Friday, 12 January 2024

जनहितार्थ

 जर आपल्या कडे अंतरराष्ट्रीय कॉल आली आहे, ज्यात दर्शविलेले नंबर भारतीय आहे किंवा कोणतीही नंबर दर्शवले नाही आहे, तर कृप्या ह्याची माहिती टोल फ्री नंबर 1800110420/1963 वर द्या.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २० जानेवारीला आयोजन

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २० जानेवारीला आयोजन

             मुंबईदि. १२ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई शहर व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० जानेवारी २०२४ रोजी संघर्ष सदन हॉल म्हाडा संकुल जवळफेरबंदर रोडकॉटन ग्रीन (पश्चिम) ४०००३३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            या  रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉग इन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे.

                भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर "Pandit Dindayal Upadhyay Job Fair" ऑप्शनवर क्लिक करुन "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यावर रिक्त पदे अधिसुचित करावी व दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२-२२६२६३०३ या दुरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

               या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर चे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

*******

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २० जानेवारीला आयोजन मुंबई, दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० जानेवारी २०२४ रोजी संघर्ष सदन हॉल म्हाडा संकुल जवळ, फेरबंदर रोड, कॉटन ग्रीन (पश्चिम) ४०००३३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉग इन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे. भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर "Pandit Dindayal Upadhyay Job Fair" ऑप्शनवर क्लिक करुन "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” यावर रिक्त पदे अधिसुचित करावी व दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२-२२६२६३०३ या दुरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर चे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे. *******

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २० जानेवारीला आयोज

             मुंबई, दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० जानेवारी २०२४ रोजी संघर्ष सदन हॉल म्हाडा संकुल जवळ, फेरबंदर रोड, कॉटन ग्रीन (पश्चिम) ४०००३३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            या रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉग इन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे.

                भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर "Pandit Dindayal Upadhyay Job Fair" ऑप्शनवर क्लिक करुन "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” यावर रिक्त पदे अधिसुचित करावी व दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२-२२६२६३०३ या दुरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

               या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर चे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

*******

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप

राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

            मुंबई. दि. 12 : आयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. 22 जानेवारी 2024 आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती दि. 19 फेब्रुवारी 2024 या निमित्त राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी अशा राज्यातील एकूण 1,कोटी 68 लाख 50 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना दि. 22 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदाचा शिधाचे वाटप सवलतीच्या 100 रुपये दरात करण्यात येणार आहे.

            आनंदाचा शिधा संचामध्ये 1 किलो साखर1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळरवामैदा व पोहा असे सहा शिधाजिन्नस आहेत. आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे.

            श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आवश्यक शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरिता एकूण 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

            राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022 च्या दिवाळी सणानिमित्तसन 2023 च्या गुढीपाडवाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त तसेच सन 2023 गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो रवाचणाडाळसाखर व 1 लिटर खाद्यतेल असे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर  सन 2023 दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळरवामैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात आला आहे.

00000

ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन सीयावर रामचंद्र की जय घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला

 ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन

सीयावर रामचंद्र की जय घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला

            नाशिकदि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली.

            यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमाशाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

            काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराजश्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारीमंगेश पुजारीनरेश पुजारीमंदार जानोरकरएकनाथ कुलकर्णीपं. प्रणव पुजारीअद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.

            याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8 व्या अध्यायाचे (श्लोकांचे) (ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे), वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंतवारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला.

स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री मोदी यांचे अभिवादन

            मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

0000

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप

राज्यातील 1 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

            मुंबई. दि. 12 : आयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. 22 जानेवारी 2024 आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती दि. 19 फेब्रुवारी 2024 या निमित्त राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी अशा राज्यातील एकूण 1,कोटी 68 लाख 50 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना दि. 22 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदाचा शिधाचे वाटप सवलतीच्या 100 रुपये दरात करण्यात येणार आहे.

            आनंदाचा शिधा संचामध्ये 1 किलो साखर1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळरवामैदा व पोहा असे सहा शिधाजिन्नस आहेत. आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे.

            श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आवश्यक शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरिता एकूण 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

            राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022 च्या दिवाळी सणानिमित्तसन 2023 च्या गुढीपाडवाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त तसेच सन 2023 गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो रवाचणाडाळसाखर व 1 लिटर खाद्यतेल असे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर  सन 2023 दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळरवामैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात आला आहे.

00000

राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचे राज्यपालांचे माध्यमांना आवाहन

 राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचे राज्यपालांचे माध्यमांना आवाहन

            मुंबई, दि. 12 : ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा भाग म्हणून विविध राज्यांमधील माध्यम प्रतिनिधींसाठी  महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिशा आणि उत्तराखंड राज्यांमधील पत्रकारांच्या एका  शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 11) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

            दोन्ही राज्यातील दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यमातील पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारिता करताना माध्यमांनी राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.

            माध्यमांनी निव्वळ गुन्हेगारीविषयक बातम्यांवर प्रकाश टाकण्याऐवजी समाजातील सकारात्मक घडामोडी वाचकांपुढे आणून त्यांच्यामध्ये  आत्मविश्वास निर्माण केला पाहिजेअसे त्यांनी सांगितले.

            आपण अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून काम केले होतेअसे सांगून राज्यपाल बैस यांनी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या क्रांतीनंतर देखील मुद्रित माध्यमाने आपली विश्वासार्हता व जागा टिकवून ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

            विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र भेटीचे आयोजन केल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी भारत सरकारचे आभार मानले. राज्य भेटीमुळे आपणांस महाराष्ट्राचा विकासप्रगती आणि सांस्कृतिक वारसा पाहता आलाअसे त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र भेटीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणेआयएनएस शिवाजी आणि जवाहरलाल नेहरू बंदर आदी संस्थान पाहून प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले व राज्य भेटीचा उपक्रम सुरु राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

            राज्यपालांच्या सूचनेनुसारओडिशा आणि उत्तराखंडमधील पत्रकारांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

            भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पत्रकारांच्या महाराष्ट्र भेटीचे आयोजन केले होते.

            यावेळी प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्माउपसंचालक जयदेवी पुजारी स्वामीसहायक संचालक निकिता जोशीमाध्यम अधिकारी श्रीयंका चॅटर्जी उपस्थित होते.

            शिष्टमंडळामध्ये देवेंद्र सती (दैनिक जागरण)गिरीश चंद्र तिवारी (दैनिक भास्कर)भूपेंद्र कंदारी (राष्ट्रीय सहारा)गिरीश पंत (बद्री विशाल)सुरेंद्र सिंग दशिला (झी न्यूज)अफजल अहमद राणा (दैनिक सहफत)ममता बोसोई (समाजा) चौधरी अमिताव दास (समद). सुदीप कुमार राउत (प्रमेय)रंजन प्रधान (प्रगतिवादी)मृणाल कांती नंदा (कलिंग टीव्ही)देबनारायण महापात्रा (न्यूज 7)दिव्य ज्योती मोहंती (अर्गस न्यूज) आदी माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

Featured post

Lakshvedhi