Saturday, 7 October 2023

आधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल

 आधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल

: राज्यपाल रमेश बैस

मुंबईत हृदयविकार विषयक जागतिक परिषदेला सुरुवात

मुंबई दि. 7 कार्डियाक इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचारामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून लाखो लोकांना त्यामुळे जीवनदान मिळत आहे तसेच रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारत आहे.  मात्र 20 - 30 वयाच्या युवकांमध्ये दिसून येणारे हृदयविकार ही चिंतेची बाब असूनते थांबविण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी समाजाला मार्गदर्शन करावेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.    

            'कार्डियाक इमेजिंग व क्लिनिकल कार्डिओलॉजीया विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 6) हॉटेल ग्रँड हयातसांताक्रुझ मुंबई येथे पार पडलेत्यावेळी ते बोलत होते.  

            उदघाटन सत्राला अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला, कार्डियाक इमेजिंग वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सी एन मंजुनाथवर्ल्ड फेडरेशन ऑफ कार्डियाक इमेजिंग अँड क्लिनिकल कार्डिओलॉजीचे अध्यक्ष डॉ जी एन महापात्राइंदूरच्या श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक डॉ विनोद भंडारी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते. 

       राज्यपाल रमेश बैस पुढे म्हणाले, इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती सामान्य रुग्णांकरिता खर्चिक असतात. अशा चाचण्यांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बहुतांश विदेशात तयार होतात व ती महागडी असतात. त्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपकरणे देशात तयार झाली, तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल. तसेच हृदयरोग व त्यासाठी लागणारा रोगनिदान खर्च आयुष्मान भारत सारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल.     

            वीस - तीस वर्षांचे तरुण जिममध्ये व्यायाम करताना किंवा कामाच्या ठिकाणी अचानक कोसळल्याचे बातम्यांमध्ये पाहतोतेंव्हा अतिशय दुःख होतेअसे सांगून हृदयविकार नियंत्रणात आणण्यासाठी तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.  

            इमेजिंग तंत्रज्ञानातील प्रगतीकृत्रिम प्रज्ञा व आयुष्मान भारत सारख्या सर्वसमावेशक योजनांमुळे लाखो लोकांचे जीवनमान उंचावेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

       संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या ताज्या अहवालानुसार सन 2050 पर्यंत भारतात वरिष्ठ नागरिकांची संख्या 34.7 कोटी इतकी असेल. या दृष्टीने नागरिकांना पुरेशा प्रमाणात हृदयरोग चिकित्सा सुविधा देण्यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांनादेखील आधुनिक चिकित्सेचा लाभ होईल. यादृष्टीने टेली मेडिसिन व टेली रेडिओलॉजीचा कसा वापर करता येईलयाबाबत विचार विनिमय करावा, अशी सूचना राज्यपाल श्री. बैस यांनी केली. 

हवेतील प्रदूषणताणतणावांमुळे हृदयरोग वाढत आहे : डॉ मंजूनाथ

            जीवनशैली आजारांच्या बाबतीत भारतात गंभीर परिस्थिती असून हृदयविकार रोगउच्च रक्तदाबमधुमेहकर्करोग व अलीकडच्या काळात स्क्रीन ऍडिक्शन वाढत आहे. हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक- तृतीयांश चाळीशीच्या आतील व्यक्तींचे होत आहेत. वाढत्या हृदय विकारांमागे हवेतील प्रदूषण हे देखील एक कारण असल्याचे समोर आले आहेअसे वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष व हृदयरोग तज्ज्ञ डॉ सी आर मंजूनाथ यांनी यावेळी सांगितले.  

