Saturday, 21 October 2023

*श्री रेणुकादेवीची कथा.*

 *श्री रेणुकादेवीची कथा.*


रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तीस्थळ म्हणून प्रसिध्द आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे. वेगळी प्रचीती आहे. कार्ल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिध्द आहे. सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत. राजा रेणू (कान्यकुब्ज, प्रसेनजित, प्रेसेन) काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे.

 

राजाराणीला बरेच वर्ष मुल नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणुन त्याला एक मुलगी झाली. ती चैत्र शुध्द पंचमीस शुक्रवारी जन्मंली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. (रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते.) ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तीचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिन्हीं लोकांतून अनेक मान्यंवर मंडळी आली. अनेक राजे-महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नि ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली.


रेणुकेला पाच मुलं झाली, त्या पाचांची नावे रूमावंत, सुशेषा, वसु, विश्र्वासु आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसी सोबत जलक्रीडा करीताना दिसला ते अतिशय मादक दृष्य पाहून माता रेणूका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदाग्नि रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्निनी आंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामूळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नि ऋषींनी रेणुकेस ठार मारण्याची आज्ञा आपल्या ४ मुलांना केली. चार ही मूले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमदाग्नि आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्निने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम (राम) तेथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुष झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यानी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचार शक्ती ऋषीना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पुर्ण केली.


मृत बंधू जीवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न-विछीन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले. या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले.


रेणुका आपल्या संसारात पुन्ह मग्न झाली. रेणुकेस एक बहिण होती. तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्त्रार्जन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदाग्निने पाठविले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषिनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली. पण ऋषी जमदाग्निनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरावर युध्द करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनुच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला. पण त्यामुळे राजा खुप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जगदाग्नि ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्निंचा वध केला. नंतर  मेहुणी रेणुकेवर २१ वार केले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृष्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे  प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्दुना माझा पराक्रमी राम एकविस वेळ ही पृथ्वी नि:क्षत्रिय करेल.


परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पुर्ण करेन. परशुरामाने कावड करून एकाबाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्हात किनवट तालुक्यात पोहचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत विधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे. हे परशुरामाला पाहवेना तो फार दुखी झाला. त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपणं आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जिवीत झाली. पण आताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुख:द प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे तो व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खुप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली, नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार  ह्रदयभेदक तो प्रसंग पहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दुर गेला. सहा दिवसांनी माता-पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मुर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मुर्ती स्थापन केली.


आईला दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र-अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भालफेक, परशु चालवण्यात प्रविण्य मिळविले. त्याने स्वबळावर सौन्य ऊभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्त्रार्जुनावर केले. त्याचा नित्पात करून इतर समाजद्रोही २० राजांना त्याने पराभुत केले. आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामाचं ही युध्द झालं आहे. परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी-तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात दोन तांदळा आहेत. एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा.


माहूर येथील डोगंरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी १२००-१५०० पायऱ्या चढूनवर जावं लागत. गाभाऱ्यात तांदळा दगडातली शेंन्दुर चर्चीत मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावला आहे. बैठकीवर सिंह कोरला आहे. देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्रीदत्ताचे स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मुर्ती आहे. बाजूला तिर्थ नावाचे कुंड आहे तेथेच परशुरामाने आई-वडिलांची अंतक्रिया केली असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई, तिचे दुसरे नाव एकविरा आईच्या आठवणीने उंचबलून आलेल्या मानाने परशुरामाने कडे-कपारीत बाण मारला. त्या ठिकाणी एकविरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे.


महाभारतात रेणुकेची उत्पती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावरुन तिला कामली हे नांव आले असावे. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कालिपुराणात सांगितले आहे.

Friday, 20 October 2023

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 

            मुंबईदि. 20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा 'दिलखुलासकार्यक्रम प्रसारित होईल.

            वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील आणि वर्षा आंधळे यांनी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

००००

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे पाठबळ कल्याणकारी योजनांचाही लाभ

 मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे पाठबळ

कल्याणकारी योजनांचाही लाभ

 

            मुंबईदि २०:- चित्रपटमालिकावेब सिरीजजाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतनकामाचा करारनामाबोनसउपदान प्रदानभविष्य निर्वाह निधीभारतीय कर्मचारी विमा योजनाबालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभही दिला जाणार  आहे.

            चित्रपटमालिका व इतर मनोरंजन कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून अनेकदा कलाकारतंत्रज्ञ  व कामगारांचे वेतन थकविण्याचे प्रकार घडत असतात. यासंदर्भात विविध कामगार संघटनांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी कामगार विभागाने २०२१ व २०२२ मध्ये चित्रपट निर्मातेतंत्रज्ञकलाकार दिग्दर्शक आणि मनोरंजन क्षेत्रातील कामगार संघटना यांच्यासोबत चर्चा करून सर्वंकष कार्यप्रणाली तयार केली आहे.

            सदरची मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी चित्रपटसृष्टीतील सर्व मालकनिर्माते,  कामगारसह कलाकारतंत्रज्ञ तसेच कामाच्या स्वरुपानुसार काम  करणाऱ्या सर्व संबंधितांवर बंधनकारक आहे. 

कार्यप्रणाली कुणाला लागू

            मानक कार्यप्रणाली ही राज्यातील चित्रपटदूरचित्रवाणीदर्शन मालिकाजाहिरात विभागडिजिटल उद्योग व इतर असंघटित करमणूक क्षेत्रातील विभागांमध्ये काम करणारे व्यावसायिकचित्रपट निर्मातेदिग्दर्शकनृत्य दिग्दर्शकसंगीत दिग्दर्शकॲक्शन ॲण्ड स्टंट दिग्दर्शककलावंत (सर्व प्रकारचे अभिनय करणारे कलाकारसह कलाकारनायकनायिकासह नायकसहनायिकागायकव्हाइस एडिटरलेखकबाल कलाकार इ. तंत्रज्ञ ध्वनी मुद्रण करणेएडिटिंग करणेसाऊंड रेकॉर्डिस्टहेड कॅमेरामन इ. कामगार, (रंगमंच उभारणारे कामगार म्हणजेच हेड टेपिस्ट, असिस्टंट टेपिस्ट,  हेड पेंटर,पेंटरकारपेंटरहेड कारपेंटरअसिस्टंट कारपेंटरपॉलिशमनपीस मोल्डरमोल्डरकास्टर, लाईटमनस्पॉट बायप्रॉडक्शन बॉयक्रेन ऑपरेटरइलेक्ट्रिशियनजनरेटर ऑपरेटरहेल्परफोटोग्राफर्ससाऊंड इंजिनिअर्सस्टंट आर्टिस्टसहायक कोरस गायक /गायिकामहिला/ पुरुष सह कलाकारसिने वेशभूषा व मेकअप आर्टिस्टॲक्शन डबिंग इफेक्ट आर्टिस्टनर्तक (देशीपरवानगी धारक विदेशी)ज्युनिअर आर्टिस्टछायाचित्रकार,ड्रेस मनबॅकस्टेज आर्टिस्टतृतीयपंथी भूमिका करणारे कलावंत)  बालकलाकार व इतर तत्सम स्वरूपाचे काम करणारे कामगार,  कर्मचारी,तंत्रज्ञतसेच असंघटित क्षेत्रातील शासनाने घोषित केलेल्या ३०० प्रकारचे उद्योग व्यवसायाच्या यादीमधील क्र. ६५ ते क्र ७७ नुसार करमणूक व संबंधित काम करणारे कामगार जसे की; दृकश्राव्य कामाशी संबंधित कामगार वाजंत्री कॅमेरामन सिनेमाशी संबंधित कामे सिनेमा प्रक्षेपणा संबंधित कामे सर्कस कलाकार नर्तक गोडीस्वारा जादूगार मॉडेल कवी लेखक इत्यादींना लागू राहील त्याचबरोबर दूरदर्शन मालिका निर्मिती, लघुपट निर्मिती, वेब सिरीज निर्मिती, जाहिरात पटनिर्मिती, ऑडिओ व्हिज्युअल अल्बम निर्मितीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील ही मानक प्रणाली लागू राहील. 

कामगारांना मिळणारे लाभ

            किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करणे नियोक्त्यास बंधनकारक. तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वेतन देणे बंधनकारक. सर्व कामगारांचे वेतन त्यांच्या बॅंक खात्यात किंवा धनादेशाद्वारे अदा करणे बंधनकारक. निर्मात्याने कुशल व अकुशल कामगारांशी वैयक्तिक करार केल्यानंतर देय वेतन/ मानधन ३० दिवसांच्या अदा करणे बंधनकारक.

५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणा-या आस्थापनेत ५ टक्के दराने घरभाडे भत्ता१० व १० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनेत २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असेल अशा कामगारांना सेवा समाप्तीच्यावेळी ८.३३टक्के दराने बोनसकामगाराने राजीनामा दिल्यास किंवा त्याला कामावरून कमी केल्यास १५ दिवसांचे वेतन ‘य’ हिशेबाने उपदान देय आहे. सिने क्षेत्रात २० पेक्षा जास्त आस्थापना असलेल्या आणि कामगारांचा पगार १५ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्या कामगाराला भविष्य निर्वाह निधी योजना लागू होऊन त्याच्या वेतनातून १२ टक्के व व्यवस्थापकाकडून निधी देण्याचा नियम लागू. भारतीय कर्मचारी विमा योजना १० व १० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना लागू असून २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणा-या कामगारांच्या वेतनातून ०.७५ टक्के आणि मालकाकडून ३.२५ टक्के रक्कम कपात करण्याचा नियम लागू. यामुळे कामगारांना आरोग्य सुविधाआजारपणअपंगत्वप्रसृती इत्यादीसाठी लाभ घेता येतील. कामगारांना इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास कामगार नुकसान भरपाई अधिनियम १९२३ च्या तरतुदीनुसार कामगारांच्या वारसा नुकसान भरपाई देणे बंधनकारक. सिने क्षेत्रामध्ये चित्रीकरणाच्या दरम्यान स्टंट करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी आणि स्टंट करताना आवश्यक असणारी सर्व सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध करून देणे

            महिलांची सुरक्षा : रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणांहून घरापर्यंत तसेच घरापासून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी सुरक्षित व सुस्थितील वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देणे बंधनकारक. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ संदर्भात तक्रार करण्यासाठी समिती गठित करावी. बाह्य चित्रीकरणावेळी स्वच्छतागृह आणि कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था करणे आवश्यक.

बाल कलाकारांची सुरक्षा:-  कोणत्याही बालकास कलाकार म्हणून एका दिवसामध्ये पाच तासांपेक्षा जास्त काम करता येणार नाही. बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणताही बालक सलग २७ दिवस काम करणार नाही याची खात्री करावी. प्रत्येक बालकाच्या वेतनामधून कमीत कमी २० टक्के रक्कम बालकाच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव म्हणून जमा करण्यात यावी.

 

उद्योगांना जमीन देणाऱ्या आदिवासी भूमिपुत्रांना रोजगार देणे बंधनकारक

 उद्योगांना जमीन देणाऱ्या आदिवासी भूमिपुत्रांना रोजगार देणे बंधनकारक

                                                           -उद्योगमंत्री उदय सामंत

राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस प्रोत्साहन निधी देणार

 

       नंदुरबारदि. २० : गुजरातमधील वस्रोद्योग महाराष्ट्रातील नवापूरमध्ये गुंतवणूक करत आहेतराज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्रद्योगांना भरघोस प्रोत्साहन निधी (इन्सेन्टिव्ह) दिला जाणार असूनयासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमीपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणे बंधनकारक असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

            जनरल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रूपये गुंतवणूकीच्या  प्रकल्पाचे भूमीपूजनजिल्हा औद्योगिक विकास मंहामंडळाची आढावा बैठक तसेच नवापूर टेक्सटाईल इंडस्ट्रिअल असोसिएशन सोबत झालेल्या कार्यक्रमात मंत्री श्री.सामंत बोलत होते.

             यावेळी आमदार शिरीषकुमार नाईकमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशीडोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावितजिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती संगीता गावित जिल्हाधिकारी मनीषा खत्रीएमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारीपी.डी. मलिकनेरसहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्कीउपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळेप्रादेशिक अधिकारी अनिल गावितअधीक्षक अभियंता श्री. झंजेकार्यकारी अभियंता गणेश वाघजनरल इंडस्ट्रीजचेअधिकारी उपस्थित होते.

            उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले कीउद्योजकांना प्रोत्साहन देताना ज्या आदिवासी बांधवांनी नवापूरच्या टेक्सस्टाईल पार्कच्या विकासासाठी जमीन दिलीत्यांना रोजगार देणे बंधनकारक असल्याचे संबंधित उद्योग व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. आदिवासी बेरोजगार तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण प्रत्येक होतकरू तरूण बरोजगारांना उद्योग विभागाच्या एम.आय.डी.सी.च्या वतीने मोफत दिले जाईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ प्रस्ताव पाठवावा. नवापूरच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी बांधवांनी राज्यातील उद्योग भरभराटीस प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या जमिनी देवून शासनाला सहकार्य केले आहेत्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे सांगितले.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले कीआपल्या भागात जेव्हा एखादा उद्योग गुंतवणूक करू इच्छितो तेव्हा त्या उद्योगाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्थानिकांमध्ये निर्माण करणेजनजागृती करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास उद्योग क्षेत्राला त्यामुळे ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे. केवळ उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा उद्देश नसून तेथील कामगार वर्ग हा सुद्धा महत्वाचा आहेत्यासाठी उद्योगांच्या भरभराटीसोबतच तेथील कामगारांनाही त्यांच्या कुशलतेचा योग्य मोबदला मिळायला हवा ही शासनाची आग्रही भूमिका आहेत्यासाठी कुठलीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.

            राज्यातील उद्योगांना हेलपाटे न मारता जागेवरच आजपर्यंत सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांचा इन्सेन्टिव्ह दिला असल्याचे सांगताना मंत्री श्री. सामंत म्हणाले की, आगामी काळात राहिलेल्या इन्सेन्टिव्ह अनुशेष भरून काढला जाणार आहे. औद्योगिक प्रगतीत आज महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. गुजरात राज्यातील उद्योग नवापूरसारख्या आदिवासी बहुलछोट्या तालुक्यात टेक्स्टाईल पार्कमध्ये गुंतवणूक करताहेतत्यामुळे या टेक्सटाईल पार्कमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करणाऱ्या गुजरातसह देशातील सर्व उद्योजकांना जास्तीतजास्त इन्सेन्टिव्ह देण्याचा व सर्व समुदायांच्या लोकांना गुंतवणूकीसोबत रोजगार देण्याचाही प्रयत्न राज्यशासनाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            नवापूर टेक्स्टाईल पार्कमध्ये ७०० मीटरच्या रस्त्याची असलेली मागणी मंजूर करत असून विद्युत पुरवठ्यासाठी येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर केल्या जातील. तसेच नंदुरबार औद्योगिक क्षेत्रात १२ दशलक्ष लिटरची पाणी योजना ही १८ ते २० दशलक्ष लिटर करण्यास तात्काळ मान्यता देताना नंदुरबारच्या औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सेवा-सुविधांच्या विकासासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. येथील जनरल उद्योग समूहाने आपल्या ८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत १२०० कोटी रुपयांची अधिकची तरतूद करून नवापूरमध्ये ५ हजार लोकांना रोजगार मिळावा यासाठीचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

००००


मेरी माटी मेरा देश' अभियानात सहभागी होणार आश्रमशाळेतील विद्यार्थी

 मेरी माटी मेरा देशअभियानात सहभागी

होणार आश्रमशाळेतील विद्यार्थी

   - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 

            मुंबईदि. 20 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात 'मेरी माटी मेरा देशहे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून  या अभियानात राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी सहभागी होणार असल्याचेआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

            'मेरी माटी मेरा देशया अभियानाबाबत प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी ते बोलत होते.

           ते म्हणाले की, 'मेरी माटी मेरा देशया उपक्रमांतर्गत एका हातात माती घेऊन 10 वर्षावरील आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा सेल्फ़ी फोटो काढायचा आहे. हे फोटो प्रकल्प कार्यालयाने 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांना देण्यात येणाऱ्या लिंक वर अपलोड करायचे आहेत.

           या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेउपसचिव र. तु. जाधवतसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्व अपर आयुक्तप्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्या

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत

ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात होणार

 

            मुंबईदि. २० : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत ७० हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत. राज्यात सध्या ७० हजार लाभार्थ्यांना ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसायाकरिता वितरीत केले आहे. यापैकी ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे. प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्भूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु करण्यात येत असून दसऱ्यापासून त्याची सुरवात करण्यात येत असल्याची माहिती  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष  नरेंद्र  पाटील यांनी दिली.

            महामंडळामार्फत गेल्या वर्षभरात राबवण्यात येत असलेल्या योजनांसंदर्भात माहिती देताना  मंत्रालयाच्या विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित  पत्रकार परिषदेत श्री. पाटील  बोलत होते.

