Saturday, 23 December 2023

ओबीसी विद्यार्थींच्या वसतिगृहासाठी भाडे तत्त्वावर इमारतीसाठी इमारत मालकांकडून अर्ज आमंत्रित

 ओबीसी विद्यार्थींच्या वसतिगृहासाठी

भाडे तत्त्वावर इमारतीसाठी इमारत मालकांकडून अर्ज आमंत्रित

 

 

मुंबईदि. २२ : इतर मागासवर्ग  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलांचे एक व मुलींचे एक शासकीय वसतिगृह सुरु करावयाचे आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीइतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या  30 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. या परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकाम्हाडासिडको तसेच खासगी इमारत मालकबांधकाम विकासक यांचेकडून इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इतर मागास प्रवर्गातील मुलांकरिता १०० मुलांच्या क्षमतेचे  एक शासकीय वसतिगृह आणि इतर मागास प्रवर्गातील मुलींकरिता १०० मुलींची क्षमता असलेले एक शासकीय वसतिगृह अशा दोन वसतिगृहाकरीता इमारत तपशिल असा आहे. इमारत मुंबई उपनगर परिसरात असणे आवश्यक आहे. किमान क्षेत्रफळ दहा हजार चौ. फुट असावे. या इमारतीमध्ये १० स्वच्छतागृह व १० स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी व पूर्णत्वाचा दाखला असावा. कार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार इमारत मालक देण्यास तयार असलेबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील. प्रत्येक वसतिगृहाकरिता स्वतंत्र दोन इमारती आवश्यक आहेत.

           इच्छूक म्हाडासिडकोबृहन्मुंबई महानगरपालिका तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांनी नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरआर सी चेंबुरकर मार्गप्रशासकीय इमारत४ था मजलाचेंबुर (पूर्व)मुंबई ७१, (दूरध्वनी क्रमांक ०२२ २५२२२०२३) या कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात अर्ज करावेअसे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

००००

मुंबई फेस्टिव्हल २०२४' च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा

 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' च्या यशस्वी आयोजनासाठी

सर्वांनी समन्वयाने काम करा 

                                                        - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

 

मुंबईदि. २२ : मुंबईत  २० ते २८ जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४आयोजित करण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल समितीसह सर्व सहभागी संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी  दिले.

         सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत पर्यटनमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीमुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रापर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी - शर्माड्रीम स्पोर्ट्सचे सिध्देश्वर मिश्रा यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले कीदेशातील आणि विविध परदेशातील नागरिकांना मुंबईचे आकर्षण आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून महाराष्टाची संस्कृती पर्यटकांना सांगण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवामध्ये व्यावसायिक, भागधारक, शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा गृहहॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाईडेड सीटी टूरसीटी टूर यांचा समावेश असणार आहे. मुंबई फेस्टिवलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करुन या महोत्सवात लोकांचा सहभाग वाढविण्यात यावा.

मुंबई महोत्सवाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. महोत्सवासाठी कमी कालावधी राहिला असल्याने महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी लागणा-या विविध परवानग्या, महोत्सवाचे नियोजनवेळापत्रक व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबतचे सविस्तर सादरीकरण संबंधित संस्थेने तयार करावे. मुंबईचे डबेवालेमुंबईची सांस्कृतिक कोळी बांधवमुंबईचे शेअर मार्केटमुंबईचे हॉलीवुड स्टारमुंबई चौपाटी या सर्वांना मुंबई फेस्टिवल मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. शासनाच्या सर्व यंत्रणा आणि अशासकीय संस्थांनी समन्वयाने काम करावे, असेही आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले.


महाराष्ट्राचे चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी पुरस्काराचे वितरण

 महाराष्ट्राचे चिराग शेटटीओजस देवतळेअदिती स्वामी,

 गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी पुरस्काराचे वितरण

 

नवी दिल्ली, दि. 22 : वर्ष 2023 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेटटीओजस देवतळेअदिती स्वामीगणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि  क्रीडा  मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी दोन खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यासह एकूण 9 खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना द्रोणाचार्य’ श्रेणीतील जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ व जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यासोबतच ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील तीन  खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद चषक’ गुरू नानक विद्यापीठअमृतसरलवली प्रोफेशनल विद्यापीठपंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठकुरूक्षेत्र या तीन संस्थांना घोषित करण्यात आला आहे.

