Sunday, 31 December 2023

जालना ते मुंबई वंदे भारत रेल्वेचे सीएसटी येथे उत्साहात स्वागत मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

 जालना ते मुंबई वंदे भारत रेल्वेचे सीएसटी येथे उत्साहात स्वागत

मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली विनंती

 

मुंबई दि. 30:  मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरू व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            आजपासून सुरु झालेली जालना - मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे देखील होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते

            मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते अयोध्या रेल्वे देखील सुरू करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाला केली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

            मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. राज्यात रेल्वेने 1 लाख 7 हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. आज हे वर्ष संपत असताना राज्याला सातवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी एकदा ठरवले की तो प्रकल्प किंवा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने पूर्ण होतोच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

            प्रारंभी मध्य रेल्वेचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक चित्तरंजन स्वैन यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

प्रवाशांची उत्स्फूर्त दाद

            जालना मुंबई वंदे भारत ट्रेनचे आगमन झाले तेव्हा मुख्यमंत्री भाषण करत होते. उतरलेल्या प्रवाशांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताच या प्रवाशांनी सुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली.

            त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि  उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प तसेच मिठाई दिली. या ट्रेनमधल्या सोयी आणि सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले . प्रवाशांचे अनुभव उत्सुकतेने ऐकत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमवेत रेल्वे कोचमध्ये तब्बल अर्धा तास दिला. प्रवाशांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले. 

            या रेल्वेमुळे आता महाराष्ट्रात जालना ते मुंबईमुंबई ते सोलापूरमुंबई ते शिर्डीमुंबई ते मडगावमुंबई सेन्ट्रल ते गांधीनगरनागपूर ते इंदौरनागपूर ते बिलासपूर अशा सात ट्रेन्स धावतील.

00000

 


December पळतो आहे

 🙏निरंतर माळेतून 

एक मोती गळतो आहे.. 

तारखांच्या जिन्यातून 

डिसेंबर पळतो आहे ..

काही चेहरे वजा अन् 

बर्‍याच आठवणी जमा.. 

वयाचा पक्षी 

आभाळी दूर उडतो आहे ..

हलकी हलकी उन्हे 

अन् आक्रसलेल्या रात्री.. 

गेलेल्या क्षणांवर 

पडदा हळूहळू पडतो आहे.. 

मातीचा देह 

मातीत मिळण्यापूर्वी.. 

हर मुद्द्यावर 

इतका का आडतो आहे.. 

अनुभवण्या पूर्वीच 

सुटून जात आहे आयुष्य.. 

एक एक क्षण जणू 

ढग बनून उडतो आहे.. 

तारखांच्या जिन्यातून 

डिसेंबर पळतो आहे ..



     *...चला...*

*या वर्षाचा हा अखेरचा.... आठवडा* 


*खुप सारे धन्यवाद..!!*

*तुमच्या या मैत्रीची साथ* 

*यापुढे ही अशीच कायम असू द्या...*

*नव्या वर्षात नव्या उमेदीने* 

पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...🍫🍫🤝

Saturday, 30 December 2023

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा  

सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 

मुंबईदि. २७ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- (अनुक्रमे पुनरीक्षण उपक्रमकालावधीसुधारित कालावधी या क्रमाने) : दावे व हरकती निकालात काढणे - २६ डिसेंबर २०२३ पर्यंत१२ जानेवारी २०२४. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणेडाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई - १ जानेवारी २०२४१७ जानेवारी २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे - ५ जानेवारी २०२४२२ जानेवारी २०२४ रोजी होईलअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

देशातील पहिला मध महोत्सव महाराष्ट्रात मुंबईत 18 व 19 जानेवारी रोजी आयोजन


देशातील पहिला मध महोत्सव महाराष्ट्रात

मुंबईत 18 व 19 जानेवारी रोजी आयोजन

मुंबईदि. 27 :- मध उद्योगाची व्याप्ती वाढावीग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच 'मध महोत्सव- २०२४महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली. 

फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामीण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमलाउपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगतापसहायक अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

श्री. साठे म्हणाले की, मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला आहे. देशातील पहिले मध संचालनालय १९४६ मध्ये महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन केंद्र शासनाने मध संचालनालय सुरु केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना’ तसेच ‘मधाचे गाव’ या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशापालनातील उपउत्पादने जसे परागमेणरॉयल जेलीप्रोपोलिसमधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती व विक्रीसाठी मधमाशा पालन उद्योगाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यात मधाबरोबर मधमेण यापासून तयार करण्यात आलेले उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

राज्यातील मधाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता, मध महोत्सवाच्या माध्यमातून मधक्रांतीची पायाभरणी या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या मध महोत्सवात मधमाशांचे जतनसंवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवादशेतकऱ्यांचे प्रशिक्षणशरीर स्वास्थ आणि मधमधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

 महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव देणारे राज्य असून राज्यात प्रति किलो पाचशे रुपये हमीभाव देण्यात येतो. त्याचबरोबर मधपाळांची माहिती संकलन करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात १०७९ गावांमध्ये ४ हजार ५३९  मधपाळ शेतकरी मधमाशांच्या सुमारे ३२ हजार पेट्यांमधून मध उत्पन्न करीत आहेत. गेल्या वर्षी १ लाख ६० हजार मध उत्पादन झाले. त्याचे मूल्य २६९ लक्ष रुपये होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

देशाच्या सीमांवर होणार मधमाशांचा वापर

मधमाशा ह्या त्यांना इजा पोहोचविल्यास समोरच्यावर हल्ला करुन त्याला जखमी करतात. मधमाशांच्या या वैशिष्ट्याचा वापर आता देशाच्या सीमेवर शत्रूला रोखण्यासाठी करण्यात येणार असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. त्याचबरोबर मधमाशांचे विष हे दुर्धर आजारावर सुद्धा उपयुक्त आहे, याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रीम प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला म्हणाल्या कीमधुबन हा महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग विभागाचा मधाचा ब्रॅंड आहे. मध शरिरासाठी अतिशय उपयुक्त आहे. आरोग्यासाठी मधाचा उपयोगमध निर्मितीया विषयात काम करणारे अनेक तज्ज्ञ आणि पहिल्यांदाच न बघितलेलेन अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातुन लोकांना अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर मधपाळशेतकरी यांच्यासाठी मधपालन कसे करायचे याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. 

सानेगुरुजींच्या कर्मभूमीतील साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ

 सानेगुरुजींच्या कर्मभूमीतील साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साहित्य महामंडळाने दिले मुख्यमंत्र्यांना संमेलनाचे निमंत्रण

 

मुंबईदि. 27 : - पूज्य साने गुरुजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहेयाचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईलअसे आश्वस्त देखील केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबेकार्याध्यक्ष प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना या आगामी संमेलनाचे निमंत्रण दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहेही केवळ खान्देशसाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनातील विचार मंथनातून राज्यातील साहित्यिक चळवळीला दिशा मिळेल. ज्यातून राज्याच्या हिताच्या उपक्रमांनाही चालना देता येईलअसा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खान्देशला मोठी साहित्यिक परंपरा लाभली आहे. यामुळे हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेतली. संमेलनासाठी शासनातर्फे सर्वतोपरी पाठबळ दिले जाईलअसे सांगत त्यांनी संमेलनाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.

सानेगुरुजींच्या कर्मभूमीतील साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साहित्य महामंडळाने दिले मुख्यमंत्र्यांना संमेलनाचे निमंत्रण

 

मुंबई, दि. 27 : - ‘पूज्य साने गुरुजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वस्त देखील केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना या आगामी संमेलनाचे निमंत्रण दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही केवळ खान्देशसाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनातील विचार मंथनातून राज्यातील साहित्यिक चळवळीला दिशा मिळेल. ज्यातून राज्याच्या हिताच्या उपक्रमांनाही चालना देता येईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खान्देशला मोठी साहित्यिक परंपरा लाभली आहे. यामुळे हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेतली. संमेलनासाठी शासनातर्फे सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे सांगत त्यांनी संमेलनाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.


राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

 राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

       मुंबईदि.३० : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावेअसे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

       सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री श्री.आठवले यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत विविध विभागांकडून आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

     यावेळी रेल्वे विभागाच्या जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टयांचे पुनर्वसन करणेमागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची अंमलबजावणीमहात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंगीकृत्त उपक्रम महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रोद्यौगिकी मर्या. (महाप्रित) यांच्या विविध योजनास्कॉलरशिप योजनेमध्ये ॲटोरिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणेअनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

      सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिगंळे यांनी यावेळी सादरीकरण करून विविध योजनांची माहिती करून दिली.

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगेसमाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरियामहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे,मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण) वंदना कोचुरे यांच्यासह गृह विभागनगरविकास विभागउद्योगऊर्जा व कामगार विभागविधि व न्याय विभाग,  संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळमध्य व पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन "राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार राज्य, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी अनुदानात वाढ

 ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन "राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार

राज्यराष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह

साजरा करण्यासाठी अनुदानात वाढ

- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. ३० : ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, १५ जानेवारी हा दरवर्षी "राज्य क्रीडा दिन" म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

             मंत्री श्री. बनसोडे म्हणालेभारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावात्यातून राज्यातील विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावीयासाठी त्यांचा जन्मदिवस, १५ जानेवारी हा राज्याचा क्रीडा दिन’ म्हणून प्रतीवर्षी सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.

            राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास पूर्वी १० हजार अनुदान देण्यात येत होते. त्यात वाढ करुन प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजारराष्ट्रीय क्रीडा दिनासाठी ५० हजार तर क्रीडा सप्ताहासाठी १ लाख रुपये असे एकूण २ लाख २५ हजार सुधारित अनुदान देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. तसेच पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा वितरण समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य क्रीडा दिन साजरा करण्यासाठी भरीव अनुदान उपलब्ध करुन दिले. त्याबद्दल मंत्री श्री. बनसोडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

राज्य क्रीडा दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

            क्रीडा व युवक सेवा संचनालयक्रीडा प्रबोधिनीक्रीडा संकुलेप्राथमिकमाध्यमिक शाळाकनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयेशासकीय तसेच खासगी विद्यापीठेक्रीडा संस्थामंडळे अकादमीक्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. यावेळी स्व. खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यानक्रीडा रॅलीमॅरेथॉनमार्गदर्शन शिबिरखेळाडूंशी संवादक्रीडा पुरस्काराचे वितरणराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरवक्रीडा उपक्रमांचे आयोजन राज्य क्रीडा दिनानिमित्त करण्यात येणार आहे. त्यास क्रीडा प्रेमींनी उत्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा मंत्री श्री. बनसोडे यांनी केले आहे.

0000


 

Featured post

Lakshvedhi