            श्री.पाटील म्हणाले कीमहामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरु करण्याची कार्यवाही केली आहे.  येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला  सुरुवात होणार आहे. यासाठी महिंद्रा आणि एस्कॉट  टर्बो या दोन कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात  येणार आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून  १० हजार ते २ लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

            महामंडळाच्या योजनांची जनजागृती राज्यामध्ये गावपातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हानिहाय दौरेमेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून  राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या माध्यमातून महामंडळाच्या योजनांची प्रचार-प्रसिध्दी करण्यात येत आहे.  ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरु करुन त्याचा लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत पत्रव्यवहार करुनही बाब उपसमितीमध्ये देखील मांडली. ही बाब महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडूनमहामंडळाच्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत मिळावी याकरिता त्यांनी प्रयत्न करुन ट्रॅक्टर प्रकरणे सुरु करण्याकरिता कार्यवाही केली असल्याचे सांगितले.

            लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1) अंतर्गत कर्ज मर्यादा रु. १० लाखांवरुन रु. १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर  ३ लाख रुपयांच्या मर्यादेत करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा ४.५ लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्ज कालावधी ५ वर्षांहून ७ वर्षापर्यंत वाढविला आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वाकरिता वयोमर्यादेची अट ६० वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे.

            ‘शासन आपल्या दारी’ प्रमाणेच लाभार्थी संवाद मेळावे आयोजित करून ‘महामंडळ आपल्या दारी’ ची कार्यवाही सुरु केली असून आतापर्यंत राज्यात ३ संवाद मेळावे व एकूण ११ जिल्ह्यांमध्ये दौरे करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँक ऑफ इंडिया समवेत सामंजस्य करार केला आहे. त्याचप्रमाणे पुढील कालावधीत महामंडळ राज्यातील सर्व सीएससी सेंटर बरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असूनलाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेअंतर्गत ऑनलाईन स्वरुपात सहकार्य सीएससी (CSC) सेंटरच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया महामंडळाच्यास्तरावर सुरु आहे. भविष्यात महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक संख्येने  मराठा तरुण उद्योजक तयार करण्याचे ध्येय असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ


कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न

 कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एसटी प्रवर्ग मागणीच्या विचारार्थ निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

            मुंबईदि. २० :-  कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातीलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच महादेवमल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.  या समाजाच्या विविध मागण्या तसेच जातीचे दाखलेवैधता प्रमाणपत्र विषयावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.

            बैठकीत कोळी समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातीलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            या बैठकीस आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित,  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलआमदार रमेश पाटीलआमदार सुरेश भोळेआमदार चिमणराव पाटीलमहसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवराआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडमाजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

            तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलआमदार संजय सावकारेमाजी मंत्री डॉ. दशरथ भांडे दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.  

            या समाजाच्या जातीचे दाखले व वैधता विषयक उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विविध निकालांचा विधी व न्याय विभागाकडून मत मागवण्यात यावे. तसेच आदिवासी विभागाच्या कार्यालयातील अधिकारी जळगाव येथेही उपस्थित राहून कामकाज पाहतील अशी व्यवस्था करण्याचे निर्देशहीमुख्यमंत्र्यांनी दिले. 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 'कोळी समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने सर्वंकष आढावा घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी  जुन्या काळातील नोंदी आदी गोष्टींची माहिती एकत्र करुन त्यांचा अहवाल तयार करावा लागेल. त्यादृष्टीने या मागणीचा विचार करण्यासाठी ही समिती समाज बांधव तसेच तज्ज्ञ आदींशी समन्वय साधून शिफारशी करेल. ही समिती कालबद्ध पद्धतीने काम करेल. या दरम्यान आदिवासी विभागाने या समाजाला जातीचे दाखले देताना काटेकोरपणे आणि विहीत पद्धतीने काम करावे. रक्त, नातेसंबंध तपासणी आदी बाबतीत विहीत आणि व्यावहारीक पध्दतीने कार्यवाही करावी,'असेही ते म्हणाले.

            या समाजाच्या प्रलंबित १२ हजार दाखल्यांचा फेरविचार करण्यात यावा, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.

            यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री श्री. महाजनपाटील यांच्यासह यांनी सहभाग घेतला. आमदार रमेश पाटीलआमदार श्री. भोळेआमदार श्री. सावकारेप्रा. एस.जी.खानापुरेचेतन कोळी,माजी मंत्री डॉ. भांडे यांनी विविध मुद्द्यांची मांडणी केली.

0000


Featured post

Lakshvedhi