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्रचे बॅडमिंटन पटू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा समावेश आहे. तरतिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांना आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहेतर अर्जुन पुरस्कार’ हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देखील दिले जाते.

ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत 21 वर्षीय ओजसने सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून आणखी एक विक्रम केला. नागपूरचा गोल्डन बॉय तिरंदाज ओजस देवतळे याच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नाव जाहीर झाले आहे.

सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720  पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्सएशियन चॅम्पियनशिपवर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

सलग चारवर्ष कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते.  खेळात तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी अर्जुन पुरस्कार’ दिला जातो.  खेळाडूंच्या मागील चार वर्षांतील उत्तम प्रदर्शननेतृत्वखेळ आणि त्यातील शिस्तीसाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळातील प्रशिक्षण देण्यासाठी आणि खेळाडुंकडून स्पर्धांसांठी उत्कृष्ट कार्य करून घेणा-या क्रीडा प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली जाते.

खेळ आणि स्पर्धेमधील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार’ दिला जातो. यामध्ये खेळाडूंच्या चांगले प्रदर्शन आणि सेवानिवृत्तीनंतरही संबंधित क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देत राहण्यासाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते. खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन’ पुरस्काराने गौरिवण्यात येते. आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन) अर्जुन पुरस्कार:ओजस देवताळेआदिती स्वामी (दोघे तिरंदाजी)मुरली श्रीशंकरपारुल चौधरी (दोघे अ‍ॅथलेटिक्स)मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)आर. वैशाली (बुद्धिबळ)मोहम्मद शमी (क्रिकेट)अनुष अग्रवालदिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी)दिक्षा डागर (गोल्फ)कृष्ण बहादूर पाठकसुशीला चानू (दोघे हॉकी)पवन कुमाररितू नेगी (दोघे कबड्डी)नसरीन (खो-खो)पिंकी (लॉन बोल्स)ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरईशा सिंह (दोघे नेमबाजी)हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)सुनील कुमारअंतिम (दोघे कुस्ती)नौरेम रोशिबिना देवी (वुशू)शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी)इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट)प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). 

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती)आरबी रमेश (बुद्धिबळ)महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स)शिवेंद्र सिंह (हॉकी)गणेश देवरुखकर (मल्लखांब).

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ)भास्करन ई (कबड्डी)जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). 

ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन)विनीत कुमार शर्मा (हॉकी)कविता सेल्वराज (कबड्डी)

0000


गाथा पराक्रमाची : वीर बालपणाच्या आदर्शाची बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग

 गाथा पराक्रमाची : वीर बालपणाच्या आदर्शाची

बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग

 

काही कृत्ये आणि कर्मे इतकी प्रगल्भ असतात की ते इतिहासाचा मार्ग बदलतात! असाच एक म्हणजे शिखांचे दहावे गुरूगुरू गोबिंद सिंग यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य!

तरूणनिरागस आणि निष्पाप सुपुत्रसाहिबजादा (प्रिन्स) अजीत सिंगसाहिबजादा जुझार सिंग ज्यांना चमकौरच्या युध्दात 23 डिसेंबर 1704 रोजी हौतात्म्य आले. छोटे साहिबजादेबाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना 26 डिसेंबर 1705 रोजी सरहिंदच्या (पंजाब) मुघल (Governor) शासक वजीर खान याने निघृणपणे ठार मारले.ते शहीद झाले.

मागील वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस’ पाळला जावा असे केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना व केंद्र शासित प्रदेशांना आदेश प्राप्त झाले आहेत. या अन्वये या दिवसाच्या महत्वाचे औचित्य साधूनगुरू गोबिंद सिंग यांचे चार साहिबजादा यांच्या हौतात्म्यावर तसेच त्यांच्या शौर्यावर प्रकाश टाकणारा विशेष लेख.

शीख समाजासाठी डिसेंबर महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच महिन्यात मुघल आणि डोंगरी संस्थानिकांच्या एकत्रित सैन्याने गुरू गोबिंद सिंगत्यांचे कुटुंब आणि अनुयायांना आनंदपूर साहिब किल्ल्यातून बाहेर काढण्यासाठी कपटाचा वापर केला आणि नंतर त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला गेला.

गुरू गोबिंद सिंगांचे शूर आणि निर्भय शीख आनंदपूरच्या किल्ल्याबाहेर मुघल सैन्याशी प्रदीर्घ युध्दात काही महिने एकत्र गुंतले होते. सम्राट औरंगजेबने शपथेवर संदेश पाठवला की जर गुरू आणि त्यांच्या शिखांनी किल्ला सोडला तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जाण्याची परवानगी दिली जाईल. गुरू गोबिंद सिंग यांना शंका होती पणसरहिंदचे शासक वजीर खानाच्या नेतृत्वाखाली या सैन्याने गुरूंना आनंदपूर साहिबमधून सुरक्षित मार्गाचे वचन दिले. तथापिते बाहेर आल्यावर त्यांच्यावर प्रचंड संख्येने हल्ला केला गेला.

नऊ वर्षे आणि सात वर्षे वयाचे दोन लहान साहिबजादेत्यांची आजी माता गुर्जर कौर यांच्यासोबत किल्ला सोडताना मुख्य दलापासून विभक्त झाले. त्यांना गंगू नावाच्या वृध्द सेवकाने त्यांच्या मूळ गावी सहेडी येथे आश्रय देण्याचे वचन दिले. तथापित्याने विश्वासघात केला व त्यांना मुघलांच्या सरहिंद प्रशासनाकडे सोपविले.

गुरू गोबिंद सिंग यांचे दोन मोठे साहिबजादेसाहिबजादा अजीत सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग दोन्ही सुपुत्रांनी शिखांच्या मुख्य तुकडी सोबत चमकौरच्या युध्दात शेवटच्या माणसापर्यंत लढा दिला गुरूंच्या थोरले सुपुत्र साहिबजादा अजीत सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग दोन्ही साहिबजादा यांना हौतात्म्य आले. पुढील घटनांमध्ये गुरूंनी त्यांचे चार साहिबजादा आणि त्यांची आई गमावली. तथापित्यांच्या समर्पित अनुयायांच्या शौर्याने आणि बलिदानामुळे ते वैयक्तिकरित्या वाचले. गुरूंना मारण्यात किंवा अटक करण्यात अयशस्वी झालेल्या वजीर खानाला नैराश्य आले व तो सरहिंदला परतला. तो ज्या फसव्या वर्तनाने वागला होतात्याबद्दल तो घाबरून गेला होता. या पार्श्वभूमीवरच त्याने लहान साहिबजादांवर इस्लाम धर्म स्वीकारून आणि नंतर त्यांना ताब्यात ठेवून त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी वजीर खानाने लहान राजपुत्रांना सर्वात वाईट प्रकारचा छळ केला आणि त्यांना धमकावले. त्याने त्यांना आणि त्यांच्या आजीला थंडा बुर्ज (थंड बुरूज) मध्ये ठेवलेज्याची रचना पाण्याच्या वाहिन्यांवरून रात्रीच्या थंड हवेच्या झुळूकांना पकडण्यासाठी करण्यात आली होती. हे ठिकाण उन्हाळ्यासाठी एक योग्य ठिकाण होते पण हिवाळ्यात आणि ते ही रात्रीच्या वेळी खूपच अस्वस्थ करणारे ठिकाण होते. अशातविशेषत: दोन्ही लहान साहिबजादांना येथे कैद करून वजीर खानाने त्यांच्यावर अत्याचार केला.

