Saturday, 25 November 2023

क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त, क्रांतिकारी भगतसिंह यांचे सहकारी

 आपण यांना ओळखलत का?


कसे ओळखणार ? हे नेहरु-गांधी घराण्यात जन्माला आले नाहीत, हा त्यांचा अपराध होता, नाही तर यांची शेकडो स्मारके, योजनांना, रस्त्यांना यांची नावे दिसली असती. सरकारी कार्यालयात त्यांचे फोटो लागले असते, जीवंतपणीच त्यांना भारतरत्न मिळाला असता!!


हे आहेत क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त, क्रांतिकारी भगतसिंह यांचे सहकारी


भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी नॅशनल असेम्बलीमध्ये बाॅम्ब टाकला होता. तेव्हा हे नाव सर्वतोमुखी झाले. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना फाशी झाली आणि बटुकेश्वर दत्त यांना अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तेथील यातनामय शिक्षेने त्यांना क्षयरोगाची बाधा झाली, परंतु ते वाचले. नंतरही अन्यत्र त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.


१९४७  साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा बटुकेश्वर दत्त यांची सुटका झाली. अंजली नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. बटुकेश्वर दत्त यांच्यापुढे आता पोटाचा प्रश्न उभा राहिला. स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणार्या बटुकेश्वर दत्त यांना दोन वेळच्या जेवणासाठी गोळ्या -बिस्कीटे विकावी लागली. 


त्यांना कळाले की पटना येथे बस चालवण्यासाठी लायसन्स मिळत आहे. त्यासाठी ते कमिश्नरला भेटले परंतु त्यांना स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यसैनिक असल्याचे प्रमाणपत्र मागण्यात आले. काय वाटले असेल या क्रांतिकारकाला? ज्याला ब्रिटीश सरकार भयभीत व्हायचे, ज्याने स्वतंत्र भारतासाठी सर्वस्व अर्पण केले, तो  आता स्वतंत्र भारतात लाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात खेटे घालत होता.


१९६४ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते


"बटुकेश्वर दत्तासारख्या क्रांतिकारकांनी भारतात जन्म घ्यावा का? परमेश्वराने त्यांना या देशात जन्माला घालुन फार मोठी चुक केली आहे. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली तो  दवाखान्यात तळमळत आहे,  विचारणारासुध्दा कोणी नाही"??


हा लेख प्रसिध्द झाला तेव्हा सरकारला जाग आली, पण वेळ निघुन गेली होती. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. शेवटी त्यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स)  दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी सांगितले की आधी पैसे भरा. लोक म्हणाले "अहो, हे महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त आहेत" डाॅक्टर म्हणाले "आम्ही नाही ओळखत,आधी पैसे भरा"


या क्रांतिकारकाचे मन नक्कीच म्हणाले असेल  "जर मी भगतसिंह,राजगुरु आणि सुखदेवसोबत फासावर गेलो असतो,तर मला हा दिवस पहावा लागला नसता"


२० जुलै १९६५ रोजी त्यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा अंत्यसंस्कार हुसैनीवाला येथे  भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या समाधिजवळ करण्यात आला. भगतसिंहाच्या आई विद्यावतीदेवी  त्यांना भेटायला आल्या होत्या. त्या बटुकेश्वर दत्तांना "भगतसिंहच" मानत असत.


स्वतंत्र भारतात अशा हजारो क्रांतिकारकांची आम्ही उपेक्षा केली. सावरकरांसारख्या क्रांतिकारकाची तर मेल्यानंतरही उपेक्षा केली जात आहे. आज ज्यांची गीते भारतातल्या तरुणांच्या ओठावर असले पाहिजे, त्यांना आम्ही विसरलो आहोत. टिपु सुलतानसारख्या अत्याचारी लोकांच्या जयंत्या सरकारी खर्चाने साजऱ्या झाल्या आणि मातृभुमीसाठी समर्पण करणार्या क्रांतिकारकांच्या समाध्यांवर "ना दीप जलते है, ना फुल चढते है" अशी अवस्था आहे. क्रांतिकारी रामप्रसाद यांनी लिहिले होते,


कभी वह दिन भी आयेगा,

की आझाद हम होंगेl

अपनी ही जमी होगी l

अपना आसमाॅ होगा

शहिदो की चिताओ पर लगेंगे हर बरस मेले

वतन पर मरमिटनोवाला यही निशाँ होगा ll


परंतु  या क्रांतिकारकांना  काय माहित? ज्यांच्यासाठी आपण फासावर जात आहोत, ते आपली आठवणही काढणार नाहीत.

तेच लोक आपल्याला विसरुन जातील. पंडीत नेहरु जेव्हा म्हणाले की "आम्ही रक्ताशिवाय स्वातंत्र्य मिळवले" तेव्हा या लोकांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील? 

हे स्वातंत्र्य आम्हाला "बिना खड्ग बिना ढाल" मिळाले नाही.

हजारो क्रांतिकारकांना त्यासाठी फासावर जावे लागले आहे.


महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांची आज जयंती.....

अशा महान क्रांतिकारला विनम्र अभिवादन!!

🙏🏼🙏🏼🙏🏼


- Ravindra Sasamkar

टवळी दिवटी ही शिवी नाही. मग आहे तरी काय ?*

 *टवळी ही शिवी नाही. मग आहे तरी काय ?*

... हा आमच्या आजीच्या तोंडी असणारा एक ग्रामीण शिवी-सदृश् शब्द..."'टवळी"'... बऱ्याच दिवसातून ऐकला आणि कुतुहल जागृत झालं.. टवळी म्हणजे काय..?माहीतीचा शोध घेतला.. पूर्वी घरातील वेगवेगळ्या वस्तूंना अथवा देवघरातील वस्तूंना अनेक नावे होती.(मराठी भाषा ही खूप प्रगल्भ आहे.) *जुन्या काळामध्ये घरामध्ये प्रकाश देणाऱ्या वस्तू या शक्यतो स्त्रीलिंगी असत, उदाहरणार्थ पणती, चिमणी, मशाल, समई, चुड, आरती तर काही पुल्लिंगी सुद्धा असत टेंबा, पलिता, भुत्या, कंदील, बोळा, काकडा,जावळा... पूर्वी वापरले जाणारे दिवटी आणि *टवळी* हे सुद्धा दिव्याचे प्रकार आहेत. देवघरात असते ती दिवटी तर शेज घरात अथवा माजघरात असते ती टवळी. *दिवटी ही एका जागी स्थिर असते ,तर टवळी हवी तशी उजेडासाठी फिरवता येते*. कधी ती घरात, दारात ,गोठ्यात, पडवीत नेता येते म्हणजे टवळी *उजेडासाठी सर्वत्र फिरते म्हणून गावभर फिरणाऱ्या एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला टवळी म्हणू लागले* .*तर घरात बसणारी दिवटी*. पुरुष-गटातील काम न करणाऱ्या पुरुषाला.. जो आडदांड आहे अशाला किंवा काही वेळा वंशाच्या दिव्याला सुद्धा दिवटा म्हणतात .*टवळीप्रमाणे टवळाही असतो*.गावातील प्रकाशासाठी वापरला जाणारा *वेटोळ्याचा दिवा*. ज्याची वात खूप मोठी असते, ती लवकर पेटत नाही, त्याला पेटवण्यासाठी खूप उशीर लागतो, त्याच्यावरून ही एक म्हण पडली....↘️ एखादी व्यक्ती घरात उशिरा आली की घरचे लोक म्हणायचे "*आला टवळ्याला वात लावून" (म्हणजेच खूप उशिरा आलास.)                                       

तर तात्पर्य हेच की *टवळा व टवळी ही शिवी नसून प्रकाशासाठी वापरला जाणारा व विविध ठिकाणांवर फिरवला जाणारा दिव्याचा प्रकार आहे*.                   🌸🌸🌸

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी तातडीने कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी सोडले

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी


तातडीने कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी सोडले


सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाण्याचे शासनस्तरावर नियोजन


 - मंत्री शंभूराज देसाई


 


            मुंबई दि. 24 : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी तातडीने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


            मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज कोयना जलाशयातील पाणीसाठा वापराबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेल्या आदेशान्वये सांगली आणि सातारा जिल्ह्यातील उर्वरित भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 24 नोव्हेंबर रोजी धरणातून 1050 क्यूसेस क्षमतेने 2 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात आले आहे. हे पाणी सांगली जिल्ह्याला पोहोचण्यासाठी दीड ते दोन दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टी.एम.सी. आहे. एकूण जलाशयाच्या प्रमाणात या वर्षी जवळपास 25 टक्के पाणीसाठा कमी आहे. कोयना धरणातील 67 टक्के पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात येते. मात्र या वर्षी जलसाठा कमी असल्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, शेतीसाठी पाणी देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.


          वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाणी कमी केल्यानंतर किती वीज विकत घ्यावी लागेल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना या बैठकीत जलसंपदा, महानिर्मिती आणि महाजेनको यांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये दहा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा आणि पंधरा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा तयार करून किती वीज खरेदी करावी लागेल याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.


            या बैठकीस आमदार अनिल बाबर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत मयेकर, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगिरी, महावितरणचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, एमएलडीसी चे कार्यकारी संचालक शशांक जवळकर, कोयना धरणाचे मुख्य अभियंता श्री. चोपडे, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) बैठकीस उपस्थित होते.


०००००

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनातील लोकप्रिय कविकट्टा हा उपकम साहित्य संमेलनात दोन दिवस आयोजित केलेला आहे. कविकट्टा व्यासपीठावर कविता सादरीकरणासाठी स्वरचित कविता मागविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नवोदित तसेच प्रस्थापित कवींना यामध्ये सहभागी होता येईल. या संमेलनासाठी आलेल्या कवितांपैकी २०० कवितांची निवड करून कवींना निमंत्रित केले जाणार आहे.


कविकट्टा नियोजनाबाबत बैठक


अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात कविकट्टा नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्‌मय मंडळाचे कार्यवाह नरेंद्र निकुंभ होते तर व्यासपीठावर कविकट्टाचे प्रमुख संयोजक राजन लाखे (पुणे) मंडळाचे उपाध्यक्ष व कवीकट्टा समन्वयक रमेश पवार होते. बैठकीत कविकट्टा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. व विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. या बैठकीस म.वा. मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, साहित्यिक प्रा.बी. एन. चौधरी, विलास पाटील, दिनेश नाईक, भाऊसाहेब देशमुख, रमेश धनगर, डॉ. कुणाल पवार, मनोहर नेरकर, शरद पाटील, सुनिता पाटील, प्रतिभा पाटील, विवेक जोशी, रत्नाकर पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण पाटील, पुनम साळुंखे, आदिंची उपस्थिती होती.


कवीकट्टासाठी कविता पाठविण्यासाठी नियमावली


कविकट्टासाठी पाठविण्यात येणारी कविता स्वरचित असावी व प्रत्येक कवीने एकच कविता पाठवावी कविता २० ओळीपेक्षा जास्त नसावी. निवड समितीने निवडलेली कविता अंतिम असेल. कवीने स्वतःचा पत्ता, दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल पानाच्या वरच्या बाजुला स्पष्ट अक्षरात लिहावा. कविता पोस्टाने पाठवितांना पाकिटावर कविकट्टा असा स्पष्ट उल्लेख असावा. कविता फक्त पोस्टाने अथवा ईमेल पाठवावी, व्हॉटसअॅपवरची कवीता स्विकारली जाणार नाही. कविता ईमेलने पाठवितांना युनिकोड फॉन्टमध्येच पाठवावी. कविता कार्यालयात पोहचण्याची अतिम दिनांक २० डिसेंबर २०२३ असेल. ईमेलने कविता kavikatta97amalner@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी. तसेच पोस्टाने कविता पाठविण्यासाठी, मराठी वाङ्‌मय मंडळ, नांदेडकर सभागृह, न्युप्लॉट, अमळनेर, जि, जळगांव ४२५४०१ येथे पाठवाव्यात असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राजन लाखे (कविकट्टा प्रमुख) ९८९२६५५५२६, प्रसाद देशपांडे (समन्वयक), ९६८७६९८२७१, रमेश पवार (समन्वयक) ९४२१५९०५१ यांच्याशी संपर्क साधावा.


सावधान मार्केटिंग फंडा


 

असा तुलसी विवाह साजरा


 

भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्रातील उत्पादनांना मागणी मसाले, गूळ, हळद, मध, पैठणी, मनुका, कोल्हापुरी चपलांना खास मागणी

 भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्रातील उत्पादनांना मागणी

मसालेगूळहळदमधपैठणीमनुकाकोल्हापुरी चपलांना खास मागणी

 

            नवी दिल्ली, दि.24 : कोल्हापूरचा मसालागूळचप्पलसांगलीची हळदमनुकाचटईनागपूरचे संत्रेमहाबळेश्वरचे मधपैठणची पैठणी यासह राज्यातील विविध पारंपरिक वस्तूंना भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात वाढती मागणी मिळत आहे.

             केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्यावतीने भारतीय उद्योग प्रोत्साहन संस्था अर्थात आयटीपीओच्या वतीने देशाची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे दरवर्षी 14 ते  27 नोव्हेंबर या दरम्यान आयेाजन करण्यात येते. या मेळ्यात विदेशातील उद्योग दालने आणि देशातील प्रत्येक राज्याची दालने मेळाव्याचे खास आकर्षण असते. मेळाव्याच्या माध्यमातून उत्पादकांना थेट ग्राहक व ग्राहकांनाही थेट उत्पादन मिळते. यावर्षी‘वसुधैव कुटुंबकम-युनिटी इन ट्रेड’ या मध्यवर्ती संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्र दालनही सजविण्यात आले आहे.

            महाराष्ट्र दालनात एकूण 48 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर चप्पलगूळमसालेसांगलीची हळदमनुकाचटई महाबळेश्वरचे मधनागपूरची संत्रीपैठणी पर्सनंदुरबारचे मसालेपापड व चटण्यासोलापूरचे टेरी टॉवेलधारावीची बॅगमाथेरानची चप्पलघर सुशोभीकरण्याच्या वस्तूहँड पेंटिंगविविध क्लस्टर व महिला बचत गटामार्फत उत्पादित वस्तू आदी वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.

            सांगलीचे बापूसो शामराव चव्हाण यांनी त्यांच्या दालनात सर्व प्रकारच्या ज्यूट चटईवॉल हॅगिंगलेटरबॉक्सबस्तरद-यासतरंज्याटेबल मॅट आदी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांनी सांगितले कीत्यांच्या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोलकत्याला जाऊन श्री. चव्हाण यांनी ज्यूटपासून बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांबद्दल सर्व आवश्यक माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी खानबाग येथे चटई बनविण्याला सुरुवात केली. सध्या त्यांच्या  चरक स्वास्थ बहुउद्देशीय संस्थेमार्फत 60 महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, 30 महिला प्रशिक्षणानंतर पूर्णवेळ ज्यूटपासून विविध उत्पादने तयार करतात. 

            कोल्हापूरचा वर्णे मसाले’ गाळा मेळ्यात लावण्यात आला आहे. या संस्थेच्या मीना वर्णे यांनी स्वत: तयार केलेले विविध प्रकारचे मसाले विक्रीस ठेवले आहेत. मेळ्यात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी सलग 10 दिवस 1000 किलो मसाले तयार केल्याचे सांगितले. या मसाल्यांना अस्सल चव असल्याची भावना व्यक्त करतात. त्यांच्या मुलाने अभियांत्रिकी पदवी मिळवूनही तो आईची मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या सहकार्यामुळे राजधानी पर्यंत पोहचल्याची व मालास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना श्रीमती वर्णे यांनी व्यक्त केली. 

            या दालनात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाडून प्रामुख्याने सेंद्रीय मध विक्रीसाठी ठेवले आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जंगलात मधमाशांच्या मधपेट्या ठेऊन मध संकलन करण्यासाठी वन खात्याची मान्यता घेऊन सेंद्रीय मध तयार करत असल्याची माहिती  संजय पाटील यांनी दिली. संपूर्ण देशी तंत्रज्ञानाने व शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात येते व रोजगार निर्मितीची उत्तम क्षमता असणारा उद्योग असल्याचेही त्यांनी सांगितले.

            कोल्हापूरचे प्रसिध्द कोल्हापूरी चप्पल मेळ्याचे खास आकर्षण ठरत आहे. या गाळ्याच्या सर्वोसर्वे श्रीमती मनीषा डोईफोडे यांनी त्यांच्या रोहित फुटवेअर स्टॉल’ मध्ये विविध प्रकारचे कोल्हापूरी चप्पल ठेवले असून या स्टॉलवर भरपूर गर्दी दिसायला मिळते.

             नागपूर येथील माऊली क्रिएशन्स’ स्टॉल ला पैठणीचे आकर्षक पर्सहँड बॅगसाड्यादुप्पटाडायरी सारख्या वस्तु श्रीमती मृणाल दाणी व अस्मिता यांनी विक्रिस ठेवल्या आहेत. पहिल्यांदाच एवढा मोठ्या व आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाल्याचा  व त्यांच्या हस्तकलेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांनी आंनद व्यक्त केला व पुन्हा या मेळ्यात सहभागी होण्याची आशाही व्यक्त केली. 

            देशाच्या राजधानीत या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाकडून दालन उभारून राज्यातील ग्रामीण उद्योजकांना उत्तम संधी दिल्याची भावना व्यक्त करतसर्व सहभागी कारागिरांनी शासनाचे आभार मानतया पुढेही राज्यशासन असल्या संधी उपलब्ध करून देण्याविषयी आशा व्यक्त केली.

००००

Featured post

Lakshvedhi