Wednesday, 27 December 2023

आजचे गिरनार पर्वतावर धुनी चे दर्शन👏👏👏👏*🙏🌸🚩

 *आजचे गिरनार पर्वतावर धुनी चे दर्शन👏👏👏👏*🙏🌸🚩


दत्ताची खुप जुनी आणि मुळ आरती

 दत्ताची खुप जुनी आणि मुळ आरती


नी आणि मुळ आरती .👆🏽 

प्रत्येक कडव्यातील शेवटच्या ओळीतले एकाच पट्टीतले विशेषालंकार 

जसे ... 

नमन,शमन,गमन,धमन

तरतरीत,जळजळीत,गरगरीत, 

भजन, पूजन, सुजन


फारच सुखावह आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. आपणही लक्षपूर्वक ऐकून सुखानंद घ्या !! ☺️ 🙏🏻

किती देता बोला की

 आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .


तलाठ्यानं सांगितलं -

काम करू पण,

 देणार किती ?

मला वाटलं शेती आमची, 

बाप माझा, 

आजा माझा.

मग याला का पैसे द्यायचे ?


तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.

पोलीस म्हणाले -

 गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .

आमच्या चहा पाण्याचं काय ?


मला पुन्हा राग आला.

यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.


म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,

आमदार म्हटले . . .

 त्याची गडचिरोलीला बदली करू, 

त्याला निलंबित करू,

मंत्र्यांना भेटू पण . . .

वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.


मला वाईट वाटलं.

यांना तर मी मतदान केलं होतं.


वाटलं कोर्टात जाऊ . . .

गेलो.

तिथं गेल्यावर कळलं की,

तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे. 


तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.

अजून निकाल लागला नव्हता.

शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती. 


म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार, 

लेखक, 

कवीला सांगावं . . .

मन हलकं करावं ! आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.


तिकडे गेलो s s

तर सगळेच म्हणाले, 

पेन आमच्या हातात असला तरी,

त्यातली शाई आम्ही विकली आहे.

आम्ही तसं लिहू शकत नाही.

आमचे हात अन . . .

पेन बांधलेले आहेत. 


मला याचा प्रचंड राग आला होता.

म्हणून एका साधू कडे गेलो.

वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.

मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .

उद्या या !


सध्या भाऊसाहेब,

 P I साहेब, 

आमदार साहेब, 

पत्रकार साहेब,

लेखक, 

कवी आले आहेत.

महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत, 

नंतर . . .

 त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत. 

आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.


माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.

म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ ...!


लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.

लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .

हल्ली काही बरळतोय् !

नंतर कळलं . . .

लोकं गुलाम झाली आहेत !

लाचार झाली आहेत !


क्षणभर वाईट वाटलं.


मी करणार तरी काय होतो.


त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?

कि मारावं यांना . . .

😢 😢

नाही पण मी यातलं काही करणार नाही.माझा सत्यावर विश्वास आहे.निश्चित एक दिवस परिस्थिती बदलेल.भ्रष्टाचार ही मानसिकता जरुर बदलेल.

हरिओम तत् सत् 🌹


- मी एक मतदार !

( या देशाचा मालक की सेवक ? )

Tuesday, 26 December 2023

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

 महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

'महालक्ष्मी सरसप्रदर्शनाचे उद्घाटन, 513 स्टॉलचा समावेश

मुंबईदि.२६: ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावीप्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'महालक्ष्मी सरस'च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

एमएमआरडीए मैदान,वांद्रे (पूर्व)  येथे 'महालक्ष्मी सरस२०२३-२४ या  बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या उद्धघाटनानंतर ग्रामविकास मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, 'नाबार्ड'चे व्यवस्थापकीय संचालक रेमंड डिसोजामहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊतग्रामविकास विभागाचे उपसचिव के. पी. पाटीलउपायुक्त विकास कोकण विभाग गिरीश भालेरावग्रामविकास विभागातील अधिकारी,  महिला बचत गटाच्या सदस्य यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, 'महालक्ष्मी सरसमध्ये स्टॉल मिळावा यासाठी महिला आग्रही आहेत. या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आता महिला बचत गटांमध्ये देखील स्पर्धा निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी बचतगटांच्या माध्यमातून 17 कोटी रुपयांच्यावर उत्पादनांची विक्री झाली आहे. यंदा या विक्रीमध्ये वाढ होऊन 25 कोटी रुपयांच्यावर वस्तूंची विक्री होईल. त्याचबरोबर प्रत्येक विभागनिहाय महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्याबाबत  विचार करणार असून याबाबत लवकरच अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सहा लाख बचतगटांना सन 2022 -23 मध्ये सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. तर यामध्ये वाढ होऊन 23-24 मध्ये हा कर्ज वितरण पुरवठा 7 हजार कोटी पर्यंत बचतगटांना कर्ज मिळाले आहे. महिला बचत गटांनी घेतलेले कर्ज फेडण्याचे प्रमाण हे 98 टक्के आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या प्रमाणापेक्षा महिला बचत गटांनी केलेली कर्ज परतफेड सर्वात अधिक आहे, असेही मंत्री श्री. महाजन म्हणाले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांचा विकास करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी देशात प्रभावीपणे केली आहे. महिलांचे परिश्रम कमी व्हावेत यासाठी उज्ज्वला गॅस योजनाप्रत्येक वाडीपर्यंत रस्तेप्रत्येकाला राहण्यासाठी घरकुलप्रत्येक घरामध्ये शौचालयगरीब व गरजूंना मोफत अन्नधान्य वितरण यासारख्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. आज अनेक बचतगटांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोटी रुपयांचे कर्ज मिळत आहे. बचत गटांच्या प्रामाणिकपणाचे हे यश आहे. बचतगटांनी तयार केलेले उत्पादन जागतिक बाजारपेठेत टिकले पाहिजे.

