Sunday, 17 September 2023

किडनी स्टोनसाठी काही घरगुती सोपे उपाय करा.....*

 *किडनी स्टोनसाठी काही घरगुती सोपे उपाय करा.....*


*१) तुळस. तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशीची पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित.*


*२)  कुळीथ.  रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळीथ पाण्यात भिजवून ते सकाळी कुस्करून व गाळून  २-३ महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो.*


*३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेली आणून त्या जाळून त्याची राख मधातून घ्यावि. स्टोन लवकर  विरघळतात.*


*४) काकडीचे मगज, ज्येष्ठमध व दारूहळदीचे चूर्ण तांदळाच्या धुवणासोबत घेतल्यास स्टोन विरघळून  बाहेर पडतात.*


*५)  हळद व एक वर्षापूर्वीचा गूळ नियमित खाल्यास स्टोन तुटुन बाहेर पडतो.*


*६)  कडुलिंबाच्या पानाची राख २ ग्रँम पाण्यासोबत नियमित खाल्यास मूतखडा विरघळतो.*


*७)  जर खडा लहान असेल तर मेहंदीचे साल वाटून चूर्ण करावे व  सकाळी अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.*


*८) पुनर्नवासव, चंद्रप्रभा वटि घ्यावी.*


*९) पाषाणभेद वनस्पति व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण २ ग्रँम रोज  एक वेळ सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत द्यावे.*

 *त्यानंतर ४-५  तास काही खाऊ पिऊ नये.*


(बरेच लोक घरगुती उपाय करत नाहीत सध्या च्य बिझी वेळेत शक्य होत नाही त्यामुळे आपल्याकडे आपण एक औषध बनवलेले आहे मुतखडा यावर या औषध चे सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यात सेवन केलात की ८ दिवसात मुतखडा पूर्णपणे निघून जातो) 


*मुतखडा(किडनी स्टोन) वरील औषध ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा*

*प्रणय गंगाधर मोहिते*

 8928767165


*अधिक माहितीसाठी खाली लिंक जॉईन करा आणि भरपूर लोकांना शेअर करा*

https://chat.whatsapp.com/DnDQeceqFMf2vZvkKQ6omV

विभागसिल्लोड येथे दिवाणी न्यायालय

 विधी व न्याय विभागसिल्लोड येथे दिवाणी न्यायालय

सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या न्यायालयासाठी 16 नियमित पदे आणि 4 बाह्य यंत्रणेद्वारे पदे उपलब्ध करून देण्यात येतील.

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय

 परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय

कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाबैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतेयासाठी 132 कोटी 90 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

मौजे जिरेवाडी येथे 60 विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय सुरु करण्यात येईलयासाठी 16 शिक्षक आणि 24 शिक्षकेत्तर पदे निर्माण करण्यात येतीलयासाठी एकूण 132 कोटी 89 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

परळी वैजनाथला सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्रसोयाबीन उत्पादनास गती येणार

 परळी वैजनाथला सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्रसोयाबीन उत्पादनास गती येणार


परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे सोयाबीन उत्पादनास गती येईल.


मौजे जिरेवाडी येथील शासकीय जमिनीवर हे प्रशिक्षण व प्रक्रीया उपकेंद्र सुरु करण्यात येईल. या उपकेंद्रामध्ये एकूण 15 पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी 24 कोटी 5 लाख रुपये निधीस मान्यता देण्यात आली. सोयाबीन हे मराठवाड्यातील महत्त्वाचे पीक असून देशात 120.90 लाख हेक्टर क्षेत्रावर तर महाराष्ट्रात 49.09 लाख हेक्टर आणि मराठवाड्यात 24.87 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड होते. बीड जिल्ह्यात सोयाबीनखाली 3 लाख हेक्टर जमीन आहे. या उपकेंद्राच्याद्धारे सोयाबीनच्या विविध वाणांची निर्मिती करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेण्यात येतील.


-----0-----

देशी गायी-म्हशींमध्ये भृणप्रत्यारोपणासाठी फिरती प्रयोगशाळा स्थापन करणार

 देशी गायी-म्हशींमध्ये भृणप्रत्यारोपणासाठी

फिरती प्रयोगशाळा स्थापन करणार

            गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी गायी-म्हशींमध्ये भृण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात निर्माण करण्याकरीता फिरती प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            विदर्भमराठवाडापुणे विभाग आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी अनुक्रमे अकोलाऔरंगाबादपुणे आणि अहमदनगर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार OPU-IVF & ET प्रयोगशाळा स्थापन करण्यात येतील. या तीन प्रयोगशाळांसाठी एकूण रु.1802.72  लक्ष इतका निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यास येईल.

लाल कंधारी, देवणी या देशीगोवंशाचे जतन करणार

 लाल कंधारी, देवणी या देशीगोवंशाचे जतन करणार

लाल कंधारी व देवणी गोवंश प्रजातीचे जतन  व संवर्धनाकरिता अंबेजोगाई तालुक्यातील मौजेसाकुड येथे  पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन  प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

लालकंधारी व देवणी या देशी गोवंशाचे मूळ पैदास क्षेत्र मराठवाड्यात असून,सदर गोवंशाचे अस्तित्व मराठवाड्यातीललातूर,बीड,उस्मानाबाद,परभणी,औरंगाबादया  जिल्ह्यात आहे.या स्थानिक जातींचे वैशिष्ट्येम्हणजेसदर जातीया दूध उत्पादन व  नर पशुधन शेतीकामासाठी उपयुक्त आहेतमात्र 2013 मध्ये लाल कंधारी गायींची संख्या 1,26,609 इतकी होती ती 2020 मध्ये  1,23,943 इतकी कमी झाली आहे. तसेच 2013 मध्ये देवणी गायींची संख्या 4,56,768 वरुन सन 2020 मध्ये  1,49,159 इतकी कमी झाली आहे. सदर प्रजातींचे महत्व विचारात घेऊन सदर जातींचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

साकुड पशुपैदास प्रक्षेत्रासाठी 13 नियमित पदे व 37 इतकी पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येतील.  पशुधनासाठी चारा, पशुखाद्य, औषधी तसेच विज,पाणी यासाठी दरवर्षी6 कोटी  इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार

 सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत सौर ऊर्जा कुंपणाच्या किंमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपये या पैकी जी कमी असेल अशी रक्कम थेट हस्तांतरण (डीबीटी) पदध्तीने अनुदान स्वरुपात देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेसाठी २०२३-२४ साठी अर्थसंकल्पीत शंभर कोटी रुपयांपैकी साठ कोटी रुपयांची तरतूद सौर ऊर्जा कुंपणाकरीता करण्यात आली आहे.

वनक्षेत्राचे प्रभावी संरक्षण झाले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु, त्याचबरोबर मानव-वन्यजीव संघर्ष विशेषत: शेती-पिकांच्या नुकसानीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. वन्यजीवांमुळे शेतपिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना पिकाचे रक्षणाकरीता रात्रीच्या वेळी शेतावर पिकाचे संरक्षण करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय तर होतेच पण वन्यजीवांच्या हल्ल्याचा धोकादेखील असतो. त्यासाठी सौर कुंपण उपयुक्त ठरते.

-----0-----


Featured post

Lakshvedhi