Thursday, 28 December 2023

प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

 प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

                मुंबईदि. 28 : ‘म्हाडा’च्या माध्यमातून मुंबई परिसरात गृहनिर्माण पुनर्विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.   

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीस गृहनिर्माण मंत्री अतुल सावेकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगृहनिर्माण विभागाशी संबंधित शासनाकडे प्रलंबित असलेले विषय तातडीने मार्गी लावावेत. गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात यावा. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात कामे अधिक वेगाने करावीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येथील आदिवासी व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी ‘म्हाडा’ व नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करण्यात यावाअसे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

            सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिका पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. एलआयसी कॉलनी पुनर्विकासाबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच ९१(अ) अंतर्गत रखडलेल्या प्रकल्पाबाबत प्राप्त प्रस्तावांना म्हाडाने गती द्यावी, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या.

******

सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित

 सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन

साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित

 

            मुंबईदि. 27 सन 2024 मध्ये राष्ट्रपुरूषथोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम साजरे करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. यामध्ये दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीसाप्ताहिक सुट्टी आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करावेतअन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेतअसे परिपत्रकात नमूद आहे.

              परिपत्रकामधील सर्व कार्यक्रम विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातीलजिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याबाबत सूचना देऊन अंमलबजावणीबाबत कार्यवाही करावीअसेही परिपत्रकात नमूद आहे.

****

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा  

सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर


मुंबई, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- (अनुक्रमे पुनरीक्षण उपक्रम, कालावधी, सुधारित कालावधी या क्रमाने) : दावे व हरकती निकालात काढणे - २६ डिसेंबर २०२३ पर्यंत, १२ जानेवारी २०२४. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई - १ जानेवारी २०२४, १७ जानेवारी २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे - ५ जानेवारी २०२४, २२ जानेवारी २०२४ रोजी होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत 10 पट वाढ

 राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत 10 पट वाढ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

            चंद्रपूरदि. 27 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावीयासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            बल्लारपूर (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकूल येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            तर बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतीलअशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भारतात घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमधून मिशन ऑलिम्पिक ची सुरवात झाली असून सन 2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू नक्कीच पदक मिळवतीलअसा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

            उद्घाटन समारंभाला आमदार रामदास आंबटकरअपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताप्रधान सचिव विकास खारगेसांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चावरेजिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनपोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेते बहाद्दूरसिंह चव्हाणधावपटू हिमा दासललिता बाबरबैडमिंटनपटू मालविका बनसोड आदी उपस्थित होते.

            खेलो इंडियाफिट इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेतअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की2036 मध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

            चंद्रपूरचे नाव देशभरात अभिमानाने घेतले जाईल, असे या क्रीडा स्पर्धाचे आयोजन असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जाहीर झाल्याची घोषणा तसेच मिशन ऑलिम्पिक ची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.  

भविष्यात पदक प्राप्त खेळाडू मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            बल्लारपुरात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात पदक प्राप्त करणारे खेळाडू मिळतीलअसा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढील ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

            राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतून भविष्यात देशाचे नाव कमावणारे खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खेळामुळे खेळातून आत्मविश्वास निर्माण होतो खेळ भावनेतूनच व्यक्तिमत्व पूर्ण होते. देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळाडूंनी खेळावेअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आवाहन केले

मिशन ऑलिम्पिक  2036 मध्ये चंद्रपूरचे खेळाडू पदक मिळवतील – पालकमंत्री मुनगंटीवार

            चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. वाघांच्या भूमीत खेळाडू वाघांसारखा पराक्रम करतीलअशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीमिशन ऑलिम्पिक  2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू पदक मिळवतील. या स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परिश्रम घेतले आहेत. खेळाडूंना कोणतीही समस्या जाणवणार नाही. त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोतअसे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

            संपूर्ण देशभरातून येथे खेळाडू आले आहेत. या स्पर्धेचे आयोजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिशन ऑलिम्पिक  2036 चे लाँचिंग येथे करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.  

             सुरवातीला मान्यवरांनी बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मनजित कुमार या खेळाडूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्रीडा ज्योत सुपूर्द केली. यावेळी संदीप गोंड या खेळाडूने शपथ दिली.

            अभूतपूर्व उद्घाटन सोहळा : उद्घाटन समारंभात शाल्मली खोलगडे यांनी सादर केलेला लाइव्ह’ परफॉर्मन्स सोबतच फायर शोलेझर शोॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरले.

            खेळाडूंचे ध्वजसंचलन : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बल्लारपूर येथे दाखल झालेल्या सर्व राज्यातील खेळाडूंनी ध्वजसंचलन करीत आपापल्या राज्याचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 1551 खेळाडू दाखल झाले आहेत.

            चंद्रपूर गॅझेटिअर व ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे विमोचन : पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर प्रथमच मराठी भाषेत प्रकाशित होत आहे. या गॅझेटिअरचे तसेच येथे आलेल्या खेळाडूंना चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिकसांस्कृतिक वारसाची माहिती व्हावीया उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००००

Wednesday, 27 December 2023

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची 'दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची

'दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखतशिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची


'दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 

मुंबईदि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात   बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग गुरुवार दि. 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

शैक्षणिक प्रशासनात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबद्दल सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (एनआयईपीए)नवी दिल्ली या संस्थेद्वारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्नत्याचबरोबर मोफत शिक्षणाची समान संधी आणि भौतिक सुविधांची उपलब्धता करून देणे  तसेच महानगरपालिका शाळांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावाया शाळांमधील पटसंख्येत वाढ व्हावी यासाठी मिशन अॅडमिशनएकच लक्ष्य - एक लक्ष ’ ही विशेष मोहीम राबविणे  तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजनांबाबत शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000


जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे

 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुलाखत

 

मुंबईदि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'डीप क्लीनिंग ड्राइव्हमोहिमेची अंमलबजावणीया विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

स्वच्छसुंदर मुंबईसाठी महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेने 'डीप क्लिनिंग ड्राइव्हमोहीम सुरु केली आहे. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मुंबईमधील विविध भागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्वच्छता करण्यात येत आहे. या मोहिमेचे नियोजनअंमलबजावणी व नागरिकांचा सहभाग याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

 ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवारदि. 28 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


कोविड’ उपाययोजनांसाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना

 कोविड’ उपाययोजनांसाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना

मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

            मुंबईदि. 26: कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रणत्यावर उपाययोजना करण्यासाठी दि. १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज दिली.

            या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआरदिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठनाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकरवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालकबी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश  कार्यकर्तेनवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदारनवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्तआरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            गंभीर व अतिगंभीर आजारी कोविड-१९ रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणेकोविड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणेगंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहेअशी माहितीही आरोग्य मंत्री प्रा.डॉ सावंत यांनी दिली.


Featured post

Lakshvedhi