प्रधान साचिव श्री.डवले म्हणालेबचत गटांकडून घेतलेले कर्ज फेडीचे ९८ टक्के प्रमाण आहे. त्यामुळे बचत गटांना बँका कर्जपुरवठा करण्यास नेहमी उत्सुक आहेत. पंतप्रधान आवास योजनाविकसित भारत त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि शासनाच्या विविध योजना एकत्रितपणे राबवत आहोत याचा लाभ बचतगटांना होत आहे. बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे.

   नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डिसोजा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे अतिरिक्त संचालक श्री. राऊत यांनी आभार मानले.

महालक्ष्मी सरस  प्रदर्शन व विक्री

८ जानेवारी २०२४ पर्यंत

राज्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकरीता सन २०११ पासून ग्राम विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून त्यांना एक उद्योजक म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण करण्यात येत आहे. अभियानांतर्गत महिलांच्या उपजिविकेवर भर देण्यात येत असून आतापर्यंत ६ लाख ३० हजार ०४० स्वयं सहायता समूह३१ हजार ३७०  ग्रामसंघ१ हजार ८५० प्रभागसंघ३०७ महिला शेतकरी उत्पादक कंपनी व १० हजार ४१४ उत्पादक गट स्थापित झालेले आहेत. सुमारे ६० लाखांपेक्षा जास्त महिला अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या आहेत.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या करीता राज्यविभाग व जिल्हास्तरावर प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते. सन २००४ पासून ग्राम विकास विभागातंर्गत मुंबई येथे 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच समूहांतील सदस्यांना विवीध राज्यातील उत्पादनेविक्री व बाजारपेठेची माहिती देणे व राज्या- राज्यातील लोकांचे राहणीमानखाद्यसंस्कृती व कलाकुसर इ.चा परस्परांना परिचय करुन देणे. शहरी भागातील लोकांना अस्सल देशी-गावरान वस्तू आणि पदार्थ उपलव्ध करुन देणे हा आहे.  

यावर्षी महालक्ष्मी सरस मध्ये एकूण ५१३ स्टॉल असूनमहाराष्ट्रातील २५५, देशभरातून येणारे इतर राज्यांचे ११८ आणि नाबार्ड चे ५० उर्वरित स्टॉल हे नावीन्यपूर्ण प्रकारचे  आहेत. यावेळी महाराष्ट्रातून जी उत्पादने येत आहेत त्यामध्ये त्या -त्या जिल्ह्यांची ओळख सांगणारे उत्पादने आहेत. मुंबईकरांना या प्रदर्शनातून खात्रीचा माल किंवा वस्तू मिळतील देशभरातील अस्सल चवी  चाखण्यास मिळतीलकलाकुसर अनुभवायला मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाल्यास ग्रामीण महिलांच्या या प्रयत्नांना हातभार  लागणार आहे.  वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ८ जानेवारी २०२४ पर्यंत असलेल्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची 113 वी बैठक संपन्न

 महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची 113 वी बैठक संपन्न

मुंबई, दि.26 : महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची 113 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे झाली.


 या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषी मंत्री श्री. मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून मंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.


या बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सदस्य डॉ. विवेक दामले, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी परिषदेचे संचालक हेमंत पाटील. डॉ. हरिहर कौसडीकर आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

बाबा जोरावरसिंग, बाबा फतेहसिंग यांच्या शौर्याला अभिवादन

 बाबा जोरावरसिंग, बाबा फतेहसिंग यांच्या शौर्याला अभिवादन

 

            नवी दिल्ली 26:  देशात 26 डिसेंबर हा दिवस  वीर बाल दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस गुरु गोबिंद सिंगांचे सुपूत्र साहिबजादा बाबा जोरावरसिंग आणि साहिबजादा बाबा फतेहसिंग यांच्या पराक्रम आणि बलिदानाची आठवण म्हणून पाळला जातो. यानिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त  रुपिंदर सिंग यांनी बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

          महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक(माहिती) अमरज्योतकौर अरोरा यांनी  बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित  कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

जे. जे. रुग्णालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे

 जे. जे. रुग्णालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या

नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे

- मंत्री हसन मुश्रीफ

          मुंबईदि. २६ :- सर ज.जी. समूह रुग्णालयाच्या आवारातील अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी नवीन बहुमजली इमारतीचे काम ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करण्यात यावे. या दृष्टीने सुरु असलेल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा दर १५ दिवसांनी घेण्यात यावाअसे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

          वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध विषयांबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर आदी प्रत्यक्षाततर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार डॉ. बालाजी किणीकरविविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

          विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या नवीन बांधकामांबाबत आढावा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घेतला. यामध्ये साताराजळगावसिंधुदुर्गनाशिक येथील महाविद्यालयरुग्णालयअधिष्ठाता व डॉक्टारांची निवासस्थानेविद्यार्थी वसतिगृहांची कामे प्रगतिपथावर असून याबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच अंबरनाथपालघरभंडारागडचिरोलीजालना येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जागांची उपलब्धतात्यासाठी शासकीय जमिनींचे हस्तांतरणनिधी वितरण यासाठी आढावा घेऊन संबंधितांना निर्देश देण्यात आले.

          सर ज.जी. रुग्णालय आणि ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी सुरु केलेल्या संपाबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. याप्रसंगी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. विभागातील ४,४९६ तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती प्रक्रिया केली जात असून पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश दिले जावेतअशी सूचना यावेळी करण्यात आली.

Featured post

Lakshvedhi