            पूर्वी शहरातील व विशेषतः संपन्न लोकांना होणारे हृदयविकार आज गरीबकामगार व गावकऱ्यांनादेखील होत आहे. लहान मुलांची झोप नीट व्हावी व मुलांची तयारी करताना पालकांचासुद्धा ताणतणाव कमी व्हावायासाठी मुलांच्या शाळा साडेदहा पासून सुरु करणे चांगले होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  

            यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते 'कार्डियाक इमेजिंग अपडेट - 2023या पुस्तकाचे तसेच परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

0000

Maharashtra Governor inaugurates 3rd World Congress

On Cardiac Imaging in Mumbai

            Mumbai 7 October: Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the 3rd World Congress in Cardiac Imaging and Clinical Cardiology (WCC ICC 2023) in Mumbai on Fri (6 Oct). The Governor released the book 'Cardiac Imaging Update - 2023' and a souvenir on the 3rd World Congress on the occasion. 

            Chairman of Atomic Energy Regulatory Board (AERB) and Nuclear Scientist Er Dinesh Kumar Shukla, President of the World Congress Dr C N Manjunath, Executive President of the World Congress and President of World Federation of Cardiac Imaging and Clinical Cardiology Dr G N Mahapatra, Founder and Chairman of Sri Aurobindo Institute of Medical Sciences Indore Dr Vinod Bhandari, and national and international delegates were present.


नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण

 नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण

मंत्री श्री. पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

            मुंबईदि. 7: उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) अधिकाधिक मुल्यांकन करून घ्यावे यासाठी  नॅक प्रक्रियेत काही सुधारणा  करण्यात याव्यात, अशी विनंती  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षणकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राद्वारे केली आहे.

            केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. प्रधान पुणे येथील एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी त्यांचे स्वागत करून मंत्री श्री. पाटील यांनी त्यांना या संदर्भातील पत्र दिले.

            उच्च शिक्षण संस्था या बिगर-व्यावसायिक  आणि विना-अनुदान/स्वयं-वित्तीय तत्त्वावर कार्यरत असणे गरजेचे आहे. एकूण विद्यार्थी संख्या 500 पेक्षा कमी, 10 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील संस्था असणेएकच अभ्यासक्रम असणारे महाविद्यालयअधिसूचित आदिवासी जिल्ह्यात असावे किंवा फक्त पदवी अभ्यासक्रम चालविणारे महाविद्यालय यापैकी कोणतेही दोन निकष देखील पूर्ण करणे गरजेचे असेल.

            या महाविद्यालयांसाठी कोणतेही श्रेणी नसावी, तर केवळ प्रमाणन झालेले किंवा प्रमाणन न झालेले असाच उल्लेख असावा. मूल्यांकन शुल्क कमी केले जावे आणि एकूण खर्चाची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये असावी. मुल्यांकन समितीचे सदस्यांची संख्या राज्याच्या लगतच्या विद्यापीठ क्षेत्रातून फक्त 2 असतील. सुमारे 30 टक्के मेट्रिक्स वैकल्पिक केले जाऊ शकतील आणि त्यासाठीचे वेटेज योग्यरित्या पुनर्विनियोजित केले जाऊ शकेल.

            पीअर टीमचे सदस्य नॅक भेटीच्या वेळी क्वालिटेटीव्ह मेट्रिक्स (क्यूआयएम)ची पडताळणी करू शकत असल्याने मेट्रिकबाबत प्राचार्यांच्या मेट्रिक संबंधी प्रतिज्ञापत्राशिवाय कोणतीही माहिती सादर (अपलोड) करणे आवश्यक नसावे. नॅकद्वारे मेट्रिक-निहाय सूचना/वेटेजचे पुनर्विनियोजन करण्याची व्यवस्था असावी.

            उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सोपी आणि परवडणारी केल्यास अधिकाधिक संस्थांकडून मूल्यांकन करून घेण्यास गती मिळेल. तसेच प्रक्रियेतील गैरप्रकार टाळता येण्यास मदत होईल. प्रक्रियेला गती देण्याचा अनुषंगाने आवश्यक असल्यास आर्थिक प्रोत्साहन/शुल्क प्रतिपूर्ती योजनाही केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांद्वारे सामायिकरण आधारावर प्रस्तावित केली जाऊ शकतेअसेही मंत्री श्री. पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

            1994 मध्ये स्थापित 'नॅकही केवळ उच्च शिक्षण संस्थांचे (एचआयई) मूल्यांकन आणि प्रमाणन करत नाही तर या संस्थांमध्ये सतत गुणवत्ता सुधारणा उपाय सुचवते आणि त्यासाठी प्रोत्साहन देते.  नॅक मुल्यांकनात विशिष्ट मानकांचे होत असलेले पालन आणि एकूणच या प्रक्रियेची गुणवत्ता लक्षात घेता भारतातील उच्च शिक्षण संस्थांसाठी ते महत्त्वाचे मानले आहे. विद्यार्थी आणि पालकांना उच्च शिक्षणासाठी संस्था निवडण्याबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास हे मूल्यांकन मदत करते.

            सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरहीराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत केवळ 20 टक्के उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन होऊ शकले आहे.  पायाभूत सुविधांच्या समस्यांव्यतिरिक्त नॅक मूल्यांकनाची जटिल रचना आणि त्यासाठीचा खर्च आदी बाबीदेखील या प्रक्रियेसाठी शैक्षणिक संस्थांच्या उदासीनतेला कारणीभूत ठरू शकतात. उच्च शिक्षणबाबत अखिल भारतीय सर्वेक्षण (एआयएसएचई) अहवाल 2021 नुसार एकूण 61.4 टक्के महाविद्यालये देशाच्या ग्रामीण भागात आहेतही बाबदेखील विचारात घेतली पाहिजे, असेही श्री. पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

            महाराष्ट्र राज्य हे 'नॅकद्वारे मूल्यांकन आणि प्रमाणिकरण झालेल्या उच्च शिक्षण संस्थांच्या (एचआयईएस) संख्येबाबत देशातील अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. विहित कालावधीत राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन व प्रमाणन व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कुलगुरूमुख्याध्यापक आणि इतर भागधारकांसोबत बैठकांच्या अनेक फेऱ्या आयोजित करण्यात आल्या. राज्य शासनाने लहान महाविद्यालयांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी 'परीस स्पर्शयोजना सुरू केली आहे.  समस्यांचे विश्लेषण आणि निराकरण करण्यासाठी काही समित्यादेखील स्थापन करण्यात आल्या आहेत. असेही मंत्री श्री.पाटील यांनी नमुद केले.

0000

     


सप्तश्रृंगी गडाच्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार

 सप्तश्रृंगी गडाच्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार

                                                   उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

कळवण-सुरगाणा तालुक्यातील 494 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

                    

            नाशिकदिनांक: 7 ऑक्टोबर2023 (जिमाका वृत्तसेवा): कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गडाच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास शासनस्तरावर मंजूरी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज कळवण येथे कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी व्यासपीठावर विधासभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळखासदार सुनिल तटकरेआमदार माणिकराव कोकाटेदिलीप बनकरनितिन पवारहिरामण खोसकरडॉ. रावसाहेब शिंदेकळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडेनगराध्यक्ष कौतिक पगारमाजी जि.प. अध्यक्ष जयश्री पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेनाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत मंजूरी देण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून योजनांची अमंजबजावणी शासनस्तरावर करण्यात येत आहे. विविध विकास कामांवरील असलेली स्थगितीही शिथिल झाली असून येणाऱ्या काळात प्रस्तावित विकासकामांनाही मंजूरी देण्यात येवून आर्थिक तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देवून कळवण तालुक्यातील ओतूर धरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजूरी देण्यात येणार असून हा प्रश्न निकाली निघणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने शुन्य टक्के व्याजदराने 3 लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उर्जितावस्थेसाठी शासनस्तरावर तोडगा काढला जाईल. परंतु यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कळवण व सुरगाणा तालुक्यातील 494 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. चणकापूर धरण परिसरात माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटन स्थळाच्या धर्तीवर आदिवासी जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुरगाणा व कळवण तालुक्यात पर्यटनास चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचा विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येईल.

            राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणालेनाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांच्या अडचणी  प्राधान्यक्रमाने सोडविल्या जातील. कळवण व सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न शासनस्तरावर करण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

            विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणालेशेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अश्वासनाचे स्वागत आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासींच्या  विकास कामेवनपट्टे प्रश्न यावर सकारात्मक भूमिका शासनस्तरावर घेण्यात यावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

            याप्रसंगी आमदार नितिन पवार यांनी आपल्या मनोगतात कळवण व सुरगाणा तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली तसेच भविष्यात करावयाच्या कामांना शासनस्तरावर मंजूरी देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

निवांत झोपेसाठी


पवईचा आंबा आणि राणीभारतातून पहिली आंब्याची करंडी इंग्लंडच्या राणीला पाठविण्यात आली होती.

 ....पवईचा आंबा आणि राणी


*18 मे 1838. याच दिवशी 1838 साली 

भारतातून पहिली आंब्याची करंडी इंग्लंडच्या  राणीला पाठविण्यात आली होती.  रत्नागिरी हापूसच्या जागतिक प्रसिद्धीचा रंजक इतिहास आज पाहू या*.  मेसेज मोठा आहे पण ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे वाचनीय आहे.  

*सध्या आंब्याचा सिझन चालू आहे:*

   कोकणचा आंबा जगावर राज्य करतो

याला एकमेव कारण म्हणजे 

*फ्रामजी कावसजी बाबा !*

   आज मुंबईमध्ये राहणाऱ्या आयटी पब्लिकची राजधानी कुठली विचारली तर पवई हिरानंदानी गार्डन हे उत्तर मिळेल. 

   अतिशय पॉश एरिया. भल्या मोठ्या काचेच्या इमारती, मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचं मुख्यालय. जवळच असलेल्या आयआयटी मुळे पवईची नॉलेज सिटी ही ओळख आणखी पक्की झाली आहे.

  पण काही वर्षापूर्वी इथे निबिड जंगल होतं हे कोणाला सांगून तरी पटेल काय?

   गोष्ट आहे १७९९ची. ब्रिटीश तेव्हा मुंबईत स्थिरावले होते. त्यांनी रस्ते बांधले, 

बाजारपेठ उभी केली. कुलाबा ते परळ 

हा भाग शहर म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र परळच्या पुढे सायन पर्यन्तचा भाग मागासलेला होता. जंगलवजा खेडी होती. 

हा भाग विकसित करण्यासाठी ब्रिटिशांनी 

एक पद्धत शोधुन काढली होती.

गावे आणि आसपासची जंगले लीजवर द्यायची.

पवई आणि त्याच्याजवळचा भाग स्कॉट नावाच्या ब्रिटीश डॉक्टरला भाड्याने दिला होता. भाडं होत ३२०० रुपये. डॉक्टर एकदम साधेसुधे होते. खूप महत्वाकांक्षी नव्हते. पवईच्या जंगलातून मिळेल तेवढ उत्पन्न काढायचं एवढच त्यांचं ध्येय. 

आजारी पडल्यावर ते इंग्लंडला गेले. त्यांच्यानंतर या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही या जागेवर दावा केला नाही. अनेक वर्ष ही जागा पडीक राहिली.

अखेर १८२९ मध्ये पवईचे नशीब फिरले. *फ्रामजी कावसजी बानजी*  नावाच्या पारसी म्हाताऱ्याने सरकारकडे अर्ज केला की पवई आणि परिसर लीजवर मिळावा.

