Friday, 29 December 2023

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या

 सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी

मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या

- मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश

            नवी दिल्लीदि. 28 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री श्री.वैष्णव यांनी मंत्री श्री.केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणेकेंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन’ आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणेसावंतवाडी स्थानकामध्ये पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या व याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास दिल्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या (केआरपीए) मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. केसरकर यांनी मंत्री श्री.वैष्णव यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती.

            सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी थांबले आहे. यासाठी आवश्यक असलेला नऊ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून कामाला गती द्यावीअशी विनंती मंत्री श्री.केसरकर यांनी केली होती. यास रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोकणातील प्रवाश्यांना अधिक चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने सावंतवाडी स्थानकाचा केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन’ आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये समावेश करण्यात यावाया मागणीला देखील तत्काळ प्रतिसाद देत श्री.वैष्णव यांनी मान्यता दिली. सर्व प्रवाशांबरोबरच विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारी पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्ट‍िम सावंतवाडी स्थानकावर सुरू करण्यास देखील त्यांनी होकार दर्शविला.

            याशिवाय गाडी क्रमांक २२६५३२२६५४२२६५५२२६५६ यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा देणेमुंबई - मंगलोर एक्सप्रेसलोकमान्य टिळक टर्मिनस - मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेसमुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसएर्नाकुलम हजरत निझामुद्दीन मंगला एक्सप्रेसलोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेसएर्नाकुलम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)त्रिवेंद्रम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)एर्नाकुलम - अजमेर मरूसागर एक्सप्रेस (साप्ता.)लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)एर्नाकुलम - ओखा एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर नियमित थांबा देण्याची विनंती देखील मंत्री श्री.वैष्णव यांनी मान्य केली. सावंतवाडी स्थानकावरून चांगले उत्पन्न असताना देखील नागपूर - मडगाव स्पेशल एक्सप्रेसचा रद्द केलेला सावंतवाडी स्थानकावरील थांबा तत्काळ सुरू करण्यात यावाया मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री श्री.वैष्णव यांनी ही मागणी मान्य केली.

            या बाबींचा लाभ केवळ कोकणातील नव्हे, तर या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाश्यांना होणार असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी या मागण्या मान्य केल्याबद्दल तसेच वेळोवेळी केलेल्या रेल्वेसंदर्भातील मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दल रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांचे वैयक्तिक तसेच केआरपीएच्या वतीने आभार मानले आहेत.

००००

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या - मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश नवी दिल्ली, दि. 28 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री श्री.वैष्णव यांनी मंत्री श्री.केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणे, केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणे, सावंतवाडी स्थानकामध्ये पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या व याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास दिल्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या (केआरपीए) मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. केसरकर यांनी मंत्री श्री.वैष्णव यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती. सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी थांबले आहे. यासाठी आवश्यक असलेला नऊ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून कामाला गती द्यावी, अशी विनंती मंत्री श्री.केसरकर यांनी केली होती. यास रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोकणातील प्रवाश्यांना अधिक चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने सावंतवाडी स्थानकाचा केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीला देखील तत्काळ प्रतिसाद देत श्री.वैष्णव यांनी मान्यता दिली. सर्व प्रवाशांबरोबरच विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारी पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्ट‍िम सावंतवाडी स्थानकावर सुरू करण्यास देखील त्यांनी होकार दर्शविला. याशिवाय गाडी क्रमांक २२६५३, २२६५४, २२६५५, २२६५६ यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा देणे, मुंबई - मंगलोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस - मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, एर्नाकुलम हजरत निझामुद्दीन मंगला एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेस, एर्नाकुलम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), त्रिवेंद्रम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), एर्नाकुलम - अजमेर मरूसागर एक्सप्रेस (साप्ता.), लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), एर्नाकुलम - ओखा एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर नियमित थांबा देण्याची विनंती देखील मंत्री श्री.वैष्णव यांनी मान्य केली. सावंतवाडी स्थानकावरून चांगले उत्पन्न असताना देखील नागपूर - मडगाव स्पेशल एक्सप्रेसचा रद्द केलेला सावंतवाडी स्थानकावरील थांबा तत्काळ सुरू करण्यात यावा, या मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री श्री.वैष्णव यांनी ही मागणी मान्य केली. या बाबींचा लाभ केवळ कोकणातील नव्हे, तर या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाश्यांना होणार असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी या मागण्या मान्य केल्याबद्दल तसेच वेळोवेळी केलेल्या रेल्वेसंदर्भातील मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दल रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांचे वैयक्तिक तसेच केआरपीएच्या वतीने आभार मानले आहेत. ००००

 सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी

मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या

- मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश

            नवी दिल्लीदि. 28 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री श्री.वैष्णव यांनी मंत्री श्री.केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणेकेंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन’ आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणेसावंतवाडी स्थानकामध्ये पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या व याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास दिल्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या (केआरपीए) मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. केसरकर यांनी मंत्री श्री.वैष्णव यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती.

            सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी थांबले आहे. यासाठी आवश्यक असलेला नऊ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून कामाला गती द्यावीअशी विनंती मंत्री श्री.केसरकर यांनी केली होती. यास रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोकणातील प्रवाश्यांना अधिक चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने सावंतवाडी स्थानकाचा केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन’ आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये समावेश करण्यात यावाया मागणीला देखील तत्काळ प्रतिसाद देत श्री.वैष्णव यांनी मान्यता दिली. सर्व प्रवाशांबरोबरच विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारी पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्ट‍िम सावंतवाडी स्थानकावर सुरू करण्यास देखील त्यांनी होकार दर्शविला.

            याशिवाय गाडी क्रमांक २२६५३२२६५४२२६५५२२६५६ यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा देणेमुंबई - मंगलोर एक्सप्रेसलोकमान्य टिळक टर्मिनस - मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेसमुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसएर्नाकुलम हजरत निझामुद्दीन मंगला एक्सप्रेसलोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेसएर्नाकुलम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)त्रिवेंद्रम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)एर्नाकुलम - अजमेर मरूसागर एक्सप्रेस (साप्ता.)लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)एर्नाकुलम - ओखा एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर नियमित थांबा देण्याची विनंती देखील मंत्री श्री.वैष्णव यांनी मान्य केली. सावंतवाडी स्थानकावरून चांगले उत्पन्न असताना देखील नागपूर - मडगाव स्पेशल एक्सप्रेसचा रद्द केलेला सावंतवाडी स्थानकावरील थांबा तत्काळ सुरू करण्यात यावाया मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री श्री.वैष्णव यांनी ही मागणी मान्य केली.

            या बाबींचा लाभ केवळ कोकणातील नव्हे, तर या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाश्यांना होणार असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी या मागण्या मान्य केल्याबद्दल तसेच वेळोवेळी केलेल्या रेल्वेसंदर्भातील मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दल रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांचे वैयक्तिक तसेच केआरपीएच्या वतीने आभार मानले आहेत.

००००

कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राज्य बॅंकेने प्रशिक्षण केंद्र सुरु करावे

 कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी

राज्य बॅंकेने प्रशिक्षण केंद्र सुरु करावे

– मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबईदि. 28 : सहकार क्षेत्रात सातत्याने वेगवेगळे बदल होत आहेत. याशिवायकेंद्र सरकार नवीन सहकार धोरण तयार करत आहे. सहकारातील या बदलांची माहिती आणि अभ्यास हा विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधील सचिव ते बँकेच्या व्यवस्थापकांपर्यंत सर्वांचा हवा. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने स्वतःचे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू करावेअसे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बँकिंग दिनदर्शिका २०२४चे प्रकाशन सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्करमाजी मंत्री आनंदराव अडसूळबँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघेअनंत भुईभारतेजल कोरडेलीलाताई अनास्कर आदी यावेळी उपस्थिती होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणालेबँक आणि येथील व्यवस्थापनाने आर्थिक शिस्त वाढवली. अडचणीतून बाहेर काढून आज चांगल्या स्थितीला आपण आलो. अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. बँकेचे सगळ्यात महत्वाचे काम हे कृषी क्षेत्राला अर्थसाह्य करण्याचे आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहते. सध्या राज्यातील सगळ्या भूविकास बँका बंद पडल्या आहेत, तर 5-6 जिल्हा बँका तग धरून आहेत. इतर जिल्हा बॅंकांची स्थिती ही आजारी पडल्यासारखी आहे. अशा बॅंकांना मदत केल्याशिवाय त्या उभ्या राहणार नाहीत. राज्य बँकेने जिल्हा बँकेला मदत केली नाही तर त्या बँका विविध कार्यकारी सहकारी संस्थेला मदत करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मदत मिळत नाही. गावपातळीवर शेतकऱ्यांना बॅंकेने मदत केली पाहिजेअसे ते म्हणाले.

            सध्या केंद्र सरकारचे नवीन सहकार धोरण तयार होत आहे. प्राथमिक सहकारी सेवा संस्थांची बळकटीकरणावर यामध्ये भर देण्यात आला आहे. सर्व सहकारी संस्था एकमेकांना जोडण्याची (लिंक करण्याची) तरतूद यामध्ये आहे. अशावेळी विकास संस्थापतसंस्थानागरी सहकारी बॅंका येथील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मंत्री श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

            राज्य सहकारी बॅंकेने राबविलेली आत्मनिर्भर कर्ज योजना अतिशय चांगली आहे. कोविड नंतर आपण आत्मनिर्भर कर्ज योजनेतून अनेक कारखाने आणि संस्थांना मदत केली. त्यामुळे या संस्था काहीशा सुस्थितीत येऊ शकल्या. विविध प्राथमिक सहकारी संस्थांना बळकटी आणण्यासाठी आता प्रयत्न होत आहेत. त्यासाठी काय योजना आणता येतीलत्यादृष्टीनेही राज्य सहकारी बॅंकेने पावले उचलावीतअसे मंत्री श्री. वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. सहकारविषयक धोरणात सातत्य असणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

            बॅंकेचे प्रशासक श्री. अनास्कर यांनी यावेळी बॅंकेने गेल्या काही वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. देशातील राज्य सहकारी बॅंकामध्ये सर्वात जास्त स्व-निधीसर्वात जास्त 45 हजार कोटी रुपयांचे व्यवहार609 कोटी रुपये निव्वळ नफासुरक्षा व्यवस्थापनात आयएसओ मानांकन मिळविणारी ही एकमेव बॅंक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

            बॅंकिंग दिनदर्शिका -2024 मध्ये आर्थिक शिस्त आणि व्यवहारांविषयीची माहिती देण्यात आल्याचे ते म्हणाले.

0000

Thursday, 28 December 2023

जेएन- 1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी

 जेएन- 1’ घातक नाहीनागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 28 : राज्यात कोरोनाच्या जेएन-1’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आले असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. कोरोनाचा जेएन-1’ हा नवीन  उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावेअसे आवाहन मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

               ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आले आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक आज झाली.

                आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरजकुमारसर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहानगरपालिकांचे आयुक्तजिल्हा आरोग्य अधिकारीमहानगरपालिका आरोग्य अधिकारीजिल्हा शल्यचिकित्सकतसेच टास्क फोर्सचे सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरबी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्तेपुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदारनवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदमआरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्य:स्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले. 

                 ‘जेएन-1’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रशासकीय रुग्णालयांमध्ये रंगीत तालीम झालेली नाही तेथे ती करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्यात्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळेधार्मिक स्थळी जातात. मात्र, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नयेअसे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतीलत्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहेत्यामुळे पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सुचविल्या जातीलअसेही त्यांनी सांगितले.

            टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलेजेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईलअशी परिस्थिती सध्या नाही. मात्र, तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.  उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. कानिटकरडॉ. कार्यकर्तेडॉ. पोतदारडॉ. कदम यांनी विविध सूचना केल्या.

****

प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

 प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

                मुंबईदि. 28 : ‘म्हाडा’च्या माध्यमातून मुंबई परिसरात गृहनिर्माण पुनर्विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.   

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीस गृहनिर्माण मंत्री अतुल सावेकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगृहनिर्माण विभागाशी संबंधित शासनाकडे प्रलंबित असलेले विषय तातडीने मार्गी लावावेत. गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात यावा. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात कामे अधिक वेगाने करावीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येथील आदिवासी व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी ‘म्हाडा’ व नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करण्यात यावाअसे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

            सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिका पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. एलआयसी कॉलनी पुनर्विकासाबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच ९१(अ) अंतर्गत रखडलेल्या प्रकल्पाबाबत प्राप्त प्रस्तावांना म्हाडाने गती द्यावी, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या.

******

सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित

 सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन

साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित

 

            मुंबईदि. 27 सन 2024 मध्ये राष्ट्रपुरूषथोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम साजरे करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. यामध्ये दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीसाप्ताहिक सुट्टी आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करावेतअन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेतअसे परिपत्रकात नमूद आहे.

              परिपत्रकामधील सर्व कार्यक्रम विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातीलजिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याबाबत सूचना देऊन अंमलबजावणीबाबत कार्यवाही करावीअसेही परिपत्रकात नमूद आहे.

****

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा  

सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर


मुंबई, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- (अनुक्रमे पुनरीक्षण उपक्रम, कालावधी, सुधारित कालावधी या क्रमाने) : दावे व हरकती निकालात काढणे - २६ डिसेंबर २०२३ पर्यंत, १२ जानेवारी २०२४. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई - १ जानेवारी २०२४, १७ जानेवारी २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे - ५ जानेवारी २०२४, २२ जानेवारी २०२४ रोजी होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi