Saturday, 13 January 2024

भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली


 भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली

 

            मुंबईदि. १३ : - भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेले सृजनशीलअलौकीक प्रतिभा यांचे अनोखे वरदान म्हणता येईलअशी एक तेजस्वी गानप्रभा आज निमाली आहेअशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान उच्चकोटीचे आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊनहे क्षेत्र त्यांनी समृद्ध केले. आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचे गाणे स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारे होतेच. पण आपल्या संगीत क्षेत्राचे देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारे होते. त्यांनी भारतीय संगीताचे हे रुप आपल्या प्रसन्नहसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवले. आपल्या प्रसन्नवैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. पण संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील  एक तेजस्वी तारा निखळला आहेअशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ज्येष्ठ गायिकापद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

            दरम्यान डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

 

तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं तरूणाई, उत्साह अन् जल्लोष; तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा

 तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं


तरूणाई, उत्साह अन् जल्लोष;


तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा


 


            नाशिक, दि. 12 : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरूणाईच्या कलाकौशल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थितांची मनं जिंकली. 'विकसित भारत @2047 - युवा के लिए – युवा द्वारा' या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात तालबद्ध जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगासने, साहसी प्रात्यक्षिकांचे युवक-युवतींनी बहारदार सादरीकरण केले. राष्ट्रीय युवा महोत्सवातील देशभक्तीपर गीतांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा पहिला दिवस तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाने गाजला. एकाहून एक सरस, कलाकौशल्य दाखविताना तरूणाईची चपळता पहायला मिळाली‌.


            तपोवन मैदानावर स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाले. महाराष्ट्रासाठी 'सक्षम युवा-समर्थ भारत' या घोषवाक्यावर आधारित या महोत्सवात तरूणाईचा जल्लोष, उत्साह ओसंडून वाहत असून नाशिकमध्ये देशातील विविध राज्यातील तरूणाईचा मेळा अवतरला आहे.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. त्यानंतर‌ भारताची विविधता, एकात्मता, संस्कृती, नृत्य व वेशभूषा यांचे दर्शन घडविणाऱ्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या चमूंचे प्रधानमंत्र्यांसमोर संचलन झाले.


            सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणात जिम्नॅस्टिकमध्ये हूप, बॉल, रिबन आणि रोप अशा साधनांचा वापर करत युवकांनी आपले कौशल्य दाखवत तालबद्ध जिम्नॅस्टिक सादर केले. जिम्नॅस्टिकचे कौशल्य पाहून उपस्थित आवाक झाले. महाराष्ट्राच्या तरूणांनी मल्लखांबावरील चित्तथरारक कसरती करून दाखवत उपस्थितांना आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. ढोल, झांज, लेझीम यासह कथकली, भरतनाट्यम्, भांगडा या विविध राज्यातील लोकनृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.


            तरूणांनी सादर केलेल्या साहसी शारीरिक कसरती, प्रात्यक्ष‍िकांच्या जोडीला सायकलिंग आणि स्केटिंगचे मनोवेधक सादरीकरण झाले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता‌.


नाशिकच्या ढोल‌ पथकानं वेधलं लक्ष


             संचालनात नाशिकच्या सहस्त्रनाद ढोल पथकातील युवक- युवतींनी ढोल वाजवत साथ-संगत केली. सुमारे 10 मिनिटे चाललेल्या संचलनात ढोल पथकाच्या निनादात आसमंत ढवळून निघाला होता‌. 50 युवक- युवतींचा समावेश असलेल्या या ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं‌ होते.


००००

पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेला, अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे

 पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी

 शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन

सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेला,

अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे

 




            मुंबई, दि. 12 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला.

            एमटीएचएल अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला गेला आहे आणि सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.

      आमच्या नागरिकांसाठी जीवन सुलभता’ वाढवण्याच्या दृष्टीने एक पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या अटल सेतूचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. हा पूल प्रवासाचा वेळ कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल ज्याद्वारे दैनंदिन प्रवास सुरळीत होईल.

            पंतप्रधानांच्या समवेत राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू

            शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी बळकट करून नागरिकांची प्रवास सुलभता’ सुधारणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या संकल्पनेनुसारमुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)आता अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू’ नामकरण झालेला पूल बांधण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.

            एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आला आहे. हा सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि मुंबई ते पुणेगोवा आणि दक्षिण भारत दरम्यानचा प्रवासाचा वेळ देखील कमी करेल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.

०००

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 35 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ अटल सेतू देशातील नागरिकांना समर्पित विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करावे

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 35 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ

अटल सेतू देशातील नागरिकांना समर्पित

विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करावे

                               -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

            रायगड, दि.12 : महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन समर्पित भावनेने काम करीत असून महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजेयासाठी केंद्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईलअशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच येत्या काळात देशातील 2 कोटी महिलांना लखपती बनविण्याचा केंद्र शासनाचा संकल्प असून विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करुन या अभियानाला यशस्वी करावे,  असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक  विकास प्रकल्पांचे उदघाटन राष्ट्राला समर्पण आणि पायभरणी करण्यात आली.  यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतु, (२२.०० कि.मी.) (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एम.टी.एच.एल.) खारकोपर-उरण रेल्वे लाईन प्रकल्प (१४.६० कि.मी.) ठाणे आणि ऐरोली दरम्यान 'दिघा गाव रेल्वे स्थानकभारतरत्नम नेस्ट-१ भवन महानगर प्रदेशाच्या पश्चिम उप-प्रदेशासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (क्षमता ४०३ द.ल.लि.) नवी मुंबई मेट्रो मार्ग-१ बेलापूर ते पेंढार (११.१० कि.मी.११ स्थानके) खाररोड आणि गोरेगाव दरम्यान नवीन ६ वी रेल्वे लाईन (८.८० कि.मी.) उरण आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ईएमयू  ट्रेनची सुरुवातनमो अभियान - मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाननारी शक्ती दूत अॅप लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप यांचा समावेश आहे.

            यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय रेल्वेकोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवेकेंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवलेकेंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटीलराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरउद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरसार्वजानिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाणकौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढामहिला व बालविकास मंत्रीकु.आदिती तटकरेखा.श्रीरंग बारणेखा.सुनिल तटकरेआ.प्रशांत ठाकूरआ.महेश बालदी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ  

            यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणालेआजचा दिवस केवळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर विकसित भारताच्या संकल्पाच्या ऐतिहासिक पुरावा आहे.  भारतातील सर्वात लांब असलेल्या अटल सागरी सेतूचे लोकार्पण हा भारताचा विकासाप्रती असलेल्या वचनबध्दतेचा पुरावा आहे. 2014 च्या निवडणुकीआधी रायगड किल्ल्यावर गेलो होतोत्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काही संकल्प केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना दिसत आहेत. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. अटल सेतू ही विकसित भारताची एक झलक आहे. अटल सेतूमुळे गोवा देखील मुंबईच्या जवळ येणार आहे, अटल सेतू प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ॲबे यांच्या समवेत केला होता. सागरी सेतूचं काम पूर्ण होणंहे मोठे यश आहे.  देशासाठी गेल्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठी 44 लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि आणखी  काम सुरू आहे.  ही रक्कम प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी वाढवित आहेअसेही ते  म्हणाले.

            स्वच्छताशिक्षणवैद्यकीय मदत आणि रोजगाराशी संबंधित योजनांचा  महिलांना सर्वाधिक फायदा झाला असल्याचे सांगून ते म्हणालेदेशात  पीएम जनऔषधी केंद्रेस्वनिधीपीएम आवास आणि बचतगटांना मदत मिळून लखपती दीदी’ तयार होत आहेत. 2 कोटी लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.  महाराष्ट्र शासनाच्या योजनाही याच दिशेने कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास गतीने सुरू आहेशासन याच निष्ठेने महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत राहीलअसा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

            महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या मेगा विकास प्रकल्पांची उदाहरणे देताना प्रधानमंत्री यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आणि नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोड प्रकल्पाची कामे सुरू आहेतयामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटीचा चेहरामोहरा बदलेल. प्रवासाची सोय आणखी वाढविण्यासाठी  इस्टर्न फ्री-वे च्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्यात बोगदा तयार करण्यात येत आहे.  लवकरचमुंबईलाही पहिली बुलेट ट्रेन मिळेलअसेही ते म्हणाले.

             दिल्ली-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर महाराष्ट्राला मध्य आणि उत्तर भारताशी जोडेल.  महाराष्ट्राला तेलंगणाछत्तीसगड आणि इतर शेजारील राज्यांशी जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचे जाळेही टाकले जात आहे.  तेल आणि वायू पाईपलाईननवी मुंबई विमानतळ आणि शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कचे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे मोठे योगदान

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            देशाच्या प्रगतीत आणि विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. उद्योगाबरोबरच, पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामातही महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा हा प्रवास निरंतर सुरूच राहील. यासाठी केंद्र शासनाचा  नियमित पाठिंबा मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीशिवडी-न्हावा शेवा अटल सेतूमुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) या सहा मार्गिकांच्या समुद्रावरील भारतातील सर्वांत लांब सागरी सेतूला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. हा पूल अटलजींच्या नावाप्रमाणेच मजबूत आणि अटल आहे. अटलजींचे नाव आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ही या पुलाच्या मजबूतीची हमी आहे. या सागरी सेतूमध्ये कोणत्याही मोठ्या भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता आहे. आज देशातील पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. राज्यात सुमारे 8 लाख 35 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बुलेट वेगाने प्रगती करत आहे. मागील नऊ वर्षांत आपण अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत. महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. जगातील अनेक देश आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांशी लढत आहेततर आपला भारत मजबूत आणि संतुलित नेतृत्वामुळे आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहेअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

चार वर्षांत मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की1973 मध्ये या सागरी सेतूची संकल्पना मांडली होती. मात्र 40 वर्षात हे काम झाले नाहीते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे. या अटल सेतूसाठी प्रधानमंत्री यांनी थेट एम.एम.आर.डी.ए. ला कर्ज उपलब्ध करुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

            मागील 50 वर्षांत महाराष्ट्राला आणि देशाला मुंबईने ताकद दिली. येत्या 25 वर्षांते देशालामहाराष्ट्राला आणि मुंबईला रायगडचा परिसर ताकद देईल. रायगडमध्ये नवा इकॉनॉमिक हब तयार होणार आहे. 65 टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे. या सेतूने या विभागाला कनेक्टिव्हिटी दिली आहे.

            मुंबईत कुठूनही 59 मिनिटात पोहोचता आले पाहिजे. मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क त्या पद्धतीने तयार होत आहे. येत्या तीन ते चार वर्षांत असे नेटवर्क तयार होईलअसेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी जनतेला सांगितले. यापुढे रायगडनवी मुंबई हे नवे इंडस्ट्रियल हब असेल. येथे नवीन विमानतळ लवकरच पूर्ण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शक्ती आमच्यामागे उभी असल्यामुळे राज्यातील पायाभूत प्रकल्प लवकर पूर्ण होतीलअसा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटीबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार

            स्वागतपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीआजचा दिवस महत्वपूर्ण आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनाप्रकल्प राबविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या सुधारणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.

            प्रधानमंत्री मोदी यांनी सुरुवातीपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले आहे. उज्वला योजना ही महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे. यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच देशाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात कटीबद्ध असल्याचे सांगून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार  असल्याचा निर्धारही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

अटल सेतूशनिवारी सकाळी खुला होणार..!

             अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. हा 'अटल सेतूशनिवार दि. 13 जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहेअसे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले आहे.

००००


Friday, 12 January 2024

दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

 दिलखुलास''जय महाराष्ट्रकार्यक्रमात

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'मध महोत्सव 2024या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील शेतकरी व युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘मध केंद्र योजना’ राबविण्यात येत आहे. याचबरोबर उद्योगाचे स्थैर्यस्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणेतयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. यासाठी 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरसभागृह येथे देशातील पहिल्या मध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकशेतकरी व तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावाअसे आवाहन मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून केले आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात सभापती श्री. साठे यांची मुलाखत सोमवार दि. 15 आणि मंगळवार दि. 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवारदि. 16 जानेवारी2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आ

लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या तीन सिट्रस इस्टेटसाठी 7 कोटींचा निधी

 लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या तीन सिट्रस इस्टेटसाठी

7 कोटींचा निधी

 

            मुंबईदि. 12 : जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका उमरखेडअमरावतीसिट्रस इस्टेटधिवरवाडीनागपूरसिट्र्स इस्टेट तळेगाववर्धा येथील शासकीय तालुका फळरोपवाटिकांमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांकरिता सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात आली आहे. या सिट्रस इस्टेटसाठी 7 कोटी 24 लाख 67 हजार रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.