वजीर खानने आपल्या सरहिंदच्या दरबारात दोन्ही राजपुत्रांवर दोन दिवस खटला चालवला. पहिल्या दिवशी साहिबजादा यांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यास प्रवृत्त केले. त्यांना प्रचंड संपत्ती आणि मोठे अधिकार देऊ केले.

दोन्ही भावांनी गुरू नानक यांच्या अनुयायांच्या शौर्याचे किस्सेगुरू अर्जन देव आणि गुरू तेग बहादूर (साहिबजादा यांचे आजोबागुरू गोबिंद सिंग यांचे पिता) यांच्या अद्वितीय हौतात्म्याची कहाणी त्यांच्या आजीकडून ऐकली होती. दोन्ही साहिबजादे यांनी वजीर खानाच्या अत्याचार धैर्यानेहिम्मतीने सहन केले व खंबीर राहून इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे वजीर खान अस्वस्थ झाला आणि प्रचंड संतापला. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या दरबारात मलेरकोटल्याचा नवाबशेर मोहम्मद खान याला शिक्षा सुनावण्याचा अधिकार बहाल केला. हे करण्यामागचे त्याचे कारण म्हणजे गुरू गोबिंद सिंग यांनी शेर मोहम्मद खानाच्या भावाला एका युध्दात मारले होते. मात्रशेर खान यांनी स्त्रिया आणि मुलांवर सूड उगवण्यास नकार दिला आणि शौर्याचा सर्वोच्च परिचय दिला आणित्यांनी दोन्ही लहान साहिबजादे व त्यांच्या आजीला सोडण्याचा सल्ला दिला.

याच वेळेलावजीर खानाने सर्वात क्रूरकृत्य केले जे माणूसकीच्या तत्वांच्या विरूध्द आहे. वजीर खानाने या दोन निष्पाप राजपुत्रांना मुघल साम्राज्याचे शत्रु घोषित केले व त्यांना भिंतीत जिवंत कोंडण्याचा फतवा सोडला. दुसऱ्या दिवशी आदेशाचे पालन व्हायचे होते. निष्पाप व लहान मुलांवर एवढे जुलमी अत्याचार  करण्याचा इतिहासात अद्यापपर्यंत कदाचित हा एकमेव दुर्दैवी प्रसंग असावा. शेवटच्या क्षणालाही वजीर खानाने साहिबजादांना त्यांचे विचार बदलून इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकवण्याचा प्रयत्न केला. शौर्यवान साहिबजादा यांनी मरण कबुल केले पण धर्म परिवर्तनास ठाम नकार दिला. तसेचआम्हाला सोडल्यास आम्ही जंगलात जाऊकाही शीख एकत्र करूचांगले घोडे खरेदी करू आणि परत येऊन युध्दभूमीवर तुमचा व तुमच्या सैन्याचा सामना करू अशा कणखर आवाजात साहिबजादा बाबा जोरावर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.  त्याच क्षणी नवीन भिंतीची निर्मिती करून त्यांना डांबण्यात आले. तथापिराजपुत्रांचा श्वास निघण्यापूर्वीच भिंत तुटली. वजीर खानाने जल्लादांना लहान राजपुत्रांचे गळे कापण्याचा आदेश दिला. दोन्ही साहिबजादा यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच त्यांची आजी माता गुर्जर कौर यांनीही अखेरचा श्वास घेतला. दोन लहान व निष्पाप साहिबजादे अन्याय आणि भेदभावाविरूद्ध ज्या पध्दतीने उभे राहिलेत्याची इतिहासात तुलना होणे नाही. या लहान राजपुत्रांनी दाखवलेले धैर्य आणि धैर्याने शीख समुदायाला छळ आणि अन्यायाविरूध्द लढा देण्यास प्रवृत्त केले.

इन पुत्रन के सीस पर वार दिए सुत चारचार मुए तो क्या हुआ जीवत कई हजार

अर्थात

माझे जे हजारो पुत्र जिवंत आहेत त्यांच्या जगण्यासाठी मी चार पुत्रांचे बलिदान दिले आहे.

साहिबजादांच्या हौतात्म्याचे वृत्त समजताच संपूर्ण देशात दु:खाची लाट उसळली. काही काळानंतरएकांतवासीय बंदा बैरागी (नांदेडमहाराष्ट्र येथील) गुरू गोबिंद सिंग यांच्या प्रभावाखाली आला आणि त्यांचा अनुयायी झाला. यावेळी त्यांनी अमृत’ प्राशन केले आणि बंदा सिंग बहादूर या नावलौकिकाने इतिहासात नोंद झाली.

बाबा बंदा सिंग बहादूर नांदेडहून पंजाबमध्ये नियोजित कार्यासाठी आले. मोठ्या संख्येने शीख बांधव त्यांच्या सोबत सहभागी झाले. त्यांनी प्रथम सामना आणि सधौरा सरहिंदच्या परिघात घेतला आणि शेवटी वजीर खानावर हल्ला चढवला. 22 मे 1710 रोजी चप्पर चिरीची लढाई म्हणून ओळखली जणारी चकमक झाली. यात शिखांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. युध्दात वजीर खान मारला गेला आणि पुढच्या दोन दिवसांत त्यांनी सदहिंदचा ताबा घेतला. अशा प्रकारे साहिबजादांच्या हौतात्म्याने मुघल साम्राज्याच्या ढिगाऱ्यातून शीख साम्राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली.

       अशा पराक्रमी बालकांनासाहिबजादा अजीत सिंगसाहिबजादा जुझार सिंगसाहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना शत शत नमन..!

अमरज्योत कौर अरोरा

(प्रभारी) उपसंचालक (माहिती)मपकेंनवी दिल्ली


Friday, 22 December 2023

जे एन- १’ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांचे आवाहन


जे एन- १ला घाबरू नकासतर्क रहा;

आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांचे आवाहन


मुंबईदि. २२ :  राज्यात कोरोनाच्या जेएन-१’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळले असलेतरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावेअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले आहे.

 जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असूनसंशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचेत्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर रुग्णालयांतील यंत्रणेचे गांभीर्याने मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करण्याचे असे निर्देश प्रा. डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा पुणे येथे आढावा घेतला. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरआयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमारसर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहापालिकांचे आयुक्तजिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जेएन-१’ हा व्हेरियंट धोकादायक नसला तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी जिल्हा स्तरापासून घेण्यात यावी. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. जेएन-१वर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे गांभीर्याने आणि वस्तुस्थितीला धरून मॉकड्रिल करावे. हलगर्जीपणा न करता आरोग्य यंत्रणाविलागीकरण कक्षऑक्सिजनची सुविधाअतिदक्षता विभागव्हेंटीलेटर आणि महत्त्वाची उपकरणे कार्यरत असल्याबाबत प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी आणि त्याबाबतचे व्हिडिओ तयार करून राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावेत. प्रत्येक जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असून चाचणीसर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करावाअशा सूचना डॉ. सावंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमासह जिल्हा रुग्णालयआपला दवाखाना येथे फलक लावण्यात यावेत. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरू नये यासाठी माध्यमांना माहिती देण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्यामार्फतच याविषयीची अधिकृत माहिती देण्यात यावी. जेणेकरून अफवा आणि चुकीची माहिती प्रसारित होणार नाही. प्रसारमाध्यमांनीही याविषयीचे वृत्त देताना वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भीती पसरेल अशी चुकीची माहिती प्रसारित करू नयेअसे आवाहन त्यांनी केले.

0000

ज्यांचा जन्म

 ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख


ही पीढ़ी आता 35 ओलाडून 50 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....


१,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.


ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....


*टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. 


*मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी. 


कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला  नव्हता. 


*'सळई जमिनीत रूतवत जाणं

खारीचा वाटा* म्हणजे *लहान वाटा* असे वाटायचं पण *खार* हे मोजण्याचे पण

 इतके दिवस *खारीचा वाटा* म्हणजे *लहान वाटा* असे वाटायचं पण *खार* हे मोजण्याचे पण प्रमाण आहे हे या मेसेज वरून कळलं ! 🌸🙏🏻


Featured post

Lakshvedhi