Friday, 22 December 2023

नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्यास ४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ

 नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना

अर्ज करण्यास ४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदि. २१ : देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३ -२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होतेमात्र  नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या योजनेसाठी अर्ज  करण्यास ४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम(IIM), आयआयआयटी (IIIT), एन‌आयटी(NIT),आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER) इन्स्टीट्यूट ऑफ नॅशनल इंपार्टन्स व इतर कॉलेज या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्कनोंदणी फीजिमखानाग्रंथालयसंगणक इत्यादी शुल्क संबंधित  विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रुपये १० हजार दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत.

            या योजनेविषयी अधिक माहितीजाहिरातअर्ज व नियमावली शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रासह ४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आयुक्तसमाज कल्याणमहाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ पुणे येथे करावा. पदवी, पदव्युतर पदवी,  पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे.  राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

000

संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्यास ४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ

  संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना

अर्ज करण्यास ४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदि. २१ : देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३ -२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होतेमात्र  नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या योजनेसाठी अर्ज  करण्यास ४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम(IIM), आयआयआयटी (IIIT), एन‌आयटी(NIT),आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER) इन्स्टीट्यूट ऑफ नॅशनल इंपार्टन्स व इतर कॉलेज या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्कनोंदणी फीजिमखानाग्रंथालयसंगणक इत्यादी शुल्क संबंधित  विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रुपये १० हजार दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत.

            या योजनेविषयी अधिक माहितीजाहिरातअर्ज व नियमावली शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रासह ४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आयुक्तसमाज कल्याणमहाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ पुणे येथे करावा. पदवी, पदव्युतर पदवी,  पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे.  राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

000

परीक्षा पे चर्चा' १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 परीक्षा पे चर्चा'

१२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 

मुंबईदि.२१ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थीशिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम 'परीक्षा पे चर्चातालकटोरा स्टेडियमनवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. हा कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येतो. त्यासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी केले आहे.

     'परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी https://innovateindia.mygov.in/ppc-२०२४ ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली जात आहे. सहावी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठीशिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.  या लिंकद्वारे १२ जानेवारी २०२४ पर्यंत नोंदणी करता येईल. सहभागी विद्यार्थीपालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक एनसीइआरटी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सन २०२४ करीता सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे.

मुंबईत 26 डिसेंबरपासून 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन महिला बचत गटांना सक्षम करणाऱ्या प्रदर्शनाला भेट देण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आवाहन

 मुंबईत 26 डिसेंबरपासून 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन

महिला बचत गटांना सक्षम करणाऱ्या प्रदर्शनाला

भेट देण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आवाहन

                                               

            मुंबई, दि. 21 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन  व विक्री 26 डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8 जानेवारी अशा दोन आठवड्यांच्या कालावधीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांना सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

           दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या दीड दशकात सुमारे 8 हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो.

         या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्याज्यूटच्या वस्तूबांबूच्या वस्तूलाकडी वस्तूचामड्याच्या वस्तूकृत्रिम दागिनेलेडीज बॅगबूट,ड्रेस मटेरियलसाड्याचादरीकार्पेट आणि पडदे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. घरगुती मसालेपापडकुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. मुंबईकर आणि संपूर्ण देशाने ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

          सरस प्रदर्शनातग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पंढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय राज्याच्या विविध भागातील मसाले आणि हातसडीचे तांदूळ प्रदर्शनात असतील. अधिकाधिक नागरिकांनी सरस प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले आहे.

000

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार

 महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि.21 : मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.  दि. 1 डिसेंबर 2023 पासून दि.31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.

मुद्रांक शुल्क अभय योजनेमध्ये कमी स्टॅम्पड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये आणि दंडामध्ये मोठयाप्रमाणात सूट दिली आहे. दि.०१ जानेवारी१९८० ते दि.३१ डिसेंबर२००० या कालावधीत निष्पादित केलेल्या ज्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखापेक्षा कमी असणार आहे. अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखिल संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तरकमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाखापेक्षा जास्त असेल तरकमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये  ५०% सूट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे.  दि.१ जानेवारी२००१ ते दि.३१ डिसेंबर२०२० या कालावधीमध्ये निष्पादित केला असेल तरअशा दस्तांवर देखिल कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५% पर्यंत सूट देण्यात येऊन त्यावरील दंड हा २५ लाख ते १ कोटी मर्यादेपर्यंतच वसुल करण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त दंडाची रक्कम असेल तरती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.

काही कारणास्तव पहिल्या टप्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर दुसऱ्या टप्यामध्ये देखिल सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. परंतुहा लाभ हा कमी प्रमाणात मिळेल.

