Friday, 22 December 2023

वारणाली रुग्णालयातील सुविधांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी

 वारणाली रुग्णालयातील सुविधांसाठी

तीन कोटी रुपयांचा निधी

-         मंत्री उदय सामंत 

 

            नागपूर, दि. 20 : सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात विविध अत्याधुनिक सोयी -सुविधा कार्यान्वित करण्यासाठी तीन कोटी रुपये पुढील आठ दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

          या संदर्भात सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होतात्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

          मंत्री श्री. सामंत म्हणाले कीवारणाली मल्टी स्पेशालिटी  रुग्णालयाच्या वाढीव कामाकरिता महानगरपालिकेने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2024-25 च्या कृती आराखड्यामध्ये रुपये तीन कोटी एवढ्या रकमेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी  राष्ट्रीय आरोग्य अभियान ,मुंबई यांच्याकडे सादर केला आहे‌. हा निधी प्राप्त करून घेण्यासाठी महानगरपालिकेकडून पाठपुरावा सुरू आहेअसेही त्यांनी सांगितले.


२५ मुखी श्री. दत्ताची. प्रत्येक चेहऱ्यावरील भाव वेगवेगळे आहेत. झूम करून पहावे 🙏🙏

 ही मूर्ती तामिळनाडूतील आहे. २५ मुखी श्री. दत्ताची. प्रत्येक चेहऱ्यावरील भाव वेगवेगळे आहेत. झूम करून पहावे 🙏🙏🙏


आरोग्य विषयक


 

ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाचा अहवाल प्राप्त

 ठाणे मनपा रुग्णालयातील

मृत्यूप्रकरणाचा अहवाल प्राप्त

                                                            - मंत्री उदय सामंत

          नागपूरदि. 20 : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या आयुक्तआरोग्य सेवा मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचा गोपनीय अहवाल शासनास प्राप्त झाला असून हा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

            यासंदर्भात सदस्य अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरेसचिन अहीर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

            मंत्री श्री. सामंत म्हणालेराज्यातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेशी निगडित अत्यावश्यक पदे तातडीने भरण्याबाबत तसेच औषध पुरवठा नियमितरित्या उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांतील रुग्ण सेवेची निकडलोकसंख्या तपासून वेळोवेळी श्रेणीवर्धन करण्यात येते. तसेच रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचाऱी यांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयमार्फत  पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे रुग्ण सेवेमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत नाही.

0000

मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि.२० :- राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता नोंदणी पोर्टल दि.४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दि. १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. ४ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 0000

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या विविध उपाययोजना

 समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी

 रस्ता सुरक्षेच्या विविध उपाययोजना

- मंत्री शंभूराज देसाई

            नागपूर, दि.२० : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची चौकशी करण्याबाबतचा प्रश्न सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. याचर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य अनिल परबसत्यजित तांबे, प्रा.राम शिंदेप्रवीण दरेकर, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला होता.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले की, अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाची 8 पथके व महामार्ग पोलीस विभागाची  14 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. समृद्धी महामार्गावर वाहन चालक व प्रवाश्यांच्या प्रबोधनासाठी टोल नाक्यांवर समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहेत. यामधून रस्ता सुरक्षा जनजागृती केली जाते. वाहनचालकांचे समुपदेशन केले जाते.वाहनांची तपासणी व टायर तपासणी ही समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर केली जाते. प्रवासी बसमध्ये प्रवाश्यांना परवान्याची व वाहनाची माहिती  सहजपणे दिसेल या करीता फिट-टू-ट्रॅव्हल असे बोर्ड प्रदर्शित केले जातात. अखिल भारतीय परवान्यावर व ऑल महाराष्ट्र वातानुकूलित कंत्राटी वाहनांची परिवहन विभागामार्फत नियमितपणे तपासणी मोहीम केली जाते.

               ज्या 8 जिल्ह्यांमधून महामार्ग जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागात प्रत्येकी 1 तपासणी पथकाची नेमणूक केली आहे. पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 8 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पथकांमार्फत समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणेरस्ता सुरक्षा विषयक जागृती करणेवाहनचालकांचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्ये करण्यात येतात. समृध्दी महामार्गावर 1 डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 4500 वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील अपघातासंदर्भात वाहन चालक व प्रादेशिक परिवहन कार्यालयछत्रपती संभाजीनगर येथील 2  सहाय्यक मोटर निरिक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यता निधीतून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवारांना आर्थिक सहाय्य दिले. रस्ता सुरक्षा उपाययोजना सक्रियपणे कार्यान्वित करण्यात आली.वाहनांची तपासणी आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली, अशी माहितीही यावेळी श्री. देसाई यांनी दिली.

00000

खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर शासकीय रुग्णालयात दोन विभाग करण्याचा विचार


खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर शासकीय रुग्णालयात

दोन विभाग करण्याचा विचार

- मंत्री हसन मुश्रीफ

            नागपूरदि. 20 : मोठ्या शहरांमध्ये असलेल्या खासगी रुग्णालयात प्रशासकीय व वैद्यकीय विभाग कार्यरत असतात. त्यामुळे डॉक्टरांना प्रशासकीय कामकाजात लक्ष देण्याची गरज नसते. याच धर्तीवर राज्यातील शासकीय रुग्णालयात असे दोन विभाग करण्याचा शासन विचार करीत आहेअशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            याबाबत सदस्य सुभाष धोटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य नाना पटोलेडॉ. राजेंद्र शिंगणेअनिल देशमुखप्रतिभा धानोरकरअमित देशमुखप्रणिती शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.

             मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोविड काळात चंद्रपूर रुग्णालयात जेम पोर्टल माध्यमातून वैद्यकीय साहित्य व अनुषंगिक वस्तूंची खरेदी केली आहे. कोविड काळात इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्लॅन मधून खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून चंद्रपूर रुग्णालयात खरेदी देखील करण्यात आली आहे. याबाबत काही अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी करण्यात येईल.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीराज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयातील वर्ग १वर्ग २ रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत एप्रिल २०२४ पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच वर्ग ३ संवर्गाच्या ५६०० पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया टी सी एस कंपनीमार्फत सुरू आहे. डिसेंबर अखेर आदेश निघणार आहे. तसेच वर्ग  पदांची भरती बाह्य तत्वाद्वारे लवकर करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi