Monday, 1 January 2024

महावितरणच्या भरतीमध्ये वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश

 महावितरणच्या भरतीमध्ये वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश

- मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            मुंबईदि. 1 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्राकरीता कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यातील विविध संस्थांमार्फत राबविण्यात येतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEB) यांच्या विद्युत सहाय्यक या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हता मध्ये करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा  समावेश नोकर भरतीमध्ये केल्यामुळे राज्यातील विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळेल, असे  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

             महाराष्ट्र राज्य कौशल्यव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या (MSBSVET) पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या (MSBVE) दोन वर्ष कालावधीच्या वीजतंत्री (Electrician) आणि तारतंत्री (Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEB) यांच्या 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक ०६/२०२३ च्या विद्युत सहाय्यक या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतामध्ये करण्यात आली आहे. 

            विविध उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मंडळ सुसज्ज आहे. मंडळाच्या अभ्यासक्रमांचा नोकर भरतीसाठी समावेश करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे (MSEB) आभारी आहोतराज्यातील सर्व विभागांनी देखील त्यांच्या पदभरतीमध्ये मंडळाच्या विविध अभ्यासक्रमांचा समावेश करावा, असे आवाहन श्री. लोढा यांनी सर्व शासकीयनिमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील विभागांना केले आहे. मंडळाचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचा नोकर भरतीसाठी समावेश केल्यास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणनवीन कौशल्यरी-स्किलिंगअप-स्किलिंग आणि रोजगार याद्वारे कौशल्य परिसंस्थेचा सर्वांगीण विकास होईल आणि उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असा विश्वास श्री. लोढा यांनी व्यक्त केला.

            मंडळास नुकतेच राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परिषद (National Council of Vocational Education and Training - NCVET), कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयभारत सरकार यांची Awarding Body व Assessment Body (Dual Recognition) संलग्नता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळेमंडळाच्या अभ्यासक्रमांना नॅशनल स्किल्स क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क (NSQF) दर्जाप्राप्त करुन घेणे व त्याप्रमाणे NSQF प्रमाणपत्र निर्गमित करणे शक्य होईल. तसेचमंडळाचे प्रमाणपत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त होतील. याव्दारे Credit Transfer, उच्च शिक्षणाच्या संधीराष्ट्रीय पातळीवर अभ्यासक्रमांना मान्यताशिकाऊ प्रशिक्षण उमेदवारी योजनेचे लाभइत्यादी घेणे शक्य होईल. पर्यायाने मंडळाव्दारे युवकांना दर्जेदार प्रशिक्षण व रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे सुलभ होईल.

*****

२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

मुंबई : शतकानूशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम जन्मभूमी आयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे पत्र आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. २२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे.

त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही  आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

Regard's

ATUL BHATKHALKAR
MLA-160 Kandivali East

पोटात चार पेग पडल्यावर किती काॅन्फीडन्स वाढतो,

 *पोटात चार पेग पडल्यावर किती काॅन्फीडन्स वाढतो, ते  पहा ! म्हणून म्हणतो अधूनमधून थोडी तरी घेत रहा !!31stची तयारी*


कमरेच सोडून डोक्याला बांधणे काय असते ते स्पष्ट केलय,नक्की पहावं अस .

 कमरेच सोडून डोक्याला बांधणे काय असते ते स्पष्ट केलय,नक्की पहावं अस .


झेपेल तेवढीच प्या भले तुम्ही पिण्यात वाघ असाल 🤣🤣

 आज झेपेल तेवढीच प्या भले तुम्ही पिण्यात वाघ असाल 🤣🤣


नववर्ष प्रारंभ

 नववर्ष प्रारंभ

नवीन आशा, नवीन ध्येये

नव तरुणांना निर्मू दे.

रामचरित गुणगान गात गात

तसेच त्यांना होऊ दे.

मातृभक्ती, पितृभक्ती, राष्ट्रभक्ती

हृदयी त्यान्च्या वसू दे

कनकम्बेच्या कृपाप्रसादे

नव वर्षाला उजळू दे

Sunday, 31 December 2023

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी

कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 28 : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी आयुक्तालय येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध संचालक व कृषी विद्यापीठांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            मंत्री श्री. मुंडे म्हणाले, राज्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.यामध्ये कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढ्या निधीची तरतूद केली आहे तो सर्व निधी वेळेत खर्च करावा. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. त्यातून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

            ‘सेंद्रीय शेती विषमुक्त शेती’ या सारख्या योजना प्रभावीपणे राबवाव्या. तृणधान्याला आता मोठी मागणी आहे. यादृष्टीने शेतकऱ्यांनी तृणधान्ये उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तृणधान्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ॲप विकसित करून डी मार्ट - ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मना थेट शेतकऱ्यांना जोडण्याचे काम करावे, अशीही सूचना त्यांनी केली.

            शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक पद्धती घेण्यासाठी सल्ला देणारी यंत्रणा विकसित करावीजागतिक कृषी गणना व शेती विषयक आकडेवारी सादर करण्याच्या योजनेअंतर्गत रिक्त पदे कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव तयार करावाकृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात मोहीम प्रभावीपणे राबवावीपिकांवरील कीड नियंत्रणासाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाटपाल खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल सादर करावा असे विविध निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

            केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली, तर आणखी वाढीव निधीची मागणी करता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करावा. विभागाने आर्थिक वर्षात केलेल्या तरतुदीप्रमाणे खर्च केल्यास नवीन वर्षांत वाढीव निधीची मागणी करता येईल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi