Saturday, 30 September 2023

४ दिवसांच्या रत्न -आभूषण प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते मुंबईत उद‌्घाटन

 ४ दिवसांच्या रत्न -आभूषण प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते मुंबईत उद‌्घाटन






रत्न आभूषण उद्योगात महिला उद्योजकांना येण्यास प्रोत्साहन द्यावे: राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबई, दि. 30 : दागदागिन्यांच्या ग्राहक व आश्रयदात्या अधिकांश महिला आहेत. तरी देखील रत्न आभूषण  उद्योग क्षेत्र आजही पुरुष प्रधान आहेहा विरोधाभास आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुढे येत असतांना रत्न आभूषण उद्योग क्षेत्रात येण्यासाठी महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.      

            जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमुंबई येथे चौथ्या रत्न व  आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते आज करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.  

            यावेळी आयोजक संस्था 'ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल'चे अध्यक्ष सैयम मेहराउपाध्यक्ष राजेश रोकडेमाजी अध्यक्ष आशिष पेठेपु.ना. गाडगीळ आणि सन्सचे सौरभ गाडगीळसेन्को गोल्डचे शुभंकर सेन तसेच रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

            रत्न व आभूषण उद्योग जगातील सर्वाधिक जुन्या उद्योगांपैकी असून या उद्योगाचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता  असून स्वित्झर्लंडने ज्या प्रमाणे घड्याळाच्या निर्मितीमध्ये नाव कमावले आहे त्याप्रमाणे भारताने रत्न आभूषण उद्योगामध्ये जगात नाव कमावले पाहिजेअसे राज्यपालांनी सांगितले.

            दुबई शॉपिंग फेस्टिवलप्रमाणे मुंबईचा देखील शॉपिंग फेस्टिवल सुरु करावा व या कामात रत्न आभूषण उद्योगाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना राज्यपालांनी केली.  रत्न आभूषण क्षेत्रातले कामगार या उद्योगाचा कणा असून त्यांच्या कल्याणासाठी तसेच आरोग्य व सुरक्षेसाठी रत्न आभूषण परिषदेने लक्ष द्यावेअसेही राज्यपालांनी सांगितले. नैतिकता व प्रामाणिकपणा हा उद्योगाचा दागिना आहे असे सांगून रत्न आभूषण उद्योगाने नीतिमत्ता कसोशीने जपावी, अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली. 

            भारतातील कारागिरांनी हाताने बनवलेली आभूषणे जगात उत्कृष्ट आहेत. या उद्योगाची उलाढाल आज ७ लाख कोटी रुपये इतकी असून पुढील काही वर्षात ती १० लाख कोटी रुपये होईल, असा विश्वास अध्यक्ष सैयम मेहरा यांनी व्यक्त केला. या क्षेत्रातील उद्योजकांच्या जीएसटीकस्टम संबंधी अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  रत्न आभूषण उद्योग प्रदर्शनामध्ये ७०० स्टॉल्स असून ७०,००० व्यापारी सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

            यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनाला भेट दिली व उद्योजकांशी संवाद साधला. राज्यपालांच्या  हस्ते यावेळी 'जीजेसी कनेक्ट'  विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रदर्शन दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे.

0 0 0

दि. 30 सप्टेंबर, 2023

वृत्त क्र.3242

 

 


हृदय विकार? प्राथमिक उपचार


 

पर्यटन, तिर्थ क्षेत्रं सावधगिरी बाळगा

 



रविवार को प्रदेश भर में स्वच्छता के लिए ‘एक तारीख एक घंटा’

 रविवार को प्रदेश भर में स्वच्छता के लिए ‘एक तारीख एक घंटा’


मुख्यमंत्री ने सभी से इस गतिविधि में भाग लेने की अपील की


 


            मुंबई, दि. 30 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपील की है कि हम स्वच्छता के लिए रविवार 1 अक्टूबर को ‘एक तारीख एक तास’ पहल में स्वस्फूर्त रूप से भाग लें और महाराष्ट्र को देश में स्वच्छता में शीर्ष स्थान पर लायें।


            राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती के अवसर पर केंद्र सरकार ने प्रदेश के शहरों और ग्रामीण क्षेत्रों में ‘एक दिन एक घंटा’ गतिविधि का आयोजन किया है और नागरिकों को सफाई कर इस अभियान में भाग लेना है. यह सफाई अभियान सुबह 10 बजे से गांव के साथ-साथ शहर के हर वार्ड में शुरू होगा. इसमें सफाई मित्र भाग लेंगे।


            अपनी अपील में मुख्यमंत्री ने कहा है कि 'एक तारीख एक घंटा' पहल को स्वच्छता आंदोलन का रूप देना है. इसके लिए सभी को अपना एक घंटा स्वच्छता के लिए देना होगा। आप, आपका परिवार या सहकर्मी जहां भी हों, आपको इस अभियान में योगदान देना है। मुख्यमंत्री ने कहा कि नगर निगम, नगर पालिका, नगर पंचायत के साथ-साथ ग्राम पंचायतें अपने-अपने क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएंगे और स्थानीय स्व-शासन निकाय, राजस्व और जिला प्रशासन मदद के लिए तैयार रहेंगे।


            इस अभियान के बाद 15 दिसंबर 2023 तक मुख्यमंत्री सक्षम शहर प्रतियोगिता और मुख्यमंत्री सक्षम वार्ड प्रतियोगिता को भी सफल बनाने की योजना है। मुख्यमंत्री भी अपनी अपील में कहते हैं, आइए महाराष्ट्र को कचरा मुक्त बनाएं। आइए इसे स्वच्छ और सुंदर बनाएं। आओ स्वच्छता के लिए जागरण क

रें.


0 0 0


रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’

उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

 

            मुंबईदि. 30 : - स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या रविवार 1 ऑक्टोबर रोजीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देऊयाअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

 

            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा  उपक्रम केंद्र शासनाने आयोजित केला असून  नागरिकांनी  स्वच्छतासाफ-सफाई करून या अभियानात सहभागी व्हायचे आहे. गाव तसेच शहरातल्या प्रत्येक वार्डात  सकाळी 10 वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील.

 

            मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की,  की ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपणआपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असालतिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे. आपआपल्या परिसरात महापालिकानगरपालिकानगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची असून स्थानिक स्वराज्य संस्थामहसूल आणि जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज असेल असेही मुख्यमंत्री म्हणतात.

 

            या अभियानानंतर 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छसुंदर करूया. स्वच्छतेचा जागर करूयाअसेही मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात.

0 0 0

                                         


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

 

            मुंबई, दि. 30 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश  अण्णा महानवर यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश  महानवर यांची नियुक्ती केली.

 

            डॉ. प्रकाश महानवर (जन्म : 01.06.1967) सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत.

 

            डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा कार्यकाळ 5 मे 2023 रोजी संपल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते.  त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

 

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

 

            विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. सुरेशकुमार  (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

 

            समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

0 0 0

  

कांदा उत्पादन, खरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -केंद्रीय वाणिज्य मंत्री, पियुष गोयल

 कांदा उत्पादनखरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

-केंद्रीय वाणिज्य मंत्रीपियुष गोयल

 

कांदा उत्पादक शेतकरीगरीब व मध्यमवर्ग सगळ्यांच्या

हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न

                                                                 -पणनमंत्री अब्दुल सत्तार

 

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

 

 

 

            नवी दिल्ली,29: कांदा उत्पादनखरेदी तसेच विक्री दराविषयी 140 कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिल्याची माहिती  राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

 

            नाशिक जिल्ह्यातील व्यापारांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढण्यासाठीकृषी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारराज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तारनाफेड संस्थेचे अपर व्यवस्थापकीय संचालक  एस.के.सिंगएनसीसीएफ चे व्यवस्थापकीय संचालक ॲनीस जोसेफ चंद्राकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजाग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे आर्थिक सल्लागार डॉ कामखेथेंग गुईटे उपस्थित होते.  

 

            गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारांच्या समस्या सुरु आहेत. या समस्येच्या निदानासाठी केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांच्यासमवेत मुंबई येथे बैठकाही पार पडल्या होत्या.  यासंदर्भात कृषी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

            यावेळी पणन मंत्री श्री सत्तार यांनी व्यापारांच्या समस्या संदर्भात तातडीने लक्ष घालून हा विषय सोडविण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल केंद्रीय मंत्री श्री गोयल यांचे आभार मानले. कांदा उत्पादक शेतक-यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नयेयासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी  प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र शासनाने हजार 410 रूपये प्रतिक्विंटल दराने नाफेड  आणि एनसीसीएफ मार्फत लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन्ही संस्थांकडून अत्यंत कमी प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून,नाफेड तसेच एनसीसीएफ या संस्थांनी प्रत्येकी एक-एक लाख टन कांदा आणखी खरेदी करण्याबाबत केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती मंत्री श्री सत्तार यांनी यावेळी दिली. आता 400 कोटी रूपयांची आणखी कांदा खरेदी करण्यात येईल. कुठल्याही परिस्थिती मध्ये गरीब शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नाहीअसे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

            सरकारच्या मागणीप्रमाणे ज्या ज्या भागात कांदा शिल्लक असेल तिथे माल खरेदीला परवानगी दिली जाणार. तसेच नवीन कांदा खरेदी केंद्र उभारले जातील. याबाबत मार्केटिंग फेडरेशनने देखील सहमती दर्शवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कांदा खरेदी व खरेदी केंद्रांबाबत शासनाकडून दररोज वर्तमानपत्रात जाहिरातीव्दारे माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

 

            केंद्र शासनाने कांद्यासाठी ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे आणि ते कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांची मागणी होती. याबाबत केंद्र शासनाकडून उच्चस्तरीय समितीने दिलेल्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.सत्तार यांनी दिली. तसेच कांदा उत्पादन शेतकरी व ग्राहकांची गैरसोय  टाळण्यासाठी व्यापारांनी लिलाव बंदी चा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी केद्र सुरु करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

 

            यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या कीकेंद्र सरकार देशातील जनतेचा विचार करुन  निर्णय घेत असते. ज्यावेळी कांद्याचे दर वाढतात किंवा कमी होतात त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी नाफेड संस्थेची मदत घेण्यात येते. १४० कोटी जनतेचा विचार करुन निर्णय घेतले जातात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी ग्राहक हित आणि शेतकरी हित ही पाहिले जाते.

 

00000000000

 

 

 

 

 

 

 

 


Featured post

Lakshvedhi