            सिट्रस इस्टेटसाठीच्या या निधीचे वितरण पुढील प्रमाणे होणार आहे. उच्चतंत्रज्ञान  आधारीत रोपवाटीका स्थापन करण्यासाठी 35 लाख 65 हजार रुपयेत्यापैकी 6 लाख 15 हजार रुपये धिवरवाडी ता.काटोलजि. नागपूरसाठी तर 29 लाख 50 हजार रुपये तळेगाव ता. आष्टी. जि. वर्धासाठी वितरित करण्यात येणार आहे. उमरखेडता. मोर्शीजि. अमरावती येथील सिट्रस इस्टेटसाठी प्रशासकीय इमारत बांधकामकार्यालयप्रयोगशाळाप्रशिक्षण भवननिविष्ठा विक्री केंद्र इत्यादीसाठी 1 कोटीतिन्ही सिट्रस इस्टेटमध्ये अवजारे बँक स्थापनेसाठी 2 कोटी 14 लाखमातीपाणीउती व पाने चाचणी प्रयोगशाळा आणि जिवाणू खते उत्पादनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

            या सिट्रस इस्टेटचे कृषी आयुक्तालय स्तरावर कृषी आयुक्तपुणेविभाग स्तरावर विभागीय कृषी सहसंचालकअमरावतीनागपूर आणि छत्रपती संभाजी नगर आणि जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीअमरावतीनागपूरवर्धाछत्रपती संभाजी नगर हे सनियंत्रण करणार असल्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.

00000

युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचालनाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

 युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

            नाशिकदि. 12  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील 25 वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत विकसित भारत घडवित इतिहास निर्माण करावाअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

            केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा विभाग व राज्य शासनातर्फे नाशिक येथे आजपासून सुरू झालेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदानावर झाले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय माहिती व प्रसारणयुवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूरकेंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिककेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळनाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसेमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजनक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेविधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळखासदार डॉ. सुभाष भामरेखासदार हेमंत गोडसेआमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेनरेंद्र दराडेकिशोर दराडेमाणिकराव कोकाटेदिलीप बोरसेदिलीपराव बनकरप्रा. देवयानी फरांदेसरोज अहिरेडॉ. राहुल आहेरसीमा हिरे,  नितीन पवारॲड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते.

            प्रारंभी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदराजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध राज्यांच्या संघांनी पथसंचलन केले. तसेच विकसित भारत @2047- युवा के लिए- युवा का द्वारा’ या संकल्पनेवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले कीस्वामी विवेकानंदयोगी अरविंद यांनी युवकांची ताकद ओळखली होती. ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय युवकांचे परिश्रमसामर्थ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. याच शक्तीच्या सामर्थ्यावर भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. याच युवकांच्या बळावर भारत मॅन्युफॅक्चरिंगचे हब तयार होत आहे. यातूनच तरुणांना इतिहास घडविण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या पिढीने देशासाठी जीवन अर्पण केले. आताच्या पिढीने पुढील 25 वर्षांचा काळ कर्तव्य काळ मानत विकसित भारताच्या निर्मितीसाठी द्यावात्यासाठी युवकांनी संकल्प करावा. जेणेकरून भारत जगात नव्या उंचीपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी ‘मेरा भारत- युवा भारत’ संघटन सुरू करण्यात आले आहे. त्यावर आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त युवक- युवतींनी नोंदणी केली आहे.

            आधुनिक भारत घडविण्यासाठी तरुणांच्या मार्गात येणारे विविध अडथळे दूर करण्यात येत आहे. कौशल्‍य विकासावर आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात येत आहे. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. आयआयटीएनआयटी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. युवकांमधील कौशल्य विकासासाठी पाश्चात्य देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून त्यांचाही लाभ होत आहे. महामार्गांची निर्मितीवंदे भारत रेल्वेविमानतळांचाही विकास करण्यात येत आहे. चंद्रयानआदित्य एल 1 च्या यशाने जगाला भुरळ पडली आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने युवकांना नवनवीन संधी दिली आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी 18 वर्षांवरील तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदान करावेअसेही आवाहन प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केले.

