Sunday, 24 December 2023

श्री सिद्धिविनायक dylisis सेंटर

 



ज्यांनी ही कविता लिहिली 1खूपच सुंदर कविता*

 *ज्यांनी ही कविता लिहिली त्यांना  100 तोफांची सलामी*

*खूपच सुंदर कविता*


*_🙏Nice🙏_* 


*_पूर्वीचा काळ बाबा,_*

*_खरंच होता चांगला,_*

*_साधे घरं साधी माणसं,_*

*_कुठे होता बंगला ?_*


                     *घरं जरी साधेच पण,*

                     *माणसं होती मायाळू,* 

                     *साधी राहणी चटणी भाकरी,* 

                     *देवभोळी अन श्रद्धाळू.*


*_सख्खे काय चुलत काय,_* 

*_सगळेच आपले वाटायचे,_*

*_सुख असो दुःख असो,_* 

*_आपुलकीने भेटायचे._*


                    *पाहुणा दारात दिसला की,* 

                    *खूपच आनंद व्हायचा हो,*

                    *हसून खेळून गप्पा मारून,*

                    *शीण निघून जायचा हो.*


*_श्रीमंती जरी नसली तरी,_*

*_एकट कधी वाटलं नाही,_*

*_खिसे फाटके असले तरीही,_*

*_कोणतंच काम रुकलं नाही._*


                    *उसनं पासनं करायचे पण,* 

                    *पोटभर खाऊ घालायचे,*

                    *पैसे आडके नव्हते तरीही,*

                    *मन मोकळं बोलायचे.*


*_कणकेच्या उपम्या सोबत,_* 

*_गुळाचा शिरा हटायचा,_*

*_पत्रावळ जरी असली तरी,_*

*_पाट , तांब्या मिळायचा._* 


                    *लपाछपी पळापळी,* 

                    *बिन पैशाचे खेळ हो,*

                    *कुणीच कुठे busy नव्हते,*

                    *होता वेळच वेळ हो.* 


*_चिरेबंदी वाडे सुद्धा,_*

*_खळखळून हसायचे,_*

*_निवांत गप्पा मारीत माणसं,_* 

*_ओसरीवर  बसायचे._*


                    *सुख शांती समाधान " ते "*

                    *आता कुठे दिसते का ?*

                    *पॉश पॉश घरा मधे,*

                    *" तशी " मैफिल सजते का ?*


*_नाते गोते घट्ट होते,_*

*_किंमत होती माणसाला,_*

*_प्रेमामुळे चव होती,_*

*_अंगणातल्या फणसाला._* 


                    *तुम्हीच सांगा नात्या मध्ये,*

                    *राहिला आहे का राम ?*

                    *भावाकडे बहिणीचा हो,* 

                    *असतो का मुक्काम  ?*


*_सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,_* 

*_कुणीच कुणाला बोलत नाही,_*

*_मृदंगाच्या ताला वरती,_*

*_गाव आता का डोलत नाही._* 


                    *प्रेम , माया , आपुलकी हे,*

                    *शब्द आम्हाला गावतील का ?*

                    *बैठकीतल्या सतरंजीवर,*

                    *पुन्हा पाहुणे मावतील का ?*


*_तुटक तुसडे वागण्यामुळे,_*

*_मजा आता कमी झाली,_*

*_श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,_*

*_सुदामाची सुट्टी झाली._* 


                    *हॉल किचन बेड मधे,*

                    *प्रदर्शन असतं वस्तूंचं,*

                    *का बरं विसर्जन झालं,* 

                    *चांगुलपणाच्या अस्थीचं ?**

💐💐🙏💐💐

पार्ले महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 पार्ले महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 





पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी

— उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 23: पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज पार्ले महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार पूनम महाजनआमदार पराग अळवणीमाजी मंत्री डॉ. दीपक सावंतअभिनेत्री सुधा चंद्रनअभिनेते शैलेश दातारसाठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडेसारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूरज्योती अळवणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले कीमुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवाने ओळख निर्माण केली आहे. संस्कृती(Culture), खाद्य संस्कृती (Cusine) आणि कलाकार (Celebrity) यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला.

पार्ले महोत्सवाचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्याने या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव त्यांना आपला वाटतो. येणाऱ्या काळात येथील फॅनेल झोन आणि विमानतळ जवळील झोपडपट्टी पुनवर्सन विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

खासदार श्रीमती महाजन म्हणाल्या कीउत्तम आयोजनउत्तम परीक्षकउत्तम स्पर्धक यामुळे पार्लेकर यांना हा महोत्सव आपला वाटतो यातच याचे यश आहे.