 या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यासह नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अभय योजनेसाठी अर्जदार यांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर (www.igmaharashtra.gov.inतसेचसर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच योजनेची सविस्तर माहिती या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने परिपत्रक-मुद्रांक अभय योजना या सदराखाली नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

००००

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकसित करणार

 जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून

कुशल मनुष्यबळ विकसित करणार

- कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकौशल्यरोजगारउद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये सामंजस्य करार

 

मुंबईदि.२१ :   महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकौशल्यरोजगारउद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल.राज्यात सहा ठिकाणी ही सुविधा केंद्र आहेत.  परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कुशल मनुष्यबळ विकास देणे शासनाला शक्य होईल असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकौशल्यरोजगारउद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये सामंजस्य करारावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत जे उमदेवार परदेशात नोकरी करू इच्छितात अशा उमेदवारांना सर्व प्रकारचे रोजगाराभिमुख  प्रशिक्षण येथे दिले जाईल. जगातील प्रत्येक क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी ची माहिती मिळाली तर विद्यार्थ्यांना त्याच प्रकारचे शिक्षण देणे शक्य होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया व डिजिटल इंडियाच्या माध्यमातून  देशभरात अनेक उपक्रम राबविले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य,रोजगारउद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राबविण्यात येत आहेत असेही श्री.लोढा यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) चे संचालक वेदमनी तिवारी म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. हे बलस्थान लक्षात घेता या वयोगटातील तरुणांसाठी बदलत्या काळाची पाउले ओळखून कौशल्य  विकासाला बळ देण्याची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला प्रोत्साहन दिलेले आहे.अनेक व विकसित देशांची उदा. अमेरिकाऑस्ट्रेलियाकॅनडासिंगापूरजपान येथे  कार्यरत वयोगटाची लोकसंख्या कमी होत चालली आहे. असे देश कुशल मनुष्यबळाची  मागणी करत आहेत. भारतातील सद्यस्थितीत तरूण वयोगटाचे प्रमाण ६२ टक्क्यावरून सन २०३० पर्यंत ६८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.अशा परिस्थितीत जगासाठी उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची संधी आपल्या  देशाला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाशी झालेल्या करारामुळे राज्यातील युवकांना याचा नक्की लाभ होईल असेही ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दोन नवीन कार्यालयांचा आरंभ आणि महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या टेलिग्रामव्हॉट्सअँप चॅनललिंक्डइनचा  आरंभ करण्यात आला.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित 'अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचा निकाल जाहीर

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित

'अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचा निकाल जाहीर

 

मुंबई दि.२१ :  राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने १ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देषाने या स्पर्धेत जाहिरातनिर्मितीभित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य लेखन या  तीन गटात  स्पर्धकांनी सहभाग घेतला.

यामध्ये जाहिरातनिर्मिती स्पर्धेसाठी ६९, भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी ६३८ आणि घोषवाक्य लेखन स्पर्धेसाठी ३५७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यातुन प्रत्येक स्पर्धेसाठीच्या परीक्षकांनी या प्रवेशिकांचे परीक्षण करून मुल्यांकन केले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आगामी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या २४ जानेवारी २०२४ रोजी नियोजित आहे. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांसोबतचस्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. सोहळ्याचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहिर करुन सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांना कळवले जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल असा आहे.

जाहिरातनिर्मिती स्पर्धा

जाहिरातनिर्मिती स्पर्धेत प्रथम पारितोषिक कुणाल कोळी (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) यांना तर निशा उपाध्याय (गुरु नानक कलाविज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय) यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.  शुभम फाळके (जे.के कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे‌.

            यासोबतच वेदांती आखाडे (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) आणि तेजस साळगावकर (बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट - अप्लाईड आर्ट) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी प्रकाश कुंटे आणि विकास पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. जाहिरातनिर्मिती स्पर्धेतील प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. १ लक्ष, ७५ हजार, आणि रु. ५० हजार तसेच सन्मानचिन्हतर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. १० हजारचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धा

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेत प्रथम पारितोषिक  दया गुजर (मंथन आर्ट स्कुल) यांनी मिळवले असून  आकांक्षा किरण मर्दे (सोफिया पॉलिटेक्निक) यांना द्वितीय पारितोषिक आणि अभिषेक ठाकरे (मंथन आर्ट स्कूल) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासोबतच संयुक्ता पवार (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) आणि धनश्री भागडकर (सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी संदीप सावंत आणि डॉ. संतोष पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेतील प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. ५० हजार, रु. २५ हजार आणि रु. १० हजार तसेच सन्मानचिन्हतर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. ५ हजारचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल.

घोषवाक्य लेखन स्पर्धा

घोषवाक्य लेखन स्पर्धेत  प्रथम पारितोषिक साहिल कासारे (संवाद आणि पत्रकारिता विभागमुंबई विद्यापीठकलिनासांताक्रूझ) यांना  जाहीर झाले असून वैष्णवी धुरी (बी.एस. बांदेकर ललित कला महाविद्यालय) यांना द्वितीय पारितोषिक आणि अवेदिका रहिंज (सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासोबतच समृद्धी पाटील (सोफिया- श्री बी.के. सोमानी मेमोरियल पॉलिटेक्निक)साक्षी चक्रदेव (मंथन- द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्ट) आणि आदिती पोसणे (बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट्ससावंतवाडी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी डॉ. निर्मोही फडके आणि प्रा. अभिजित देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. घोषवाक्य लेखन स्पर्धेतील प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. २५ हजार, रु. १५ हजार आणि रु. १० हजार तसेच सन्मानचिन्हतर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. ५ हजारचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल.

या स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व विजेते आणि स्पर्धकांचे निवडणूक कार्यालयाने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

000000

Featured post

Lakshvedhi