मराठी भाषेतून राजमाता जिजाऊ यांना वंदन

            राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. हाच धागा पकडत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मराठीतून संवाद साधत अभिवादन केले. ते म्हणाले कीभारतीय नारी शक्तीचे प्रतीक राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी युवा महोत्सवामुळे मिळाली याचा अतिशय आनंद होत असल्याचे सांगून राजमाता जिजाऊ यांना प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी कोटी कोटी वंदन केले. महाराष्ट्राची भूमी ही पुण्यवीर तपोभूमी आहे. याच भूमीत राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा महानायक घडविला. याच भूमीत अहिल्याबाई होळकरलोकमान्य टिळकस्वातंत्र्यवीर सावरकरअनंत कान्हेरेरमाबाई आंबेडकरचाफेकर बंधुदादासाहेब पोतनीस यांच्या सारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे घडलीअसेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्रांची करावी स्वच्छता

            अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्यानिमित्त आबालवृद्धांनी या कालावधीत मंदिरांसह तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्‍छता मोहीम राबवावी. याचाच एक भाग म्हणून आज सकाळी काळाराम मंदिरात दर्शनानंतर स्वच्छता करण्याची संधी मिळाल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

अद्वितीय कामगिरीची नोंद

            युवकांनी अद्वितीय कामगिरी बजवावी. या कामगिरीची समाज नेहमीच दखल घेतो. एवढेच नव्हेतर इतिहासात या कामगिरीची सुवर्णाक्षरांनी नोंद होते. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुलेशहीद भगतसिंगचंद्रशेखर आझादबटुकेश्वर दत्तहॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद ही त्याचीच उदाहरणे आहेत. तसेच देशातील प्रत्येक महिलेचा सन्मान करीत व्यसनांपासून तरुणांनी दूर रहावेअसेही आवाहन प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीप्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने नाशिकची भूमी पावन झाली आहे. कुंभमेळाकरिता नाशिक प्रसिद्ध आहे. अशा भूमीत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त देशभरातील युवक शक्ती एकत्र आली आहे. यानिमित्त येथे युवकांचा कुंभमेळाच भरला आहे. ही राज्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या क्रीडा महोत्सवाचे बोधचिन्ह राज्यातील भीमाशंकरमहाबळेश्वर आणि आंबा घाटाच्या जंगलात आढळून येणारा शेकरू हा अतिशय सुंदर प्राणी आहे.  तो गतिशीलताचपळताविविधतेचे आकर्षण असणारा  आणि पर्यावरणा प्रती सजग असलेला प्राणी आहे. त्यामुळे या बोधचिन्हातून तरुणांना मैत्रीसामजिक एकतेचा संदेश देतो. हा संदेश देशभरातील तरुण नाशिक मधील युवा महोत्सवातून आपापले राज्यशहर आणि गावात घेऊन जातीलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताची जडणघडण होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सव तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरेलअसे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महोत्सवासाठी आलेल्या तरुणांना शुभेच्छा दिल्या.  युवकांच्या सक्रिय सहभागामुळे सन 2047 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवतीलअसा मला विश्वास आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताचे नाव जगात आदराने घेतले जात आहे. भारताची वाटचाल महासत्तेकडे सुरू आहे. त्यामुळे भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्टार्ट अपस्टँड अप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. राज्यातील तरुणांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेतअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            केंद्रीय क्रीडा मंत्री श्री. ठाकूर म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रात यशस्वी होत आहे. क्रीडासंरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू आहे. वीजलोखंड उत्पादनात आघाडी घेतली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच शंभरावर पदके पटकावली आहेत. भारताने आता ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र आणि वैभवशालीसमृद्ध भारत घडविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले. त्यासाठी युवकांनी सहकार्याचा संकल्प सोडावाअसेही आवाहन मंत्री श्री. ठाकूर यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार

            प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा सत्कार केला. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. पवार यांनी स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा देऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा सत्कार केला.

०००००

 


Featured post

Lakshvedhi