   तेव्हाचा मुंबईचा कलेक्टर जॉर्ज गिल्बर हा खूप धूर्त होता. त्याने सरकारला पवई भाडेतत्त्वावर देण्याची गरज नसल्याचं दाखवत फ्रामजी कडून लीजची रक्कम वाढवून घेतली, काही अटी घातल्या . त्या अटी देखील खूप गंमतीशीर होत्या. दहा वर्षाच्या अवधी साठी पवई भाड्याने मिळणार या काळात तिथे विहिरी, तलाव, पिण्याचे पाणी याची सोय करायची. तिथे दारू बनवली तर लोकल लोकांनाच विकायची. जंगल साफ करून शेती योग्य बनवायचे.


फ्रामजी कावसजी या सगळ्या अटीसाठी एका पायावर तयार झाले  आणि लवकरच ते पवईचे मालक बनले.

   त्यांनी खतं वापरून जमीन कसायला सुरवात केली. दरवर्षी एक याप्रमाणे 10 विहिरी बांधल्या. गावात धर्मशाळा उभारली, तलाव दुरुस्त केले. थोड्याच दिवसात त्याने इंग्रज सरकारकडून आणखी आसपास ची गावे मागून घेतली.

आज लोक मुंबईत स्क्वेअरफुट स्क्वेअर सेंटीमीटरवर घर घेतात अशा काळात फ्रामजी पवई ते साकीनाका चांदिवली विक्रोळी अशा महाप्रचंड भागाचा एकुलता एक मालक होता.

   ब्रिटीश खूप हुशार होते. त्यांनी फ्रामजीला ज्या अटी घातल्या होत्या त्यामुळे त्यांना जमिनीचा पैसा तर मिळतच होता शिवाय गावाचा विकास होऊन तिथल्या जनतेचा आशीर्वाद देखील मिळत होता. फ्रामजी सुद्धा धूर्त होता. त्याला माहित होते जर जास्त मेहनत केली नाही तर पवईची मालकी आपल्याला परवडणार नाही. त्याने एक हुशारी केली.

   पवईच्या साडेतीन हजार एकर परिसरात आंब्याची एक लाख कलमी रोपे लावली. अवघ्या तीन वर्षात ही रोपे बहरून आली. त्याला आंबे लगडू लागले. बॉम्बे मँगो या नावाने ते ब्रिटीश अधिकाऱ्यांच्यात फेमस देखील झाले. फ्रामजी कावसजीने तुफान पैसा छापला.

   इंग्रज पवईच्या आंब्यासाठी वेडे झाले होते. त्याच्या आंब्याची चर्चा इंग्लंड पर्यंत पोचली होती.

   फ्रामजीकडे व्यापारी डोके सुद्धा होतं. आपले आंबे देशातून बाहेर गेले तर जास्त पैसे कमवता येईल याची खुणगाठ त्याने बांधली होती, 

पण असे आंबे परदेशात विकणे सोपे नव्हते, आपण पारतंत्र्यात होतो.

   कोणतीही गोष्ट करायची झाली तर १०० नियम पार करावे लागायचे. फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजाला ते ती करंडी नेऊन ठेवली.

ते आंबे सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणी करता होते.

१८ में १८३८ साली भारतातून पहिली आंब्याची करंडी निर्यात झाली. इंग्लंडच्या राणीला देखील हे आंबे आवडले,  अस म्हणतात की व्हिक्टोरिया राणीच्या एका भारतीय सल्लागारामुळे तिला आंब्याबद्दलची उत्सुकता लागली होती. त्यानंतर मात्र ती या फळाची शौकीन बनली.

व्हिक्टोरिया राणीमुळे भारतीय आंब्याला परदेशी मार्केट खुले झाले. आजही कोकणचे हापूस आंबे जगावर राज्य करतात याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी बाबा!

   फ्रामजी कावसजी फक्त आंब्यावर थांबला नाही. त्याने पवईमध्ये मलबेरीची झाडे लावली, तिथे रेशीम उत्पादन सुरु केले, ऊस लावला, त्या उसापासून साखर निर्मिती साठी छोटा कारखाना देखील सुरु केला. उसाच्या मळीपासून दारू देखील गाळली जाऊ लागली.