विलेपार्ले कल्चर सेंटरकडून पार्ले महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाचे 23 वे वर्ष आहे. यावर्षी या महोत्सवादरम्यान वेगवेगळया 32 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये 30 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. 30 डिसेंबरपर्यंत चालणारा हा महोत्सव विलेपार्ले येथील वामन मंगेश दुभाषी मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

पार्ले महोत्सवाचे उद्घाटन प्रास्ताविक आमदार पराग अळवणी यांनी केले. तसेच यावेळी पार्ले महोत्सवासाठी तयार करण्यात आलेले गाणे कार्यक्रमादरम्यान वाजविण्यात आले.

साठ्ये महाविद्यालयास प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर तर नृत्य स्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी नगर असे नाव देण्यात आले आहे.

00000

*डाॅक्टरकडे जाताय.......* *एकदा वाचा !*

 *डाॅक्टरकडे जाताय.......*

*एकदा वाचा !*


*ADR  म्हणजे अडवर्स ड्रग रिअक्शन - संपूर्ण  जगामध्ये  मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे.* आपण जी अलोपॅथिक औषधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते. 


सर्वच प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, आय.सी. सी.यु. युनिट्स आहेत, मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत,नेओनेटलॉजि युनिट्स आहेत तिथे लोकांचे आरोग्य खराब आहे असे UNO 2007 च्या सर्वेक्षनामध्ये नमूद करण्यात आले आहे.


कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी 11लाख लोकांना मधुमेह (Diabetis) होतो.


आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगात खळबळ उडूवून दिली आहे त्या पुस्तकाचे नाव आहे *"ओव्हर डोस अमेरिका"* या पुस्तकाचे लेखक डॉ.जॉन अब्राहमसन या सुप्रसिद्ध अमेरिकन लेखकाने संपूर्ण जगाला पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की,अमेरिकेसहित संपूर्ण जगाचे स्वास्थ्य अलोपॅथिक औषधांमुळे कसे खालावत चालले आहे. लेखक हे सुप्रसिद्ध हॉर्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन चे मानद सदस्य आहेत.


अँटिडिप्रेसंट औषधी, Antiboitics,कोलेस्टेरॉल च्या औषधी यामध्ये साक्षी बदलवून आकड्यांचा भयंकर उलट फेर करून सर्व जगाला भ्रमीत केले जात आहे.


आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे *"DEATH BY PRESCRIPTION"* या पुस्तकाचे लेखक सुविख्यात अमेरिकन डॉक्टर *Dr Ray Strand* आहेत.  


आज *संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्टअटॅक अथवा अपघात नसून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या अलोपॅथिक औषधी आहेत* हे Dr Ray Strand यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे....


*जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वतः घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच करू शकणार नाहीत.* इतर कोणत्याही कारणांपेक्षा औषधांच्या दुष्परिणामांनी  मरणाऱ्यांची संख्या पाचपट जास्त आहे.- Dr.B.M.Hegde (पद्मभूषण) MD, FRCP (London)


लोकांना असे वाटते की, ऑलोपॅथिक चिकित्साविज्ञान हे ज्ञान व प्रक्रियांचे सुव्यवस्थित क्षेत्र आहे. परंतु हा केवळ एक भ्रम आहे. हे एक अत्यंत अपूर्ण व अनेक दोषांनी युक्त विज्ञान आहे. ऑपेरेशन व उपचारा दरम्यान मानवी शरीरात घडणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया धोकादायक व अनिश्चित असतात - डॉ. अतुल गावंडे (HOD, सर्जरी डिपार्टमेंट - बोस्टन युनिव्हर्सिटी)


हेल्थ चेकअपच्या नावाने एक जबरदस्त व्यापार व भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात आहे. लोकांना असं वाटत असेल की पृथ्वीवर जीवंत राहण्यासाठी ऑलोपॅथिक चिकित्सा / औषधी / रक्त - लघवी तपासण्या व हायटेक सर्जरी व टेक्नॉलॉजि आहे तर हे साफ चुकीचे आहे Famous डॉ. B M हेगडे येथे नमूद करतात,की देवाची कृपा आहे की,हे *ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञान फक्त 100-150 वर्ष जुने आहे* & त्यामुळे मानव जात अजून पृथ्वीवर जीवंत आहे.


मानवी प्रतिकार क्षमता किंवा आजार ठीक करण्याची अंगभूत क्षमता यांवर अलोपॅथिक डॉक्टरांचा विश्वास नाही. चिकित्सा जगतातील व्यापारीकरणामुळे टेक्नॉलॉजिमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.


हृदयरोग व कॅन्सर यामध्ये सर्वाधिक टेक्नॉलॉजि चा वापर केला जातो. हे दोन विभाग प्रचंड पैसा  कमविण्याचे साधन बनले आहेत. बायपास, कॅन्सर, अँपेंडिक्स, मणक्याचे ऑपेरेशन, सिझेरिअन,गर्भाशय काढण्याचे, कृत्रिम गुडघेरोपनाचे ऑपरेशन हे गरज नसतांना सर्रास केले जाणारे व त्याद्वारे प्रचंड पैसा उकळण्याचे साधन बनले आहे.


अलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदान (Dignosis) च्या बाबतीत अचुक आहे असे म्हटले जाते परंतु हा सुद्धा एक भ्रम आहे. त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असतो.


अनावश्यक रक्त - लघवी तपासणी, X-Ray, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, MRI, एन्डोस्कोपी, अँजिओग्राफी ई.अनेक तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाध्य केले जाते. *यापैकी 90% तपासण्यांची रुग्णांना गरज नसते. डॉक्टर स्वतः आपल्या अनुभव व  कौशल्याच्या आधारे योग्य निदान करू शकतात.* जे शेकडो तपासण्यांपेक्षा जास्त अचूक असू शकते. या तपासण्यांमागे 50% पर्यंत कमिशन मिळते हे अमीर खानने सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमात जगजाहीर केले आहे. यात काही अपवाद नसतील असे नाही.


अनावश्यक व्हॅक्सिनेशनचा धंदाही फार जोमात आहे.अनेक लसी अनावश्यक असून या  लसींची विश्वासाहार्यता आपल्या देशात अगदीच कमी आहे. औषधी कंपन्या लसीकरणाच्या नावाने अब्जावधी रुपयांचा नफा कमवितात. *मेडिकल सायन्सच्या इतिहासात लाखो लोकांचा बळी या अनावश्यक लसीकरणामुळे गेला आहे.*


औषधी कंपन्या आपली औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रोख, भेटवस्तू, विदेश दौरे प्रायोजित करतात. रुग्णांना जास्तीत जास्त औषधं लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.अनावश्यक औषधांच्या दुष्परीणामामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होऊन रुग्णांचा जीव व पैसा दोन्हीवर गदा येते. रुग्ण मात्र याबद्दल अनभिज्ञच राहतात.


Unreasonable  Profit Making हा फंडा मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलनी अवलंबलेला असून,अनावश्यक ऑपरेशनची मालिकाच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्यामुळे अनेक ऑपरेशनचा दुरुपयोग सर्रास होतांना दिसून येतो. खुप कमाई असल्यामुळे अनेक शहरांत सुपरस्पेसिलिटी व मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलची साखळीच निर्माण होत आहे. मोठी कार्पोरेट घराणी आता या व्यवसायात उतरली आहेत.


 *रुग्णाचा आजार किती गंभीर आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिले जाते (तो तसा नसतांना). त्याला विचार करायला वेळही मिळू न देता महागडी ऑपरेशन e.g. Bypass, Angioplasty करायला भाग पाडले जाते.*


असे अनावश्यक ऑपरेशन करतांना किंवा उपचार करतांना रुग्ण दगावला अथवा अधिक गंभीर झाला, तर हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी न घेता पॆसे मात्र पूर्ण वसुल करतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की, सामान्य आजारांकरिता केलेल्या अनावश्यक उपचार  अथवा  ऑपरेशनमुळे रुग्णाला जीव गमवावा लागला आहे.


व्यवस्थेच्या मुळापर्यंत पसरलेला हा भ्रष्टाचार थांबवणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. कारण त्याच भ्रष्ट वृत्तीने ही यंत्रणाही किडलेली आहे.


*स्वतः चे स्वास्थ्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी  सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.*


डॉ निलेश वंजारी, MBBS - Boston University

🙏 🙏.        

 *छान माहिती आहे आपले नातेवाईक आप्तेष्ट  मित्रमंडळी  यांना पाठवली पहिजेत*

🤝🙏🤝✅👌

Saturday, 23 December 2023

मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.

 मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.


कारण ..

श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की ...

” देवाधिदेवा... भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी , दुर्योधनाला आणी दु:शासनाला सांगितली असतीस् तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ?

 इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ? 

भग्वद्गीतेचे  हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे , युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”


सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे  इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस ईतके ट्रॅफिक ओसंड्ल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली. 

आणि ...एके दिवशी मला श्रीकृष्णाचा video कॉल आला. 


अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे  , श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार हे मला अगोदरच ठावूक होते. 


थेट स्वर्गातून , पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे , खुप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला .


“ वत्सा , कशाला ईतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले.”


“ देवा , हा आखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दचं झाले नसते ..हा प्रश्न इंटरनेटच्या  ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्वाचा नाही का ?”


*“मला उपदेश करू नकोस ”*   .......... श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.


“ देवा , माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची “ ....मी गयावया केली.


“ वत्सा ...अरे तुला नाही म्हणालो.”


