपुणे येथे १७ ते २१ जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

            पणन मंडळामार्फत दरवर्षी 'उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीया संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा यामागील उद्देश आहे.

            या महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादकतृणधान्य प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गटसहकारी संस्थाशेतकरी उत्पादक कंपन्यास्टार्ट अप कंपन्या सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना सुमारे ५० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

             ग्राहकांना अस्सल ज्वारीबाजरीनाचणीभगरराळासामाकोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवाबाजरीच्या लाह्यारागीची बिस्किटेज्वारीचे इडली-मिक्सरागीचा डोसा मिक्स आदी नाविण्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

            याबरोबरच महोत्सवात मिलेट उत्पादनेमूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादनेआरोग्यविषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानेखरेदीदार-विक्रेते संमेलन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांनी मिलेट खरेदीसह विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी केले.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा



 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई, दि. 15 :- सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या संस्थाचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. या संस्थांनी नेहमीच सर्वच जाती-धर्मांचं हित पाहिले आहे. लोकाभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेले काम अतुलनीय आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने मुलुंड येथे उभारण्यात आलेले हे देखणे वसतीगृह असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने मुलुंड (पूर्व) येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योग मंत्री  उदय सामंतखासदार सुनील तटकरेखासदार मनोज कोटककुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्यासह संघाचे मान्यवर पदाधिकारी व नगरिक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीआजचा दिवस आपल्या सर्वांसाठी समाधानाचा आहे. समाजोन्नती संघांनी एक मोठी मजल मारली आहे. आपला हा वसतीगृहाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचे आपण अभिनंदन करतो. समाजाच्या योगदानातून समाजोपयोगी तेही शिक्षणाच्या क्षेत्रात असं भरीव काम होणं हे आपल्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे असून कुणबी समाजोन्नती संघाचे अभिनंदन.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीशासनाने समाजातील सर्व घटकासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. शासन हे सर्व सामान्यांचे आहेसर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी शासन काम करत आहे. ओबीसी समाजासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले असून शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुरू केला आहे. या विभागाच्या माध्यमातून इतर मागास व अन्य समाजातील होतकरू तरुणांनाशिक्षणस्वयंरोजगार आणि उद्योगांसाठी शासन पाठबळ देत आहे. ओबीसी समाजासाठी राज्यात 72 वसतिगृह सुरू करण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला आवश्यक सोयी सुविधा पुरवणार असून ओबीसी समाजासाठी राज्यात दहा लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            शिक्षण आणि शैक्षणिक सुविधांमध्ये महाराष्ट्र पुढे आहे. त्याचे कारणही आपल्या या अशा संस्थाच आहेत. शासनही अशा संस्थांना पाठबळ देण्यात नेहमीच पुढाकार घेत आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. शामराव पेजे महामंडळाला अधिकाचा निधी व परेल येथील वास्तूलाही आवश्यक निधी दिला जाईल. या बरोबरच तालुका स्तरावरील कुणबी भवनसाठी  आवश्यक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले,

            कुणबी समाज हा शेतकरी आहे. मुलुंड येथे उभारण्यात आलेल्या या वसतिगृहात मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या त्यांच्या मुलांची राहण्याची सोय होणार आहे, असे उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

            शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास अधिक निधी मिळावा. कुणबी समाजाच्या तालुकास्तरावरील कुणबी भवनसाठी निधी मिळावाअशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याकडे भाषणदरम्यान केली.

            खासदार सुनील तटकरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.


राज्यातील धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार

 राज्यातील धार्मिक स्थळांच्याशहरालगतच्या ग्रामीण भागाच्या

स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार

 - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला सशक्तीकरण अभियानमुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियान

प्रभावीपणे राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

                मुंबई दि. 15 :- राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारी ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबविण्याची आणि यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम  मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेची बाब आपणासाठी अभिमानाची असून त्याबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

            राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणेशहरी आणि ग्रामीण भागातील संपूर्ण स्वच्छता मोहिम आणि महिला सशक्तीकरण अभियान यांच्याविषयीची आढावा बैठक वर्षा शासकीय निवासस्थान येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासहविविध विभागांचे सचिवविभागीय आयुक्तजिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्यातील धार्मिक स्थळांवरील इमारतींची स्वच्छता संबधित ट्रस्टमार्फत होत असते. परंतु बाहेरील भागात अस्वच्छता कायम राहते. यामुळे भाविकांना त्रास होत असतो. याची गंभीर दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांना स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात तातडीने संबंधित जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहिम राबवावी. तसेच मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. आठवडाभरात हा बदल दिसायला हवा. तसेच धार्मिक स्थळांवर कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष योजना तयार करण्याच्या आणि या योजनेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. या योजनेसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून नोडल अधिकारी नेमून राज्यस्तरावरुन लक्ष ठेवावेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शहराबरोबरच ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी अभियान

            मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीआपल्या राज्याला स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. हा क्रमांक आपल्या राज्याला कायम ठेवायचा आहे. यात संपूर्ण स्वच्छता मोहिम महत्वाची ठरणार आहे. राज्यातील शहरी भागात संपूर्ण स्वच्छता मोहिम आपण राबवत आहोत. या मोहिमेद्वारे एकाच वेळी जादा मनुष्यबळ आणि संसाधने वापरून स्वच्छता करण्यात येत आहे. यामुळे प्रदूषणासोबतच रोगराई सुद्धा कमी होत असून या मोहिमेला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासाठी नगरविकास विभागातर्फे नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करुन लक्ष ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानात सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे तेव्हा त्यांच्याकडून अधिक चांगले काम होणार आहेया मोहिमेचे ते खरे हिरो ठरले आहेत, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

            राज्यात ही स्वच्छता केवळ शहरी भागापूरती मर्यादित राहायला नको. यासाठी शहराच्या हद्दीलगत तसेच ग्रामीण भागात देखील स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या भागांच्या स्वच्छतेसाठी देखील कायमस्वरुपी योजना राबविण्याचे आणि जिल्हा नियोजन समिती माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहिमेविषयी थोडक्यात माहिती दिली.

महिला बचत गटांचे रुपांतर शक्ती गटात करणार

            राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना बाजारातील मागणी असणाऱ्या वस्तुंच्या निर्मितीचे प्रशिक्षण देणेभांडवल उपलब्ध करणे आणि त्या वस्तुंचे ब्रँडिगमार्केटिंग करणे यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करता यावी याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारे तात्पुरते स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. राज्यातील बस स्थानकरेल्वे स्थानक आणि मॉल्स मध्ये काही स्टॉल तातडीने बचत गटांना कसे उपलब्ध करुन देता येतीलयाचे नियोजन करावे. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बचत गट मॉल ही संकल्पना सुद्धा इतर जिल्ह्यात राबवावी. या अभियानातून जास्तीत जास्त महिलांना बचत गटांच्या चळवळीत सहभागी करुन घ्यायचे आहे. राज्यातील बचत गट मेहनत करणारे असून त्यांना मजबूत करण्यासाठी शासन म्हणून प्रभावी पाऊले आपल्याला उचलायची आहेतअसेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियान राज्यात प्रभावीपणे राबवा

            राज्यातील सर्व शाळांमध्ये 1 जानेवारी पासून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियानाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. शाळेकडे ओढा वाढावा, शिक्षकपालकविद्यार्थी यांच्यात शाळेबद्दल आत्मियता वाढावीयाकरिता हे अभियान महत्वाचे आहे. अभियानातील माझी परसबाग उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक आवड निर्माण होईल. स्वच्छता मॉनिटर टप्पा-2 मोहिमेतून स्वच्छतेचे महत्व पोहचणार आहे. महावाचन महोत्सवातून वाचनाची आवड निर्माण होणार आहे. या अभियानात 2 कोटी विद्यार्थी सहभागी होणार असून प्रोत्साहन देण्यासाठी 70 कोटी रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच शाळांच्या सक्षमीकरणासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून दत्तक शाळाडिजिटल क्लासरुमसायकल वाटप असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात चांगले काम केलेल्या जिल्ह्यांचा अभ्यास करावाअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

            या बैठकीत मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियानाबाबत मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनी सादरीकरण केले.

००००


Featured post

Lakshvedhi