आज जिथे सिमेंटची जंगले आहेत त्या पवईमध्ये फ्रामजीने उसापासून ते सफरचंदापर्यंत अनेक गोष्टींचं उत्पादन घेतलंय.

   पुढे वय वाढेल तसा फ्रामजीला विरक्ती वृत्ती आली. त्याच लक्ष पैसा कमवण्यापेक्षा मुंबईतील लोकांचं जगणे कसे सुसह्य होईल याची तो काळजी घेत होता. 

   *त्यानेच मुंबईमध्ये पहिली पाईपलाईन टाकली. फ्रामजीने गिरगांवातील  मुगभाटमध्ये एका मैदानात तीन मोठ्या विहिरी बनवल्या, त्यातून पाणी खेचण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा पंप लावला. शिवाय बैलानी ओढण्यासाठी चारचाकी गाडीही कामाला लावली. गिरगांवला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू लागले. तो पर्यंत मुंबईकरांना पाईपलाईन हा शब्दही माहित नव्हता.*

   इंग्रजांना जे जमलं नव्हतं ते फ्रामजीने केलं. त्याला तब्बल ३०००० रुपये खर्च आला.

आजच्या काळात त्याची किंमत काढली तर अब्जावधी रुपये होतील. पण फ्रामजीने मागेपुढे पाहिलं नाही. त्यानेच मुंबईमध्ये गॅसबत्तीची सोय केली.

   आज मुंबई भारतातील सर्वात अत्याधुनिक शहर आहे, लोक याच श्रेय इंग्रजांना देतात मात्र त्यांच्या बरोबरच काही भारतीय देखील होते ज्यांचा दूरदृष्टीपणा मुंबईला मोठ करून गेला यातील प्रमुख नाव म्हणजे *फ्रामजी कावसजी बानाजी*.

त्याच्या या कार्याच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये *धोबीतलावाला फ्रामजी कावसजी*  यांचं नाव देण्यात आले आहे.🌹

हनुमान चाळीसा .. एक सिद्ध स्तोत्र....*

 *हनुमान चाळीसा .. एक सिद्ध स्तोत्र....*


.हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का?

 नसेल तर जाणून घ्या

 कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल?

 

 सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात.

 पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.


 गोष्ट *इ.स. १६००* ची आहे* हा काळ *अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.


 एकदा तुलसीदास जी मथुरेला जात होते, रात्री होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला, लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत.


 हे ऐकून

 त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.

 सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे?


 तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, त्याने रामचरितमानसचा अनुवाद केला आहे.

 हे रामभक्त तुलसीदास जी आहेत.

 मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.


 अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे, असे सांगितले.


 सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.


 हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?

 त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.


 हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले.

 आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ला आणण्याचा आदेश दिला.


 तरी

 बिरबलाने अकबराला असे नकरण्याचा सल्ला दिला.

 पण अकबराला ते मान्य नव्हते

 आणि तुळशीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.


 तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करा.


 तुलसीदासजी म्हणाले-

 मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.


 हे ऐकून अकबर संतापला.

 आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.


 दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.


 लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे?

 तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते.

 पण तू सहमत नाहीस

 आणि करिश्माला बघायचं असेल तर बघ.


 अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले. आणि

 साखळ्या उघडल्या गेल्या.

 तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे.


 मला अंधारकोठडीतील भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली.

 मी रडत होतो.

 आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.

 हे 40 चतुर्भुज,

 *हनुमान जी* यांच्या प्रेरणेने लिहिलेले.

 तुलसीदास जी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि हे पाठ करतो, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. काढले.


 ती *हनुमान चालीसा* म्हणून ओळखली जाईल.


 अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितलीआणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन, लव-लष्कर मथुरेला पाठवले.


 आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत.

 आणि

 या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे.

 आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.

 म्हणूनच हनुमानजींना "संकट मोचन" असेही म्हणतात.

 

CREDIT - Dattamaharaj 👈👈👈


टीप - ( सदर पोस्ट @Dattamaharaj या फेसबुक पेजवरून घेतली आहे त्यामुळे या लेखनाच श्रेय त्यांना जात)

-----------------

*ज्ञान ,मनोरंजन, माहिती, यासारख्या update मिळविण्यासाठी join करा..*

*सहेली.. शब्द प्रांगण Whatsapp group 3*


https://chat.whatsapp.com/EuwJswnmmQz0ViF1KrByT7

*किंवा* 

*सहेली.. शब्द प्रांगण Whatsapp Group 2:*


https://chat.whatsapp.com/KDdHQJXdx4H7wK41nRyUDM


*किंवा*

*सहेली.. शब्द प्रांगण*

*WhatsApp Group 1*:

https://chat.whatsapp.com/I7EOMYxcLeg9V5EOqzNR54

मूत्राशय गुदमरल्यास...* ________________ मूत्राशय भरले आहे,

 *मूत्राशय गुदमरल्यास...* ________________

 मूत्राशय भरले आहे,

 आणि लघवी होत नाही,

 किंवा लघवी करता येत नाही. मग काय करायचं?? 

 हा अनुभव आहे एका प्रख्यात ॲलोपॅथी फिजिशियन 70 वर्षांच्या *ईएनटी* तज्ञाचा.

 चला ऐकूया अनोखा अनुभव..

 एके दिवशी सकाळी त्याला अचानक जाग आली. त्याला लघवी करणे आवश्यक होते, परंतु तो करू शकत नाही (काही लोकांना ही समस्या नंतरच्या वयात होते). त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, पण सलग प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा त्याला समजले की एक समस्या निर्माण झाली आहे.

 डॉक्टर असल्यामुळे अशा शारीरिक समस्यांपासून ते अस्पर्शित नव्हते; त्याचे खालचे पोट जड झाले. बसणे किंवा उभे राहणे कठीण झाले, खालच्या ओटीपोटात दाब वाढू लागला.

 होईल.

       मोठ्या कष्टाने त्याने आपल्या मित्र डॉक्टरला परिस्थिती सांगितली.

 त्या मित्राने सांगितले :- *"अरे, तुझे मूत्राशय भरले आहे. आणि प्रयत्न करूनही तुला लघवी करता येत नाही... काळजी करू नकोस. मी सांगतो तसे कर. या त्रासातून सुटका मिळेल."*

 आणि त्याने सूचना दिली:-

  *"सरळ उभे राहा आणि जोमाने वारंवार उडी मारा. उडी मारताना, झाडावरून आंबा तोडल्यासारखे दोन्ही हात वर ठेवा. हे 10 ते 15 वेळा करा."*

 डॉक्टरांनी विचार केला: "काय? मी खरोखर या स्थितीत उडी मारू शकेन का? उपचार थोडे संशयास्पद वाटले. तरीही डॉक्टरांनी प्रयत्न केला...

 3 ते 4 वेळा उडी मारल्यावरच त्याला लघवी करण्याची इच्छा जाणवली आणि त्याला आराम मिळाला.

  इतक्या सोप्या पद्धतीने समस्या सोडवल्याबद्दल त्याने आपल्या मित्र डॉक्टरचे आनंदाने आभार मानले.

 अन्यथा, त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असते, मूत्राशयाच्या चाचण्या, इंजेक्शन्स, अँटीबायोटिक्स इत्यादी तसेच कॅथेटर घालावे लागले असते… त्याच्यावर आणि त्याच्या जवळच्या लोकांसाठी मानसिक तणावाबरोबरच लाखोंचे बिलही आले असते.

 *कृपया ज्येष्ठ नागरिकांसोबत शेअर करा. हा असह्य अनुभव असलेल्या प्रत्येकासाठी हा एक सोपा उपाय आहे....* 

 *कृपया हे शेअर करा*


*श्री स्वामी समर्थ*

रविंद्र आहीरे आयुर्वेदाय

Featured post

Lakshvedhi