........मला हायसे वाटले.


“ मला उपदेश करू नका ...असे दुर्योधन मला म्हणाला होता.


....तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी  दुर्योधनाकडे गेलो नसेन ? 

भग्वद्गीतेमधील न्याय अन्याय , नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”


“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला ते कळाले नाही ? तो सरळसरळ तुम्हाला उपदेश  करू नका म्हणाला ?”


“ वत्सा , अगदी असेच घडले बघ.


 दुर्योधन म्हणाला .....मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणी दु:वर्तन यातील फरकही मी जाणतो , त्याचा *उपदेश मला करू नका “.* 


“ वत्सा , पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्ही सुद्धा जाणता ..पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधन ही अन् तुम्ही ही ओळखता , 

पण टाळत नाही.

तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही जाणता , पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा 'नाकर्तेपणा' ढालीसारखा वापरला”.

.

.


आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला .

.

.


“ मला उपदेश करू नका“......वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन. 

मित्रांबरोबर उनाडक्या करणे , चुकीचे होते हे मला माहिती होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना “ उपदेश करू नका” असे सांगत होतो. 


सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठावूक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणी “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या  आईला , “ उपदेश करू नकोस” असे सांगणारा "दुर्योधन" मीचं होतो.


“तंबाखू खाऊ नका , दारू पिऊ नका , मांसाहार करू नका “ , हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठाऊक आहेत, पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही . कारण आम्ही 'दुर्योधन' आहोत. आम्ही कौरव आहोत.


अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की , दुर्योधनाने समजत असूनही स्वत: चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले... 


संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय ....याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या .

कधीतरी स्वत: च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा ......तरच भग्वदगीता वर्तनात येईल...वाचण्याची इच्छा होईल.

इच्छा होईल तोच  सूर्योदय.


सध्यातरी मी कौरव नंबर "१०१" आहे ....


..तुम्ही?


😌🙏🙏😞

प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यद्रोही अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण खंबीरपणे हटविल्याबद्दल

 प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यद्रोही अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण खंबीरपणे हटविल्याबद्दल









काल मंगळवारी पुण्यातील नातूबाग मैदानात सांस्कृतिक कार्य आणि वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचा सुवर्णकंकण अर्पण करून सत्कार करण्यात आला. 'हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्कारानेयावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांना निवृत्त एअर मार्शल श्री जयंत इनामदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहेहाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावेअसे आवाहन यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

प्रतापगड उत्सव समितीतर्फे झालेल्या या हृद्य सत्कार समारंभास पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभक्तांच्या प्रेमाचे ऋण हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन केले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखे लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईलयाचाही पुनरुच्चार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

 

प्रतापगड उत्सव समितीने केलेल्या या सत्काराला उत्तर देतांना मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणालेकी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने जपल्या जातील.  छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्यावरील टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी  २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ टपाल तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊछत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक महोत्सवानिमित्त हिंदवी स्वराज्याचे चलन असलेले "होन" रीझर्व बँकेच्या माध्यमातून पुन: प्रकाशित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात गतवर्षी शिवजयंती साजरी करण्यात आलीतो अभिमानाचा क्षण होता असेही ते म्हणाले.

 

नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भयगर्व आणि वासनारहित समाज उभा राहावातो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या नंतरही औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही. काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांच्या याच अलौकिक कार्याची प्रेरणा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना देत त्यांच्यासाठी ऊर्जादायी ठरेलअसे ते म्हणाले.

 

यादेशात केवळ विजेता किंवा धनवान हा आदर्श असत नाही तर या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजमहाराणा प्रतापझाशीची राणी लक्ष्मीबाई हेच आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतोअसेही ते म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त) यांच्या हस्ते मंत्री श्री.मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 

यावेळी निवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री जयंत इनामदार,  श्री सुनील देवधर,  श्री मिलिंद एकबोटे,  श्री नंदकुमार एकबोटे यानी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याबद्दल आणि धडाडीच्या कार्यशैली बद्दल गौरवोद्गार काडशे.

 

शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगड उत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री जयंत इनामदारभाजपाचे राष्ट्रीय सचिव श्री सुनिल देवधरभाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री धीरज घाटेसौ. स्वाती मोहोळश्री मिलिंद एकबोटेश्री नंदकुमार एकबोटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते निवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री जयंत इनामदारश्री संभाजी बालघरे,  आ.  श्री. महेश लांडगे,  ॲड. श्री निलेश आंधळे,  सौ. स्वाती मोहोळश्री हेमंत जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.

टर टर करने पर दामाद को मिला ईनाम.... 😂😅


 टर टर करने पर दामाद को मिला ईनाम.... 😂😅

Featured post

Lakshvedhi